Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५१४ ]
श्री.
तीर्थरूप रा। दादा वडिलांचे सेवसीः--
आपत्य पुरुषोत्तमानें साष्टांग नमस्कार विनंति कीं, -- काल छ ८ मोहरमी सविस्तर वृत्त सेवेसी लिहिलें आहे. श्रीमंतांस निवेदन केलेच असेल. आजचे नवलविशेष हेच की, पूर्वी पातशाहाचे मातुःश्रीने खानखानाचे विद्यमानें सलुखाचा डौल केलाच होता. त्याउपरि, मीरबक्षीनें खानखानास खरें करून, आपलें लगामीं लाविले, व सलुख करूं लागले. याउपरि मीरबक्षीस, रोहिलियास लढाईचे पल्यावर पातशाहासहित आणून सा लक्ष रुपये देऊ केले, व लडाई ठैरली. आज एकाएकीच खबर आली की, खानखानाचे विद्यमानें सफदरजंगास सुबे अयुद्धेचा खिलत पोहोंचला. त्यानें बलमगडसंनिध येऊन फर्मान बाडी उभी करून फर्मान खिलत घेतला. हें वृत्त ऐकिलिल्यावर पातशहास अर्ज केला की, काल काय ठैराविलें व आज काय केलें ? त्यानें शफत जे वाहावी ते वाहिली की, मजला कोणाचें भय कीं गुप्त पाठवूं ? त्यानें जैसें एका गुलामास तक्तावर बैसविले, तैसें आपणच सोंग करून, शोहरत देऊन, पळावयाची विद्या केली असेल; नाहींतर, वाटेंत जमेदार मारतील यास्तव हें कर्म केलें असेल; आह्मी युद्धास तयार आहों. याप्रो। शपथपूर्वक सांगितलेयावर, अकबतमहमूद आह्मांस ह्मणूं लागला की, खानखाना आह्मांस तुह्मांस खता देऊन आपण सलुख करील; तैसेंच जालें ; तुमचे खाविंदाचे भरवशियावर आमचेंच नुकसान तुह्मी केलें. अतः पर उदईक रोहिले व बक्षी उठोन येऊन किल्यापासीं धरणें बसणार, व तलब घेणार, ह्मणून सांगितले. मुख्य गोष्ट हेच की, सफदरजंगास खिलत अयुधाचा खानखानानें पोहचविला. पातशाहा तो शफथ वाहतात की, आह्मीं पाठविला नाहीं. उदईक सफदरजंग कुच करून सुभियाकडे जाणार ह्मणून वार्ता आहे. अमलांत येईल तें लिहूं. पातशाहाचे मातुश्रीने मीरबक्षीसवें रोहिलियासी आह्मांकडून लढाईचे पल्यावर आणून, गुप्तरूपें खानखानाचे हवाला खिलत सुवियाचा केलासा वाटतो. स्पष्ट कळेल तेव्हां सो। लिहूं. कां कीं, मीरबक्षीसहि अयुधेचा खिलत अकबतमहमुदाचे हवाला केला आहे. व सा लक्षांचे निमे तीन लक्ष रुपयेहि बकशीस भांडीकुंडी मिळून दिधले; आणीख तीन लाख मिळतील तेव्हां हे युद्धास प्रवर्ततील, अथवा शिबंदी चुकवून घरी येतील. जें होईल ते लिहूं. आह्मीं लडाई करावयाचाच उद्योग करवितों. सफदरजंग मित्रभंग करून पळून जाणारसें वाटतें. अमलांत येईल तें खरें. जाट सुरजमल रोहिलियांचे पायदळ ठेवित आहे. मजहला तमाशाचाच दिसतो. आपली भारी फौज सत्वर येती तर उत्तम होतें. लडाई आठ महिने थांबविली; कोठवर बुद्धिबल चालेल ? विनारुपया सोंग रुपयाचें होत नाहीं. श्रीइच्छाप्रों। जें होणार तें हो ! आह्मी अझूनहि सफदरजंग पळाला तर्ही पिच्छा करावयाचा उदेग करितों. होतां होईल तें खरें. भेट होईल तो सुदिन ! कृपा केली पाहिजे. हे विनंति. आमची अकबराबादेची सनद फौजेचे नेमणुकेची नुस्ता कागद घ्यावयासी खावंद अनमान करितात; पुढे उमेद काय ? बरें ! महिनतीचें सार्थक करणार खाविंद समर्थ आहेत ! जाट मरेल तेव्हां अकबराबादेंत पाच हजार स्वार त्या ऐवजी खर्च मिळेल. बरें ! श्री इच्छा प्रमाण ! हे विनंति.
