Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ६४.
१७०१ माघ व॥ ७ श्री. २६ फे. १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. नवाबबहादर यांसीं आहाद शर्तीनर्सी पक्का सलूख व सफाई जाल्याचा लौकीक फार जाला. इंग्रजाचे तंबीची मसलतही थोर, त्यांत नफेही तसेच, असें जाणून नवाबबहादर यांचे मर्जीनरूप करारनामा व पत्रें पाठविलीं. परंतु, सरकारांत पांच साहा वर्षांचा खिसारा. हें नवाबांस माहीत नाहीं ऐसें नाहीं. याजकरितां पंधरा लाखांची तर्तूद नवाबांनीं करविली, त्याप्रमाणें आईंदे सालचे बारा, एकूण सत्तावीसांचा भरणा व्हावा. पुढें बारा मजुरा द्यावे. चिंता नाहीं. यांत नुकसानीही नाहीं. इकडील मोहीमेच्या कामावर ऐवज पडेल. यास्तव तुह्मीं व राजश्री नरसिंगराव व गोविंदराव मिळोन नवाबांसी बोलोन, लिहिल्याप्रमाणें घडवावें. नवाबबहादर ही याविशीं नाहीं ह्मणणार नाहींत. स्नेह जाहाला, त्यापक्षीं करणें उचित आहे. र॥ छ २० सफर. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ६३.
१७०१ माघ व॥ ७ श्री. २६ फे. १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामीचे सेवेसीः-
विनंति उपरी. मानाजी फांकडे बदमामली त्यास निरोप दिल्हा. सटवोजी भोंसले यांस लिहिलें तो बलखुद राहील, ऐसें नवाबबहादूर बोलले ह्मणोन लिहिलें. एसियास, फांकडे व भोंसले कितुरकर ऐसे जमून लबाड्या करितात. दासाजी सिंदे ही त्यांतच आहेत. मुलूक खराबा करितात. सबब, त्यांजवर फौजा पाठविल्या आहेत. कितुरकर आदिकरून पारपत्य केलें जाईल किंवा नाहीं ? नवाबबहादूर यांचा तालुका लगता. त्यास, कोणी गेल्यास आश्रा न व्हावा, ऐसी सर्व अमीलास नवाबबहादर यांची ताकीद असावी. *र।। छ २० सफर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ६२.
१७०१ माघ व. ७ श्री. २६ फे. १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. इकडील राजकी वर्तमानः- दादासाहेब सुरतेंतच आहेत. त्यांजकडून इंग्रज व कांहीं फौज येऊन डबई घेतल्याचा मजकूर पेशजीं लिहिलाच होता. त्यावर, राजश्री माहादजीराव सिंदे व होळकर व भारी तोफखानासुधां कोंडाईबारीचा घांट उतरोन पलिकडे खडकाबाहेरा येथें जाऊन पोहचले. तेथून सुरत वीस कोस आहे. इंग्रजांनीं डबई घेतल्यावर बडोद्यांत फत्तेसिंग गायकवाड यांचे कबिले होते, ते गायकवाड यांनी काढून, तेथून सिंदे यांजकडील पावागड कच्चे वीस कोस आहे तेथें गेले. सिंदे यांस व पायागडास तफावत पन्नास कोसांची आहे. इकडील भारी फौज गेली याजमुळें गायकवाड यांन्हीं हिम्मत चांगली धरली आहे व इंग्रजही आपले जागां अंदेशांत पडले आहेत. गायकवाड व सिंदे होळकर एक जाल्यावर लढाईही सुरू होईल. आज उद्यां वर्तमान येतांच मागाहून पाठविलें जाईल व आनंदराव यांस सांगोन नवाबबहादुरांस बातमी लेहून पाठऊं. इंग्रजास हरत-हेनें मैदानांत काढावें, याच तजविजेंत सिंदे होळकर आहेत. र।। छ २० सफर. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ६१.
