Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ ५ जमादिलावल, लेखांक १०४. १७०२ चैत्र व॥७
सन समानीन श्री. २५ एप्रिल १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। हरी बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणूल स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं पत्रें पाठविलीं तें पावलीं. श्रीमंतांचे पत्रावरून सर्व अर्थ ध्यानांत आले. नवाबबहादूर यांणीं चेनापट्टणकर कुमसेलवाले यांस निरोप दिल्हा. खेमे बाहेर जाले. आमचे रवानगीची तर्तूद जाली. राजश्री पाटीलबावा यांजकडील निभावणीचे पत्राचा मात्र गुंता. तें सत्वर पाठवावें. ह्मणजे, आह्मांस रुकसत देऊन आपण चेनापट्टणाकडे जातील, ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, पाटीलबावांकडे पत्राविसीं सांडणीस्वार व जासूद जोड्या फार रवाना केल्या. मार्ग नीट नाहीं, ह्मणोन कांहीं मारले गेले. कांहीं पोहचले न पोहचले, याचा संशय. सबब, तुमचीं पत्रें येतांच आणखी जोड्या रवाना केल्या. तों कालच पत्रें आलीं कीं, मसविदा पावला. इदईक मसविद्याप्रमाणें पत्र सत्वरच येईल. केवळ या पत्राकरितां तटून राहणें ठीक नाहीं. नवाबांनीं मसलतीवर जावें. पत्र येतांच पोहचाऊन देत असों. आलें ऐसें जाणून दरकुच जावें. एविशीं तुह्मीं व राजश्री नरसिंगराव मिळोन नवाबबहादर यांची खातरजमा करावी. सविस्तर श्रीमंत नानांनीं लिहिलें त्यावरून कळेल. *र॥ छ १९, रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
राजश्री गणेशपंत स्वामीस सं॥ नमस्कार. लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ ५ जमादिलावल, लेखांक १०३. १७०१ चैत्र व॥७
सन इहिदे समानीन श्री. २५ एप्रिल १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं--
पो। बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेषः- तुह्मीं फाल्गुण वद्य सप्तमी व अष्टमी व चतोर्दशी व चैत्र शुध त्रितीया व पंचमी ऐसी पांच रवानग्याचीं पत्रें पाठविलीं. ते चैत्र शुध त्रयोदसी चतोर्दशी व वद्य त्रितीयेस पावलीं. लिहिला मजकूर सविस्तर समजला. नवाबबहादर याणीं आपणाकडील करारनामा व निभावणीचीं पत्रें येतांच चेनापट्टणवाले कोशलदार यांस येक येक वस्त्र देऊन रुकसत केले. आपण डेरे बाहेर दिल्हे. तमाम कारखानेवाले यांस तयारीविशीं निकडीची ताकीद जाली. फौजा व पाळेगार यांस बेंगळूरच्या सुमारें येण्याची पत्रें गेलीं. खांसा हि सत्वरच डेरेदाखल होणार. आमचे रवानगीची तर्तूद होत आहे. लौकरच आह्मांस निरोप देऊन आपण चेनापट्टणप्रांतें जाणार ह्मणोन विस्तारें लिहिलें. ऐसीयांस, इंग्रजाचे तंबीची मसलहत कसी, दिवस बाकी किती राहिले, याचा विचार सर्व नवाबबहादूर यांचे ध्यानांत आहे. ल्याहावें ऐसें नाहीं. मसलहत ठरून साहा महिने जाले. कागदींपत्रींच लिहिणीं होत गेलीं. येक येक कलमाची तकरार पडली. हालीं नवाबबहादूर यांचे मर्जीनिरूप सर्व घडून आलें. नेमाप्रों। तुह्मांस निरोप देऊन आपण चेनापटणच्या जिल्हांत गेले असतील. त्यांत गुंता नाहीं. पुढें बरसातीस दोन महिने आवध आहे. तों पावेतों इंग्रेजी मुलूक मारून ताराज करावा. राजश्री रावरास्ते यांजकडील मातबर व फौज पाठवणें. त्यास, तुह्मी आलियावर त्यांची रवानगी फौजसह नवाबबहादूर यांजकडे केली जाईल. करारप्रमाणें सरकारची फौज व सरदार गुजराथप्रांतीं जाऊन लढाई हररोज शुरू आहे. भोंसले फौजसह बंगाल्यास च्यारसें कोसांवर गेले. नवाबबहादूर व नवाबनिजामअलीखांबहादूर राहिले. त्यांस नवाबनिजामअलीखां यांची सर्व तयारी जाली आहे. साहेबजादे यांस खेमे दाखल केलें. नवाबबहादूर चेनापटणच्या जिल्ह्यांत नमूद होतांच हे हि सिकाकोलीकडे निघतात. सर्व मसलत सीध. या उपरी दिवस रिकामे जातात, ते व्यर्थ आहेत. सारांश, नवाबबहादर याणीं इंग्रेजावर जरब लौकर जाऊन बसवावी. र॥ छ १९ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १०२.
