Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ४५.
श्री.
सेवेसीं कृष्णराव नारायण जोसी सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ मोहरम मु॥ श्रीरंगपट्टणपावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेषः- स्वामींनीं सांडणीस्वारासमागमें छ १९ जिल्हेजचें पत्र नवाबसाहेब यांस शादीची वस्त्रें व व जवाहीर रकमा व थैल्या श्रीमंतांकडून व खासगत पाठविल्या. त्या छ ११ मोहरम मु॥ मजकुरीं पाऊन बहुत संतोष जाहाला. पत्रीं लिहिलें कीं, शादीचीं वस्त्रें जवाहीर पाठविलें आहे. वस्त्राची व जवाहीर रकमाची याद अलाहिदा आहे. त्याप्रमाणें तुह्मीं व राजश्री गोविंदराव व राजश्री नरसिंगराव मिळोन नवाबास आहेर करावा. वरकड तुह्मी पोहचून सर्व मसलतीचे अर्थ बोलण्यांत आलेच असतील. अदवानीचा हांगामा मना लौकर व्हावा ह्मणजे नेमिले मसलतीचें सार्थक. निर्वेधपणें दुषमानाचीं पारपत्यें होतील. येविसींचे पर्याय जातेसमयीं तुम्हांस सांगितलें आहेत. त्याप्रमाणें लौकर प्रत्ययास यावें म्हणोन. ऐसियास, आम्ही बागलकोटाहून निघोन मजल दरमजल आलों. नवाबसाहेब यांचे जिल्हेंत आल्यावर, मार्गीं जागाजागा, परामर्षं यथास्थित जाहाला. छ १० मोहरमीं पट्टणानजीक येतांच, नवाबसाहेब यांणीं राजश्री श्रीनिवासराव बारकी, मातबर सरदार, यांस पुढें दोन कोस सामोरे पाठऊन किल्ल्यानजीक कावेरी तीरीं, बागें (त) जागा राहावयास अगोधरच करविली होती. नजीक देवस्थान व मंडप अति उत्तम आहे. तेथें म।।निले यांणीं समागमें येऊन उतरविलें. भेटीस मुहूर्त छ १२ मिनहूचा निश्चय करून, मातबर सायंकाळीं पाठऊन, त्यासमागमें चार घटका रात्रीस मंडळी व लोकसुधां सुसमयीं किल्ल्यांत गेलों. भेट जाली. भेटीचे समईचीं वस्त्रें व शादीचीं वस्त्रें, जवाहीर थैल्यासहीत निवेदन केलें. अत्यादरें स्वीकार केला. श्रीमंतांकडील व स्वामीकडील कुशलार्थ पुसोन उपचारिक भाषणें परस्परें जालीं. च्यार घटका दरबारांत होतों. नंतर निरोप देतेसमईं बोलिले कीं, कित्येक मजकूर बोलावयाचे आहेत, त्यास सुचना करूं तेव्हां यावें. बोलणें होईल. त्याप्रमाणें सुतरस्वार ठेऊन घेतलेच आहेत, त्याबराबर सविस्तर लिहून पाठऊं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै ।। छ २७ मोहरम, सनसमानीन, लेखांक ४४. १७०१ पौष शु ।। १५.
मयाव आलफ मु।। श्रीरंगपट्टण. श्री. २१ ज्यानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य बाबूराव विश्वनाथ वैद्य साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल त।। पौष शु॥ १५ जाणोन स्वकीय लेखन करणें. विशेषः–आपणाकडून बहुत दिवस पत्र येऊन संतोषवृत्त कळत नाहीं. ऐसें न करितां सर्वदा पत्र पाठऊन संतोषवृत्त लिहीत असावें. यानंतर आम्हांकडील वर्तमान तर, सर्व यथास्थित असे. आम्ही श्रीमंतापासीं आहों. चिरंजीव कासीराव याचें लग्न मार्गशीर्ष वद्य ७ पुण्यात जालें. लग्नाकरितां आलों, ते येथेंच आहों. चिरंजीव माधवराव याचे लग्न माघमासीं करावें, हें मानस आहे. वांईप्रांतींच कोठें योजना होईल. आठ पंधरा दिवसांनीं श्रीमंतांची आज्ञा घेऊन घरास जाऊं. आपणांस कळावें. वरचेवरी पत्र पाठऊन संतोषवीत जावें. तात्या, लोभांत ममतेंत अंतर नसावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै ।। छ मोहरम, सन समानीन, लेखांक ४३. १७०१ पौष शुद्ध १५.
