लेखांक ९५.
१७०२ चैत्र शु।। ८ श्री. १२ एप्रिल १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी- गोविंदराव नारायण यांस देवआज्ञा जाल्याचा मजकूर लिहिला, तो समजला. त्यास, फार वाईट जालें. आयुष्यमर्यादा प्रमाण. या गोष्टीस उपाय नाहीं. तुह्मीं सर्व मंडळीसह येऊन राजश्री गणेशपंत यांस तेथें नवाबबहादूर यांजपासीं ठेवावें, ऐसे पेशजी लिहिलें होतें. परंतु, गोविंदराव यांचा प्रकार असा जाला. त्याअर्थीं, गणेशपंत यांसही बराबर घेऊन यावें. तेथें ठेऊं नये. नवाबबहादूर यांसीं पक्की दोस्ती जाली, जुदागी राहिली नाहीं. कच्चें पक्कें व मसलतसमंधें नवाबबहादूर मजकूर सांगतात त्याप्रमाणें वरचेवर कळला पाहिजे, सबब, रावरास्ते यांजकडील कारकून येथून आले आहेत, त्यांस नवाबबहादूर यांजपासीं ठेवावें. ह्मणजे बहादूर वर्तमान सांगतील त्याप्रमाणें वरचेवर इकडे लिहीत जातील. याप्रमाणें तुह्मीं नवाबबहादूर यांसीं बोलून गणेशपंत यांस समागमें घेऊन यावें. र॥ छ ६ रबिलाखर. * हे विनंति.
पो।।। छ २२ रबिलाखर. सन समानीन.