१७०२ चैत्र व. ७ श्री. २५ एप्रिल १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. ममईची बंदी केली, सबब, गल्ल्याचा वगैरे तेथें तोटा पडला. त्यावरून इंग्रजांनीं बेलापूर तालुकियांत पांच च्यारसें माणसांनसीं येऊन कांहीं गल्ला भरला. तितकेंच राण त्यांस मोकळें होतें. हें वर्तमान येतांच राजश्री नागोराम यांजबराबर कांहीं फौज व गाडद देऊन त्यांचे तंबीस रवाना केलें. ते जागा पक्की बंदीची, सबब, मागाहून राजश्री सखारामपंत पानसे, कांहीं तोफा व पोख्त सरंजाम देऊन, एका दों दिवसीं त्यांचीही रवानगी होईल. दर्यांतून सरकारचे आरमारासीं व इंग्रजाचे आरमारासींही लढाई दररोज होत आहे. नवाबबहादूर यांस वर्तमान सांगावें. रा।.छ १९ रबिलाखर. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १०१.
१७०२ चैत्र व. ७ श्री. २५ एप्रिल १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. राजश्री माहादजीराव सिंदे यांस अशेरीचा किल्ला सरकारांतून दिल्हा असतां त्यांस प्राप्त होत नाहीं. सरदार मातबर ! किल्ल्याचा मजकूर काय ? किल्ला त्यांस देऊन त्यांचा संतोष राखावा, ऐसें नवाबबहादूर बोलून ल्याहावयास सांगितलें, ह्मणोन लिहिलें. ऐशियास, शिंदे उमदे सरदार, बाजूचे एकनिष्ट. त्यांत अकृत्रिम आमचा भाऊपणा! शेकडों किल्ले त्यांणीं सरकारांत मिळऊन दिल्हे, आणि पुढेंही उमेद तसीच; ऐसें समजोन, अशेर त्यांजकडे करार करून सनदा दिल्ह्या. त्यांत गुंता नाहीं. दरमियान किल्लेकरी लबाड्या करितो, त्याचीही तजवीज होत आहे. लौकरच किल्लेदाराचें पारपत्य होईल. दुसरा अर्थ किमपि नाहीं. याप्रमाणें वास्तविक आहे. तुह्मीं नवाबबहादूर यांसीं बोलावें. *रा।. छ १९ रबिलाखर. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ २९ रबिलावल, सन लेखांक १००. १७०२ चैत्र व।। ५
समानीन. मया व अलफ. श्री. १४ एप्रिल १७८०.