१७०१ माघ शु.४ श्री. ९ फे. १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी नवाब बसालतजंग यांजकडील वकील पट्टणीस आहेत. अदवानीचा जाबसाल होत आहे. त्यास, नवाबबहादर त्यांस पन्नास हजार होन दरसाल मागतात, ह्मणोन कळलें. ऐसियास, ही गोष्ट कांहीं करारांत नाहीं कीं, पैका मागावा. यास्तव लिहिलें असे. तरी तुह्मीं व राजश्री गोविंदराव व नरसिंगराव एकत्र होऊन, नवाबबाहदर यांस बोलावें कीं, पैका कांहीं त्यांस न मागतां, अदवानीचा हांगामा जलद मना व्हावा. यांत रावपंतप्रधान यांचा संतोष; आणि करारांतही असेंच आहे. विषय ही भारी नाहीं. पन्नास हजारांवर व लाखावर नजर राखावी, हेंही ठीक नाहीं. मोठे मसलतीवर दृष्ट देऊन, पैक्याचें कांहीं न ह्मणतां, आधीं हांगामा मना व्हावा. नवाब बसालतजंगबहादूर यांत कांहीं ताकद व हाल राहिला नाहीं. तालुका मारून तारबतार जाला; व वसूलही बहादरांकडील अमीलांनीं फार केला. मुलकांत वसाहात नाहीं. यास्तव, पत्र पावतेक्षणींच पैक्याची बाबत कांहीं न ह्मणतां, हांगामा दूर होय, तो अर्थ आधीं करावा. मुदगल तालुकियास नवा उपसर्ग जाला आहे, तो मना व्हावा. जमेदार लबाड्या करून गैरवांका नवाबबाहदर यांजकडील अमीलास समजावितात. यास्तव गजिंद्रगडकरी वगैरे बहादरांकडील तालुकदार यांस पत्रें घेऊन पाठवावीं कीं, जमेदार यांचें सांगणें तुह्मीं न ऐकतां, सर्व प्रकारें मुदगलकर यांचें साहित्य करीत जाणें. तालुकियास कोणेविशीं इजा न देणें. ह्मणोन निक्षूण नवाबबहादर यांच्या ताकिदी घेऊन पाठवाव्या. अदवानीचा उपसर्ग खंडणीचें कांहीं न ह्मणतां, आधीं मना होऊन, बहादर यांचें जाणें चेनापटणाकडे सत्वर व्हावें. दिवस ऐन आहेत. इतक्या गोष्टीस एक दिवसाची ढील न करावी. र॥ छ ३ सफर. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ६०.
श्रीशंकर. फेब्रुवारी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गणेशपंत केळकर दि॥
तात्या जोशी सातारकर स्वामी गोसावी यांसिः-
सेवक कृष्णराव नारायण जोशी नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल ता। माघ शु।। मु॥ श्रीरंगपट्टण जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. आह्मीं आलिया त।। तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तेणेंकरून चित्त सापेक्षित असे. ऐसें न करणें. इकडील वर्तमान तरीः- हरिहरचे मुकामाहून पत्र बागलकोटास प।। होतें. तेथून राजश्री मल्हारपंत याणीं आपले जासुदासमागमें तुह्मांकडे पत्रें पाठविलींच असतील. त्यांवरून अलीकडे आह्मीं दरमजल पौश शु॥ एकादशीस मु॥ मजकुरीं दाखल जाहालों. नवाबसाहेब यांची भेट जाहली. दुसरे दिवशीं मेजमानीचा सिदा सर्वांस व कांहीं नख्त खर्चास प।।. एक दोन रोजानी दोन तीन बैठकींत बोलणेंही जाहलें. त्यांस, श्रीमंतांकडील तहनाम्याची यादी आणिल्या होत्या, त्यांपैकीं दोन तीन कलमें यांस तपसील लागला. तेव्हां येथून नवाबांनीं नवा मसुदा करून दिल्हा. या प्रो। तेथून करारनामा आणवावा. ह्मणजे कराराप्रो। ऐवज तुह्मांस मोघम देऊन तुमची रवानगी करून देऊन, आह्मीं चेनापट्टणाकडे इंग्रजावर मसलतीस नमुद होतों. या प्रो। बोलणें जाहलें. कदाचित् तक्रार केलियास निरोपही देतात, हो अर्थ चित्तांत आणून, येथील सविस्तर मजकुराची पत्रें लिहून, मसुदे व पत्रें, सांडणीस्वारांची