लेखांक ६३.
१७०१ माघ व॥ ७ श्री. २६ फे. १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामीचे सेवेसीः-
विनंति उपरी. मानाजी फांकडे बदमामली त्यास निरोप दिल्हा. सटवोजी भोंसले यांस लिहिलें तो बलखुद राहील, ऐसें नवाबबहादूर बोलले ह्मणोन लिहिलें. एसियास, फांकडे व भोंसले कितुरकर ऐसे जमून लबाड्या करितात. दासाजी सिंदे ही त्यांतच आहेत. मुलूक खराबा करितात. सबब, त्यांजवर फौजा पाठविल्या आहेत. कितुरकर आदिकरून पारपत्य केलें जाईल किंवा नाहीं ? नवाबबहादूर यांचा तालुका लगता. त्यास, कोणी गेल्यास आश्रा न व्हावा, ऐसी सर्व अमीलास नवाबबहादर यांची ताकीद असावी. *र।। छ २० सफर हे विनंति.