लेखांक ६०.
श्रीशंकर. फेब्रुवारी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गणेशपंत केळकर दि॥
तात्या जोशी सातारकर स्वामी गोसावी यांसिः-
सेवक कृष्णराव नारायण जोशी नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल ता। माघ शु।। मु॥ श्रीरंगपट्टण जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. आह्मीं आलिया त।। तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तेणेंकरून चित्त सापेक्षित असे. ऐसें न करणें. इकडील वर्तमान तरीः- हरिहरचे मुकामाहून पत्र बागलकोटास प।। होतें. तेथून राजश्री मल्हारपंत याणीं आपले जासुदासमागमें तुह्मांकडे पत्रें पाठविलींच असतील. त्यांवरून अलीकडे आह्मीं दरमजल पौश शु॥ एकादशीस मु॥ मजकुरीं दाखल जाहालों. नवाबसाहेब यांची भेट जाहली. दुसरे दिवशीं मेजमानीचा सिदा सर्वांस व कांहीं नख्त खर्चास प।।. एक दोन रोजानी दोन तीन बैठकींत बोलणेंही जाहलें. त्यांस, श्रीमंतांकडील तहनाम्याची यादी आणिल्या होत्या, त्यांपैकीं दोन तीन कलमें यांस तपसील लागला. तेव्हां येथून नवाबांनीं नवा मसुदा करून दिल्हा. या प्रो। तेथून करारनामा आणवावा. ह्मणजे कराराप्रो। ऐवज तुह्मांस मोघम देऊन तुमची रवानगी करून देऊन, आह्मीं चेनापट्टणाकडे इंग्रजावर मसलतीस नमुद होतों. या प्रो। बोलणें जाहलें. कदाचित् तक्रार केलियास निरोपही देतात, हो अर्थ चित्तांत आणून, येथील सविस्तर मजकुराची पत्रें लिहून, मसुदे व पत्रें, सांडणीस्वारांची जोडी आपले सरकारची आली होती, त्यासमागमें पुणियास पत्रांची रवानगी केली आहे. त्याबरोबर तुह्मांसही पत्र प।। आहे, तें तीर्थस्वरूप राजश्री आपाकडे पावेल. ते तुह्मांकडे रवाना करतील. पुण्याचे पत्रांचीं उत्तरें सरकारचीं येत तों पावेतों आमचें राहणें जाहलें. शिवरात्रीस आमचें येणें होत नाहीं. आह्मांविषयीं चिंता तुह्मीं तिलप्राय करूं नये. नवाबसाहेब बहुत लोभ ममता करितात. थोडेबहुत अलीकडे नको ह्मणत असतां, आग्रह करून खर्चासही दिल्हें. कृपेंत किमपि अंतर नाहीं. पुणियाहून पत्रें नवाबसाहेब यांचे मुद्यामाफूक आलियास सरकारचे जाबसाल अमलांत आणून येत असों. कदाचित् उत्तरें समर्पक नच आलीं, तरी येथून यांची आज्ञा घेऊन सत्वरेंच येतों. निरोपाविसीं किमपी गुंता पडावयाचा नाहीं. श्रीसांबजीचा शिवरात्रीचा उत्साह यथासांग सालाबाद प्रो। करणें. आह्मीं घरीं नाहीं, ह्मणोन उणें पडों न द्यावें. वरकड सर्वांस नमस्कार सांगावा. बहुत काय लिहणें लोभ कीजे हे विनंति.
तीर्थस्वरूप राजश्री आबा दीक्षित मामा यांसी साष्टांग नमस्कार विनंति. लि।। परिसोन लोभ करावा. हे विनंति.
सेवेसीं बाळाजी दत्तात्रेय व गोपाळ गणेश बेडेकर सां। नमस्कार.
तीर्थरूप मातुश्री ताई व आत्याबाई यांसि सां। नमस्कार.
पैवस्ती शके १७०१ फा॥ शु॥ १ शुभवार.