Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
१७०१ मार्गशीर्ष वद्य १०. लेखांक २५. १ जानुआरी १७८०.
र॥ छ २३ जिल्हेज समानीन. श्री.
अदवानी तालुक्यांत आंमेहरबांकडून हांगामा आहे, एविशीं तहनाम्यांत कलम लिहिलें व वकीलासींही बोलण्यातं आलें व आपणासही कलमी केलें. त्याचा दरजाब आसाहेबीं वकीलास लिहिला कीं, हांगामा लौकरच मना करऊन अमीरुल-उमरा यांस सलूखच करितों. लेकिन ताहाल हांगामा मना जाला नाहीं. रोजबरोज तालुकियास ज्याजती इजा होत आहे, ह्मणोन अखबारेवरून जाहीर जालें. दरी सुरत इंग्रजास तंबी कर्ण्याची मसलहत मोठी. नवाब निजामआलीखांबहादूर या मसलतीस शरीक; सर्वांची सलाह तदबीर एक; अदवानी तालुका नवाबमवसूफ यांचा; त्या तालुकियांत आमेहरबांकडील हांगामा; तेव्हां नवाबमवसूफ यांची मसलतीविसीं तमा नियत कसी होईल ? सिकाकोल राजबंदरीकडे जावयाची त्यांची तयारी व जमाव जाला आहे. इंग्रज दुसरे वाटेनें अदवानीस येणार, हें नवाबमवसूफ यांस जाहीर होतांच, ज्याबज्या फौजा पाठऊन घाटबंदी केली. अदवानीचे बंदोबस्तास फौज रवाना जाली. दक्षणचे सर्व साहेब रयासत यांचा इंत्यफाक व एकदिली जाली, हें इंग्रजास इतल्ला कळतांच, मसहलत भारी पडली, ह्मणोन मुशकिलींत आहेत. त्यांत अदवानीचा हांगामा मना होत नाहीं. नवाबमवसूफ व नवाबबहादूर यांची तरफैन नामाफिकत इतकी दरज मुखालिफांस मालूम होतांच, कितेक कामांस कमती येईल. नवाबमवसूफ यांचे बेइंत्यफाकींत कबाहाती फार आहेत. दुषमानास राजकारण करावयास दरजा राहतील. उमदे रयासतींत उमदींच कामें, त्यांत फायदेही मोठेच. तेव्हां ऐशा जुजकामाकरितां नवाबमबसूफ यांची नाखुसी येणे हें सलाह वख्त नाहीं. बिनाबरा अदवानीचा हांगामा जलद रफा व्हावा, ह्मणजे नवाबमवसूफ यांची खातरजमा होऊन सर्वत्रांची एकदिली जालीयाचा दाब दुषमनावर पडून, नेमल्या मसलतीस जिल्हे व खलक येईल. मोहीमेचे दिवस न्याहायत कम राहिले. पल्ला थोर. सर्व दरजे व दूरंदेशीचे मरातब आसाहेबांस जहननिसी आहेत. कलमीं करावें ऐसें नाहीं. अदवानीचा हांगामा मना करऊन आपण चेनापट्टणच्या जिल्ह्यांत जुद नमूद व्हावें. नवाबमहसूब अदवानीचा बंदोबस्त करून सिकाकोल राजबंदरीकडे जातील. सरकारच्या फौजा गुजराथ प्रांतीं रवाना जाल्या. सरदारांचीही तयारी आहे. थोडकेच दिवसांत जातील. खंडोजी भोंसले यांची फौजेची जमाव जाला. याउपरीं बंगाल्यांत जातील, इकडील कराराप्रमाणें कोणताही गुंता नाहीं. कृष्णराव नारायण व नरसिंगराव वकील पट्टणास पावले असतील. त्यास मुफसल कलमी केलें आहे. त्या बयान करतील त्यावरून जाहीर होईल. ह्मणोन हैदरआलीखांबहादूर यांस नानांचे नावें पत्र.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ ११ मोहरम, सु।। लेखांक २४. १७०१ मार्गशीर्ष व॥८.
