Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५६० ]
श्री.
पौ। छ २ माहे सफर.
राजश्री बापूजी माहादेव व राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासी :-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणऊन स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें छ १ + + + रोजी पावोन भावार्थ कळों आला. + + + दिल्लीकडील अमिराचें वृत्त * + + + +
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५५९ ]
श्री.
राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासीः--
उपरि. तुह्मी छकडे भरून सामान पाठविलें तें:-
गवत पुले सुमार
वगैरे
१८१५ गवत पुले. सुंब मोळाचें
३९८ वेसु. वजन पक्कें
--------- ॥८
२२१३
एकूण सुमारें बेवीससे तेरा वा। सत्तावीस शेर जमा असे. जाणिजे. छ ३ सवाल.
------------
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५५८ ]
श्री.
राजश्री दामोदर माहादेऊ गोसावी यासी :--
राजश्री दामोदर माहादेऊ गोसावी यासी:----
स्नो मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि. येथून जातेसमयीं नवाब समसामदौला आह्मांसी बोलून गेले की, शहरांत जाऊन राजश्री सेटीबाकडील घोडी पाठवून देतों. त्यावरून चारही हत्ती त्यांचे स्वाधीन केले. त्यासी, तुह्मी वजिरास व समसामदौला यासी बहुत प्रकारें सांगणें. घोडीं राजश्री बापूजी त्र्यंबक यांचे स्वाधीन करून पाठवून देतील. पातशाहाकडील घोडे दोन आले होते. ते डसरे, एक दोन माणसें जाया केली. आमचे कार्याचे नाहीत. याजकरितां फिरोन पाठविले असत. त्यांचे स्वाधीन करणें. रा॥ छ ७ रबिलावल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
( मोर्तबसुद )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५५७ ]
श्री.
पौ। छ २४ रबिलावल.
राजश्री दामोदर माहादेऊ गोसावी यासीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपर येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणें. विशेष. पत्र पाठविलें प्रविष्ट जालें. लिहिलें कीं, श्रीमंत राजश्री दादा गणमुक्तेश्वराकडे गेले; आणि आपण रेवडी प्रांतें मुकाम केले; आणि आपली फौज खानखानाचे कार्याकरितां यथें आली; याजमुळें, वजीर पैका द्यावयासी गईगुदर करितात, ह्मणोन तपशीलें लिहिलें. ऐसियासी, श्रीमंत गणमुक्तेश्वरास गेले, त्या मजकुरांत तुह्मीच होतां. खानखानास लाहोरास पोहोचविण्याकरितां फौज द्यावी, या इत्यर्थांत तुह्मीच आहां. त्याजला लाहोरास पोचावयासी तुह्मीच आहां. हे सर्व मजकूर तुमच्याच विद्यमानाचे आहेत. वजीर पैका देतीलच. ते अनमान करितील, तरी तुह्मीच त्याजकडून देवाल, येअर्थी संदेह नाहीं. आह्माकडील मजकूर तरी आह्मी कूच करून पुढें जात असों. आमचे मुकामाची येथें कांहीं गुंता नाहीं. सत्वरीच कूच करून जात असों. वजिरांनी आमचा पैका न द्यावासा काय आहे ? तुह्मांवेगळा मजकूर कोणता जाला आहे ? सर्व कारभार तुमचेच विद्यमानाचा आहे. वजिरास ताकीद करून, ऐवज येसा तुह्मीच कराल. येविसीं सर्वप्रकारें तुमचा भरवसा आहे. रा। छ २२ रा।वल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. ( मोर्तबसूद )
