लेखांक ५७.
१७०१ माघ शुक्ल २ श्री. ७ फेब्रुआरी १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-विनंति उपरी. नवाब हैदरआली खांबहादर यांचा व सरकारचा पक्का सलूख जाला. दुसरा विच्यार राहिला नाहीं. तेव्हां, वर्तमान परस्परें कळत असावें. इकडील सविस्तर लिहिल्याप्रमाणें त्यांस सांगून, तिकडील नायमार वगैरे व बहादर चेनापट्टणाकडे कधीं जाणार, डेरेदाखल कधीं होणार, हें सविस्तर त्यांस पुसोन, लिहीत जावें. पडदा कांहीं आतां राहिला नाहीं. लौकर जाणें चेनापट्टणाकडे व्हावें. वरकड कराराप्रों। अमलांत लौकर यावें. र॥ छ, सफर. हे विनंति.