चिरंजीव तात्यास आशीर्वाद. राजश्री त्रिंबकपंतांस नमस्कार उपरि. राजश्री गंगोबातात्यास व राजश्री सखारामपंतांस पैदरपै पत्रें पाठविलीं, व नेमणुके विशईंहि लिहिलें; परंतु उत्तरहि न पाठविलें. याचें कारण काय ? तें लिहिणें. सा। नमस्कार सांगणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५१३ ]
श्री.
श्रीमत् राजश्री उभयतां साहेबांचे सेवेस:-
आज्ञाधारकाचा कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ २१ माहे जमादिलाखर पावेतों जाणून स्वकीय कुशल लेखनाज्ञा करीत असलें पाहिजे. विशेष. आपण कृपा करून नथु हरकार्याबराबर पत्र पाठविलें तें पावलें. बहुत हर्ष जाले व सविस्तर वर्तमान कळलें. इकडील वर्तमान तर सेवेस येऊन लिहिलेप्रों। हजर आहे. परंतु येथें सल + + + + + रंग बरा नाहीं कीं, पातशाहीमध्यें अबदुल अहतखां व नजबखान सरदार त्यामध्यें चित्तशुद्धता नाहीं. जैसें हिसामुद्दीखान नजबखानाचे पाठेस लागला होता, तैसें अबदुल अहदखां नजबखानाचे पाठीस लागला आहे. परंतु थोडक्या दिसांत अबदुल अहदखानहिठिकाणें लागतो. पहिलें, अबदुल अहदखानास लोक भला ह्मणत होते; परंतु आतां सारे जण बुरा ह्मणतेत; कोण्ही भला ह्मणत नाहीं. व आह्मीहि अबदुल अहदखानासी उमेद ठेवित होतों की, हा आरसियांत कारभारांत येईल, तर आमचे कामें करून देईल. परंतु हा मादरचोद कश्मिरी असा हरामजादा कीं, बोलणेंहि टाकिलें. आपलें गाव दुसरेयासी देणें चाहातो. आह्मांस दस्तक गांवचे करून देत नाहीं. हरामजादगी करतो. यापेक्षा हिसामुद्दीखानच बरा होता. बरें ! असो ! हाहि ठिकाणीं लागतो. कांहीं चिंता नाहीं. ईश्वर आपल्यास सलामत राखो ! सर्व उत्तमच होतील. दुसरें :-- येथें खर्चाचीहि टंचाई आहे. गावची हे शकल ! व करोडचे दरमाईचाहि कांहीं ठीक नाहीं. व येथें हवेलीचे मरामतेस दीडशें रुपये लागले. हवेलीची ज्या ठिकाणें जरूर मरमत करणें होतें, तेथें केली आहे. कळावें. दुसरें:- येथें या सरदारानें रामरावसारखे वकील पाठवून वकालतीचें ऐसें स्वरूप गमाविलें कीं, स्वरूप वकालतीचें न राहिलें. येथें ते ऐसे असतात की, पेशव्यांच्या वकालतीचा माणूस दाहादाहा वीसवीस रुपये मागत फिरतो. त्यास, विनंति की, येथें विकालीतमधें जो कोणी शंभर रुपये दरमाहा चाहे तो येथें मिळणार नाहीं. याकरितां ईश्वरकृपेनें आपण जों इकडे यावें तों आपलें सर्व खायाची बेगमी बंदूबस्त पक्के करून येणें. येथील भरंवसा कांहींच न ठेवणें. जर आपण मेरट वगैरे माहाल हजुरांतून करून इकडे याल तर बहुत उत्तम आहे. व आपले सर्व गोष्टीचें स्वरूप व विकालत सुजादौलचे जाबसाल हजुरांत करून येणें कीं, दिल्लीचा रंग आपणांस ठाऊका आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५१२ ]
श्री. पौ। छ ११ रा॥वल.