श्रीह्माळसाकांत चरणीं तत्पर
खंडोजीसुत ह्मल्हारजी होळकर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५५६ ]
श्री. पौ छ ९ रा॥खर सोमवार अडीच-
प्रहर दिवस चढल्यावर लष्करांत
पावलें.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा याप्रति बापू माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ ६ माहे रा।वल मुकाम इंद्रप्रस्थ जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष. पेशजी तुह्मांस अजुरदार जोडीसमागमें साकल्य वृत्त लिहून पाठविलें असे, त्याजवरून सर्व ध्यानास येईल. सांप्रत वर्तमान तरः तुमच्या पत्राच्या रसरंगावरून सार्वभौमादिक मंडळी बहुत खुष जाली; आणि निजामनमुलुक यांनी आपल्या स्वहस्तें अफरीतहशीनचा शुका तुह्मांस पाठविला असे. व सैद लष्करखानास लिहिलें आहे कीं, राव दामोधर माहादेव जें तुह्मांस सांगतील, त्याजप्रों। कर्तव्यार्थ तो करणें. ह्मणून लिहिले आहे. त्यास, तुह्मी खंडोबास सैद लष्करखानाकडे सत्वर मार्गस्त करावें. फर्मान वगैरे पत्रें श्रीमंत आदिकरून तयार करून पाठवितों. हजरत् जिलसुभाजी यांणी आज्ञा केली जे, तुमचा कौल अहदांत पांच हजार स्वार रिकाबसाहा देत असावे; आणीख लागतील त्यांत अर्धा रुपया रोजीना देत जावा. त्यासी, ते गोष्टी स्मरण धरून बाळाजीराव दो महिन्यांसाठी पांच हजार स्वारानसी दामोदरपंत हजुर येऊन, निजामन्मुलुकाचे हमराह देत तर आह्मी जाऊन. सत्यवचनीं व पुढें जें काम घेणें तें शिवाय पंतप्रधानाच्या होणार नाहीं. न आले तर, आमचा शब्द मात्र लागेल. त्यासी निजामनमलुक तरी येथें पांच हजार स्वार आला, तर रोजिनाही देतील. त्यासी, श्रीमंत स्वामीस लिहून पांच हजार स्वार तुह्मासमागमें येत तें करणें. तुह्मी ह्मणाल, मल्हारबा देतील. त्यांजला हितोपदेशी राजामलजीस, राणबास, होते, त्याप्रमाणें आहे. त्याहिमधें आलियास, पठाण, व मल्हारबा, व सुरजमलजी, व वजीर, अवघे एकवट जाले तरी पठाण जुंज घेतल्याखेरीज राहत नाहीं. हे चांडाळचौकडी मल्हारबास मारविल्याखेरीज राहात नाहीं ! आधीं तर रजपूत या प्रकारचे पाठी लागले आहेत जे, दक्षिणी होय, ऐसा पाहिल्यास मारूनच टाकितात ! - बोलावून मारतात, कौल देऊन मारतात, मेजमानीस बोलावून मारितात ! या प्रकारचा त्यांचा विचार !!! तिकडून पठाण प्राणच घेतील किंवा देतील ! मल्हारबा ह्मणतात, " मजला हें करणें अथवा हरद्वारास जाऊन गोसावी होणें !" त्यासी, ऐशा समयांत आलियावर - याच राड्यांत पडिल्यावर – ना निजामन्मुलुकाचें काम होय, ना आपला लौकिक होय. याकरितां क्रोड कामें एकीकडे; आणि एक निजामन्मुलुकाप्त नेऊन, सुबेदारीवर बसवून अवघी दक्षण गांडीमागें लावून घेणें यापेक्षां दुसरा विचार थोर नाहीं. हें तों कर्तव्य; परंतु मल्हारबा आह्मांसी खुनस राखितो तर्ही, इतका तरी भ्रम आहे जे, आह्मांसी मल्हारबासी ऋणानुबंध नाहीं, दादांसी तर्ही आहे. त्यासी, तो भ्रमहि जात राहिला; आणि हा पुरताच दुशमन जाला तर संकष्ट ! त्यासी, फौज मल्हारबा जवळून तुह्मांबरोबर येईल, ऐसें असिलें तर