समानीन, बुधवार, मु।। पट्टण. श्री. ३० दिसेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं:--
सेवक आनंदराव नरसिंह कृतानेक सां।। नमस्कार विनंति. येथील क्षेम मार्गशीर्ष व॥ अष्टमी गुरुवारपावेतों आपले कृपेंकरून यथास्थित जाणून स्वकीय कुशल लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेषः-आपण सुमुहूर्त करून स्वार होऊन गेलियानंतर, हजरत नवाबसाहेब यांनीं लग्नपत्रिकेच्या थैल्या, श्रीमंत राजश्री पंतप्रधान आदिकरून सर्वांस पाठविल्या, त्या पावत्या करून संतोष समाचार सांगितला. त्यावरून श्रीमंत इत्यादिकांनीं वस्त्रें जवाहीर षुतरस्वारां ब॥ आपणांकडे र॥ केले आहेत. आपण मजल दरमजल गेलेच असतील. पट्टणास जाऊन पावलियानंतर नवाबसाहेबांची भेट होऊन बोलणें जाहलियाचे संतोषवृत्त कळवावें. बहुत काय लिहिणें ? कृपा असावी हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ ११ मोहरम. लेखांक २३. १७०१ मार्गशीर्ष व॥७.
सन समानीन, पौषमास, मुक्काम पट्टण. श्री. २९ दिसेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं : -
पो॥ हरी बल्लाळ सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः- नवाब हैदरआलीखां बहादूर यांणीं पुत्राचे शाद्वीचे थैली पत्र पाठविलें, तें पोहचू (न) बहुत संतोष जाला. इकडून शादीचा आहेर वस्त्रें व सिरपेंच रकम एक पाठविली, त्याची याद अलाहिदा आहे. त्याप्रमाणें तुह्मीं व राजश्री नरसिंगराव मिळोन इकडील आहेर नवाबांस प्रविष्ट करावा. अदवानीचा हांगामा सत्वर मना व्हावा. नाहींतरी मोठे पेंच आहेत. याजकरितां नवाबबहादर यांसी बोलून, हांगामा मना होऊन बहादरांचें निघणें चेनापट्टणाकडे लौकर व्हावें. दिवस कांहीं राहिले नाहींत. नवाब निजामआलीखां बहादूर यांची सर्व तयारी जाली. अदवानीचा महसरा ऊठला ह्मणजे करारप्र।। सिकाकोल राजबंदरीकडे जातील. इकडील फौजा गुजराथ प्रांतीं गेल्या. सरदारही सत्वरच जातील. भोंसले यांचीही फौज जमा जाली. थोडे दिवसांत बंगाल्यांत नमूद होतील. करारप्र॥ तुह्मीं कारभार उगऊन लौकर यावें. वरकड सविस्तर श्रीमंतांचे पत्रावरून कळेल. र॥ छ २० जिल्हेज बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
राजश्री गोविंदराव व गणेशपंत स्वामींस सं॥ नमस्कार विनंति उपरी. लिहिलें परिसीजे. लोभ असो दीजे. हे विनंति.
श्री.
यादी नवाब हैदरआलीखानबहादूर यांजकडे शादीबद्दल बहुमान येणें प्रों। हरी बल्लाळ
७ | सनगें तमामी |
१ चिराबादली | |
२ जामेवार जोडी | |
१ किमखाप | |
१ पटका जरी | |
२ शाला फर्द | |
----- | |
७ | |
१ | जवाहीर सिरपेंच |
--- | |
८ |
सात सनगें व एक जवाहीर रकम त॥ सांडणीस्वार छ २१ जिल्हेज.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ २१ जिल्हेज. लेखांक २२. १७०१ मार्गशीर्ष व॥ ७.
