इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे लिखित
समग्र साहित्याच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

कै. वि.का. राजवाडे हे नाव ज्यांना माहित आहे व ज्यांनी त्यांचे साहित्य वाचले आहे अशा व्यक्ती ह्या संकेतस्थळाकडे ओढल्या गेल्या तर त्यात आश्चर्य नाही. कारण राजवाडे ह्या माणसाचे कर्तृत्व अनन्यसाधारण आहे. परंतु, राजवाड्यांचे नाव प्रथमच कानावर पडले असे सांगणाऱ्या हजारो व्यक्ती आणि विशेषतः तरूण पिढीतली मंडळी आज आपल्यात आहेत. अशा सर्वच मंडळींसाठी हे संकेतस्थळ आहे.

सानेगुरूजी हे मराठी साहित्यातील मोठे नाव. त्यांनी वि.का. राजवाडे यांचे चरित्र पुस्तकरूपाने लिहीले आहे. ते संपूर्ण पुस्तक संकेतस्थळावर दिले आहे. ते वाचल्यास वि.का. राजवाडे कोण होते, व त्यांचे कर्तृत्व काय होते याचा परिचय वाचकांना अधिक तपशीलाने होईल.

आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

धन्यवाद.