मल्हारबाजवळ यावें; नाही तरी यावें, आणि यापासूनच खंडेरायासी घ्यावें; अथवा कोण्ही पथकच हजारा दो हजारासी घ्यावें. मल्हारबाचे गांव इनाम जे असतील ते करून देऊं. सर्व प्रकारें पा + + + नी त्यांचें राहेत तें करूं यांत श्रीमंतस्वामीचें घर, खाविंदाचे तर आपलें पहिलें घर. त्यासी, या दुष्टांही त्यास आग्रहांत पाहून मारूंच ह्मणतात ! यास उपायहि तुह्मीं आलियावर होईल. तुह्मी लौकर याल, आणि ईश्वरें पठाणाचें सलुखाचें यश दिधलें तर, चिरंजीव नानास तिकडे पाठवीन. परंतु येथें आधीं फौज दोन हजार तर्ही पातशाहाचे आज्ञेप्रो। फौज आणिली पाहिजे. आणि श्रीमंत स्वामीचें फुकाचें यश होते. निजामन्मुलुकाचें साहित्य करणें ते गोथा श्रीमंत स्वामीचें साहित्य कैसे ह्मटल्यास ? बावीस सुभ्यावर हुकूम श्रीमंताचा राहतो. त्यासी हुकुमानेच जो मुलुक मिळणें तो मिळतो; आणि जो निघणें तो निघतो. त्यासी तो हुकूम श्रीमंत स्वामींच्या हातीं बाबिसा सुभ्यावर आहे. त्यांत अंतर ह्मटल्यास सुमेदारांहीं घेऊन पाडिलें; फलाणी यांणी सांभाळिले ऐसें ह्मणतील; याच गोष्टीकरितां वजीर, बक्षी, दुसरे, तिसरे, कोणाचे लालुचीवर दृष्टी न दिधली. आणि रजपूत, दुसरे, तिसरे सर्व हातचे देऊन नवल-रायाचाच न्याय केला असतां सर्व श्रीमंत स्वामीचे हाती ठेविलें. मुख्तार होऊन आजचे श्रीमंत स्वामीसी अटकेपासून तों श्वेतबंधरामेश्वरपर्यंत ज्यांनीं शत्रुत्व केलें असतां, अद्यापपर्यंत सर्वांस मित्रत्व तरी ठेविलें आहे. आपला खाविंद साक्षात् सीतारामअवतार आहे ! श्री याजहून विशेष उर्जित करो !! हिंदुस्थानच्या पातशाहाजवळी त्यांचा याख्तियार येथपर्यंत जे चित्तीस येईल त्यासी हिंदुस्थानचें राज्य द्या, चित्तास येईल त्यासी दक्षण द्या ! ज्याच्या लिहिल्यावर सुभेदार्या राज्य घेतात, त्यांचीच लिहिलीं खिलअत सर्व खाविंदास देतो. खाविंद कांहींच न करीत यासी काय करावें ? करिताते त्याचे बरखिलापखामच्या करितात. पातशाहाचा फर्मान गेला आहे जे, तुमचे खातरदास्त हिंदुस्थानचें राज्य माधोसिंगास केलें; अतः पर माघारें जा. तेवढ्यावर पातशाहासहि वेडेंवाकडें बोलूं लागले. रजपूत जमलेच आहेत. आणि घर कछवाहाचें यांचे वडिलांहीं हिंदुस्थान संपादून दिधलें. त्यासी बिघडून ज्यांनीं हुशमन दक्षिणी मात्रासी केलें ; रावराजे दलेलसिंगास थोरल्या बाईहीं ह्मणजे मातुश्री राधाबाईहीं सवाईजयसिंगाची कन्या मांडीवर घेऊन राज्य दिधलें; जे, माझे वंशीचा जो कोण्ही असेल ते तुमचे राज्याकडे पाहणार नाही. त्याचे पन्नास हजार, बाईची भेटी ह्मणून देत होत. बायही येऊन पाटणहि घेतली. बरें ! तेंहि जाहालें तरी जाहालें. राज्यच काढून वर्णशंकरास देऊन राजाधिराज राण राठोडहाडे यासी 'जात सोडा' ह्मणतात, ते कैसें सोडतील ? घरांत राज्य ठेविल्यास असो. हे कजियाहि करणार नाहीत. पातशाहांनी ज्यास रावराजे केलें असेल, तोच आहे व होईल. त्या लेकराचे घरांतून बायका धर धरून लुगड्या देखील झाडा घेतला, काय काय अपराध केले ! जे जे सफदरजंगास सर्वांहीं दुशमन ह्मणून लुचे आहेत तरी धाडेच टाकूं लागले; तैसें मर्हाट्यांसी रांडांहीं