पो। छ ६ जमादिलाखर. लेखांक ९९. १७०२ चैत्र शु॥१०.
श्रीगजानन. १४ एप्रिल १७८०.
श्रीमंत राजश्री तात्या यांप्रति आश्रित भिक जोसी संगमेश्वरकरकृत नमस्कार विनंति येथील कुशल त॥. चैत्र शुद्ध १० दशमीपर्यंत यथास्थित आसे. विशेष. पंच्यांग पाठविणें ह्मणोन लि॥. ऐसियासी, आक्षर पंच्यांग संग्रह लेहून पाठविलें आहे, प्रविष्ट होईल. आह्मांस एके कुणबिणीचें आगत्य आहे. घरीं साही महिने कुणबीण अगदीं नाहीं. त्यास सोय करून चांगली पोर्गी जातीचा शोध करून पाठऊन द्यावी. न पाठविल्यास येथें विकत घ्यावी लागेल. यास्तव तेथूनच नेमणूक करून पाठविल्यास रुपये पावणाशें खर्चावें लागणार नाहींत. आह्मीं श्रीसंनिध अभीष्ट चिंतीत आसों. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ कीजे. हे विनंति.
हे॥ हरभट सोमण यांचे नमस्कार.