राजश्री दामोदर महादेव गोसावीः--
उपरि. तुह्मी आह्मांबराबर येणें ह्मणून तुह्मांस दोनचार पत्रें लिहिलीं; परंतु तुह्मी अद्यापि आला नाहीं. खानखानाचा कारभार विल्हेस लागणें. त्यास, बापूजी महादेव तेथें आहेतच. कारभार यासी विल्हेस लावतील. त्रिंबकपंतासही याच कारभाराकरितां ठेवावयाचें अगत्य असल्याप्त ठेवावें. परंतु जरूर जरूर आह्मांबराबरी तुह्मी यावें; व रा॥ कुकाजी शिवराम, व त्रिंबक खंडेराव यांजबराबरी ऐवज पाठविणें. ह्मणून आज्ञा केली होती. त्यास, याजबराबरी ऐवज रवाना केला असिला तरी उत्तम. ऐवज रवाना जाला नसल्यास एक लक्ष रुपये अगत्य अगत्य जरूर जरूर तुह्मीच घेऊन येणें. तुह्मी यावें व ऐवजहि जरूर पाहिजे याकरितां उदैक गाजदीनगरावरी मुक्काम करावा लागला. त्यास, दिरंग न लावितां बहुत सत्वर येणें. जाणिजे. छ १० रबिलावल. तीन मुकाम पडले. दोन तुमचे जाहाली. ती मुकामादाखलच जाहाली. यास्तव लौकर येणें. उशीर न करणें. मुलकासी ताकीद आहे. यास्तव लौकर स्थान करून पुढील भलता एखादा विचार केला पाहिजे. फार दिवस लश्करास ताकीद केल्यानें खराबा होईल. आजपावेतों दिल्लीवर खराबा जाहाले ते भलत्या एखाद्या मनसुब्यावर घालून तोंड मोकळें केलें पाहिजे. यास्तव लौकर येणें. जर तुह्मी रुपये लौकर येत नाहीं, तरी मग ताकीद कशास करावा ? ये प्रांतीस पोटास ऐवज मेळवावा लागेल. मग सला राहणें कळतच आहे. तुह्मी इतकें करून फलकार्य सिद्ध जाहालें तरी लौकर आला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५११ ]
श्री.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री सदाशिव शामजी फडणीस प्रा। शिंगरुड गोसावी यासी:-
सो। बापूजी माहादेव व दामोदर माहादेव नमस्कार उपरि येथील क्षेम ता। छ १ जा।खर जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन सकलार्थ अवगत जाला. ऐसियासि यादोरायाचें शांत जालियाचें वर्तमान कळोन परम चित्त विस्कळित जालें. बरे ! त्यासी तो समजून घेऊं परंतु आपलें हातचें माणूस गेलें हें खरें ! जें जालें त्याजला तो उपाय नाहीं. सांप्रत प्रा। मजकुरचें कामकाज तुह्मी व राजश्री त्रिंबकराव उभयतां एक विचारें करून करणें. जमीनदारांस वगैरे पत्रें जें पाठवणें तें मागाहून पाठवून देऊं. तुर्त प्रा। मजकुरीं विस्कळित न होता बंदोबस्त राखून सरकारचें कामकाज करीत जाणें. उभयतांहीं एकें चित्तें राहून प्रा। मजकूरचा बंदोबस्त करणें. वरचेवर वर्तमान लिहित जाणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५११ ]
श्री.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री सदाशिव शामजी फडणीस प्रा। शिंगरुड गोसावी यासी:-
सो। बापूजी माहादेव व दामोदर माहादेव नमस्कार उपरि येथील क्षेम ता। छ १ जा।खर जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन सकलार्थ अवगत जाला. ऐसियासि यादोरायाचें शांत जालियाचें वर्तमान कळोन परम चित्त विस्कळित जालें. बरे ! त्यासी तो समजून घेऊं परंतु आपलें हातचें माणूस गेलें हें खरें ! जें जालें त्याजला तो उपाय नाहीं. सांप्रत प्रा। मजकुरचें कामकाज तुह्मी व राजश्री त्रिंबकराव उभयतां एक विचारें करून करणें. जमीनदारांस वगैरे पत्रें जें पाठवणें तें मागाहून पाठवून देऊं. तुर्त प्रा। मजकुरीं विस्कळित न होता बंदोबस्त राखून सरकारचें कामकाज करीत जाणें. उभयतांहीं एकें चित्तें राहून प्रा। मजकूरचा बंदोबस्त करणें. वरचेवर वर्तमान लिहित जाणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५१० ]
श्री.