चहूकडे मारिलें. कांहीं गोविंदरायाचे तहखान्यांत लपाले. कैद होते ते सोडविले. गोविंदरायांनीं फरास सोडवून जे जखमी होते त्यांच्या जखमा बांधून, मारिले गेले त्यांच्या लोथा पाठविल्या. सुभेदाराचा जावाई, जयापाचें माणूस, फार मारलें गेलें. त्यासी तुह्मी आलियानें पठाणाचेंहि यश येऊन, मल्हारबाची अबरू राहून, खाविंदकाम होऊन, हेंहि यश येतें. दिवस गत लागलिया ईश्वर न करो. मल्हारबाच हातचा जाऊन श्रीमंतास किस्त होते. त्यासी पैख़ी तो ऐसी जाहाली जे, श्रीमंत स्वामीस कंमत पाहिजेत. पाहिजे तैसा बोलबालाच आहे. परंतु मल्हारबासारिखा सरदार राहतो. नाहींतर चांडाळचौकडी माखीलसें दिसतें. दुमजला करून सुभेदाराजवळी येणें. रा॥ जयापाचें पत्र आलें जें, ' तुह्मी ताबडतोब या.' त्यासी, खाविंदाजवळी असिल्यावर पाठवितील तेव्हां यावें, हे पाठवितील तेव्हां जावें, ऐसे असतां, खामखा उगेंच उठोन चालेन ह्मटल्यास चिरंजीव नाना टिका घेऊन गेला असतां येऊं देत नाहीत. जे, मल्हाररायाचे खातरदास्त टिका ह्मटला तेव्हां, टिकाच आह्मास घेणें नाहीं, वजिराचें भलें माणूस तरी मारूनच टाकूं. इकडे तर रांडा देखील शेर मर्हाट्यांवर जाल्या आहेत. दिल्लींत कांहीं फजिती लिहिता पुरवत नाहीं ! अहोरात्र हेच चिंता लागली आहे जे, मल्हारबास तो अहोरात्र वजिराचें साहित्य करूं हें आहे. फसल्यावरी काय करावें ? हे चिंता आह्मास. त्यास वाटतें, आमचे मनसबे सेवटास जाऊं देत नाहींत. सफदरजंगांनीं पंजहजारीची जागीर कबूल करून ह्मणाला जे, मल्हारबास मोहांत पाडून, आणि त्यासी निमकहरामी करून, खाविंदास पृथ्वीचे शत्रु करून. आपणहि दुनियांतून व ईश्वरापासून जाणें असतें तर, आपल्याच लोभावरी दृष्ट देतो. त्यासी, खाविंद चाकरीवर आहों; पातशाहास राखिलें आहे ; दक्षणहिंदुस्थान आजिपर्यंत श्रीमंत स्वामीचा प्रताप सूर्यासारिखा तपतो. त्यास, ते ज्याच्या मस्तकावर हात ठिवतील तो करील. पातशाहा बोलता तरी त्यासी बोलतात, करितात तरी त्याची खातर करितात. आपण नौकर. नौकरचे अर्थ नइकर. त्यासी, आपण नित्य नई करीत जावी. जें बनून येईल तें खाविंदाचे, बिघडलें तें खाविंदाचे ऐसें सर्व प्रकारें अहोरात्र सेवा करीत असतां, चाकरीवर बाद गुनालाजीम करून, रांगड्यांत मन माने तें बोलून आपल्या मुख्तारपणास डाग लावितात. असो ! आह्मी त्यांची लेकरें, ते वडील आहेत; विहित जाणतील तें करितील. आपण खाविंदाचे चाकर आहों, सांगतील चाकरी करूं. आपल्या तीर्थी बसुन भटपणहि करूं तर अश्लाघ्य नाही. परंतु फारच आह्मांस येसमय गांजिलें. तें ईश्वर जाणे ! एकता त्या मनुष्यसमागमें घर फिरलें तर घराचे वासे देखील फिरलेसे वाटतात. कोण्ही ह्मणतात, कारकून येत होता तो आह्मी महकूफ केला. कोण्ही ह्मणतात, बाबूरायासी पाठवितो, बाबुरायाचा बाप ठेवितो. कोण्ही भोसडीचा येईना का ! ! ! कांहीं खाविंदाचें खालें असेल तर दबूं ! कांहीं चाकरीत अंतर केलें असलें तर दबूं ! जाटांचे माणसास बोलावून, एकांत लोकांत करून, तकीर लटकीच करा ह्मणत पातशाहास लिहितात जे, हे आमचे ज्यानीं दुशमन आहेत, यांसी काढा, नाहीं तरी आह्मी मरूं