Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
सके १५९२ आषाढ सुध ९ गुरुवारी माहुली घेतली.
शके १५९३ विरोधी संवछर
वैशाखमासी मोहबतखानाने वेढा ज्येष्ठमासी बाहादूरखान व दलेलखान
घालून अहिवंत व मारकंडा व जवळा सालेरीस वेढा घातला. आस्विन मासी
व अंचळागिरिहि घेतले. माघमासी वेढा काढून औरंगाबादेस आले आणि तेथे
मोरोपंतीं हशम घेऊन सालेरीचे माचीचा फौज ठेविली.
वेढा मारिला. उपराळा केला. प्रतापराऊ माघमासी सुलतान शाअलम
आनंदराऊ फौजेनसी जाऊन बलोलखान औरंगाबादेहून दिलीस गेले.
धरिला मोहकमसिंग व दारकोजी भोसले
धरिले. हात्ती ११ व घोरी सतरासे पाडाऊ
केली.
शके १५९४ परिधावी संवछर
जेष्ट वद्य ५ मोरोपंत जाऊन जवारी आषाढमासी रामनगर घेतले तेथील
घेतली तेथील राजा विक्रमशा पळाला राजा पळोन दवनसेस गेला १.
मोगलाईत आला १.
जेष्ट सुध ७ कल्याणपंती जेष्ट सुध ५ भागानगरीचा पातशा
चिंचवडी परलोकवास केला सुलतान अबदुला कुतुबशा मेला त्याचा
मार्गेश्वरमासी * * * * जावई तानाशा तखती बैसविला.
अदलशा परलोकास गेला. त्याचा पुत्र नाव सुलतान अबदुल हसन ठेविला.
सुलतान शिकंदर तखती बैसविला. राज्याचे हेजीब नीराजीपंत भागानगरास
खवासखान कारभारी जाला. राज्याचा व जाऊन एक लक्ष होनाचा तह करून
इदलशाचा सला तुटला बाबाजी नाईक भागानगराहून ६६ हजार होन घेऊन
पुंडे विजापुरी वकील होते त्यास बोलाऊन राज्यापासी आले.
आणिले.
फाल्गुण वद्य १३ पनाळा गड
अनाजीपंत भेद करून कोंडाजी फर्जंद
याज बा। लोक देऊन घेतला. पाठी लोक
रवाना केले.
शके १५९५ प्रमादी संवछर
चैत्र शुध्द १ राजे रायरीहून पनाळियास चैत्र वद्य १० भोमवार किले परली
गेले ते च मासी बहलोलखानासी व घेतली विजयादसमीच्या मुहुर्ते राजे
प्रतापराऊ व आनंदराऊ यासी लढाई जाऊन बंकापूर लुटिले.
जाली, विजापुराजवळ फते जाली, एक
हाती पाडाऊ आला
श्रावण वद्य ९ रविवारी सातारा घेतला. कार्तिकमासी सर्जाखान * * व विठोजी सिंदियासी झगडा जाला. विठोजी पडिला.
(बाजू १ अर्धे पान खालचें)
व्यानी केलंजा घेतला. वद्य नवमी जेष्ट सुध घटी ५ राज्याची मौंजी
बुधवारी दो प्रहरा रात्री जिजाई आऊ जेष्ट सुध ६ शनिवारी समंत्रिक विवाह
पाचोडींत निर्वग वास केला १. केला १
माघमासी मोरोबाची मुंजी जाली जेष्ट शुध १२ शुक्रवार ५१।३४ वी
जैतपडी माघ वद्य ६. ३८।४२ + + ।४५ तीन घटिका रात्री
गंगाबाई निवर्तली फाल्गुण वद्य ५ उरली तेव्हा सीवाजी राजे सिंहासनी बैसले
फाल्गुण वद्य ५ राजे + + डि यास छ १० रबिलावल सु॥ सन खमस सबैन
ले + + + + + + + + पंचमी अलफ
गुरुवारी संभाजी राजे यांची मुंजी जाली
चैत्र सुध १३ चिपोळणांत लस्करची
पाहाणी केली आणि बहिरराऊ मोहिते
यासी सरनोबती दिधली १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५.
(बाजू १ अर्धे पान)
शके १५५४ अंगिरा सवछर.
जेष्टमासी महमदखाने वेढा घालून भाद्रपदमासी शाहाजीराजे यानी दौलताबाद घेतली १.
पेमगिरीस निजामशाहावरी छत्र धरिले १.
