Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ५३२ ]

श्री. पौ। छ ३० रबिलाखर.

श्रीमंत राजश्री उभयतां स्वामींचे सेवेसीः--

सेवक नरहर शामराज साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम जाणोन स्वामींनी आपले स्वानंद-लेखन-आज्ञा केली पाहिजे. विशेष. आपण आज्ञापत्र पा। कीं, रा० धोंडो दत्तात्रय याजपासून दीडशें दोनशें राऊत घेऊन रा० मामांकडे पाठवून देणें. त्यासी, आपलें पत्र त्यासी प्रविष्ट करून त्याचें उत्तर आलें कीं, राऊत रिकामे नाहींत, रा० गोविंदपंत यमुना उतरून अलीकडे आले आहेत, त्यासी आणावयासी राऊत गेले आहेत, ते इकडे आलियावर राऊतांची तजवीज केली जाईल. दुसरें आह्मांस आज्ञा होईल तर, सेवेसी भेटीस येऊन. भेटीअंती सकल वृत्त निवेदन केलें जाईल. स्वामी इकडे श्री भागीरथी उतरोन कोणे दिवशीं आगमन होईल ? तें आज्ञापत्रीं लेखन केलें पाहिजे. नावाडी यांसी ताकीद करून राजघाटावर आणविल्या आहेत. सेवेसी कळावें. छ २९ रोजी येथून तरकार व पानें वगैरे गुलाबी शिसे २ पाठविले आहेत ते पावले असतील. रा० धोंडोपंती पत्र लेहलें आहे तें सेवेसीं लाखोटा पाठविलें असे. हल्ली छ मा। तरकारी वगैरे फुलें गुलाबाची सेवेसी पाठविले असेत. प्रविष्ट होतील. बहुत काय लिहिणें ? कृपा असो दीजे. हे विज्ञप्ति.

[ ५३१ ]

श्रीमोरया.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोधरपंत स्वामीचे सेवेसीः--

पोष्य गंगाधर यशवंत सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. दारूगोळी पाहिजे तर दारू व शिसे देखील दाहा उंट भरून अगत्यरूप पाठऊन देणें. दारु उत्तम व शिसें ऐसें सत्वर येऊन पावे तें करणें व बाण उत्तम पंनास उंट, ऐसें पातशहांकडून हा सरंजाम लि॥प्रमाणें, मागोन घेऊन पाठवून देणें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

उपरि झेंड्या करणें टोकर थोर उत्तम दोन जरूर जरूर पाठऊन देणें. झेंडे तयार केले आहेत. परंतु टोकरावांचून अटकाव असेत. टोकर उत्तम अगत्य पाठणें. वेळू ढालाकारणें पाहिजेत. यास्तव लि॥ असें. हे विनंति.

[ ५३० ]

श्री.

राजेश्रियाविराजित राजश्री नारो हरी स्वामी गोसांवी यांसी :-

सेवक बापूजी माहादेव सां॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. तात्यांचा काळ जाला हें चिरंजीव दामोदरजींनी लिहिलें त्यावरून परम खेद जाला. ईश्वरें मोठें वाईट केलें ! बरें ! ते पुण्यवान होते. तुह्मी सहसा खेद न करणें. तुह्मांस तात्यांचे स्थळी तीर्थरूप राजश्री भाऊ आहेत. कोणे गोष्टीची फिकीर न करणें. तुह्मी सुज्ञ आहां. लेहावें ऐसें नाहीं. त्यामागें हिंमत धरून पराक्रम करणें. तुह्मी करालच. हा आह्मांस पूर्ण भर्वसा आहे. तुमचें कामकाज असेल तें लिहीत जाणें. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.

[ ५२९ ]

श्री.

राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसीः--

विनंति उपरि. चांदखान बेपारी यानें येऊन विदित केलें कीं तुह्मांकडील सिवरामपंत यानें च्याळीस कोडी कापड लुटोन नेलें. त्यापैकी च्यार कोडी फिरोन दिल्ही बाकी. कोडी छतीस ठेविल्या ? त्यास, रयेत लुटोन ऐसी बदमामली केली. तेव्हां आमच्या प्रगणियाची अबादी कैसी होईल ऐसी बजीद गोष्ट आह्मांस कार्यास येणार नाहीं. सिवरामपंताची अबरु राखणें असिली तरी बेपारी मजकुराचें कापड झाडियांनसी देऊन त्याचा राजीनामा पाठऊन देणें. कापड याचें यासी देणें. जरी कापड नसिलें तरी त्याचे मालाचे रुपये तीन हजार करार आहेत त्याप्रमाणें ता हजाराची याची निशा करवणें. येणेंप्रमाणे पंत मशारनिलेस ताकीद करून विल्हेस लाववणें. अनमान जालिया पंतमशारनिलेवर येथून स्वार येतील. समक्ष आणून विल्हेस लाविलें जाईल. बोभाट जालिया परिणाम शुध होणार नाही. असें जाणून वर्तणूक करणें. छ १७ जिलकाद. हे विनंति.

मोर्तब
सुद

[ ५२८ ]

श्री.

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्याजश्री बाळोबा गोसावी यांसीः--

सेवक बापूजी माहादेव नमस्कार उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुमचें पत्र सुतर स्वाराबरोबर आलें तें मिरापुरी पावले. लिहिलें कीं, माहाराजांहीं व बखातींसगांनीं याच वाटेने श्रीमंतांकडे जाणे होय, तर उत्तम आहे. ऐसे लिहिले, त्यास, येथे वर्तमान आले की, श्रीमंत करोलीकडे येणार. नंतर आज उदईक, आमची रुकसद करतील. आह्मी दिल्लीचे मार्गे जाऊं. कळलें पा।. यानंतर आह्मांस नवाब दुंदेखानांनी घोडीं दिधली होती ते त्यांचेच हद्देंत गेली आहे. ती त्यास नवाबास सांगून घोडींचा तलास करवून घोडी पाठऊन देवावीं. बहुत काय लिहिणें ? छ १० रजब. हे विनंति.

हिशेब

२ शालेची रजई
.॥. अंगरखा पायजामा सफेद
.।- छीट आंगरखा पायजामा
३-॥- शालेचा जामा
----
६।-

वसूल रुपया १ बाकी
५।-

                                                                                  लेखांक ३०३

                                                                                                  श्रीराम                                                       
                                                                                                                                                                     
नकल

यादि स्मरणार्थ दादाजी नरसी प्रभु देशकुलकर्णी व गावकुलकर्णी ता। रोहिडखोरे हे आपले वतन अनभवित असता अबरंगजेब पातशाहा याची मसलत दक्षण प्राती जाली विजापूर भागानगर हस्तगत करून राजश्री             स्वामीच्या राज्यावरी चालून घेतले ते समई मुलकामधे राजिकाचा उपद्रव फार जाला मुलकास हि दहशत बहुत पडोन परागंदा होऊन परमुलकास गेले मुलुक खराबा होऊन पडिला ते वख्ती दादाजी नरसी याणे आपले वतन सोडून मुले माणसे घेऊन परागदा होऊन परमुलकास जाऊन वख्त गुजराण करित असता मोगलाची धामधुम फार जाली जुलपुकारखान रायगडास येऊन रागड हस्तगत केला ते प्रसंगी राजश्री            स्वामी स्वार होऊन कर्नाटक प्रांतास गेले ते प्राती राजश्री रामचंद्रपंत अमात्य व राजश्री शंकराजी नारायण सचिव यासि ठेविले ऐसियासि राजश्री                  स्वामी चंदीचे मुकामी असता राजश्री शंकराजी नारायण सचिव याणी विनतीपत्र पाठविले जे ता। रोहिडखोरे येथील देशकुलकर्णी होता त्याचा निरवश जाला वतन चालवावयासी कोण्ही नाही स्वामीनी कृपाळु होऊन सेवकास वतन मर्‍हामत केले पाहिजे त्याचे लिहिलियावरून मनास आणिता स्वामि कृपाळु होऊन वतनाचा कागद करून दिल्हा त्यापासोन राजश्री शकराजी नारायण ता। रोहिडखोरे येथील देशकुलकर्णी चालवित आहेत ऐसियासि दादाजी नरसी प्रभु परागदा होऊन परमुलाकस कालक्षेप करीत आहेत दादाजी प्रभुचे पुत्र कृष्णाजी व येसाजी प्रभु आहेत

[ ५२७ ]

श्रीवरद.
पौ छ ७ रबिलावल.

