पै॥ छ २२, रबिलाखर, लेखांक ९६. १७०२ चैत्र शु॥९.
सन समानीन. श्रीशंकर. १३ एप्रिल १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरी. कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. अलीकडे आपणांकडून पत्र येऊन कुशलतेचें वर्तमान कळत नाहीं. तरी, सदैव पत्र पाठऊन सविस्तर लिहीत जावें. यानंतर इकडील वर्तमान, राजश्री गणपतराव केशव यांसी लिहिलें आहे, त्याजवरून सविस्तर कळेल. निरंतर पत्रीं सानंदवीत असावें. रवाना छ ७, रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा, हे विनंति.