शके १५५७ युवा सवछरी शाहाजीराजे माहोलीस गेले तेथे रणदुलाखान इदलशाही व खान जमा मोगलाचा सुभा जाऊन वेढा घालून निजामशाहा हाती घेतला
शाहाजीराजे इदरशाही चाकर जाले १.
(बाजू २ अर्धें पान शक वरील अर्धांत गहाळ)
वैशाखमासी सिवाजी राजेयानी रायरी मार्गेश्वरमासी सुलान महमूद
घेतली आस्विन वद्य राज्यानी सुपे इदलशाह मृत्यू पावला माघ सुध ६
घेतले संभाजी मोहिता धरिला शनवारी गायकवाडासी सोयरीक केली
सकवारबा (इसी सोयरीक केली)
ईचे लग्न जाले १.
(बाजू १ अर्धें पान वरचें)
शके १५८६ क्रोधी संवछर
जेष्ठ शुध १४ सोमवारी जसवंत कार्तिकमासी इदलशाहाचा व राज्याचा
सिंगें कोंढानियाचा वेढा काढिला त्याचा बिघाड होऊन खवासखान कुडास जाऊन
सुबा तगीर होऊन जयसिंगास जाला १. घोरपडे मारिले. खवासखानासी झगडा
केला तो पलोन घाटावर गेला १.
मार्गेश्वरमासी खुदावदपुर राजियानी माघमासी राजश्री जाहाजांत बैसोन
लुटिले १. बसनुरास गेले ते शहर मारले १.
पौष वद्य ३० माभलेश्वरी जिजाई
आऊची तुला जाली ग्रहण सूर्य होते १.
(बाजू २ अर्धे पान वरचें)
सोनाजीपंत हि तुला केली १. माघ वद्य ५ स सोनाजीपंत परलोकास
गेले १.
शके १५८७ विस्वावसू संवछर.
चैत्र वद्य १० सुक्रवारी राजश्री इदलशाहा व मोगलाचा सला तोडून
पुरंदरास आले. जयसिंग व राजश्री राजे व दिलेलखान
वैशाखमासी जयसिंग व दलेलखान विजापुरावरी मार्गेस्वरमासी चालोन गेले.
येऊन पुरंधरास वेढा घातला. तेथे इदलशाही फौज सर्जाखान वगैरे
आषाढ सुध १० राजे येऊन लढाईचा सला
जयसिंगास भेटोन सला जाला राजश्री
संभाजी
(बाजू १ अर्धे पान खालचें)
(कार्तिक) वद्य १२ (१३) सोमवारी जाला. कार्तिक वद्य ५ संभाजी राजे
स्वार होऊन दुसरे दिवसी औरंगाबादेहून शाहजादा शाआलम यास भेटावयास
राजगडास आले. औरंगाबादेस गेले. मोगलासी सला जाला.
जसवंतसिंगाची भेट कार्तिक वद्य ६
राजपुत्राचे दर्शन
शके १५९० कीलक संवछर श्रावण सुध ८ बुधवारी प्रतापराऊ व श्रावण सुध ५ रविवारी नीराजी राहूजी स्वार होऊन औरंगाबादेस फौजेनसी गेले १.
(बाजू २ अर्धे पान खालचें)
शके १५९१ सौम्य संवछर.
भाद्रपदमासी औरंगजेबेल कासीस माघ वद्य ९ सुक्रवारी कोंढाणा घेतला.
उपद्रव केला देवालये पाडिली १. उदेभान किलेदार मारिला. तान्हाजी
पौष मास मोगलाचा व सिवाजी राजे मालुसरा राज्याकडील हशमाचा सुभेदार
याचा सला तुटला. प्रतापराऊ व पडिला.
आनंदराऊ फौजेनसी औरंगाबादेस फालगुण सुध १५ राजगडी राजाराम
शाहाजादीजवळ होते ते राजगडास उपजला.