तीर्थस्वरूप राजश्री बापूसाहेब व राजश्री दादासाहेब वडिलाचे सेवेसीः----

बालकें पुरुषोत्तमानें व दिवाकरानें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता। छ ३ रा॥वल मुकाम नजिक शिकारपूर जाणोन खानदोत्सवलेखन करीत गेलें पाहिजे. यानंतरः वडिलीं पत्र छ २७ चें पाठविलें तें छ २ मिनहूस पावलें. लेखनार्थ कळला. लिहिलें कीं-- तुह्मांस इतके दिवस जाले हा काळ रुपया एक न आला; आह्मी त्रिंबक गोजरोवर वरात केली ह्मणून त्याजवर इतराजी करून मसाला केला. ह्मणून लिहिलें त्यास, आह्मीं तों त्रिंबक गोजरोस इतकेंच लिहिलें होतें की, जलालाबादेचा ऐवज दिल्लीस पोंहचावणें; आणि ताकीद केली कीं तहशिलेंत सुस्ती केलिया कार्यास येणार नाहीं. त्यावरून त्या मादरचेदानें आपणांस लिहिलें कीं, मसाला केला, ह्मणून लिहिलें. असो ! त्याचेंच लिहिणें सत्य झाले ! उगीच शिबंदी ठेऊन, दोन हजार रुपये रोजिना खर्च करून, कमाविसदारापासून रुपये घेऊन शिबंदी खर्च करिता येथे एक रुपया न द्यावा, हे ताकीद करितां, याचें नाव काय ? ह्मणून लिहिलें; तर उगेच बसून शिबंदी खर्च करावी, ऐसी हौस नाहीं. मुलकांत अमल खांद्यावर धोत्र घालून तपश्चर्येने अमंल होतो, यांत संदेह नाही. परंतु या गोष्टीस तपश्चर्याशील कृष्णाजी केशव आहे तो अमल करील. आमचेनें होत नाहीं. व लिहिलें की -- बखेडा न कराल, व माणसांस बराबर ठेवाल, सुरळितपणें काम कराल तर करणें, नाहींतर इजारदारा पाठवूं, व रुपया ठिकाणीं लावूं, नाहीतर विसा लक्षांस आह्मी बुडतों. उद्या लोक ह्मणतील कीं, पोराचे भरंवसियावर घरच बुडविलें. जनांत तोंड दाखवायास जागा राहणार नाही. जैसे अंताजी पंतांसीं मिळोन घर बुडविलें त्याप्रों।च हें लक्षण दिसतें. ह्मणून कितेक प्रकारें कृपामृतवर्षाव करून लिहिलें त्यास, आतां आपण सुखनैव चित्तास येईल त्यास पाठवावें. आजपावेतों लोकांचे भरंवलियावर नवतों. व पुढेंहि श्रीकृपेनें व तीर्थरूप केलामवासीचे पुण्येंकरून लोकांचे भरंवसियावर नाहीं. व अंताजीपंतासी मिळून घर बुडविलें नसतां आह्मांवर निमित्त आलें. बरें ! आह्मी घर बुडविलें ! लोकानें तारलें ! पुढेंहि. बुडवायास आह्मी आहों ! यास्तव, ज्या सोन्यानें, कान तुटे तें कशाप्त ठेवावें ? व जेव्हां ठेविलें तेव्हांहि कोणी चालवीत नवता. व आतांहि कोणी चालवावें या उमेदीवर नाहीं. सर्वस्वी पदरी तीर्थरूप भाऊसाहेबांचें पुण्य आहे. सर्वांची श्रीमहालक्ष्मी आहे. ईश्वराचा मुलुख कांहीं उणा नाही, व आमचा पाय कांहीं लंगडा नाहीं. ईश्वरास सर्वांची चिंत्ता आहे. व लिहिलें कीं- येथून आज्ञा येईल त्याप्रों। वर्तणुक करित जाणें ; आज्ञेखेरीज वर्तिलां कार्यास येणार नाहीं; वरात तनखा करूं ते मानीत जावी; इतक्या गोष्टी पुरवत असल्या तर काम करणें. ह्मणून लिहिलें त्यास, आह्मी कांहीं चाकरी कबूल केली नाहीं, व ऐसे चाकरी करून ऐसी कृपा संपादावी याजपेक्षां दुसर्याचीच चाकरी करावी हें उत्तम. व लिहिलें कीं, खरीप एक महिना राहिलें होतें. ते वेळें आह्मी आलों. अगोधर माजुलअमीलांनी खरीफ घेऊन गेले. माहालोमाहाल शंभर प्यादे ठेवून अमल करितील, ऐसे विलायेतचे अमल असतील ते करतील; आमच्यानें होत नाहीं ! सुखेनैव ज्यास पाठवणें त्यास पाठवावें. अगोधर कांहीं अर्जुवंद नवतों व पुढेंहि आह्मी होत नाहीं. आह्मी बहुत परिहार ल्याहावा तो कोठवर ल्याहावा ? तेथें चुगलखोर रात्रदिवस सांगतच असतील. बरें ! श्रीकृपा करणार समर्थ आहे ! वरकड कितेक प्रगण्याचा अहवाल वेगळ्या पुरवणी लिहिला आहे त्याजवरून कळेल. कृपा केली पाहिजे हे. विनंति.

