Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ३५. १७०१ पौष शु।। १४.
श्री. २० ज्यानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
गोविंदराव स्वामींचे सेवेसीं:--
पो। कृष्णराव नारायण जोसी सां।। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करीत जावें. विशेषः- तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. संतोष जाहाला. लिखितार्थ कळों आला. अदवानीचे मजकुराविसीं वे कामकाजाचा गुंता उरकून सत्वर यावयाचें करावें ह्मणोन विस्तारेंकरून लिहिलें. ऐसि - यास, इकडील वर्तमान तरी, हरीहरचे मुकामाहून पत्रें पा।। होतीं. त्या अलीकडे दरमजल येऊन छ १० मोहरमीं श्रीरंगपटणास पोंहोचलों. नवाबसाहेबांनीं राजश्री श्रीनिवासराव वारकी यांस दोन कोस सामोरे पा। होतें. मातबर मनुश. यांनीं समागमें येऊन अगोदरच स्थल किल्ल्यानजीक कावेरीतीरीं नेमिलें होतें. त्या जाग्यावर आणून उतरीवलें. छ १२ मीनहूस वलाऊ पा।, त्यावरून रात्रौ चार घटका रात्रीस गेलों. नवाबसाहेब यांची भेट जाहाली. सर्वांचें कुशलतेचें वृत्त पुसिलें. उतर समर्पक व्हावयाचें तें जाहालें. नंतर च्यार घटका राहून बोलिले कीं, कितेक बोलावयाचें आहे. त्यास एक दोन रोजा सूचना होईल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ २७ मोहरम, लेखांक ३४. १७०१ पौष शु. ८.
सन समानीन मु।। पट्टण. श्री. १५ ज्यानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। गोविंद भगवंत सां।। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करून आनंदवीत असिलें पाहिजे. विशेष. आपणाकारणें मकरसंकरमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले आहेत. हे स्वीकारून पावलियाचें उत्तर यावें. रा।। छ ७ माहे मोहरम. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ २५ मोहरम, लेखांक ३३. १७०१ पौष शु॥ ६.
सन समानीन मु।। पट्टण. श्री. १३ जानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णरावजी तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। मल्हार विठ्ठल दि॥ राजश्री रास्ते कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल त।। पौष शुद्ध शष्ठीपर्यंत आपले कृपेंकरून क्षेम असे. विशेषः-- आपण येथून स्वार होऊन गेल्या दारभ्य पत्र येऊन परामृष जाहला नाहीं. तरी, सदैव पत्रीं सांभाळ करावा. बासवापट्टणचे मुक्कामींहून राजश्री गोविंदरावजी यांची पत्रें आलीं, त्यांसमागमें आपण घरास लाखोटा पाठविला तो पावला. आजच वांईस व घरास जासूद गेले, त्या समागमें रवाना केला असे. उत्तर आल्यावरी आपणाकडे पाठवितों. आपणाकारणें रविसंक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले आहेत. स्वीकारून उत्तर पाठवावें. सर्वदा पत्रीं सांभाळ करावा. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असों दीजे. हे विनंति.''
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ३२. १७०१ मार्गशीर्ष वा। ३०.
श्रीशंकर प्रसन्न. ६ जानुआरी १७८०.
राजश्रियो विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी सां।। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष. सांप्रत आपणाकडील पत्र येऊन कुशलवृत्त कळत नाहीं. तरी सविस्तर लिहीत असावें. यानंतर इकडील म।।र, राजश्री गोविंदराव नारायण व राजश्री गणपतराव केशव यांस सविस्तर लिहिलें आहे, त्याजवरून कळों येईल. निरंतर पत्रीं संतोषवीत जावें. र॥ छ २८ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ३१.
१७०१ मार्गशीर्ष शु।। १३ श्री. २१ दिसेंबर १७७९.
राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंती उपरी. पेशजी नवाब हैदर अलीखान यांजकडे पत्रें पाठविलीं, त्याचा मसुदा तुह्मांकडे पाठवावा, तो राहिला होता. तो व हालीं पत्र पाठविलें त्याचा मसुदा एकूण दोन मसुदे पाठविले आहेत. त्याजवरून कळेल. हे विनंति.
पै॥ छ. १२ जिल्हेज. सन समानीन मु॥ पट्टण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ३०.
१७०१ मार्गशीर्ष वद्य ११ श्री. २ जानुआरी १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं :--
विनंति उपरी, राजश्री चंदरराव पोंवार, श्रीमंत राजश्री दादासाहेबांपासोन निघोन, दोन च्यार हाजार जमाव करून, आमदाबाद तालुकियांत हांगामा शुरू केला होता. त्यारा, आमदाबादकर यांजकडील जमाव व राजश्री फत्तेसिंगराव गाइकवाड यांची फौज जाऊन पोंवारास तंबी करून, सर्व त्याचा जमाव लुटून घेतला. याप्रों। जालें. राजश्री विसाजी आपाजी व भगीरथराव सिंदे व पाराजीपंत ऐसे माघून दाहाबारा हजार फौजनसीं गेले. सरदारांचाही जाण्यास याउपरीं गुंता नाहीं. किरकोळी सर्व वर्तमान पेशजी सांडणीस्वाराबराबर लिहिलें आहे, त्यावरून कळेल. नवाबबहादर यांस पत्र लिहिलें, त्याचा मसविदा पाठविला, त्यावरून सर्व कळेल. त्याप्रमाणें तुह्मीं व राजश्री नरसिंगराव मिळोन नवाबांसीं बोलावें. अदवानीचा उपद्रव मना व्हावा. चेनापट्टणाकडे सत्वर जावें. करार बमोजीब निभावणींत यावें. तिकडील वर्तमान नवल विशेष इंग्रज वगैरे बहादरांस पुसोन लिहीत जावें हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ १२ जिल्हेज (?) लेखांक २९. १७०१ मार्गशीर्ष व।। ११.
सन समानीन, मु॥ पट्टण. श्री. २ जानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः- तुह्मी पट्टणास पाऊन पत्र अदियाप येत नाहीं. मसलतीचे दिवस केवळच थोडे राहिले. अदवानीचा महसरा अदियाप उठत नाहीं. नवाब निजामआलीखांबहादूर यांची सिकाकोल राजबंदरीकडे जावयाची सर्व तयारी जाली. अदवानीचा हांगामा मना व्हावा इतकाच गुंता. हांगामा मना जाल्याखेरीज त्यांची खातरजमा होत नाहीं. हांगामा तों दिवसें दिवस अधिक होतो. ऐविशीं तुह्मीं व राजश्री नरसिंगराव एकविच्यारें नवाबबहादूर यांसीं बोलोन, हांगामा मना सत्वर व्हावा. नवाबाकडील फौज अदवानीकडे गेली. तेथें परस्पर कलह न व्हावा. इंग्रजाची मसलत मोठी. त्यांतही किरकोळी कामासाठीं कजिये पाडणें सलाह नाहीं. याउपरीं, हांगामा मना होऊन, नवाबबहादर यांचें जाणें चेनापट्टणाकडे लौकर व्हावें. कराराप्रमाणें कामें उगऊन तुह्मीं सत्वर यावयाचें करावें. मसलत मोठी. दिवस कांहींच राहिले नाहींत. समजोन करावें. इकडील सविस्तर राजश्री नानांनीं लिहिलें, त्याप्रमाणें व्हावें. पत्रें व तिकडील वर्तमान वरचेवर लिहित जावें. *र॥ छ २४ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? लोभ किजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ १२ जिल्हेज (?) लेखांक २८. १७०१ मार्गशीर्ष व।। ११.