आले. १ फाल्गुण वद्य १२ भोमवारी निळोपंत
मजूमदार * *
* * * * * * *
(सबंध पान)
७ (पृष्ठांक)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
धाऊ प॥ बिन वाल बाबाजी बिन रामजी
पा। खैरा क॥ सुपे भाबकर मौजे वढाणें
दोघाचे हात एकवट बांधोन दिव करावया उभे राहिले यावरी गोत देशमूख महालानिहाय बित॥
आपाजि नायकर व श्रीपाजि साहाजी देशमुख
कुळकरणी अ॥ जाकोजी कोडे पा। चाकण
देशमुख ता। खेडबारे गोंदजी व दतो नामाजी अजहती
लिलोजी अजहत देशमुख क॥ सासवड आपाजी निगडे प॥ सिरवळ
एही अर्जदास्त केली जे आह्मी गोत आहो यां दोघास पुसोन तरी आपणात आपण समजले तर समजावून यावर सदरहू देशमुख दोघापासी जाऊन पुसिलेयावरी दोघे राजी होऊन आत्मसुखे भाका दिधलिया जे गोत हद घालील तेणेप्रमाणे दोही गावी वर्तणें ह्मणून गोवर जोंधले सिवोन भागा ठेविलिया देशमुख सदरहू एऊन हाजीर मजालसीस सांगितलेयारी मुनसुफिदारी दोघापासी कतबे मागितले गोत सिवेची हद घालील त्यासि जो तकरार करील त्याने दिवाणी होन ५००० व सिसे ५ देणे ह्मणून कतबे लेहोन दिधले यावरी हाजीर मजालसी तिवधियाकरता पश्चमे तिंवधा तेथे गेले तो मजरा चिचोली कसबे मजकुरीचा सुपियाखाले कमाविष आहे तेथील मिरासी निंब पाटील बिन माया पाटिल-बोरकर हाजीर मजालसीस होता त्यासि पुसिले त्यावरी इमान घातला ते असत्य वदसील तरी तुझिया पूर्वजाचे तोंडी मांगीमाहारीचे असुद तेणे आपले पूर्वज स्मरोन हद दाखविली पश्चमे दिसे ओहळाखालील काठी दक्षिणे चिचोळी सुपाचा मजरा उत्तरे वढाणें हे हद दाखविलियावरी मुनसुफिदार व गोत खातिरेस आणोन तेणे दाखविलीयापैकी वढाणाची जमीन. सुपेचिंचोळियांकडे टाकून अज बिघे ४ च्यार अलीकडे हद सिवेची घातली तिवधा वोहळास पूर्वे काठी वोहळा पैलाडि पश्चिमे दिशा वोहळा ऐलाडि दक्षणे चिचोळि सुपे उत्तरेदक्षणे हा तिवधा करून पुढे हद घातली पुढे पुणेदेशीचे सुपेदेशीचे मोकदम चालिले पुढे दगड थोडे घातले त्याप्रमाणे मुनसुफीदार व हाकीमशरा व देशमुख माहालानिहाय व देशक व देशमुख हरदो महाल या दो गावीचे मोकदम सिवेस बांध घालून दगडाचे खिळे केले बित॥
पश्चमे तिवधा तीन गाव
वोहळा करता पश्चमेस वोहळा खालते पूर्व
कांठपासून पिसा काठापासून दक्षणे उत्तरे
सुपे वढाणें
खिळा वोहळाचे कांठ नजीक मुरबी
या तिवधियापासून बिदाणे क॥ सुपे
दिवाचा खिळा थोर केला असे तेथवरी सदरहू अर्ज बिघे ४ च्यार टाकून वढाणाची जमीन पैकी सुपियाकडे टाकून तेथवर आले दिवाच्या खिळिायापासून तहद तिवधां डोंगराचे माथांपासून मार्ग बहुळगावास जातो तेथे केला सुपे वढाणे व पडवी या दोही तिवधियामध्ये बिदाणे बित॥
दिवाच्या खिळियापासून ईशाने पुढे तीटाऊन खालून नेम मुईन करून हद घालून तिवधियासि नेले तलई वढाणेचे यास उत्तरेपासून मार्ग वडवडास व देऊळगावास जातो तेथे डोंगरमाथां तिंवधा केला
पूर्वे सुपे पश्चमे वढाणे उत्तरे पडवी
सदरहू सिवेची हद घालून गडधो सिवेसि घातले बित॥
येणेप्रमाणे हद सिवेची घातली येणेप्रमाणे सालाबाद दोही गावी वर्तणे यासि जो पेस्तर हद मोडून कुसूर करील तेणे दिवाणी होन ५००० पांच हजार व सिसे ५ पाच देणे
हा महजर सही
हा करार कर्दे नाऊजी बिन बाबजी बिदस्तूर माहादो लखमदेऊ
खैरा व धाऊजी बिन वाल प॥ कुलकरणी
मोकदम क॥ सुपे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
मुलाने मसीद प्रा। सुपे मेहतर दादू प्र॥ सुपे
विठल बिन वामन प॥ मौजे अनजून मेहतर अबान प्र॥ सुपे
प॥ सिरवळ नाई पाटिल धांगदे प॥ सो।
हिरपाटील मायापाटिल सो। अनजून
कारखेल प॥ सुपे भिला बको विर्तीकार मौजे खांबगाऊ
माया सुधो वृत्तीकार प्रा। पुणे
गोदा कान्हो विर्तीकार सो। कोथरुड गंगो बसो विर्तीकार सो। पिपरी