शुक्रवार, मु।। श्रीरंगपट्टण. श्री. २१ ज्यानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो।। हरी बल्लाळ सां।। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेषः--आपणांस जाऊन फार दिवस जाले. पट्टणास पावेल्याचें पत्र येत नाहीं. मसलतीचे दिवस ऐन. इतक्या दिवसांत करारप्रमाणें जिकडील तिकडे नमूद जालें असावें. अदवानीचा हांगामा अदियाप दूर होत नाहीं. उलटा मुदगल प्रांतांत नवा उपसर्ग जाला. नवाबांस इकडून खातरजमेनें लिहीत होतों, त्यांत कमी पडलें. नवाबांचा सर्व सरंजाम व तयारी जाली. अदवानीकरितां गुंतून राहिले. सिंदे होळकर गुजराथेस जण्यास निघाले. सरकारचे वकील सुरतेहून आले. भोंसले यांणीं बंगाल्याचे रुखें कूच केलें. एक अदवानीचा हांगामा म्हणोन नवाबांचा गुंता. दिवस कांहींच राहिले नाहींत. याउपरीं तुम्हीं नवाबबहादूर यांसीं बोलोन, करारप्रमाणें अदवानीचा उपसर्ग राहून, बहादरांचें जाणें चेनापट्टण प्रांतीं होय; सर्व निभावणी होऊन, तुमचें येणें सत्वर घडे; ऐसें व्हावें. सविस्तर श्रीमंतांनीं लिहिलें त्यावरून कळेल. सर्वांनीं ++ + तंबीचा एका केला असतां, अदवानीचे शहामुळें उणी गोष्ट घडली. नवाब गुंतूत राहिले. त्यास, थोर मसलतीस अदवानीचे महस-याचें कारण नाहीं व करूं नये. याजकरितां, राजश्री नरसिंगराव व तुम्हीं नवाबबहादरांसीं बोलून, अदवानीचा महसरा उठोन, आपलाले कामास लागत, ती गोष्ट करून, उत्तरें लौकर पाठवावीं. *र।। छ १३ मोहरम. बहुत काय लिहिणें लोभ असों दीजे. हे विनंति.
राजश्री गोविंदराव व गणेशपंत स्वामींस सां। नमस्कार. लोभ करावा. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ४२.
१७०१ पौष शुद्ध १४. श्री. २० ज्यानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नाना स्वामींचे सेवेसीं: -
पोष्य कृष्णराव नारायण जोशी सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ १२ मोहरम मु॥ श्रीरंगपट्टण पावेतों वर्तमान यथास्थित आसे. विशेषः- स्वामींनीं सांडणीस्वारासमागमें छ १९ जिल्हेजचें पत्र नवाबबहादर यांस शादीचीं वस्त्रें व जवाहीर रकमा व थैल्या श्रीमंतांकडून खासगत पाठविल्या, त्या छ ११ मोहरम मुकाम मजकुरीं पाऊन बहुत संतोष जाहाला. पत्रीं लिहिलें कीं, शादीचीं वस्त्रें जवाहीर पाठविलें आहे. वस्त्राची व जवाहीर रकमांची याद आलाहिदा आहे. त्याप्रमाणें तुह्मीं व राजश्री गोविंदराव व राजश्री नरसिंगराव मिळोन नवाबास आहेर करावा. वरकड तुह्मी पोहचून सर्व मसलतीचे अर्थ बोलण्यांत आलेच असतील. अदवानीचा हांगामा मना लौकर व्हावा, ह्मणजे नेमिले मसलतीचें सार्थक, निर्वेधपणें दुषमानाचीं पारपत्यें होतील. येविसींचे पर्याय जाते समयीं तुह्मांस सांगितले आहेत. त्याप्रों। लौकर प्रत्ययास यावें ह्मणोन. ऐसियास, आह्मी बागलकोटाहून निघोन मजल दरमजल आलों. नवाबसाहेब यांचे जिल्हेंत आल्यावर, मार्गीं जागा परामर्ष यथास्थित जाहाला. छ १० मोहरमीं पट्टणानजीक येतांच, नबाबसाहेब यांणीं राजश्री श्रीनिवासराव बाहारकी