लेखांक ३०३
श्रीराम
नकल
यादि स्मरणार्थ दादाजी नरसी प्रभु देशकुलकर्णी व गावकुलकर्णी ता। रोहिडखोरे हे आपले वतन अनभवित असता अबरंगजेब पातशाहा याची मसलत दक्षण प्राती जाली विजापूर भागानगर हस्तगत करून राजश्री स्वामीच्या राज्यावरी चालून घेतले ते समई मुलकामधे राजिकाचा उपद्रव फार जाला मुलकास हि दहशत बहुत पडोन परागंदा होऊन परमुलकास गेले मुलुक खराबा होऊन पडिला ते वख्ती दादाजी नरसी याणे आपले वतन सोडून मुले माणसे घेऊन परागदा होऊन परमुलकास जाऊन वख्त गुजराण करित असता मोगलाची धामधुम फार जाली जुलपुकारखान रायगडास येऊन रागड हस्तगत केला ते प्रसंगी राजश्री स्वामी स्वार होऊन कर्नाटक प्रांतास गेले ते प्राती राजश्री रामचंद्रपंत अमात्य व राजश्री शंकराजी नारायण सचिव यासि ठेविले ऐसियासि राजश्री स्वामी चंदीचे मुकामी असता राजश्री शंकराजी नारायण सचिव याणी विनतीपत्र पाठविले जे ता। रोहिडखोरे येथील देशकुलकर्णी होता त्याचा निरवश जाला वतन चालवावयासी कोण्ही नाही स्वामीनी कृपाळु होऊन सेवकास वतन मर्हामत केले पाहिजे त्याचे लिहिलियावरून मनास आणिता स्वामि कृपाळु होऊन वतनाचा कागद करून दिल्हा त्यापासोन राजश्री शकराजी नारायण ता। रोहिडखोरे येथील देशकुलकर्णी चालवित आहेत ऐसियासि दादाजी नरसी प्रभु परागदा होऊन परमुलाकस कालक्षेप करीत आहेत दादाजी प्रभुचे पुत्र कृष्णाजी व येसाजी प्रभु आहेत