सन समानीन, मु॥ पट्टण. श्री. २ जानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रावजी स्वामींचे सेवेसीं:-
पो। गोविंद भगवंत सा।। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल त॥ छ २४ माहे जिल्हेज जाणून वर्तमान यथास्थित असे. विशेषः- आपण पट्टणास पोहचून अदियाप जाब येत नाहीं. नित्य श्रीमंत विच्यारितात, अदवानीचा उपद्रव अदियाप मोकळा होत नाहीं ? नवाब निजामआलीखां यांची मर्जी अदवानीकरितां खफा आहे. इंग्रजाची मसलत मोठी. सर्वांनीं करावी. तें राहून आपले आपले घरांत व वांकडे पाहाणें, यांत कार्ये कसीं होतील? नवाबबहादर दूरंदेश आहेत. श्रीमंत राजश्री नाना व राव यांणीं नवाबांस पत्रें लिहिलीं, तें देऊन आधीं अदवानीचा हांगामा मना करून चेनापट्टणाकडे स्वारी सत्वर जावी, ह्मणजे नवाबही सिकाकोलीकडे जातील. त्यांचा सरंजाम सर्व तयारी आहे. अदवानीचा महसरा उठण्याची मात्र प्रतीक्षा आहे. आपण इतकें नवाबांसीं बोलून जरूर करवावें. करारप्रमाणें जाबसाल उगऊन सत्वर इकडे यावयाचें करावें. कितेक श्रीमंतांनीं लिहिलें त्यावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
प छ ११ मोहरम सन समानीन. लेखांक २७. १७०१ मार्गशीर्ष व॥ ११.
बुधवार मु।। पट्टण. श्रीशंकर प्रसन्न. २ जानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल त।। छ २४ जिल्हेज जाणून स्वकीय लिहीत गेलें पाहिजे. विशेषः-- आपणाकडील पत्र येऊन कुशल वृत्त कळत नाहीं, तरी सविस्तर लिहीत असावें. यानंतर इकडील म।। राजश्री गोविंदराव नारायण व राजश्री गणपतराव केशव यांस सविस्तर लिहिला आहे, त्याजवरून कळों येईल. निरंतर पत्रीं आनंदवीत जावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ १२ जिल्हेज * लेखांक २६. १७०१ मार्गशीर्ष वद्य १०.
समानीन, मुक्काम पट्टण. श्री. १ जानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पे॥ बाळाजी जनार्दन सां. नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः-तुह्मी पट्टणास पोहचून नवाबबहादर यांची भेट होऊन सर्व बोलणें जालें असेल. अदवानी तालुकियांतील उपसर्ग अदियाप मना होत नाहीं. सर्व मसलती मोठ्या याकरितां तटून राहिल्या आहेत. नवाब निजामआलीखां बहादूर यांची सर्व तयारी जाली. इंग्रज दुसरे मार्गें अदवानीस येत होते, तेथें फौज पाठऊन तमाम घांटबंदी केली. अदवानीचा हांगामा उठतांच बंदोबस्त करून सिकाकोली तालुकियांत जातील. येथील उपसर्ग मना जाल्याखेरीज त्यांची खातरजमा पटत नाहीं. मकान त्यांचें, यास उपद्रव. तेव्हां दुसरे मोहीमेस ते कसे जातील ? आह्मी त्यांची खातरजमा वरचेवर करितों कीं, बहादरांस लेहून हंगामा मना करवितों. त्याजवर हे स्वस्त आहेत. याउपरीं तुह्मीं बहादरांसीं बोलून हांगामा अदवानीचा आधीं उठवावा. चेनापट्टणाकडे सत्वर जावें. करारप्रमाणें सर्व गोष्टी निभावणींत याव्या. दिवस कांहींच राहिले नाहींत. मोठ्या मसलती सोडून किरकोळी कामांत दिवस जातात, हें ठीक नाहीं. मसलत इंग्रजाची थोर, दिवस थोडे, हें सर्व मरातब बहादर यांचे ध्यानांत आहेतच. तुह्मींही बोलून लिहिल्याप्रों। सत्वर घडावें. अदवानीचा महसरा लौकर उठऊन नवाबबहादरांनीं लौकर चेनापट्टणाकडे जावें. र॥ छ २३ जिल्हेज बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.