प्रा। पुणे प्रा। पुणे
माया काळो विर्तीकार सो। तुको चांगो विर्तीकार मौजे विखल
सुपे खुर्द प्रा। वाई
सदरहू कागद हाजीर मजालसी दाखविला यावरी मुनसुफीदारी खातिरेस आणितां दिव करून जमीन साधिली ह्मणून सदरहू कागद लिहिला आहे तरी जे वख्ती दिव होते ते वख्ती हरदो महालीचे कारकून व देशमुख व देशक व जवार व कोनेकुए मेळऊन दिवाण होते तेथे महजर त्यांची नावे निशाणे करून महजर करिताती ए कागदी तैसा अमल नाही यासि तो कागद रुजू न पडे बातील करून दूर केला यावरी सुपेकरास पुसिले धाउजी बिन वाल पाटिल खैरा कसबे सुपे याणे मालूम केले ज मौजे वढाणे सुपे याचे सिवेवरी वसिले ते जमीन माझी मजरे मौजे खोरास सवि आहे तैसीच हद दाखवीन ह्मणून सांगाते अजुराण देऊन हद पाहिली तो समुद्रे वढाण सुपियाखाले सापडोन तिवधां पूर्व त्याजखालील देऊळगाव व खोर सुपे बिदाण थोट वड तरडादेवीचा त्रिशूळ दाखविला सदरहू हद दाखविली हाली वर्तणूक लेहोन दिधलीर पहिला तिवधां थोट वढ तेथून तळयावरील पालीस ईस्वराचे पाटीने तहद पांढरविहीरपावेतो यावरी सदरहूने हदचे कतबे घेतले सदरहू अमल हाजीर मजालसी खातिरेस आणितां वढाणे कदीम मौजा पुणियाखाले दिवाणचे दफ्तरी आहे तो सुपियाचे सिवेवरी कैसा हे माकुळ नव्हे ऐसे जाहालेयावरी मनसुफीदार व हाकीमशराव देशमुख व देशक हाजीर मजालसी आणितां कसबे मजकुरीचा मजरा चिचोळी मोडोन कसबियाखाले कमाविश होते पांढरी देवस्थान आहे तेथील मिरासदार बारकर पश्चमेस वाडा सवविताती मौजे वढाणे दोन्ही पांढरिया कदीम अमले सामले आहेत या दोही दरम्यान दोरिया धरून मधेमध साधून तेथे दिव घातले यावरी सुपाचा देशमुख व मोकदम व कारकीर्दी अमानत पुणाचा ठाणेदार लखमाजी मुदगल व सुपाचा ठाणेदार रामाजी विस्णु निवाडा करावयास आले ते वख्ती हद नेमून कतबे वढाणाचे मोकदमाचे बिदस्तूर मोरो तानदेऊ देशकुलकरणी प्रा। पुणे तेथे मजमून जे हाली आपले गावीची जमीन आपले वेळेस नेली ते हद दाखविली पेडवळाची गडधो त्या पुढे आपलिया अजियाचे कारकिर्दीस पेषजी सेतें नेली आहेत तेही सांगितली त्यावरी हाजीर मजालसी साहेबी करारती केली गडधो चिंचा हदनामा आहे तेथे दिव करणे कीं हद कारकिर्दी दर कारकिर्दी सीव आपली सेतें तागाईत वणगोजी आपली सेतें तेथे गडधो आहेत तेथे दिव करीत खरा जालों तरी माझी हद आहे तेथून खाणे खोटा जालों तरी सुपेकरी हद दाखविलियाप्रमाणे खाणे ह्मणोन तह करून येणेप्रमाणे कतबा सुपेकरापासीं होता तो दाखविला दोंहि हदा दरम्यान मध्ये मध्य साधून दोरिया घालून कतब्यांत बिदाणे तिवधे घालणे ह्मणून सुपेकर बोलिले यावरी मनसुफीदार व हाकीमशरा पुढिल कतबा जाला तेथे माहारे दिव करावे ऐरणीचे बन ना आणि तेथे एैरणी दिव जाले नाही यावरी वढाणाचा खून झाला आहे तरी हा कतबा मसमू आहे कीं काय हाकीमशरा बोलिले जे खुणाचा मुबदला खून दिधला तर कतबा मसमू धरावा तरी ऐरणी दिव साहेबी मोडिले आहे करकसियाची जमीन दोघा मोकदमाचे दिव तेल ५ व तूप
५ ऐसे तपेलियात घालून ताऊन दोघा मोकदमाचे हात एकवट बांधोन घालावे ऐसी रजा --- मलिकसाहेबाची बांची आहे यावरी हाजीर मजालसीस सदरहू कतबे दूर करून धाऊजी बिन दाद प॥ हद दाखविली वढाणें सुपियाचे वाडी समुदा सीवार सुपियाखाले सापडऊन पांढरी देखील खोर व देऊलगाव यासि सीव केली ते दिवाणीची पांढरी कदीम मौजा तोडावा कोयरे वगैरे माकूल दूर केले आणि चिचोळी कसबे मजकुरीचा मजरा व वढाणें दोन्ही पांढरिया दरम्यान मजून कबूल केले तेथे ब॥ रजा मलिकसाहेब ते
५ व तूप
५ एकूण दाहा सेर तपेलियात ताऊन दोही गावीचे पाटिलाचे हातीची नखे काढून निंबू साबण लाऊन हात पाख करऊन आंघोलिया करविलिया त॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४.