श्रीमंत राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णरावतात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। हरी बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेषः- तुह्मीं दोन तीन पत्रें पाठविलीं, तें पावलीं. सर्व मजकूर समजला. मसविद्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें सत्वर यावीं. नवाबबहादूर यांजकडील सरंजामी सर्व जाली, पत्रें येण्याचा मात्र गुंता, ह्मणोन लिहिलें. त्यास, नवाबबहादूर यांचे दोस्तीवर नजर देऊन, व इंग्रजाची मोहीम त्यांस तंबी करावी व त्यांत नफे ही फार, ऐसें जाणून, छ २१ माहे सफरीं मसविद्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें शुतरस्वाराबराबर रवाना केलीं, तें पोहचलीं असतील. इकडील गुंता राहिला नाहीं. याउपरीं सत्वर नवाबबहादूर यांणीं चेनापट्टण जिल्ह्यांत जाऊन इंग्रजास बतंग करावें. कुमशेलवाले यांस साफ बोलून निरोप द्यावा.•••••••••••••••जात ठेवूं नये. तुह्मीं करारप्रमाणे कामें सर्व उगऊन मिरजकरसहित लौकर यावें. इकडील सविस्तर श्रीमंत राजश्री नानांनीं लिहिलें त्यावरून कळेल. *र॥ छ १७ रबिलावल बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
राजश्री गोविंदराव व गणेशपंत स्वामींस सां। नमस्कार विनंति उपरी. तुमचे लिहिल्याप्रमाणें सरकारचे कागदपत्र सर्व रवाना केले आहेत. पावले असतील. सर्व कामें उरकोन नवाबबहादरांचें जाणें चिनापट्टणाकडे होऊन इंग्रजास तंबी होय, ती गोष्ट करावी. लोभ कीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ ६ जमादिलाखर. लेखांक ९९. १७०२ चैत्र शु॥१०.
श्रीगजानन. १४ एप्रिल १७८०.
श्रीमंत राजश्री तात्या यांप्रति आश्रित भिक जोसी संगमेश्वरकरकृत नमस्कार विनंति येथील कुशल त॥. चैत्र शुद्ध १० दशमीपर्यंत यथास्थित आसे. विशेष. पंच्यांग पाठविणें ह्मणोन लि॥. ऐसियासी, आक्षर पंच्यांग संग्रह लेहून पाठविलें आहे, प्रविष्ट होईल. आह्मांस एके कुणबिणीचें आगत्य आहे. घरीं साही महिने कुणबीण अगदीं नाहीं. त्यास सोय करून चांगली पोर्गी जातीचा शोध करून पाठऊन द्यावी. न पाठविल्यास येथें विकत घ्यावी लागेल. यास्तव तेथूनच नेमणूक करून पाठविल्यास रुपये पावणाशें खर्चावें लागणार नाहींत. आह्मीं श्रीसंनिध अभीष्ट चिंतीत आसों. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ कीजे. हे विनंति.
हे॥ हरभट सोमण यांचे नमस्कार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २२ रबिलाखर, लेखांक ९८. १७०२ चैत्र शु॥९.
सन समानीन. श्री. १३ एप्रिल १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. अलिकडे तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं हें काय ? ऐसें नसावें. राजश्री नाना यांस हालीं पत्र आलें, त्यावरून सर्व भाव समजले. नवाबबहादूर यांणीं, चेनापटणकर कुमसेलवाले आले होते, त्यांसी साफ उत्तर देऊन निरोप दिल्हा. आपण डेरे बाहेर दिल्हे. सत्वरच डेरेदाखल होऊन जाणार. आह्मांस निरोप देण्याची तजवीज केली आहे. दो चौ रोजीं निरोप देणार, ह्मणोन मजकूर होता. ऐसीयास, मसलतीचा ठराव व सरकारांसीं व नवाबबहादर यांसीं दोस्ती आस्विन मासीं जाली. त्यास साहा महिने जाले. अदियाप लिहिण्याखालींच दिवस आहेत. सरकारच्या फौजा जाऊन लढाई दररोज होत आहे. अशांत नवाबबहादर यांचें जाणें सत्वर व्हावें. कुमसेलवाले यांस रुसकत दिल्ही, उत्तम. नवाबबहादर यांची सरंजामी सर्व तयार आहे. जलद त्यांचे तालुकीयांत नमूद होऊन, चैत्र अखेर पावतों लढाई जाल्याचें वर्तमान यावें. तरीच केलें कर्माचें सार्थक. जाण्याची जलदी व्हावी. तुह्मीं सर्व कार्य उगऊन लौकर यावें. सविस्तर राजश्री नानांनीं लिहिलें त्यावरून कळेल. गोविंदराव नारायण यांचा काळ जाला; फार वाईट जालें. मनुष्य चांगला होता. उपाय नाहीं ! र॥ छ ७ माहे रबिलाखर. *बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २२, लेखांक ९७. १७०२ चैत्र शु॥९.