मामांनी लिहावें. रा॥ त्रिंबक गोजरोंनी शिबंदी ठेवायासी पत्रें पाठविलें तें बजिनस सेवेसी पाठविली आहेत. चाकराचा आब व चुगलखोरी या प्रकारची; व आपली त्या पाजीकरतां आह्मांवर इतराजी ! बरें, असो ! बहुत काय लिहिणें ? ही विज्ञप्ति.

[ ५२६ ]

श्रीगजानन.

पो। छ ६ रबिलावल

सेवेसी बालकें पुरुषोत्तमानें व दिवाकरानें कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। छ ६ रबिलावल मुकाम हरणावा जाणोन स्वानंदोत्सव लेखनआज्ञा करित गेलें पाहिजे. यानंतर पूर्वी पत्र पाठविलें आहे त्याजवरून सर्व वृत्त ध्यानास येईल. त्यास, ऐसें न होये कीं, नवाब वजिर यांसी बोलावून घेत. अगोधर आलेच नसते तर्हे बरें होते. आतां उठून गेले तर, फौजेचा भ्रम उठतो. यास्तव नवाबाचें ताकीदपत्र यांसी एक पाठवावें कीं तुह्मांस त्यांचे ताबीन करून पाठविलें आहे कीं, ते ज्या प्रों। सांगतील त्याप्रों। करणें. तें तो नाहीं ; मधेंच फितुर करूं लागलेत हें काय ? आतां ज्याप्रों। ते सांगतील त्याप्रमाणें करीत जाणें; फितुर केलिया कार्यास येणार नाही. याप्रों। ताकीद्रपत्र पाठवावें. व दोन चौक्या पाठवून द्याव्या की--- आपल्या ताबीन राहेत; त्यांचे ताबीन आहेत, त्या आपले कामाच्या नाहीत. व यांनी तो साहु फितुर आरंभिला आहे. उबेदुल्लाखान येतांच, त्यानें गुलामाचे दिवाणास बोलावून वचनप्रमाण, आणभाष केली कीं — आह्मी तुजला वांचवून तुझा गड तुला भाल ठेवितों व तुझी मुलाजमत करवितों. त्याजवरून आह्मी तों रात्रंदिवस तेथील बारदारी करितों, व चौकीस लोक पाठवितों. श्रीकृपेने तो बाहेर निघतांच त्यास ठिकाणी लावितों. ऐसे करितां तो निघून तिकडे आला तर, आपण नवाबासी ठीक करून, कांहीं देऊ घेऊ करून तो गुलाम तेथें येतांच त्यास मारून टाकीत, याप्रों। जरूर करावें. आह्मीहि माहालेमाहाल शिड्यां वगैरे सरंजाम आणविला आहे. तो येतांच श्रीकृपेनें एक्या हुल्यांत गड खाली करून घेतों या गोष्टीचा बंदोबस्त नवाबापासीं जरूर करावा. विशेष काय लिहिणें ? या गोष्टीची त्वरा करावी. विलंब केलिया सिबंदीची तदबरी होते, यास्तव त्वरा करावी. कृपा केली पाहिजे. हे विज्ञापना.