(नकल)
श्रीशंकर.
१५५० श्रावण वद्य १३.
महजर बतेरीख २६ जिल्हेज हाजीर
मजालसी
हाकीम शरा | |
काजी चांदबिन | काजी इसाख |
काजी मनसूर प्रा। | प्रा। इंदापूर |
सुपे | |
काजी --------------- | |
प्रा। चाकण | |
दिवाण लोक | |
शाहाजी अल्ली दतो लिगरस सितोळे देशमुख कान्हो सुपे बिरादर सोमाजी मोकदम मौजे दौंड + + रीदेऊ व माहादो लखमदेऊ कुलकरणी चितपाटिल बिन दाद पाटिल अजहती मलजी भगत मौजे राजेवाडी तुकपाटिल बिन विठपाटिल मोकदम मौजे कोरगाऊ मल्हारजी मोकदम मौजे लोणी तिमाजी बिन माहाद मौजे लोणी तिमाजी बिन माहाद प॥ मौजे खोर दादप॥ बिन देऊपा॥ मोकदम मौजे भिउंडी अमाजी गायकवाड चौगुला मौजे कायवाडी लंबाची खंडप॥ बिन लिंगप॥ मोकदम मौजे पिपरी लिलोजी अजहत देसमुख क॥ सासवड प॥ इंदापूर देशमुख प॥ म॥ रखमाजी कान्हो देशकुलकर्णी |
हैबदराऊ हवालदार व मालो दतो मजमूदार प॥ सुपे मकुंद नरसिह हरकारे नागोजी जगदेराऊ रघोजी बिन जाऊजी मोगदम मौजे खडकी व नरो बाबदेभट बिन लक्षमणभट जोसी काउजी बिन हरजी मोकदम व नाईकजी कोलता मौजे पिसारवे बाजि बिन साउजी मोकदम मौजे पांडवेस्वर कान्होजी बिन एकोजी सितोळे मौजे खडवी सूर्याजी बिन जाउजी प॥ मोकदम व दाद प॥ चौगला मौजे नाहीगाऊ +++ बिन बालजी प॥ मोकदम मौजे एकवडी सूर्याजी बिन बाजी मोकदम मौजे अबिले साहाजी देसमुक मौजेचाकण साउजी प॥ मोकदम मौजे पिसे त॥ खेडेबारें आपोजी निगडे व श्रीपाजी कुलकर्णी अ॥ जाउजी कोडे देशमुख |
गोदजी दुवले अ॥ दतो मानाजी |
बि॥ श्रीपाजी नरसिंह |
सु॥ तिसा आश्रैन अलफ श्रीशके १५४० कालयुक्त सवंछरे मार्गेस्वरवद्य द्वादशी ब्रहस्पतवार ते दिवसी महजर ऐसा जे देहाय प्र॥ पुणे व देहाय प्र॥ सुपे यां दोही विलायतीमध्ये सिवेचा करकसा लागला होता पेशजी कारकीर्दीस खूनखणबिया जालिया तरी दों माहालीचे देशमुख हुजूर हजरती साहेबाचे बंदगीस आणून बदल निवाडा सीव मुनसफीदार पाठविले बित॥
शाहाजी अल्ली दतो लिगरस लग
मकुंद नरसिंह हरकारे
माहालास आले कसबा सुपां मुकाम केला कसबे मजकुरीं व मौजे वढाणें प्र॥ पुणा यां दोही गावास सिवेचा करकशा होता मुनसफीदार कसबे सुपां एऊन मुकाम केलियावर मौजे वढाणे प्रा। पुणे तेथील काऊजी पाटिल बिन आपाजी चौधरी यांचे सेतांत सुपेकराची गुर निघाली ते त्याणे हरदो गावीचा करकसेयाची जमीन दोही खाले होती तेथे भोवडिली यावरी कारकीर्दी एसाजी दिवाकर ठाणेदार प्र॥ सुपे तेहीं ठाणाहून सांगाते तोपची देऊन पाठविला त्या तुबकियाने बार करून काऊजी बिन आपाजी चौधरी आपले सेतांत वढाणे नजीक होता तेथे तुबकियाने गोळीने हाटिला तो मयत जाला हा अमल मुनसफीदारास मोकदम मौजे वढाणे मालूम केला मुनसुफीदारी खबर घेतां सदरहू खून इतबारखान सांगातें तुबकी गेला होता त्याने केला हें लाजिम जाले यावरी एसाजी दिवाकर हवालदार प्रा। सुपे यासि शाहाजी साहेबी सांगितले जे इतबारखान तुबकी हाजीर करा खून जाहाला आहे हजरती मलिकसाहेबाची अदल इनसाफ दखल असतां खून जाहाला आहे तो इतबारखान होता तुबकी हाजीर जाला नाही गैरहाजीर जाला मोकदम मौजे वढाणे रजा देऊन बहुडाविला यावरी विलातीचे सीव निवाडा करावया मुनसिफदाही गस्ती गेली निवाडा करितां करितां कसबे सुपे व मौजे वढाणे यासि सिवेच्या निवाडियाबदल सिवेसी आले खातिरेसी आणितां पाहिले वढाणे- मोकदमे आपली दाद दाखविली कदीम पश्चिमेकडे चौ गावीचा चौधा दक्षेण सुपे कसबेकरीची चोळी मोडोन कसबियाखाले कमाविश होते पश्चमे रिशापिशा उत्तरे वढाणे त्या चौधियापासून बिंदाणेकडे तळई सोनार खिळा पुढें उत्तरें तिवधां तीन गाव सुपे वढाणे पडवी पश्चमे वढाणे पूर्वे सुपे उत्तरे पडवी एणेप्रमाणे हाद दाखविली यावरी सुपेकरी कागद दाखविला तेथे मजमून की स्वस्ति श्री शके १४४६ तारण सवछरे मार्गेश्वर वद्य रवौ तदिनी दसकत कान्हो लुखो पेधो लुखो मलो कोंडो माहार विर्तीकार मौजे वढाणे आत्मसुखें पेधो मालोस व पेधोई मालीस लेहोन दिधले ऐसे जे मौजे चिचोली मजरा सुपाचा तेथील सिवेची सेते वढाणेयाखाली पडिली होती तें दिव करून साधिली तें लेकुराचे लेकुरी औलादी अफलादीनसी खाइजे ए बाबे मी उभा राहे माझीए वंसीचा उभा राहे तरी दिवाणी खंड सिसे २ टके ५००० देणे अन्यथा नाही हदमहदूद वरिलीकडील तरडा देवीचा त्रिसूळ तिवधा पिशाची चोळी वढाणे तेथून चिचेवरील राजोखाट तेथून बिंदाणे पाढरजुळीचा खिळा तेथे तिवधां चिचोळी सुपे वढाणे हा तिवधा तेथून हद एकतलईची पाली तेथून खाईल वड देऊळगावीची वाट तेथून तिवधां पडवी वढाणे सुपे हे सीव तुवा खाइजे या बोलास अन्यथा नाही याचे गोही लिहिले आहेत बित॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
हरदोजणा नफरांच्या तकरीरा मनास आणून मौजेमजकूर बलुते कोनेखुटे यांसि तलब करून आणिले.
