Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १५४. १७०२ ज्येष्ठ व॥ ३.
श्री. २० जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. राजश्री परशरामपंतभाऊ फौजसह कोल्हापूर प्रांतांतून येऊन, गोकाकेस कितुरकर देसाई यांस उपद्रव केला. तेथें लगते तालुके नवाबसाहेब यांचे. तिकडे स्वारीशिकारी करितात ह्मणोन धारवाड वगैरेहून यांची बातनी आली. त्यावरून नवाबसाहेब यांणीं आह्मांस सांगितलें कीं, कोल्हापूर व कितुर हें काम किती हाताखालील, जेव्हां ह्मटलें तेव्हां त्यास नसीयेत होईल. इंग्रजांचें काम उमदें. तिकडे भाऊंची रवानगी करावी. भारी मसलतीवर नजर असावी, ह्मणोन लिहिलें. ऐसियास येसाजी सिंदे व मानाजी फांकडे व सटवोजी भोंसले व कितुरकर यांणीं बेनिहायेत बेअदबी केली. सरकार तालुकियास मनस्वी इजा दिल्या. कितेक गांव ताराज केले. वोली धरून नेल्या त्या अदियाप सुटल्या नाहींत. यांची तंबी करणेंच सलाह जाणून भाऊंची रवानगी जाली. मशारनिले यांणीं तंबी केली. याचा त॥ वरचेवर तुह्मांस लिहिण्यांत आलाच आहे. दोन महिने फौज फिरवून असावें ऐसें होतें. परंतु, नवाबसाहेबाचा तालुका लगता, यांस उपसर्ग लागेल ऐसें समजोन मवकुफ केलें. हें भाऊंनीच लिहिलें. कितुरकर यांजकडील पेशकशातचा जाबसाल जाला. सरकारतालुका त्याणें कांहीं दाबला त्याचा फैसला जाला ह्मणजे फौजा छावणीस येतील. करवीरकर रुजू जाले उत्तम; नाहीं तरी पांच हजार फौज त्यांच्या तोंडावर राहील. नवाबबहादर यांचे तालुकियास काडीमात्र उपद्रव जाला नाहीं, अमिलांनीं व तालुकदारांनीं उगेंच फौजा गोकाकेस आल्या इतक्यावरच लिहिलें असेल, याची चौकसी करावी. दोस्ती जाली तेव्हां, हे चाल इकडून सहसा होणार नाहीं. याची खातरजमा असावी. हें आमचे तरफेनें तुह्मीं नवाबबहादूर यांसी बोलावें. *नवाबबहादर यांचे तालुक्यास उपद्रव लागला नाहीं. कोल्हापूरकर व कितुरकर यांणीं फारच बेअदबी केली, त्यांचें पारपत्य करणें हेंच प्राप्त करणें पडलें. इंग्रजांचे मसलतीस दुस-या फौजा व सरदार मवलग आहेत. र॥ छ १६ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २३ रजब सन लेखांक १५३. १७०२ ज्येष्ठ व॥ ३.
इहिदे समानीन. श्री. २० जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. राजश्री परशरामपंत फौजसह त्या प्रांतीं गेले. त्यास, आपले तालुकियास इजा लागली असेल, अगर लागेल, ऐसा नवाबबहादूर यांचे दिलांत अंदेशा आला, ऐसें तुमचे लिहिण्याचे भावावरून समजलें. त्यास, नवाबबहादर यांसीं व सरकारासीं पकी दोस्ती जाली; सलाहतदबीर सर्व एक. तेथें क्षुलक अशा गोष्टी कशा घडतील ? त्यांचा तालुका तो आह्मी आपलाच जाणतों. दुसरे कोण्हाचा उपसर्ग होऊं लागल्यास तरफैन रखवाली होत असावी. उपद्रव होऊं लागल्यास मग दोस्ती ते काय ? अशा गोष्टी इकडून सर्वथैव होवयाच्या नाहींत. तुह्मीं येविशीं नवाबबहादराची पकी खातरजमा करावी. एक वेळ आह्मी स्नेह ह्मटला तेथें चाल कसी पडती याचा आजमाईष नवाबसाहेब यांस अदियाप नाहीं. बरें ! सलाहतदबीर एक, तेव्हां अईंदे इकडील दोस्ती कसी हें जहुरांत येईल. वारंवार ल्याहावें ऐसें नाहीं. भाऊ यांस फौजसह छावणीस आणविले. र॥ छ १६ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २३ रजब सन लेखांक १५२. १७०२ ज्येष्ठ व॥ ३.
