लेखांक १०२.
१७०२ चैत्र व. ७ श्री. २५ एप्रिल १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. ममईची बंदी केली, सबब, गल्ल्याचा वगैरे तेथें तोटा पडला. त्यावरून इंग्रजांनीं बेलापूर तालुकियांत पांच च्यारसें माणसांनसीं येऊन कांहीं गल्ला भरला. तितकेंच राण त्यांस मोकळें होतें. हें वर्तमान येतांच राजश्री नागोराम यांजबराबर कांहीं फौज व गाडद देऊन त्यांचे तंबीस रवाना केलें. ते जागा पक्की बंदीची, सबब, मागाहून राजश्री सखारामपंत पानसे, कांहीं तोफा व पोख्त सरंजाम देऊन, एका दों दिवसीं त्यांचीही रवानगी होईल. दर्यांतून सरकारचे आरमारासीं व इंग्रजाचे आरमारासींही लढाई दररोज होत आहे. नवाबबहादूर यांस वर्तमान सांगावें. रा।.छ १९ रबिलाखर. हे विनंति.