सोनोरी |
मोकदम मोजे खानवड |
त्यांचे डोईवर सुकुरत घालून गोही पुसिली तिही X X X उभयवर्ग साठी सत्तर वरसे भांडताती यांचे निवाडे जाले नाहींत कुंभारकर पाटीलकी चालविता होता तो खांडगियानी मारा करून भांडण बहुत दिवस आहे आतां हरदोजण दिव्यास राजी जाले आहेत दिव्य करितील खरा होईल तो खाईल खोटा होईल तो तुटला जाईल. ऐसी गोही जालियावर जाऊ पाटील व अंचल पाटिल खलदास गोतामधें गेला होता X X X जे अंचलपाटिलानें रवा करणे साधून खाणे म्हणऊन खलदच्या X X X त्यावर तान पाटील कुंभारकर दिव्यास राजी जाला यावर ठाणाहून पांढरीवर दिव्य करावे ऐसा तह करून पाठविले आधले दिवसी हत धोऊन हाती पिसवीया घातलिया एरे दिवसी श्रीशके १५३० कीलक नाम संवछरे जेस्ट वद्य एकादशी रविवार छ २४ माहे सफर
विठल तानदेऊ अजहत | लिंगो पंडित ठाणेदार |
कृष्णाजी त्रिमल मुश्रीफ | कर्याती सासवड |
X X X पाटिल मोकदम | मालोजी नरसिंगराऊ सितोले |
क॥ पुणे | देशमुख यांचे अजहत त्रिंबक |
उमाजी मोकदम | पिलदेव व एकोजी सितोले |
मौजे वाल्हे बाऊजी मोकदम मौजे भिवरी जाऊ पाटिल मोकदम मौजे वाघापूर |
व कृष्णाजी चौधरी व देश- कुलकर्णी यांचा यारेदी रंगो श्रीपति कसबे सासवड गणाजी व बालोजी व |
हिरोजी मोकदम लखोजी | |
सताजी व बोपाजी | बाबाजी दाणी |
मोकदम मौजे पारगाऊ | देऊजी कासार |
बाद पाटिल मोकदम मौजे भिवडी X X X पाटील मोकदम मौजे एकवडी बाल माली चौगुला मौजे सानवडी बाबाजी नेलेकर व जानोजी खैरा मौजे कोढित खुर्द |
रूपाजी सेटिया व मालजी सेटिया माहाजन दमसेट रंगारा क॥ जेजूरी बालसेट सेटिया भिका सुतार बालोजी बुरुंजा हशम नाईक जथे कान्होजी बाबर |
या हुजूर तान पाटिल बिन अंचलपाटील सुश्चातत होऊन पत्र भाखा बांधोन मौजे मजकुरीचे बहिरवाचे देवलापुढें तपत माहादिव्य तानपाटिलें सात हि मंडलें चालोन रवा काढिला व पाटिल खांडगे याने साउली केली होती हाती पिसविया घालून तेथून स्वार होऊन छ २६ माहे सफरी सीसंबेचे रोजी हातीच्या पिसविया काढिल्या बिहुजूर मजालस मौजे वाल्हे
विठल तानदेऊ अजहत कृष्णाजी त्रिमल मुश्रीफ त्रिंबक पीलदेव व एकोजी सितोले व कृष्णाजी चौधरी अजहत मालोजी सितोले देसमुख व रंगो श्रीपत यारीदी देशकुलकर्णी पाटिल मोकदम मौजे वडगाऊ सुलतानजी मोकदम मौजे साकुर्डे रुद्राजी जाधव व जनाजी खैरा मौजे काडीत खुर्द |
सांगो माऊजी सरसंमत कर्हेपठार |
X X X हात पाहिला चोखट निघाला तानपाटिल कुंभारकर खरा जाला यावर ठाणियास तानपाटिल व जाऊपाटिल आणिले हाजीर मजालसीस तानपाटिलाचा हात पाहिला तानपाटील खरा जाला तानपाटिल कुंभारकर आपली औलियाद व अफलादी लेकराचे लेकुरी आपली पाटिलकी खाणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३.
श्री.