मातबर सरदार यांस पुढें दोन कोंस सामोरें पाठऊन किल्ल्यानजीक कावेरीतीरीं बागेंत जागा राहावयास आगोदरच करविली होती. नजीक देवस्थान व मंडप अतिउत्तम आहे. तेथें मशारनिले यांणीं समागमें येऊन उतरविलें. भेटीस मुहूर्त छ १२ मीनहूचा निश्चय करून सायंकालीं मातबरास पाठविलें. त्यासमागमें चार घटका रात्रीनंतर मंडळी व लोकसुद्धां सुसमयीं किल्ल्यांत गेलों. भेट जाहाली. भेटीचे समयींचीं वस्त्रें व शादीची वस्त्रें, जवाहीर, थैल्यासहीत निवेदन केलें. अत्यादरें स्वीकार केला. श्रीमंतांकडील व स्वामीकडील कुशलार्थ पुसोन उपचारिक भाषणें परस्परें जाहालीं. चार घटका दरबारांत होतों. नंतर निरोप देतेसमयीं बोलिले कीं, "कितेक मजकूर बोलावयाचे आहेत. त्यास, एक दोन रोजांनीं सूच(ना) करूं, तेव्हां यावें. बोलणें होईल.'' स्वामींकडून दुसरीं पत्रें व थैल्या छ २३ जिल्हेजचीं आंचीवर हजूर छ १२ मिनहूस आलीं, तीं नवाबसाहेब आपल्या थैल्या घेऊन लाखोटे आमचे आह्मांकडे पाठविले. त्या पत्रांतही मजकूर अदवानीचा विस्तारेंकरून होता. त्यास एक दोन रोजांनीं नवाबसाहेब बोलवितील, ते समयीं हाही मजकूर बोलण्यात येईल. सांडणीस्वार ठेऊन घेतले आहेत. बोलण्याचा अभिप्राय सविस्तर मागाहून नवाबसाहेब यांस पुसोन सुतरस्वारासमागमें लेहून पाठऊं. दुसरा मजकूर लिहिला होता जे, नायमाराची व इंग्रजाची लढाई जाली, ह्मणोन इकडे वर्तमान. तेथें तहकीक बातमी असेल. नवाबबहादर यांचा व श्रीमंतांचा स्नेह याअर्थे इकडील वर्तमान तिकडे कळत जाईल. तिकडील वर्तमान इकडे कळवीत जावें ह्मणून. त्याजवरून नवाबसाहेब यांस राजश्री नरसिंगराव यांणीं विचारलें. त्यास महीबंदर नवाबसाहेबाकडे. तेथें नायमार असतात. गुदस्ता नायमार यांणीं लबाडी करून, इंग्रजासीं राजकारण करून, बंदर मजकुरीं बखेडा केला होता. नवाबसाहेब पट्टणास आलियावरी नायमाराची समजाविसी केली. महीबंदरचाही पक्का बंदोबस्त. इंग्रज मागतीं आले होते. त्यासीं नवाबसाहेब यांचे तर्फेनें नायमारांनीं लढाई दिल्ही.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ४१.
१७०१ पौष शुद्ध १४. श्री. २० ज्यानुआरी १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. भोंसले यांणीं बंगाल्याची मसलत कबूल केली. राजश्री खंडोजी भोंसले उंदरीचे घाटाखालीं फौज जमा करण्यास आले. पंचवीस हजार फौजचा जमाव केंला. एका दो दिवसीं कूच करून, छत्तीसगडावरून बंगाल्याचे सुमारें जातील. सरकारचे वकील राजश्री लक्ष्मण गोविंद सुरतेस होते, त्यांस हुजूर आणविलें. ते पुणियास येऊन पोहचले. इंग्रजास बिघाड हें साफ समजलें. इकडील फौजा पुढें रवाना जाल्याच आहेत. वकील आलियानंतर सिंदे होळकरही छ ६ मोहरमीं डेरेदाखल जाले. सत्वरच गुजराथ प्रांतीं जातील. ईश्वरसत्तेनें इंग्रजांनीं मैदानांत यावें. मग होईल तें द्रिष्टीस पडेल. हें वर्तमान नवाबबहादूर यांस सांगावें. र॥ छ १२ मोहरम. हे विनंति.
पै॥ छ २७ मोहरम, सन समानीन श्रीरंगपट्टण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ४०.
