Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

तंजावर येथील शिलालेख.

मराठ्यांचा इतिहास*

         श्री
( श्री राम कर्ता)

श्रीमद्भोंसल वंशाची आदि । मूल पुरुष, श्रीमन्नारायण । त्या परंपरेनें, श्री सूर्यनारायण । त्या पासून, मनू । मनूपासून, राजा इक्ष्वाकू । त्या राजाचे परंपरेंत, कृतत्रेताद्वापर ह्या तीन युगांत हीं, प्रख्यात पुण्यश्लोक राजे जाहले । या वंशांत, प्रस्तुत कलियुगामध्यें, शंभूपर्वतप्रदेशी, श्री महाराष्ट्र देशाधिपति, शौर्योदार्यगुणप्रख्यात, राजा शंभू ह्मणून अवतरला । त्या राजानें, आपुला स्वधर्मयुक्तविहित मार्गानें राज्य परिपालन करी, त्यासरिसें, शंभूपर्वतावरि श्रीसांबशिवप्रसादार्थ, अनुष्ठान ही करीत आला । त्या अनुष्ठानास संतोष पाऊन, श्री सांबशिवांनी, त्या शंभू राजास स्वप्नांत प्रत्यक्ष होऊन, तुला संततीसंपत्ति विशेषें कडून होईल, ह्मणोन प्रसादवाक्याचें अभय दिल्हे । सवेच कित्येक दिवसाने, त्या शंभू राजाचे जठरसमुद्रीं, गुणरत्नऐशे, प्रथमयेकोजी राजे, संभवले ॥ १ ॥

त्या येकोजी राजानीं, त्या शंभूपर्वतप्रदेशी, विहित रीतीने राज्यभार करीत असतां, त्या सांबशिवानुग्रहेंकडून, येकोजी राजाचे उदरीं शरभ राजे नामक, प्रथमसत्पुत्राचा संभव झाला ॥ २ ॥