रा॥ त्रिंबकपंत स्वामीस नमस्कार विनंति उपर. तीर्थस्वरूप साहेबांस लिहिलें आहे त्यावरून सर्व कळेल. त्वरा करावी. यांनी फितुर आरंभिला आहे. त्वरा करावी, व तेथील बंदोबस्त करावा की गुलाम येतांच त्यास ठिकाणीं लावीत. हे विनंति.

[ ५२५ ]

श्री.

त्यासी, त्या गोष्टी अनुभवास आणायाचे दिवस हेच आहेत. ईश्वरें आपणांस मोगलाईकडील सूत्रधारी केलें. या दिवसांत जरी आमची साहेता न करतील, आणि स्नेह साफल्य न दाखवितील, तरी पुढें कोणता प्रसंग ? बहुत लिहिणें तरी आत्मस्तुति दिसते. मीहि जसा स्नेहांत दृढ आहे, व ज्याचा जालों, त्याचा कायावाचामनसा जालों. त्यांत संदेह नाही. व कांहीं कामाचाहि आहे. जरी आपण विश्वास देऊन येथें यथास्थित आत्म्यांत विचारांत शरिक ठेवतील, तरी, उदंड कांहीं किफायत स्वामीच्या विद्यमानें नवाबाची करून दाखवीन. रोहिले नबाब आमसी काय वाकीफ ? न जाणो ! पूर्वी खोजीमकुलीखानांहीं गिल्ला शिकवाहि आमचा काय लिहिला असेल ? ऐसियासी, आपण असलियानें आमची खातरजमा जाली, लौकिकांत प्रतिपादनाहि जाली. गोष्ट प्रसंगाची आहे. जरी आपण इमायतनामा वा ब + + + चे नावें आकारणविशईं पाठवितील तरी + + झी तरी बिल एकरुई दृढतर चित्तारूढ करितील. तरी मी सर्वां अगोदर येऊन आपली भेटी घेईन. कितेक प्रसंग इकडील निवेदन करून आपले विद्यमानें मुलाजमतहि होईल. यद्यपि आह्मांस तरी आपणांसी काम आहे, भेटीनंतर जैसा विचार सांगतील तैसा केला जाईल. खोजीमकुलीखानानें प्रस्तुत मोठा जुलुम शहरचे लोकांवर मांडला आहे. कितेक साहुकार तरी शहरांतून गेले. जरी यासी नबाबांहीं, तोंडी लाविलें तरी हा योग्य नाहीं; दुष्टबुद्धि व हिंदूचा अत्यंत द्वेष्टा आहे. आतांपासूनच याच पाय दृढ न होय तो प्रसंग ध्यानांत असो द्यावा. नवाबहि इकडे बंदोबस्त व द्रव्य मेळवायानिमित्य येताती व तुह्मीहि जैशी हाती धरले तैसा निर्वाहहि केला पाहिजे. बहुतांकडे उदंड द्रव्यें निघतील. घेणार पाहिजे. हे प्रसंग लिहिणियांत येत नाहींत. भेटीच्या समयीं सूचना केले जातील. मूळ स्नेह करून दाखवायचे दिवस हेच आहेत. बहुत काय लिहावें ? जो उपकार आपण करितील ते आपलें नांव राहील वादगारी. उत्तराची मार्गप्रतीक्षा करजेते. हे विनंति.