१७०१ पौष शुद्ध १४. श्री. २० ज्यानुआरी १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंती उपरी. राजश्री श्रीपतराव मोरेश्वर वगैरे यांस नवाबबहादूर यांणीं कांहीं तसदी देऊन पैक्याची निशापाती करून घेतली, ह्मणोन वर्तमान ऐकण्यांत आले. त्यावरून बहुत अपूर्व वाटलें. त्यास, सर्व गोष्टी करारप्रमाणें अमलांत याव्या. येविशीं राजश्री आनंदराव नरसी यांस सांगितले आहे. तेही नवाबबहादूर व राजश्री नरसिंगराव यांस लिहितील. पक्का सलूख जाला, मग तेथें अशा गोष्टी न व्हाव्या. करार प्रमाणेच तरफैन वर्तावें. इकडे तहनामा होणें आणि तिकडे त्यांस तसदी दाखऊन निशा घेणें रीत नाहीं. बहुधा असें जालेंच नसेल. ऐकिल्यावरून लिहिलें आहे. छ २७ मोहरम, सन समानीन, शुक्रवार मु॥ श्रीरंगपट्टण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ २७ मोहरम, सन लेखांक ३९. १७०१ पौष शु।। १४.
समानीन, मु।। श्रीरंगपट्टण. श्री. २० ज्यानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो।। गोविंदराव कृष्ण साष्टांग नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल त॥ छ १२ मोहर ( म ) जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. आपणाकारणें मकरसंक्रमणप्रयुक्त तीळ शर्करामिश्रित पाठविले आहेत. स्वीकारून पावलियाचें उत्तर पाठवावें. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ३८.
१७०१ पौष शु॥ १४ श्री. २० जानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सा। नमस्कार विनंति उपरी येथील जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मांस जाऊन फार दिवस जाले. जातांच नवाबबहादूर यांसीं बोलोन, अदवानीचा उपद्रव मना करवावा. ऐसें असतां अदियाप कांहींच घडून येत नाहीं. रोजबरोज उपसर्ग अधिकच होतो. मुदगल तालुकियांतही नवा हांगामा शुरू जाला आहे. यावरून परम आश्चर्य वाटलें कीं, बोलणें व करार काय ? आणि घडतें काय ? मोठे मसलतीवर नजर देऊन, नवाबबहादुर यांचे ह्मटल्याप्र॥ करारमदार केले. इंग्रजाचे तंबीचे मसलतींत नफे फार. तें कांहीं न होतां, व कडपे तालुकियास इंग्रजाचा तालुका लगता, तिकडे हांगामा व्हावा तें राहून, आपआपणांत कजिये करीत बसणें हें काय ? इंग्रजाची मसलत मोठी, दिवस सर्व निघोन गेले. इतक्या दिवसांत चेनापट्टण प्रांतीं जाऊन टोपीकरास ताण दिल्हा असावा, तें कांहींच नाहीं. इकडील सर्व तयारी जाली. सिंदे होळकर फौजसह गुजराथ प्रांतीं जावयास निघाले. सुरतेस वकील होते ते माघारे बोलाऊन घेतले. भोंसले यांचाही पंचवीस तीस हजार जमाव होऊन, बंगाले प्रांतीं त्यांणीं कूच केलें. राहतां नवाब निजाम आलीखां व नबावबहादूर राहिले. नवाबांची सर्व तयारी जाली. अदवानीकरितां तटून राहिले आहेत. नवाबांचा व सरकारचा स्नेह. ते आपले जागीं नाखुष. तेव्हां मोठे मसलतीस पायबंद बसतो. बाहेरील मसलत राहून, अदवानीसाठीं कजिया पडणें ठीक नाहीं. नवाबबहादूर दूरंदेश. सर्व पल्ले त्यांचे ध्यानांत आहेत. त्यांचे लिहिल्यावर व कायममिजाजीवर नजर ठेऊन मसलत केली, ते सेवटास जावी. दिवस कांहीं बाकी राहिले नाहींत. आह्मी नवाबाची खातरजमा करून नित्य लिहितों कीं, अदवानीचा हांगामा लौकरच दूर होईल. आपण जलदी न करावी, ऐसें लिहितों. परंतु, तिकडून हांगामा दूर होत नाहीं. उलटा, मुदगल तालुकियांत नवीन उपद्रव जाला. त्याजवरून नवाबाचीं पत्रें आलीं कीं, तुह्मीं खातरजमा करून लिहितां, आणि कांहींच प्रतियास येत नाहीं, हें काय ? ऐसीं आलीं. त्यावरून हें पत्र लिहिलें असे. तरी, तुह्मीं व राजश्री नरसिंगराव नवाबबहादूर यांसीं बोलून, अदवानी व मुदगल तालुकियाचा उपसर्ग दूर होऊन, चेनापट्टणाकडे नमूद होत ऐसें करावें. उग्याच जिकडील तिकडे मसलती तटून राहिल्या ! दिवस हेच मुख्य आहेत. तेथील कच्चा खुलासा समजावा.