सन समानीन, मुक्काम पट्टण. श्री. २९ दिसेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नरसिंगराव स्वामींचे सेवेसीं:-
पो।। कृष्णराव बल्लाळ सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेषः- आपण जाऊन पट्टणास पावल्याचें पत्र आलें नाहीं. त्यास, सविस्तर ल्याहावें. अदवानीचा महसरा आधीं उठवावा, हें जातेसमईं सांगितलें; व नवाबबहादूर यांस पत्रेंही मदारुलमही यांचीं व आमची पाठविलीं. त्यांचें उत्तर नवाबबहादूर यांचें तुह्मांस आलें कीं, हांगामा मना करवितों. ऐसें असतां, हा वेळपावतों हांगामा मना जाला नाहीं. दिवसेंदिवस अधिकच उपद्रव होतो. याजमुळें नवाबांची मर्जी नाखुष आहे. इंग्रजाचे मसलतीचे शरीक, व सरकारचा त्यांचा स्नेह कोणे प्रकारचा आहे, हें सर्व माहीतगिरी. इंग्रजाची मसलत मोठी असें असतां, आपले आपल्यांत असें करणें नीट नाहीं. कराराचे कलमांत अंतर येतें. इंग्रजास राजकारणास जागा दरज राहाती. इतक्या गोष्टी नीट नाहींत. हे सर्व पर्याय नवाबबहादूर यांचे खातरेंत आहेत. तुह्मींही खोलून दरजे सांगून हांगामा मना होय, हें आधीं करावें. नवाब निजामअलीखां बहादूर यांची फौज अदवानीचे बंदोबस्तास गेली. बहादरांचे घरची शादी जाली. याउपरीं अदवानीचा हांगामा मना होऊन सत्वर चेनापट्टण प्रांतीं नमूद व्हावें. ह्मणजे नवाबही सिकाकोलीकडे जातील. त्यांची फौज वगैरे सर्व तयारी जाली. इकडीलही फौजा गुजराथ प्रांतीं गेल्या. सरदारही लौकरच जाणार. दिवस निपट थोडे. त्वरा करावी. करारप्रमाणें कामें उगऊन तुह्मीं यावयाचें करावें. र॥* छ २० जिल्हेज बहुत काय लिहिणें, लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक २१.
पै।। छ ११ मोहरम, पौष शु॥१३ श्री. १७०१ मार्गशीर्ष व॥ ७.
बुधवार, सु।। समानीन मु॥ पट्टण. २९ दिसेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो॥ कृष्णराव बल्लाळ सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून वकीय लिहीत जावें. विशेष. नवाब हैदरआलीखांबहादर यांचे पुत्राची शादी लग्नपत्रिका आम्हांस बहादरांनी पाठविली. शादीचे खुसीचीं वस्त्रें व जवाहीर रकम पाठविली, ते तुम्हीं व राजश्री गोविंदराव व राजश्री नरसिंगराव मिळोन नवाबांस आमचा आहेर ह्मणोन नेऊन गुजरावा. सनगाचा वगैरे त॥ राजश्री गोविंदराव नारायण यांचे पत्रीं लिहिला आहे. अदवानीचा महसरा अदियाप उठत नाहीं. यामुळें नवाब निजामआलीखां यांची नाखुसी. मोठे मसलतींत दिक्कती पडतात. कोण्हांत कोण्हीं मिळत नाहीं ऐसें होतें. याजकरितां अदवानीचा उपसर्ग मना व्हावा. येविशीं नवाबबहादर यांसीं बोलोन सत्वर घडावें, ह्मणजे करारप्र॥ अमलांत येतें. नवाब निजामआलीखां यांचा संतोष; इंग्रजाचे मसलतीस अनकूल; इंग्रजावर दाब; सर्व गोष्टी घडतात. मसलतीचे दिवस केवळच कमी राहिले. नवाबबहादर यांचे घरची शादीही जाली. याउपरी अदवानीचा हांगामा मना होऊन चेनापट्टणाकडे बहादरांनीं सत्वर नमूद व्हावें. इकडील सविस्तर मजकूर राजश्री नानांचे पत्रावरून कळेल.*र॥ छ २० जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक २०.
१७०१ मार्गशीर्ष व॥ ७. श्री. २९ डिसेंबर १७७९.