जोडी आपले सरकारची आली होती, त्यासमागमें पुणियास पत्रांची रवानगी केली आहे. त्याबरोबर तुह्मांसही पत्र प।। आहे, तें तीर्थस्वरूप राजश्री आपाकडे पावेल. ते तुह्मांकडे रवाना करतील. पुण्याचे पत्रांचीं उत्तरें सरकारचीं येत तों पावेतों आमचें राहणें जाहलें. शिवरात्रीस आमचें येणें होत नाहीं. आह्मांविषयीं चिंता तुह्मीं तिलप्राय करूं नये. नवाबसाहेब बहुत लोभ ममता करितात. थोडेबहुत अलीकडे नको ह्मणत असतां, आग्रह करून खर्चासही दिल्हें. कृपेंत किमपि अंतर नाहीं. पुणियाहून पत्रें नवाबसाहेब यांचे मुद्यामाफूक आलियास सरकारचे जाबसाल अमलांत आणून येत असों. कदाचित् उत्तरें समर्पक नच आलीं, तरी येथून यांची आज्ञा घेऊन सत्वरेंच येतों. निरोपाविसीं किमपी गुंता पडावयाचा नाहीं. श्रीसांबजीचा शिवरात्रीचा उत्साह यथासांग सालाबाद प्रो। करणें. आह्मीं घरीं नाहीं, ह्मणोन उणें पडों न द्यावें. वरकड सर्वांस नमस्कार सांगावा. बहुत काय लिहणें लोभ कीजे हे विनंति.
तीर्थस्वरूप राजश्री आबा दीक्षित मामा यांसी साष्टांग नमस्कार विनंति. लि।। परिसोन लोभ करावा. हे विनंति.
सेवेसीं बाळाजी दत्तात्रेय व गोपाळ गणेश बेडेकर सां। नमस्कार.
तीर्थरूप मातुश्री ताई व आत्याबाई यांसि सां। नमस्कार.
पैवस्ती शके १७०१ फा॥ शु॥ १ शुभवार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ५९.
८ फेब्रुआरी १७८०. श्री. १७०१ माघ शु॥ ३.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
पो। बाळाजी जनार्दन सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः- नवाबबसालत जंग बाहादर यांचे वकील पट्टणास आहेत, त्यांसी नवाबबाहदर पन्नास हजार होन मागतात, ह्मणोन कळलें. ऐसियास, त्या पासोन पैका घ्यावा, मग उपद्रव मना करावा, ऐसे करारांत नाहीं. आणि मुलकांतही कांही ताकत राहिली नाहीं. तमाम मारून ताराज जाला व वसूलही बहादरांकडील अमीलांनीं नेला. याज करितां पैक्याचें कांहीं ह्मणावें ऐसें नाहीं. मसलत मोठी आहे. यास्तव यासच अटकून लाख पन्नास हजारांवर नजर ठेवावी, ऐसें नाहीं. तुह्मीं व राजश्री नरसिंगराव व गोविंदराव नवाबबहादूर यांसीं बोलोन, ऐवजांचे कांहीं न ह्मणतां, कराराप्रमाणें अदवानीचा उपद्रव लौकर दूर व्हावा, हें जरूर करावें. बहादरांचें जाणें चेनापट्टणाकडे जलद घडावें. अलीकडे मुदगल तालुकियांत नवीन हांगामा बहादरांकडील अमीलांनीं शुरू केला, ह्मणोन कळलें. त्यास, नवाबबहादर यांसी एविशीं बोलोन, गजिंद्रगडकरी वगैरे यांस पत्रें द्यावीं कीं, मुदगल तालुकियास कोणेविशीं उपद्रव न देणें. जमेदार वगैरे कोणी तुह्मांकडे आल्यास, त्यास आश्रा न देणें. मुदगलकरांचेंच साहित्य करीत जाणें. ऐसीं निक्षूण पत्रें घेऊन, आधीं इकडे पाठवणें. याच शुतर स्वाराबरोबर पत्रें घेऊन पाठवावीं. सारांष, अमीरुलउमराव यांस पैक्याचें कांहीं न ह्मणतां, अदवानीचा उपद्रव दूर करवावा. थोड्यासाठीं वांकडें न दिसावें. विषयही कांहीं बहुत नाहीं. श्रीमंतांचे मर्जीकरितां अदवानीचा हांगामा दूर करून, अमीरुलउमराव यांसीं सलूखच करितों, ऐसें पेशजी नरसिंगराव यांस बहादरांनीं लिहिलें होतें, त्याप्रमाणेंच करावें. पैक्याविशीं कांहीं न ह्मणावें. हें सत्वर घडावें. *र॥ छ २ सफर. बहुत काय लिहिणे ? लोभ असो दीजे. हे विनंति.
