[ ५३२ ]
श्री. पौ। छ ३० रबिलाखर.
श्रीमंत राजश्री उभयतां स्वामींचे सेवेसीः--
सेवक नरहर शामराज साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम जाणोन स्वामींनी आपले स्वानंद-लेखन-आज्ञा केली पाहिजे. विशेष. आपण आज्ञापत्र पा। कीं, रा० धोंडो दत्तात्रय याजपासून दीडशें दोनशें राऊत घेऊन रा० मामांकडे पाठवून देणें. त्यासी, आपलें पत्र त्यासी प्रविष्ट करून त्याचें उत्तर आलें कीं, राऊत रिकामे नाहींत, रा० गोविंदपंत यमुना उतरून अलीकडे आले आहेत, त्यासी आणावयासी राऊत गेले आहेत, ते इकडे आलियावर राऊतांची तजवीज केली जाईल. दुसरें आह्मांस आज्ञा होईल तर, सेवेसी भेटीस येऊन. भेटीअंती सकल वृत्त निवेदन केलें जाईल. स्वामी इकडे श्री भागीरथी उतरोन कोणे दिवशीं आगमन होईल ? तें आज्ञापत्रीं लेखन केलें पाहिजे. नावाडी यांसी ताकीद करून राजघाटावर आणविल्या आहेत. सेवेसी कळावें. छ २९ रोजी येथून तरकार व पानें वगैरे गुलाबी शिसे २ पाठविले आहेत ते पावले असतील. रा० धोंडोपंती पत्र लेहलें आहे तें सेवेसीं लाखोटा पाठविलें असे. हल्ली छ मा। तरकारी वगैरे फुलें गुलाबाची सेवेसी पाठविले असेत. प्रविष्ट होतील. बहुत काय लिहिणें ? कृपा असो दीजे. हे विज्ञप्ति.