पौ। छ ४ रमजान.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यासीः--
बापूजी माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ २२ माहे शाबान मुक्काम इंद्रप्रस्त जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष. तुह्मी पत्रें दोन-एक पाचवे तारखेचें आलें तें पंधरावीस पावलें, पंधरावीचें आलें तें एकविसावे तारखेस पावून-वर्तमान सविस्तर विदित जाहालें. लिहिलें की, वजिरासी शंढासी आपल्या विद्यमानें मित्रत्व असावें. वजिराचा खास दस्खताचा शुका पाठविला त्यावरून नवाब बहादूर यास सविस्तर सांगितलें. त्यांणी पातशाहास अर्ज केला. पातशाहांनी ह्मटलें :– रावदामोदरपंतास वजिराचे कामामुळें ना ह्मटलें. त्यावरून सरदार येऊन काम केलें. याचप्रकारें खालसा सोडावायाचा जिंमाहि राव दामोदरपंताचा आहे. व वजिरुनमुमालिकाची एकनिष्ठतेवरच चित्त असावें, हाहि जिंमा राव दामोदरपंताचा आहे. अकबराबाद ह्मटल्यास मजला हें कळलें नवतें जे, या सुभ्यावरी दृष्टी वजिरुन. मुमालिकास असेल, त्यासी बाविसा सुभ्यांचा यख्त्यार वनिरुनमुमालिकांचा आहे, तेथें हा सुभा बिसाद काय ? परंतु पहिल्यापासून मर्यादा + + + + + पातशाहा जाद्याचें नाव जाहा + + + + रिचा शब्द कोण्ही आरकानतो + + + + + नाहींत. व पातशाहांहीं काढी + + + + + हेहि वजिरुनमुमालिकाचे कामाकरितां रजपुतास बंदगींत आणून फौज संगीन तयार करविली. या रीतीनें सांगून, मसलहत करून, जवाब देऊं ह्मणाले, जें कांहीं उत्तर होईल तें लिहून पाठवूं. मग दुसरे पत्राचा मजकूर करूं. तुह्मांस कळावेंनिमित्य लिहिलें असे. मागाहून नवाब बहादुराचें पत्र तुमचें नावें पाठवूं तेवढें मुफसल लिहूं. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५०९ ]
न यावें तर त्यास अबदालीची ताकीद कीं, सत्वर स्वामीचे सेवेसी जाणें. यास्तव त्यास येथेंच लावून ठेवून त्याचा एक भला माणूस घेऊन रा॥ मल्हारजी होळकर सुबेदार याजकडे जाऊन. सो। स्वामिदर्शणास पांच वर्शें नाली; एकदां दर्शन घ्यावें. येथें ती॥ राजश्री बापूजी माहादेवासी आज्ञा येती तेव्हां याकुबअलीखानासी घेऊन सेवेसी येते. येथून येक मजल मथुरेकडे निघालों इत्कियांत रा। मल्हारजीबावाची खबर आली कीं, फिरोन स्वामीचे सेवेस गेले. मार्ग दुस्तर जाला. यास्तव, लाइलाज राहिलों. तों शाहाची पत्रें वरचेवर आली की, सत्वर येणें. तिकडेहि न जावें तर इकडील हिंदुस्थानी पातशाहासुद्धां बेइमान जाले. त्याजकडे गेल्यानें त्यासी व स्वामीसी एकोपियाची शोहरत होईल; व बेइमान बेइमानी करणार नाहींत; व स्वामींनी या पातशाहास पातशाहा केलें असतां बदानियेत जाली; येविशईंही तिकडून बनलें तर, ते आपले करावे; व तेहि बोलावितात. काय मानस ? व किती फौज ? व काय विचार ? तो मनास आणून सेवेसी यावयासी रवाना जालों ते शामलीस पावलें. पुढेंहि श्रीस्वामीचे प्रतापें जातों. कृपा करून शाहास ; व अश्रफुल्उजरा शाहावलीखान यांसी पत्रें शिष्टाचाराची पाठविणार स्वामी समर्थ आहेत ! सुरक्षित हजुर येऊन स्वामी साहेबांचे दर्शन श्रीकृपेनें घेऊं तो सुदीन ! खर्चावेंचाविशई विनंति लिहिली ते मान्य करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति. + +
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५०८ ]
श्री.