१५३० आषाढ शुध्द २
नकल
महजर बतारीख १ माहे रबिलाखर बिहजूर हकीमशरा व नैब गैबत हाजीर मजालसी प्रा। पुणें
मजालसी प्रा। पुणें
काजी आबन हकीमशरा व काजी इसमाईल शरा सेख नूरमहमद मुतवली रोजा मखदूम सेख सला कृष्णाजी त्रिमल मुश्रीफ मालोजी नरसिंगराऊ सितोले देसमुख प्रा। मजकूर * * बिन * * सेट सेटिया क॥ पुणे व गोपालबा वेव्हारा माहाजन रंगसेट सेटिया पेंठ मूर्तजाबाद |
मीर सैद इसीफ नैब गैबत किले कोंढाणा व हवाले प्रा। पुणे विठल कोनेर मजूमदार हिरोजी पंडित नाजीर तुकपाटिल बिन चितपाटिल क॥ पुणे बापसेट बिन जोमसेट सेटिया व कृष्णाजी मुदगल व विष्णूबा माहाजन पेटा शाहापूर तानसेट सेटिया पेठ मलकापूर |
इसम नाईकवाडी | |
कान्होजी बाबर एकबोजी कानडा नरसपाटिल बिन हेमपाटिल मोकदम मौजे धायरी |
धाऊजी जाघला नामाजी सितोला हाली मोकदम मौजे हडपसर देऊजी पाटिल मोकदम मौजे नर्हे |
X X व बाबाजी मोकदम मौजे आंबेगाऊ बु॥ काऊ पाटिल मोकदम माजे उरली बु॥ |
गोमाजी मोकदम व गुंडाजी मोकदम मौजे मांजरी बु॥ एस पाटिल मोकदम मौजे पर्वती |
लखमोजी मोकदम मौजे लोणी कालभोर |
दतजी व परसोजी मोकदम मौजे गराडे |
बाऊजी मोकदम मौजे भिवरी बाजी मोकदम मौजे चांबिली बाजी दरेकर मोकदम मौजे आंबिले बाजी मोकदम मौजे पिसार्वे |
संताजी व बोपाजी तुकपाटिल मोकदम |
सुलतानजी मोकदम मौजे साकुर्डे |
नरसोजी मोकदम मौजे जेजूरी |
नाईकजी मोकदम मौजे सोनोरी |
कुमाजी मोकदम मौजे वाल्हे |
राघपाटिल मोकदम मौजे हिंगणे बु॥ |
मोकदम मौजे खानवड हिरोजी मेहत्रिया लोहार |
सु॥ सन तिसा अलफ कारणे महजर ऐसा जे वणपुरीचा पाटिलकीचा वेव्हार
अग्रवादी तान पाटिल बिन अचलपाटिल |
पस्वमवादी जाव पाटिल बिन बाद पाटिल |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २.
१५२४ आषाढ शुध्द ३.
॥ अज रख्तखाने खोदायवंद खान अलीशान ख॥ हैबतखान साहेब अलीदयाम दौलतहू तं॥ कारकुनानि पा। पुण्हे बिदानद की ह॥ सु॥ सन अलास अलफ जमीन एक चावर ५१ दर सवाद मौजे परवती ब॥ सन नाम बाजी अजरामर्हामती बे॥ तानाजीराम देसकुलकर्णी प॥ मजकूर जमीन दे॥ माहासूल व नख्तयाती दिल्हे आहे दुबाला कीजे. तालीक लीहून घेउनु असली परतेतु दीजे. बाबती सेत बादुनु दुबाला कीजे औलीयाद वा अफवाद चालवीजे. तेरीख १ माहे मोहरम.
तानाजी वलद रामाजी वलद होनाजी देशपांडे प्रांत पुणें-होनप.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १.
श्री.
यादी बिंदाणे सिवेची मौजे पिसोई ता। कर्हेपठार व मालसिरस दोही याची बिंदाणे बित॥
वोढियाचे खालील काठापासून उभा बांद दगडाचा पठारी तिवघा
दक्षणेस पिसोई १ उत्तरेसी टेकवडी १ पूर्वेस मालसिरस १ तेथून खालता उभा बांद सेंधी ४ खिला १ खलवडे १ खिला खलवडिया खालता सेंधे दगडाचे १ फणी खालता उभा बांद दगडाचा त्याचे खालते लवण त्याजखालती ती दगडाची रुरो त्याजखाले पूर्वामुख धोरड माचाडास अडसरावेरी आला तेथे वाटे तरता अडसरी खिला तेथून पुढे वाट वाटेवरी गची खडक वेहलालीची जाली वाटे खालता लवण तेथे धोरड पूर्वामुख गेला आहे तेथून खालता अडसर तेथून पुढे दक्षणेस अडसर त्याच्या माथियाने धोरड दक्षणेस गेला असे माथा खिला मोरीचे झाड त्याजखालते अडसरी खलवडे १ त्याजपुढे खलवडी सुमार ७ साल याजखालती वाट वाटेखालता माथाचा खिला तेथे पांढरजाळीचे झाड खालती धोंडी तेथून पुढे रुरो थोरली पेडालापासून पस्छमेसी पुढे दक्षणेस सेधी * * वारुळ पुढे बेरी * * * सुमार ३ * * * * पुढे सेधे १ पुढे * * * * * * * सेवटीच्या सेधे * * * ती दगडाची पुढला धाकटा १ पुढे तिवधा गांव ४ पूर्वेसी नायगाऊ १ पस्छेमेसी पिसोई १ उत्तरेसी मालसिरस १ दक्षेणेस माविडी १ एकूण गाऊ च्यारी