सारांष, अदवानीचा उपद्रव मना होऊन, तेथील सरंजाम आहे तो, तसाच कडपे तालुकियास लगता इंग्रजाचा तालुका आहे, तिकडे नमूद व्हावा. नवाबबहादूर यांणीं चेनापट्टणाकडे जावें. पत्रांची उत्तरें सत्वर पाठवणें. येविषयीं* बहुत पत्रें गेलीं. परंतु अमलांत दिसत नाहीं. हें मोठे मसलतीस व करारमदार जाले त्यास एक प्रकार दिसतें. याकरितां, तुह्मीं नवाबबहादरांशीं बोलून महसरा लौकर उठे व चेनापट्टणाकडे जाणें लौकर होय, तें करावें. र॥ छ १२ मोहरम बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
पै॥ छ २७ मोहरम, सन समानीन, मु॥ श्रीरंगपट्टण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ३७.
श्री.
यादी रोख धर्मादाव. | |
१ | सूर्यवाहन |
१ | लक्ष्मी |
१ | नरसिंह |
१ | मूल रंगास्वामी |
१ | महालक्ष्मी रंगास्वामीची रुजु समस्त ब्राह्मण |
२ | समस्त ब्राह्मण रंगास्वामीजवळील देवळाबाहेरील |
१ | मूल नरसिंह |
१ | समस्त ब्राह्मण नरसिंहाचे देवालयांतील |
१ | व-हा स्वामी |
१ | व-हा स्वामीचे देवालयांतील समस्त ब्राह्मण |
१ | नरसिंह स्वामीचे लक्ष्मीस |
.॥. | व-हा स्वामीचे लक्ष्मीस |
.॥. | सिद्धिविनायक |
.।. | व-हा स्वामीचे देवळांतील वाजंत्री. |
श्रीवेंकटेश प्र॥
विनंतीस चित्त दीजे. आपण स्नान करून पांच घटिका होतांच सर्वत्र मंडळी सह देवदरशेणास यावें. पूजेचा समयही असतो. त्यावरी तोफा वगैरेही पाहून मग भोजनास जाऊं. ये रात्रींच चोपदारास हुकूम जाहला आहे. समागमें जाऊन आल्यावरही दाखवून यावें. यास मीही दरबारास असतों. आपण येतांच येतों. हे विनंति.
रा॥ गणेशपंत बाबा स्वामीस. कागदपत्र अगदीं लाखोटा करून घेऊन सत्वरीं यावें. आळस न करावा. हे विनंति. चिरंजीव आपासही घेऊन येणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ २७ मोहरम, सन समानीन. लेखांक ३६. १७०१ पौष शु।। १४.
शुक्रवार. मु।। श्रीरगंपट्टण. श्री. २० ज्यानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेषः- तुह्मांस जाऊन फार दिवस जाले. अदियाप पट्टणास पावलियाचें उत्तर येत नाहीं. अदवानीचा हांगामा मना होत नाहीं. दिवसेंदिवस अधिक तसदी होती. दुसरें मुदगल तालुकियास नवा उपसर्ग लागला, यामुळें नवाब यांचा असंतोष, सरंजामी सर्व जाली असतां या शहाकरितां अडकून राहिले आहेत. नवाबांचा व सरकारचा स्नेह. त्यांचा असंतोष यांत पेंच फार आहेत. शत्रूचीं पारपत्याचीं कामें व ज्यांत नफे तें राहून, आपस आपसांत असंतोषी येणें ठीक नाहीं. दिवस निघोन गेले. इकडील गुंता किमपि नाहीं. सरदार गुजराथप्रांतीं जाण्यास डेरेदाखल जाले. फौजा पुढें गेल्याच आहेत. भोंसले यांणींही बंगल्याकडे कुच केलें. नवाब अदवानीकरितां राहिले. महसरा सत्वर उठला तर उत्तम. नाहींतरी मोठी मसलत राहून, हेच कजिये पडतील. येविशीं तुह्मीं व राजश्री नरसिंगराव, नवाबबहादर यांसीं बोलून, करारप्र॥ हांगामा मना होऊन चेनापट्टणाकडे जाणें नवाब बहादर यांचें व्हावें. सर्व निभावणी करून तुह्मीं सत्वर यावें. कांहींच समजत नाहीं. यास्तव कच्चें वर्तमान सत्वर कळवावें. इकडील कितेक मजकूर राजश्री नाना यांणीं त। लिहिले त्यावरून कळेल. आणि त्याअन्वयें बोलून लौकर अमलांत यावें.*र॥ छ १२ मोहरम. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.