इहिदे समानीन. श्री. २० जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. नवाबबहादूर यांस थैलीपत्र पाठविलें तें त्यांस प्रविष्ट करावें. त्यांतील मजकूर तुह्मांस समजावा ह्मणोन मसोदा पाठविला याजवरून मजकूर समजेल. पेशजीं मुहूर्तीविशीं व चंदनाविशीं लिहिलें त्याप्रमाणें मुहूर्त व चंदन जरूर घेऊन यावा. खरेदी करून आणावा. र॥ छ १६ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २३ रजब सन लेखांक १५१. १७०२ ज्येष्ठ व॥ १.
इहिदे समानीन. श्री. १७ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. इंग्रजाचे तंबीकरितां नवाबसाहेब शुध येकादसीस खेमेदाखल जालें. बेंगरुळावर जाणार ह्मणोन लिहिलें. त्यास, तुह्मीं लिहिल्याप्रमाणें अमलांत सत्वर यावें. लांब लांब मजली करून टोपीकराचे तालुकियांत नमूद होऊन ताख्त व ताराज करावें. लिहिण्याखालींच दिवस सर्व गेले. पुढें तरी ऐसें न व्हावें. जलदींत फार फायदे आहेत. येविशीं वारंवार काय ल्याहावें र॥ छ १३ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २० रजब सन इहिदे लेखांक १५०. १७०२ ज्येष्ठ व॥ १.
समानीन, आषाढ मास. श्री. १७ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
पो॥ बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं जेष्ठ शुध प्रतीपदेचें पत्र पटणचें मुकामचें पाठविलें तें शुध चतोर्दसीस पावलें. राजश्री परशरामपंतभाऊ फौजसुद्धां सरकारांतून करवीरकरांचे पारपत्यास रवाना जाले. त्यांचीं ठाणीं घेऊन कितूरकरावर दौड करून गोकाकेस वेढा घातला आहे. नवाबसाहेब यांचे तालुकियास उपसर्ग दिल्हा, नरगुंदकराचे कुमकेस रामदुर्गाकडे चार हजार फौज पाठविली. व येडगल तालुके मजकूर इकडेही स्वार पाठविले आहेत ह्मणोन धारवडेहून वगैरे चहूंकडून बातमीचीं पत्रें आलीं. त्यावरून नवाबसाहेब यांणीं आह्मांस बोलावून पत्रें दाखविलीं. आणि बोलिले कीं:- मदारुलमाहाम यांचा आमचा स्नेह होऊन इंग्रजाचे मसलतीस नमूद जालों असतां परशरामराव यांणीं दंगा करावा कीं काय ? किरकोळी गोष्टीकरितां दिलांत खतरा राहणें हें ठीक नव्हे; ऐसें बोलिले. त्यांस आह्मीं जबाब दिल्हा कीं:- कोल्हापुरकर व कितूरकर याणीं सरकार तालुकियांत बेकैदी केली सबब फौज रवाना करणें जरूर. आपले तालुकियांत फौजेमुळें कमपेश पडले असलिया मदारुलमाहाम यांस आह्मी पत्र लेहून पाठवितों; ह्मणजे त्यांस लेहून बंदोबस्त करवितील. यास्तव भाऊंस लेहून नवाबसाहेब यांचे तालुकियास उपसर्ग न होय तो अर्थ व्हावा. ह्मणोन विस्तारें लिहिलें. ऐसियास, येसाजी सिंदे व सटवोजी भोंसले वे मानाजी फांकडे त्रिवर्ग एक होऊन सरकारतालुकियास बहुत उपद्रव केला. गांव मारले. पाटील धरून नेले. ऐसें जाणून राजश्री परशरामपंत यांची रवानगी फौजसह त्यांजवर केली. मशारनिले यांणीं जाऊन, त्यांची मातबर तीन चार ठाणीं घेतलीं. पुढें बंदोबस्त करावा तों कितुरकर गोकाकेस जमाव बांधूं लागला व शाहापूर वगैरे सरकारतालुका मारला. पुढें जमाव धरितो जाणून त्यांजवर दौड पाठविली. फौजेनें गोकाकेस मोहसरा केला. भाऊंही जाऊन पोंहचले. नंतर कितूरकर याणें कौल घेऊन येऊन भेटला. हें वर्तमान