यादी नवाब हैदरआलीखान बहादूर यांजकडे शादीबद्दल चंद खान पारचे व जवाहीर रकमा त॥ सांडणीस्वार. र॥ छ २० जिल्हेज सु॥ समानीन मया व अलफ. सरकार
१० | खाशांस | |
८ | सनगें | |
१ चिराबादली | ||
१ गोषपेंच | ||
१ पटका | ||
२ जामेवार जरी | ||
१ किमखाप | ||
२ शाला फर्द | ||
------ | ||
८ | ||
२ | जवाहीर सिरपेंच व जगा एकूण दागिने | |
------- | ||
१० | ||
८ | टिपूखान यांस रुपेरी | |
१ चिराबादली | ||
१ गोषपेंच | ||
१ पटका | ||
२ जामेवार जरी | ||
१ किमखाप | ||
२ फर्द शालांचे | ||
------ | ||
८ | ||
८ | करीमखान यांस | |
१ चिरा जरी | ||
१ पटका कारचोबी | ||
२ जामेवार जरी | ||
२ शाला फर्द | ||
१ किमखाप | ||
१ जवाहीर सिरपेंच | ||
----- | ||
८ | ||
३ | स्त्रीस | |
१ पातल जरी कारचोबी | ||
१ खणास जामेवार जरी | ||
१ किमखाप ![]() |
||
------ | ||
३ |
एकूण सनगें सवीस व जवाहीर दागिने तीन एकूण एकूणतीस दागिने.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १९.
१७०१ मार्गशीर्ष व॥ ६. श्री. २८ डिसेंबर १७७९.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. अदवानीचा महसरा उठवण्याविशीं नबाब हैदरआलीखां बहादूर यांस इकडील पत्रें पाठविलीं होतीं. त्यांचें उत्तर वकीलास नवाबांनीं लिहिलें कीं, महसरा लौकरच उठऊन अमीरुलउमराव यांसीं सलूख करितों. त्यास, अदियाप तालुकियांतील हांगामा मना जाला नाहीं. दिवसेंदिवस अधिकच उपसर्ग होतो, ह्मणोन वर्तमान येत आहे. ऐसियास, इंग्रजास तंबी करावी येविसीं नवाब निजामआलीखां बहादूर शरीक. त्यांच्या तालुकियास उपसर्ग, तेव्हां त्यांचा संतोष कसा राहील? लौकिक सर्वांस लागला. अदवानीमुळें नवाब नाखुष राहून विच्यार करितात. दक्षणचे सर्व दौलतदार यांचा एका जाला, हें वर्तमान इंग्रजास समजतांच, बहुत विच्यारांत पडून सर्द आहेत. त्यांत, अदवानीमुळें नवाब निजामआलीखां व नवाबबहादूर यांची नाखुसी, हें त्यांस समजतांच किती दाब कमी पडेल ? दुषमानास राजकारणास जागा होती. ऐशा कबाहती आहेत. मसलत इंग्रजाची मोठी, आणि मोठेच नफे. ऐसें असतां जूजकामाकरितां आपआपल्यांत नाखुसी राखणें ठीक नाहीं. नवाब निजामआलीखां बहादूर यांचा व सरकारचा स्नेह. मोठ्या तिढणी पडतात. यास्तव तुह्मीं व राजश्री नरसिंगराव मिळोन, नवाबबहादूर यांसीं बोलोन, अदवानीचा हांगामा, पत्र पावतांच मना होय, ते गोष्ट जरूर जरूर घडावी. ह्मणजे केली मसलत इंग्रजाची सिद्धीस जाईल. सर्व रीती व मनसबे नवाबांचे ध्यानांत. त्यांस पत्रें लिहिलीं, त्यांचे मसोदे तुह्मांकडे पाठविले, त्यावरून सर्व मजकूर कळेल. कडपे तालुकियांतून इंग्रज अदवानीस येणार. त्यास, बहादरांकडील फौजांनी हाटऊन घातलें. तेव्हां दुसरे वाटेनें अदवानीस यावें, या मनसब्यानें इंग्रज येत होते. हें नवाब निजामआलीखां बहादूर यांस समजतांच तमाम फौजा पाठऊन घांटबंदी केली. अदवानीचे बंदोबस्तासही फौज गाडद पाठविली. नवाबबहादूर यांजकडून महसरा उठतांच बंदोबस्त करून सिकाकोलीकडे जातील.*नवाब बहादर अदवानीचा महसरा उठवितील. तुह्मीं आपल्याकडील फौज पाठऊन अदवानीचा बंदोबस्त करावा, ह्मणोन निजाम आलीखान यांस लिहिलीं गेली. त्यावरून त्यांणीं फौज अदवानीस पाठविली. त्यासी बहादरांकडील फौजेसीं कलह न व्हावा. नाहींतर गोष्ट नासेल. आधीं अदवानीचा महसरा लौकर बहादरांनीं उठऊन न्यावा. ह्मणजे इंग्रजाची मसलत चांगले रीतीनें होईल. सर्व दूरंदेशी बहादरही समजतील. र॥ छ १९ जिल्हेज. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १८.