० श्री ँ
राजा शाहूनरपति हर्ष
निधान, बाळाजी बाजीराव
प्रधान.
राजश्री सटवोजी जाधवराव गोसावी यासी:--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। सदाशिव चिमणाजी आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिवणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. बेरडाविसीं गावास मसाला केला आहे. ऐशास, गांवांत बेरड वावगा नाहीं; दाहाजण दरवाजापाशी आहेत ते चाकर आहेत; नानाची चिटी पाठवावी; ह्मणून लिहिलें. त्यास, तमाम मुलुकाचे बेरड आणविले आहेत. याकरितां तुह्मीं चौघे बेरड दरवाजावर ठेवणें. साहाजण बेरड व मांग पत्रदर्शनी पाठविणें. जाणिजे. छ ६ रावल. * बहुत काय लिहिणें? वतनदार आहेत. आपले नि॥ मसाला देतील. त्यापासून देवणें. छ मा।र वडकीचे बेरड चोरी. वर सापडले. सर्वां बेरडांस चोर्या ठावूक. जागाजागां बाहेरील चोर, व देसचेहि करितात. त्यांचे पुर्ते पारपात्य बंदोबस्त केला पाहिजे, असें आहे. तरी पाठवून देणें. जाणिजे. छ मजकुर.
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५०७ ]
श्री.
विनंति उपरि. काल संध्याकालपर्यंत जाहला मजकुर, सविस्तर, राजश्री गोविंदपंत तात्या पोंहचल्यावरी, अवगत जाहलाच असेल. जी याद नानासाहेबांजवळून कबूल करून घ्यावयासाठी कलमवार लिहून ठेविली होती, तिजवर नानासाहेबांचे दादासाहेबांचें बोलणें होऊन रात्रीस कबूल करून घेतले. गोपाळराव यांचे मजकुरासी मात्र मळमळीत आहे. आजी प्रातःकाळीं प्रहर दिवसाउपरि थोरले श्रीमंत बागांत सैर करावयास गेले. दादासाहेबी सारे हुजुरचे मुत्सद्दियांस बोलावून ताकीद केलीः-- मजला कळल्याखेरीज कांहीं न करावें. पवारांची व सिंद्यांची जप्ती उठविली; पत्रें दिल्हीं, जिवाबाई सिंदी यांचे कारभारियास बोलाव पाठविलें आहे. याउपरि रंग काय पडतो ? कारभार कसा होतो ? तो सर्व दिसेल मजकुर तसा लेहून पाठवूं. बहुत काय लिहिणें ! हे विनंति. रवाना बुधवार दोन प्रहर दिवस.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५०५ ]
वार्ता सर्वामुखीं जाली आहे. त्यास, हे वार्ता यथार्थ जाली तर, बहुत अनुचित गोष्ट जाली. तेव्हां चहूंकडून पळाळे, पळाले, ह्मणून एकत्र शहोरत जालिया, पठाणाच्या दहशतीनें ठाणीं आसपासचीं राहणें कठीण होतील. आणि वजिर अजम सर्व प्रकारें बुडाला हें जाणावें. त्यास, तुह्मी उभयतां सरदारांस सांगावें जे, ज्याचा पक्ष करावा तो शेवट करून दाखवावा. तुह्मी मात्र अकबराबादपर्यंत येऊन, सलुखाचाच पैगाम पठाणास करून, उभयतांचें सौख्य करून यश संपादावें. येथून पाहिजे तैसी सार्वभौमाची पोख्तगी करून घेतों.
तो विचार सुभेदारास येऊन लागला त्याचा निकाल तुह्मी करून घेणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.
चिरंजीव नानास आशीर्वाद उपरि. लि॥ परिसीजे. हे आशीर्वाद.
राजश्री त्रिंबकपंत व गोविंदराव यांस नमस्कार. सो। गिरमाजी मुकुंद कृतानेक सा। नमस्कार विनंति उपरि. लिहिलें परिसोन कृपा कीजे हे विनंति.