पेशजीं तुह्मांस लिहिलेंच आहे. फौजा गोकाकेकडे गुंतल्या ऐसें समजोन सलूख्याचा पैगाम लाविला असतां सिंदे व फांकडे, भोंसले यांणीं जमाव फिरोन करून तालुकियांत मनस्वी धूम केली. जयराम स्वामीचें वडगांव दरोबस्त लुटून बोली बहुतेक नेल्या. हें वर्तमान कळतांच भाऊंनीं चार हजार फौज त्याजवर रवाना केली. त्यांणीं तिघांस लुटिलें. सडे त्रिवर्ग पळोन किल्ल्याचे माचीस गेले. कर्में करितात त्याप्रमाणें शिक्ष्याही होती. कितूरकर यांजकडील पेशकसी व सरकार तालुका दाबला, त्याचा जाबसाल होत आहे. नवाबबहादूर यांचा व सरकारचा स्नेह जाला. त्याचे तालुकियास काडीमात्र इजा न देणें ह्मणोन परशरामपंत यांस पत्रें गेलीं, व जातात. मशारनिले याणींही सरकारांत लिहिलें कीं:- इकडील तालुकियांत दोन महिने फौज फिरऊन मुपसद यांचें पारपत्य करावें ऐसें होतें, परंतु नवाबबहादर यांचा तालुका लगता. त्यास उपसर्ग लागेल. सबब फौज पाठविणें मवकूफ केलें. नवाबबहादर यांसीं दोस्ती जाणोन फौज न पाठविली. ऐसीं त्यांचीं पत्रें आलीं. तेव्हां त्यांजकडून उपसर्ग लागेल असे कसें घडेल ? अमीलांनीं व तालुकदारांनीं उगेंच गैरवाका लिहिलें असेल. यांची चौकसी करावी. दोस्ती जाली तेथें असें सहसा होणार नाहीं. येविशीं नवाबबहादूर यांची खातरजमा असावी. आईंदे सर्व जहुरांत येईल. कितूरकर व सिंदे, फांकडे व भोंसले यांचें परिपत्य करणें हेंच चांगलें. इंग्रजाचे तंबीचे ह्मणोन मसलतीवर भाऊंस इतके सरंजामीनसीं घालवावें ह्मणोन लिहिलें. त्यास, गुजराथप्रांतीं मातबर फौजनसीं सरदार. कोंकणांत इंग्रजांनीं हांगामा केला. तिकडे हुजूरच्या फौजा व गाडद रवाना जाली व वरचेवर होत आहे. भाऊंनीं जावें ऐसी दरकार नाहीं. कितूरकर यांचा जाबसाल उलगडल्यावर फौजा छावणीस येतील. तुह्मी नवाब बहादर यांसीं बोलून कोणेविशीं त्यांचे दिलांत अंदेशा न ये ऐसें कराव. सारांश, करारांत अंतर इकडून येणार नाहीं. पूर्वींच राजश्री भाऊंस लिहून पाठविलें कीं, नवाबबहादूर यांचे तालुक्यास उपद्रव लागों देऊं नये. त्याचीं उत्तरें ही आलीं. फिरोन ही तुमचे लिहिलें आल्यावरून दुसरीं पत्रें पाठविलीं. येविषई खातरजमा ठेऊन लौकर इंग्रजाची मसलत ठरल्याप्रों। व्हावी. कोल्हापूरकर यांणीं बेअदबी फार केली. तसीच कितूरकरांनींही केली. तेव्हां पारपत्य करणें प्राप्त. त्याप्रों। केलें, व करीत आहों. दोघेही फंदी व मकरी. त्यांची उपेक्षा करणें सलाहदौलत नाहीं. हें नवाबबहादूरही दौलत करतात त्यांचेही चित्तांत येईल. र॥ छ १३. जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
शक १७०२ वैशाख व॥ १२. लेखांक १४९.
पै॥ १७८० मे ३१. श्री. शके १७०२ ज्येष्ठ शु॥ १२.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. नवाबबहादूर यांस पत्र लिहिलें. त्याचा जाब तुह्मांस कळावा सबब मसुदा पाठविला आहे, याजवरून सर्व अर्थ कळेल. सारांष नबाबाचें जाणें दरकुच इंग्रजाचे तालूकियांत व्हावें; नाहीं तरीं मग जाण्यास दिवस राहिले नाहींत. हे विनंति. पो। छ २६ जमादिलावल.
सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ ७ जमादिलाखर, लेखांक १४८. १७०२ ज्येष्ठ शु॥ ८.