१७०१ मार्गशीर्ष व॥ ६. श्री. २८ डिसेंबर १७७९.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:---
विनंति उपरी. दक्षणचे सर्व सरदार यांचा एका जाला, हें वर्तमान करनेल गाडर यांस कळतांच, आपआपल्यांत सर्द होऊन विच्यारांत पडले. पुढें मनसबा काय करावा, याजकरितां गाडर ममईस गेले. ममईकर जनरालाचें त्यांचें कोंसल जालें. कलकत्त्यास पत्रें लिहिलीं. ममईपैकीं तीनचार हजार माणूस घेऊन गाडर फिरोन सुरतेस छ २६ जिलकादीं पोहचले. याउपरीं कोणती चाल शुरू करतील पाहावें. सरकारच्या फौजा राजश्री विसाजी आपाजी व भगीरथराव सिंदे व पाराजीपंत ऐसे, दाहा बारा हजार फौजनसीं, गुजराथ प्रांतीं रवाना जाले. सरदारांची सर्व तयारी आहे. लौकरच जातील. इंग्रजाचीं बंदरें इकडे दोन. वरकड कांहीं मुलूक नाहीं. त्यांणीं मैदानांत यावें, हें इतके दिवस वाट पाहणें होतें. सेवटीं फौजा रवाना जाल्या. सरदारही जलदच जातील. राजश्री खंडोजी भोंसले बंगाल्यांत जाण्याची नेमणूक केली. ते फौज जमा करण्यास घांटाखालीं आले. बहुतकरून फौजेचा जमाव जाला. बाकीचाही होऊन थोडेच दिवसांत बंगाल्यास रवाना होतील.*नवाब बहादरांनीं लौकर चेनापट्टणाकडे जावें. र॥ छ १९ जिल्हेज. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १७.
१७०१ मार्गशीर्ष व॥ ६. श्री. २८ डिसेंबर १७७९.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं : -
विनंति उपरी. राजश्री येसाजी सिंदे व सटवोजी भोंसले व मानाजी फांकडे ऐसे त्या प्रांतें आहेत. कितुरकरही त्यांचे मसलतींत मिळाले. इंग्रजाचे मसलतीस आटकल्यानंतर, खाले राण पाहून मुलकांत धामधूम करतील. ऐसें समजोन, दाहा हजार फौज त्या प्रांतीं ठेवावी. राजश्री रघुनाथराव मिरजकर कांहीं फौजसुद्धां कृष्णा पार होणार, याचा इतल्ला नवाबबहादर यांस करावा. नवाबबहादर यांचा व सरकारचा स्नेह जाला. जुदागी कोणेविशीं राहिली नाहीं. तेव्हां कच्चें पक्कें तरफेन कळविलें पाहिजे, ह्मणोन लिहिलें असे. र॥ छ १९ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १६.
१७०१ मार्गशीर्ष व॥ ६. श्री. २८ डिसेंबर १७७९.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं :-
विनंति उपरी. इंग्रजास तंबी करण्याची मसलत मोठी. दिवस केवळच थोडे राहिले. त्यास, नवाबबहादूर यांचे घरीं शादीचा समारंभ म्हणोन गुंता; तेंही जालें. याउपरीं अदवानीचा महसरा उठऊन चेनापट्टणाकडे सत्वर नमूद व्हावें. निघावयास दिवसगत न लागावी. याप्रमाणें तुम्हीं नवाबबहादूर यांसीं बोलोन लौकर घडवावें. दिवस कांहींच राहिले नाहींत. इंग्रजांची व नायमाराची लढाई लागली आहे. नायमार यांणीं इंग्रज सिकस्त केले, ऐसें वर्तमान इकडे आहे. त्यास, तिकडलें तों जवळ पैगाम, वर्तमान येत असेल, नवाबबहादूर यांस पुसोन कच्चें वर्तमान ल्याहावे. *नवाबबहादरांचा स्नेह जाहाला, त्यापक्षीं वर्तमान चोहूंकडील परस्परें कळत असावें. र॥ छ १९ जिल्हेज. हे विनंति.