रबिलाखर. श्री. १३ एप्रिल १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री गणपतराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः- तुम्हीं पत्रें राजश्री नाना व राजश्री लक्ष्मणराव अण्णा यांस पाठविलीं, त्यांवरून सविस्तर मजकूर समजला. गोविंदराव व नारायण यांस देवआज्ञा जाली. मोठें वाईट जालें. आयुष्यमर्यादेस यत्न नाहींच नाहीं. नवाबबहादर यांणीं कुमसेलवाले यांस रुकसत दिल्ही. डेरे बाहेर दिल्हे, आमची रवानगी कर्ण्याचा उद्योग होत लौकरच रुकसत देतील ह्मणोन लिहिलें. ऐसियास दिवस कांहीं बाकी राहिले नाहींत. याउपरी नवाबबहादर यांचें जाणें चेनापटण प्रांतीं होऊन, इंग्रजासीं लढाई जाली हीं वर्तमानें चैत्र अखेर कळावीं. तरी केली मसलत चांगली. सर्व दरजे समजोन त्वरा घडावी. तुम्हीं आपलीं कामें सर्व उगऊन लौकर यावें. र॥ छ ७ माहे रबिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २२, रबिलाखर, लेखांक ९६. १७०२ चैत्र शु॥९.
सन समानीन. श्रीशंकर. १३ एप्रिल १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरी. कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. अलीकडे आपणांकडून पत्र येऊन कुशलतेचें वर्तमान कळत नाहीं. तरी, सदैव पत्र पाठऊन सविस्तर लिहीत जावें. यानंतर इकडील वर्तमान, राजश्री गणपतराव केशव यांसी लिहिलें आहे, त्याजवरून सविस्तर कळेल. निरंतर पत्रीं सानंदवीत असावें. रवाना छ ७, रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा, हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ९५.
१७०२ चैत्र शु।। ८ श्री. १२ एप्रिल १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी- गोविंदराव नारायण यांस देवआज्ञा जाल्याचा मजकूर लिहिला, तो समजला. त्यास, फार वाईट जालें. आयुष्यमर्यादा प्रमाण. या गोष्टीस उपाय नाहीं. तुह्मीं सर्व मंडळीसह येऊन राजश्री गणेशपंत यांस तेथें नवाबबहादूर यांजपासीं ठेवावें, ऐसे पेशजी लिहिलें होतें. परंतु, गोविंदराव यांचा प्रकार असा जाला. त्याअर्थीं, गणेशपंत यांसही बराबर घेऊन यावें. तेथें ठेऊं नये. नवाबबहादूर यांसीं पक्की दोस्ती जाली, जुदागी राहिली नाहीं. कच्चें पक्कें व मसलतसमंधें नवाबबहादूर मजकूर सांगतात त्याप्रमाणें वरचेवर कळला पाहिजे, सबब, रावरास्ते यांजकडील कारकून येथून आले आहेत, त्यांस नवाबबहादूर यांजपासीं ठेवावें. ह्मणजे बहादूर वर्तमान सांगतील त्याप्रमाणें वरचेवर इकडे लिहीत जातील. याप्रमाणें तुह्मीं नवाबबहादूर यांसीं बोलून गणेशपंत यांस समागमें घेऊन यावें. र॥ छ ६ रबिलाखर. * हे विनंति.
पो।।। छ २२ रबिलाखर. सन समानीन.