सन इहिदे समानीन. श्रीशंकर प्रसन्न. १० जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं: -
पोष्य आणाजीराव तमाजी कृतानेक सां॥ नमस्कार विनंति येथील कुशल ज्येष्ट शु॥ अष्टमी मोकाम बेदवटी, जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष. आह्मी कांहीं कार्यानिमित्य बेदवटीस आलों. चिरंजीव राजश्री आनंदराव बागटकोटास आले होते. आह्मी येथें आलियावर वर्तमान कळवून भेटीस आले. भेटी जहाली. राजश्री येशवंतरावजीचें पत्र कालि चिरंजीव राजश्री आनंदरायास आलें. कीं, राजश्री आनंदरावजी बाजी, व आपण व राजश्री गणपतीराव दादा बागडकोटास येऊन दाखल जाहला. लवकरीच कूच होणार. ह्मणून त्यास चिरंजीव राजश्री आनंदराव याचें मानस आपली भेटी घ्यावी, याजकरतां लवकरीच जाऊं ह्मणतात. लवकरीच येथून निघून येतील. भेटीअंतीं कळेल. ती॥ रो।. नरसिंगरावजीचें पत्र-वैशाख वद्य पंचमीचें कालिं येथे आलें. त्यांत चिरंजीव भुजंगराव याची रवानगी केली आहे, लवकरीच येतील. ह्मणून त्यास चिरंजीव लवकरीच आपण बागडकोटास आहां, इतकियांत येऊन पावले. कदाचित आपलें जाणें जलदीनें जहालिया चिरंजीव शिदापुरास पावेतों घरास येऊन सर्वांची भेटी घेऊन आपणाजवळी येईल. चिरंजीव आपणा जवळी येऊन पावे पावेतों हलक्या मजल करीत जावें. अगर तुंगभद्रेवर दोनी तिनी मोकाम केलिया सत्वर येऊन पावेल. ती॥ रो।. नरसिंगरावजीनीं आपल्या भरंवसियावरी चिरंजीवाची रवानगी केली आहे. चिरंजीवास आपण वडील. सर्व प्रकारें सांभाळ करीत जावें. हुजूर जातात. तेव्हां दरबार नवा, आपण दरबारचे वाकीफ आहां. हरयेक विषयीं बुद्धिवाद सांगत जावे. आपणांस उपचार ल्याहावे ऐसें अर्थ ती॥ रावजींच्या व आपल्या रणानबधांत नाहीं ह्मणून लिहिलें आहे. सर्वदां पत्रीं परामृश करीत जावें. बहुत काय लिहिणें कृपा कीजे हे विनंति.
सेवेसीं आनंदराव नरसिंह कृतानेक सां। नमस्कार. विनंति जे, आपली भेटी व्हावी ऐसा मनोदय आहे. श्रीकृपेंकरून घडेल, तो सुदीन. वरकड वर्तमान ती॥ राजश्री अणांनीं लिहिलें आहे; त्याजवरून कळेल. कृपालोभ असो दिजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ ६ जमादिलाखर, लेखांक १४७. १७०२ ज्येष्ठ शु॥ ८.
सन समानीन. श्रीशंकर प्रसन्न. १० जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। गोविंद भगवंत सां॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. आपण दोन पत्रें पाठविलीं तें पावून सकल अर्थ कळला. आपण गेल्यापासोन श्रीमंतांस पत्रें येत गेलीं, त्यांवरून सर्व अर्थ समजण्यांत येतात. प्रथम करारास नवाबसाहेबाकडूनच मोबदला मुलुक व एक साला खंडणीस कमी पडले. त्यास, थोर दौलत जाणून व स्नेहावर नजर ठेऊन, इंग्रजाचें पारपत्य होतें ऐसें चित्तांत आणोन, कबूल करून करारनामा व मदारुलमाहाम यांचीं वगैरे खातरजमेचीं पत्रें पाठविलीं. त-ही प्रथमच दिवस. सर्व ह्मणतात कीं, नवाबबहादर इंग्रजावर जात नाहींत. एवढी मसलत एक सिंदे यांचे पत्रांकरितां तटून राहील कीं काय ? श्रीमंतांचा मुख्य करारनामा सिक्यानसीं जाला तेव्हां राहिलें तें काय ? ऐसें असोन, दिकती निघतात. तेव्हां मसलत करावयाची नाहीं, ऐसी चर्चा लोक करतात. वद्य त्रयोदसीस निघतील हा भरवंसा मदारुलमाहाम यांस फार होता. तों