[ ५२४ ]
श्री.
पो छ ८ मोहरम.
भेटल्यानें व शिपाई लोकांची तलब न दिधल्या, फितूर दोहीकडे वेडावांकडाच जाला आहे; तो कोठवर लिहावा ? सत्वर येऊन पाहावा तरच उत्तम. आह्मांस मीरबक्ष बोलावितो. त्याचे बोलावण्याकरिता जावें. परंतु कांहीं चव व जीव राहिला नाहीं. एकमूठ असते तर, आपले हातीं कबज राहता ? तें होईल तो सुदिन ! मुख्य इत्की मेहनत करून शेवटी खाविंदहि समयास न आले. व आह्मांस वृथा क्लेश ! घोडियांस दाणाही घरीं नाहीं; तो विस्तार कोठवर लिहावा ? येथें श्रीमंत दादासाहेबांकडून पन्नास हजार पाचाशाःची हुंडी घेऊन वरातदार फर्माशी घोडे २५ घ्यावयास आले आहेत. येथें घोडे मिळते, तर आह्मी दादासाहेबांसाठी न घेतों ? श्रीमंत नानासाहेबांची फर्मायश पाचा घोडियांची, तिहि सरंजाम एकहिं न जाला. कां कीं, या दिवसांत कारवान येत नाहीं व जेथें जेथें घोडे होतात तेथें माणूस पोहोचूं सकत नाहीं. ऐसेंहि असतां गणेशपंत दि॥ विठ्ठल शिवदेव व रुपये मकुजराची वरात घेउन आले आहेत. त्यास पांचशे रुपये आज्ञेप्रों। खर्चास दिधले. पन्नास हजाराच्या वस्ता पाहाविया तेव्हां रुपये द्यावे, कीं ते जाणोत, भक्षोत, अथवा जें इच्छतील तें करोत, — रुपये त्यांचे हवाला करावे. ज्याप्रों। श्रीमंतीचा आज्ञा येईल त्याप्रों। करुं. रुपये द्यावयाची आज्ञा आली तर--- पूर्वी अंताजीपंतासाठी अडीच तीन लाख रुपये कर्ज घेतलें -- या रुपयांसाठीहि खुद गाहाण होऊन जितके सरंजाम होतील तितके त्यांचे हवाला करुं. काय आज्ञा ते घेऊन त्याचे नांवें पत्र पाठवावें. दुसरें :- श्रीमंत नानासाहेबीं साडेच्यार लाख रुपये घ्यावयाची वरात अंताजी माणकेश्वरास द्यावयास पाठविली आहे; ते कोठून कोणते ऐवजीं वरात अदा करावी ? तिसरें:- पांच लाखा रुपयांचा मजकूर वडिलीं लिहिला. त्यास जे समयीं अंताजीपंत दिल्लीस आले नवते, ते समयीं खानखानास आह्मी मिळवून घेऊन, तुझे विजारतचे मुकदमियांत आह्मी मदतगार ह्मणून पाचा लाखाची फर्द दसखत करून घेतले. अंताजीपंत आलियावर हे वृत्त त्यांजला सांगितले; हें त्यांजलाच शफतपूर्वक पुसावें. नगद आमचे हवाला पातशाहापासून घेऊन केले असतील तर, आमचें घर जप्त करणें. जर त्यांनी फर्दहि दसखत करविली नसली तर, त्याजपासून जें चित्तास येईल तें घेणें; अथवा, आह्मांस तर्ही सत्य राखणें. या दिवसांत खानखानाचे फर्द दसखतीसहि लटकी आहे, ह्मणून ह्मणतों. आणि खानखानानें जलालुदिखानाचे ह