[ ५२९ ]
श्री.
राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसीः--
विनंति उपरि. चांदखान बेपारी यानें येऊन विदित केलें कीं तुह्मांकडील सिवरामपंत यानें च्याळीस कोडी कापड लुटोन नेलें. त्यापैकी च्यार कोडी फिरोन दिल्ही बाकी. कोडी छतीस ठेविल्या ? त्यास, रयेत लुटोन ऐसी बदमामली केली. तेव्हां आमच्या प्रगणियाची अबादी कैसी होईल ऐसी बजीद गोष्ट आह्मांस कार्यास येणार नाहीं. सिवरामपंताची अबरु राखणें असिली तरी बेपारी मजकुराचें कापड झाडियांनसी देऊन त्याचा राजीनामा पाठऊन देणें. कापड याचें यासी देणें. जरी कापड नसिलें तरी त्याचे मालाचे रुपये तीन हजार करार आहेत त्याप्रमाणें ता हजाराची याची निशा करवणें. येणेंप्रमाणे पंत मशारनिलेस ताकीद करून विल्हेस लाववणें. अनमान जालिया पंतमशारनिलेवर येथून स्वार येतील. समक्ष आणून विल्हेस लाविलें जाईल. बोभाट जालिया परिणाम शुध होणार नाही. असें जाणून वर्तणूक करणें. छ १७ जिलकाद. हे विनंति.
मोर्तब
सुद