मुहूर्त तो राहिला. श्रीमंतांचा व नवाबसाहेबांचा स्नेह असा माघें कधीं जाला नाहीं. याप्रमाणे योग घडून आला. तेव्हां, नवाबबहादर यांणीं बेशक इंग्रजावर जाऊन पडावें. तेव्हां यांचीही खातरजमा पक्की जाली आणि आपले नवाबबहादर पुर्ते सोबती जाले, ऐसें होईल. यांची त्यांची एकरंगी आणि पुर्ता सोबतीपणा जाला ह्मणजे यांत उभयपक्षीं कितीं कामें आहेत आणि काय काय नफे आहेत, हें पुढें समजेल. कितेक दुषमानांस विचार पडेल. ऐसे ऐसे मसलतीचे पल्ले व दुरंदेशी सोडून किरकोळी कल्पना निघतात, यास कसें करावें ? राव रास्ते व कृष्णराव यासारखे मधेस्त; राजश्री पाटीलबावा यांचें पत्र आलें ते थैलीच श्रीमंत राजश्री नाना यांणीं रवाना केली. पावली असेल. आतां आळस न होतां इंग्रजावर नवाबसाहेब यांणीं जावें. सलाहमसलत एक तेव्हां तमाशबीनीसारखें लौकिकांत न दाखवावें. दिवस निपट थोडे. जलदीस मोल आहे. स्वारी निघण्यास उशीर नसावा. तुह्मीं करारप्रमाणें कामें उगऊन लौकर यावें. निंबाळकर यांजकडील वरातेच्या ऐवजाविशीं आपण लिहिलें. त्यास, अदियाप ऐवज वसूल नाहीं. याउपरी निकड करून ऐवज उगवितों. दिवसगत मात्र लागली व लागेल. परंतु ऐवजास चिंता नाहीं. आपण गेल्या कार्याचें यश घेऊन जलद यावें. सरकारांतून खर्चास पाठविलें. पावलें असेल. सविस्तर राजकीय वगैरे श्रीमंतांचे पत्रीं वरचेवर लिहिण्यांत येतच आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १४६.
१७०२ ज्येष्ठ शु. ७. श्रीशंकर प्रसन्न. १० जून १७८०.
राजश्रीया विराजीत राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लेखन करीत जावे. विशेष. आपण सातारीयाहून निघोन लष्करांत गेलियातागाईत वर्तमान कळत नाहीं. तरी सविस्तर ल्याहावें. इकडील मजकूर राजश्री आनंदराव निंबाजी यांचे पत्रीं लिहिला आहे, त्यावरून कळों येईल. निरंतर पत्रीं संतोषवीत जावें. बहुत काय लिहिणें लोभ करीत जावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १४५.
१७०२ ज्येष्ठ शु॥ ७. अलीफ. ९ जून १७८०.
बहुत दिवस गुजरले, आंसाहेबांकडून खैरीयतेचें खत येऊन वर्तमान कळत नाहीं. त्यास, दोस्तीचे अलमांत असें नसावें. हामेश खैरअफीयतचें खत पाठवून दिलशाद करीत जावा, हे लाजम आहे. आमेहेरबाचें जाणें चेनापटणचे जिल्ह्यांत जालें असेल, जालें नसलिया करारबामोजीब जलद जाणें होऊन, इंग्रजास ताण बसवून, सजा अमलांत यावी. गुजराथप्रांतीं करनेल गाडर यासीं व सरकारच्या सरदारांसी लढाई शुरूं आहे. पांच सात लढायांत इंग्रजास नसीहातच जाली. तेव्हां या फौजांपुढें आपला टिकाव होत नाहीं, असें समजोन करनेल गाडर यांणीं सुरतेस माघारा जावयाचा मनसबा करून, नर्मदाकिना-यास आले. पिछावर सरकारच्या फौजा आहेत. कोंकणप्रांतीं ममईकर इंग्रजांनीं हंगामा केला. त्यांचे तंबीचे व कोल्हापूर व कितूरकर वगैरे याणीं सरकारतालुक्यास इजा दिल्ही. त्याचें पारपत्याचे कुल आजीमुलकद्र कृष्णराव नारायण यांस कलमीं केलें. तें जाहीर करतील त्यावरून मुफसल मालुम होईल. तर्फेंन दोस्तीचे यगानगत; तेव्हां सलामसलत पैहाम इतला करीत असावी. सर्व मरातब आसाहेबाचे दिलनिसीन आहेत. ह्मणोन नवाब हैदरअलीखानबहादुर यांस नानांचे नांवें पत्र. र।। छ ५ जमादिलाखर, सु॥ इहिदे समानीन मया व अलफ.