लेखांक ६४.
१७०१ माघ व॥ ७ श्री. २६ फे. १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. नवाबबहादर यांसीं आहाद शर्तीनर्सी पक्का सलूख व सफाई जाल्याचा लौकीक फार जाला. इंग्रजाचे तंबीची मसलतही थोर, त्यांत नफेही तसेच, असें जाणून नवाबबहादर यांचे मर्जीनरूप करारनामा व पत्रें पाठविलीं. परंतु, सरकारांत पांच साहा वर्षांचा खिसारा. हें नवाबांस माहीत नाहीं ऐसें नाहीं. याजकरितां पंधरा लाखांची तर्तूद नवाबांनीं करविली, त्याप्रमाणें आईंदे सालचे बारा, एकूण सत्तावीसांचा भरणा व्हावा. पुढें बारा मजुरा द्यावे. चिंता नाहीं. यांत नुकसानीही नाहीं. इकडील मोहीमेच्या कामावर ऐवज पडेल. यास्तव तुह्मीं व राजश्री नरसिंगराव व गोविंदराव मिळोन नवाबांसी बोलोन, लिहिल्याप्रमाणें घडवावें. नवाबबहादर ही याविशीं नाहीं ह्मणणार नाहींत. स्नेह जाहाला, त्यापक्षीं करणें उचित आहे. र॥ छ २० सफर. हे विनंति.