पै॥ छ १७ सफर, सु॥ समानीन. गुरुवार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ५८.
१७०१ माघ शुक्ल २. श्री. ७ फेब्रुआरी १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:–विनंती उपरी. नवाब निजामआली खांबहादर यांचा व सरकारचा प्राचीन स्नेह. इंग्रजास तंबी कर्ण्याचे मसलतीस सर्वप्रकारें अनकूल, टोपीकरास तंबी करावी हे सर्वांची मसलत ठरली. त्याप्रमाणें आपलाले कामास लागावें, तें राहून, नवाबबहादूर यांणीं अदवानीसच जकड बसविली. सबब नवाब मवसूफ विच्यारांत पडले. मसलती होऊं लागल्या कीं, नामूस सर्वांस लागला. पुढें कसें करावें ? इंग्रजाकडून वकीलही भागानगरीं आहेच. राजकारणें चालूं लागलीं. तेव्हां इकडून खातरजमेनें लिहिलें कीं, वकील पट्टणास गेले. सर्वांची मसलत एक होऊन, टोपीकराची चाल खुषकींत फार जालीः त्यास तंबी करावी ऐसी जाली. तेव्हां अदवानीचा हांगामा नबाब बहादर, मना करवितात. आपण खातरजमेन असावें. ऐसें पक्कपणें दोन च्यार वेळां त्यांणीं निशा पडे ऐसें लिहिलें. तेव्हां त्यांचें उत्तर आलें कीं, अदवानीचा हांगामा मना होय, तोंपर्यंत आह्मीं सिकाकोलीकडे जात नाहीं. त्याउपरी आणखीं त्यांचीं पत्रें आलीं कीं, तुह्मी खातरजमा करून लिहितां, त्याप्रा। कांहींच अमलांत येत नाहीं. उलटें, मुदगल तालुकियास नवा उपसर्ग जाला. दिवसेंदिवस अधिक होतें. आह्मी, तुह्मीं खातरजमा करून लिहिलें, त्यावर स्वस्त. पुढें विचार काय ? ऐसीं लिहिलीं येतात. त्यावरून हालीं मुजरद सांडणीस्वार जोडी पाठविली आहे. तरी, तुह्मीं नवाबबहादर यांसी बोलोन, करारप्रा। आदवानीचा उपद्रव आधीं मना करवावा. आह्मीं खातरजमा करून नवाब निजामआलीखां यांस लिहिलें व लिहितों, त्याप्रों। घडावें. सारांष, केल्या करारांत अंतर न यावें. दिवसगत न लावितां, लिहिल्याप्रो। करून, उत्तरें जलद पाठवावीं. *रा। छ, सफर. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ५७.
१७०१ माघ शुक्ल २ श्री. ७ फेब्रुआरी १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-विनंति उपरी. नवाब हैदरआली खांबहादर यांचा व सरकारचा पक्का सलूख जाला. दुसरा विच्यार राहिला नाहीं. तेव्हां, वर्तमान परस्परें कळत असावें. इकडील सविस्तर लिहिल्याप्रमाणें त्यांस सांगून, तिकडील नायमार वगैरे व बहादर चेनापट्टणाकडे कधीं जाणार, डेरेदाखल कधीं होणार, हें सविस्तर त्यांस पुसोन, लिहीत जावें. पडदा कांहीं आतां राहिला नाहीं. लौकर जाणें चेनापट्टणाकडे व्हावें. वरकड कराराप्रों। अमलांत लौकर यावें. र॥ छ, सफर. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ५६.