[ ५२४ ]

श्री.

पो छ ८ मोहरम.

भेटल्यानें व शिपाई लोकांची तलब न दिधल्या, फितूर दोहीकडे वेडावांकडाच जाला आहे; तो कोठवर लिहावा ? सत्वर येऊन पाहावा तरच उत्तम. आह्मांस मीरबक्ष बोलावितो. त्याचे बोलावण्याकरिता जावें. परंतु कांहीं चव व जीव राहिला नाहीं. एकमूठ असते तर, आपले हातीं कबज राहता ? तें होईल तो सुदिन ! मुख्य इत्की मेहनत करून शेवटी खाविंदहि समयास न आले. व आह्मांस वृथा क्लेश ! घोडियांस दाणाही घरीं नाहीं; तो विस्तार कोठवर लिहावा ? येथें श्रीमंत दादासाहेबांकडून पन्नास हजार पाचाशाःची हुंडी घेऊन वरातदार फर्माशी घोडे २५ घ्यावयास आले आहेत. येथें घोडे मिळते, तर आह्मी दादासाहेबांसाठी न घेतों ? श्रीमंत नानासाहेबांची फर्मायश पाचा घोडियांची, तिहि सरंजाम एकहिं न जाला. कां कीं, या दिवसांत कारवान येत नाहीं व जेथें जेथें घोडे होतात तेथें माणूस पोहोचूं सकत नाहीं. ऐसेंहि असतां गणेशपंत दि॥ विठ्ठल शिवदेव व रुपये मकुजराची वरात घेउन आले आहेत. त्यास पांचशे रुपये आज्ञेप्रों। खर्चास दिधले. पन्नास हजाराच्या वस्ता पाहाविया तेव्हां रुपये द्यावे, कीं ते जाणोत, भक्षोत, अथवा जें इच्छतील तें करोत, — रुपये त्यांचे हवाला करावे. ज्याप्रों। श्रीमंतीचा आज्ञा येईल त्याप्रों। करुं. रुपये द्यावयाची आज्ञा आली तर--- पूर्वी अंताजीपंतासाठी अडीच तीन लाख रुपये कर्ज घेतलें -- या रुपयांसाठीहि खुद गाहाण होऊन जितके सरंजाम होतील तितके त्यांचे हवाला करुं. काय आज्ञा ते घेऊन त्याचे नांवें पत्र पाठवावें. दुसरें :- श्रीमंत नानासाहेबीं साडेच्यार लाख रुपये घ्यावयाची वरात अंताजी माणकेश्वरास द्यावयास पाठविली आहे; ते कोठून कोणते ऐवजीं वरात अदा करावी ? तिसरें:- पांच लाखा रुपयांचा मजकूर वडिलीं लिहिला. त्यास जे समयीं अंताजीपंत दिल्लीस आले नवते, ते समयीं खानखानास आह्मी मिळवून घेऊन, तुझे विजारतचे मुकदमियांत आह्मी मदतगार ह्मणून पाचा लाखाची फर्द दसखत करून घेतले. अंताजीपंत आलियावर हे वृत्त त्यांजला सांगितले; हें त्यांजलाच शफतपूर्वक पुसावें. नगद आमचे हवाला पातशाहापासून घेऊन केले असतील तर, आमचें घर जप्त करणें. जर त्यांनी फर्दहि दसखत करविली नसली तर, त्याजपासून जें चित्तास येईल तें घेणें; अथवा, आह्मांस तर्ही सत्य राखणें. या दिवसांत खानखानाचे फर्द दसखतीसहि लटकी आहे, ह्मणून ह्मणतों. आणि खानखानानें जलालुदिखानाचे ह