Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
महाराष्ट्र इतिहास.
संकेत.
श्री मत्समर्थसज्जन-,
बर्हन्मेरूशिरःप्रतापगडराचित्यो ।
नति रामदासशिवपर्दि,
स्वधर्मभूरातमहारथींखचित्या।।१।।
महाराष्ट्राचा इतिहास अजून सिद्ध करावयाचा आहे. त्याला साधनीभूत जीं जुनीं राजकीय व धार्मिक व्यवहाराचीं, ( त्या त्या बाबतींतील पुढा-यांची ते ते व्यवहार त्यांच्या हातून घडत असतांना एकमेकांनीं एकमेकांस लिहिलेलीं) अस्सल पत्रें ती, सध्या कोठें सुप्रसिद्ध स्वेतिहाससंशोधक रा. रा. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, मयूरभक्त लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांसारखें पदवीधर, तसेच रा. दत्तात्रय बळवंत पारसनीस ब्रह्मेंद्र स्वामीचें चरित्र लिहिणारे असे कित्येक सद्वृहस्थ अधिकउणें प्रयत्न करीत आहेत तेव्हां, उपलब्ध होऊं लागलीं आहेत. त्या सर्व उपलब्ध व उपलभ्य साधनांचें जेव्हां प्रकाशन होईल तेव्हां महाराष्ट्राचा आपल्या प्रिय देशाचा व पूज्य पूर्वजांचाखरा खरा इतिहास “धर्मार्थकाममोक्षाणामुपदेशसमन्वितं । पूर्ववृत्तं कथायुक्तमितिहासं प्रचक्षते ॥ १ ॥”–ह्या आपणांकडील अत्युदात्त व्याख्येशीं जुळणारा असा कोणा तरी अर्थात् स्वभूमि, स्वभाषा, स्वजन आणि स्वधर्म यांस वाहिलेल्या स्वजनोत्कर्षेछू महापुरुषाकडून लिहिला जाणें शक्य होणार आहे अशी आमची दृढ समजूत आहे. तिला अनुसरूनच सद्य:स्थितींत आह्मी महाराष्ट्र इतिहासाची साधनें जशीं जर्शी तीं आमच्या हार्ती येतील तशीं तशीं छापून प्रसिद्ध करण्याचें आपलें कर्तव्य समजून करीत आहों.