१७०१ माघ शु।। २ श्री. ७ फेब्रुआरी १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. इंग्रज यांस सांप्रतकाळीं गर्व फार जाला. जात पक्की ........ संमंधाखेरीज समजत नाहीं. त्यास, पांच वर्षें त्यांस संमंध पडला, त्यावरून त्यांचे चालीस पक्केपणें माहीतगिरी जाली. कौलकरार इमान ज्यांचे गावींच नाहीं. प्रथम लिहिणें व बोलणें परम गोड. दुस-यास असें वाटावें कीं, काय इमान व वचन आहे, तें यापासीं. खरेपणाची रास, ऐसी भुलथाप पडावी. परिणामीं उमजतें. त्याची नजर केवळ वांकडी. सर्व मुलूक कबज्या केला. दक्षण चा दाइया राखितात ? एकास मिळऊन घ्यावें, एकास हालकें करावें, हे जात करण्याची. फोडाफोड करावी, नाद राखावा, ऐसें आहे. त्यास, दक्षण दोन लाख घोड्यांची विलायत. त्या गरीबांनीं काय कर्णें ? परंतु, न होण्याचे ते मनसबे करितात. दुसरें, ज्याचें इमान सुटलें, आणि वचनाची कायमता नाहीं, ते दौलत कांहीं एका दिवसांत बुडती, हा नेम. आणि, इश्वरें असें जाणूनच, होणाराप्रमाणें रावपंतप्रधान व नवाब निजामआलीखां व नवाबबहादर व भोंसले इतक्यांचा एका होऊन, ठाईं ठाईं त्यांस ताण बसवावे, ऐसें ठरविलें. त्यांतच त्यांची कंबक्ति आली हें समजावें. आणि, एक वेळ त्यांचा गरूर उतरल्याखेरीज दक्षणचा दाब व बंदोबस्त ही नाहीं. दौलत देणें हा यख्त्यार ईश्वराचा. तेव्हां ईश्वराचे आज्ञेप्रमाणें एकवचनी इमान शाबूत ऐसें चालिल्यानें परिणाम. इतक्या गोष्टी टोपीकरांनीं सोडल्या, तेव्हां, त्यांचा सेवटच. तात्पर्य, बहादरांनीं आतां जलदीनें चेनापट्टणाकडे नमूद व्हावें; व नवाब सिकाकोलीकडे जातील. इकडील व भोसल्याकडील गुंता नाहींच. यांत मसलत तमाम होती. इतके दरजे नवाब बहादर यांचे ध्यानांत आहेच. बाजेवख्त इकडील अनभव इंग्रजाचा तुह्मीं सांगावा. ** * * * * * हीं पत्रें नवाबबहादर यांचीं राजश्री नरसिंगराव यांस येत होतीं. तेव्हां, हे दरजे त्याचे चित्तास पुर्ते नक्ष आहेतच. र॥ छ १ सफर, हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ५५.
१७०१ माघ शुद्ध २ श्रीशंकर. ७ फेब्रुआरी १७८०.
चिरंजीव राजश्री तात्या यांसीः- आपाजी रघुनाथ आसीर्वाद उपरी. येथील कुशल ता। माघ शुध २ पर्यंत मु।। पुणें सुखरूप असों. विशेष. बहुत दिवस जाले, तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तेणेंकरून चित्त सापेक्षित असे. तरी सविस्तर लिहून पाठवावें. सातारां सर्व सुखरूप आहेत. आठ दिवस जाले, गणेशपंत यांचें पत्र आलें होतें. आपण ठिकाणीं पोहचल्याचें पत्र आलें नाहीं, याकरितां मार्गप्रतीक्षा. तरी सविस्तर अर्थ तपसिलें ल्याहावे. तेणेंकरून समाधान होईल. आह्मीं दोन तीन पत्रें तुह्मांकडे पा।.आथणीचे मुक्कामावरील पत्र आलें. त्याअलीकडे आलें नाहीं. याकरितां लि।। असे. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे, हे आसीर्वाद.