किंवा मारू. ते कागदावर मुततहि नाहीत. त्यासी, खाविंदाची खातर किंवा चाकराची खातर. ऐसेंहि असतां, मल्हारबा येऊन वकालत करीत असतील तर, यापेक्षां काय विशेष आहे ? परंतु जीवच घेऊं ह्मणतात. त्यासी, तुह्मी आलियानें काय होईल तें होवो ! मी तर बेजार जालों आहे ! एखादे तीर्थी बसावे; अथवा हा सुभेदार येतो या बराबर जावें ! तुह्मी येथें राहावें. त्यासी, आमचें सुभेदारास विषम वाटून, पठाणास मारून, फेरोजंगास अडवें जहालें तर, अखेर दुसरे तिसरे माळव्यांत येऊन जुंज घेतील यांत संदेह नाही. जर श्रीमंत स्वामीस हिंदुस्थान आपल्याकडे राखणें आहे, तर नर्मदेजवळी यावें. आजी पांच हजार स्वार दिल्लीस आला तर, श्रीमंत स्वामीची रक्षण आहे. चित्तास येईल बरें करोत वाइट करोत ! नाहीं तरी आपल्या मजबुतीनें तर अलबते येईल, त्यासी तरी हा भर्वसा आहे जे, पटाचें काम श्रीमंत माझे करून, पुढें पातशाहाची मरकुनखातर करितील. त्यासी, दोन हजार स्वारहि न आले, तर स्वरूपच जाईल ! याकरिता, जें लिहिणें तें श्रीमंत स्वामीस लिहिणें. नाहींतर लाख दोन लाखाचें कर्जहि करा. परंतु हजारा दो हज़ारानशी या. येविशीं श्रीमंत स्वामीस ताबडतोब लिहून पाठवा. आणि तुह्मी दुमजला करीत मल्हारबास भेटून फौज कांहीं तरी घेऊन या. मल्हारबांही फौज दिधली तर, निजामन्मुलुक मल्हारबाचा येहसानमंद जाहाला. त्यासी, खाविंदासी व तीर्थरूपास लिहून पाठवणें. तुह्मी ताबडतोब येणें. दोन हजार स्वार व सैदलष्करखानासारखाच दुसरा कोण्ही उमदा जैनगराजवळी तर्ही मुलाजमत करी, ऐसे रीतीनें येणें जाल्यास आपुण गोथा हिंदुस्थानास आलों तरी हें काम केलेंत लौकिक होईल. त्यासी, ज्या रीतीनें होईल व सद्यश पदरीं पडे तें करणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद. सैदलष्करखानास पत्र आपल्या हातचें, व तुह्मांस तसे सिआफरीचें पाठविलें. तें घेऊन ताबडतोब सैदलष्कर खानाकडे बंडो त्रिंबकास पाठवणें. आणि हें पत्र लि॥ पाठवणें जे, पांच हजार फौज न्यावी लागते त्याचा तनखाव हा तुह्मांवरी येईल व तुह्मी आपला उमदा सरदार ज्याचें नाव प्रसिद्ध गोथा तुह्मीच ऐसा तयार करून ताबडतोब पाठवणें. त्याप्रो। लिहून त्याचा मातबर आपली फौज घेऊन येणें, सलह आहे. त्यासी, जे उत्तम मसलहत असेल तें करणें. बहुत काय लिहिणें ! हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५५५ ]
छ ११ रजब
क सरावियासी आपण राहून पुढें कोन पाठविनार ? ऐसी तजवीज आहे. तुह्मी तिकडोन अवलियाखानाची रवानगी केली, ह्मणून लि॥ आहे. तरी तोहि गेलाच आहे. श्रीसत्तेनें सर्व गोष्टी उत्तमच होतील. तुह्मीं पुढें जावयाचा मजकूर हरमीज न करावा. मातुश्रीचा दुराग्रह यात्रेचा बहुत; यास्तव पाठविली आहेत. यात्रा करवून तुह्मींहि समागमेंच अविलंबे यावें. जर वजिरास तेथें खर्चावेंयाची अथवा रिसालियांचे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३०५
श्री
राजश्री वाकाजी पवार गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रीा फतिसिंग भोसले राम राम सु॥ इसन्ने सलासीन मया अलफ तुह्मी पत्र पाठविले पावोन वर्तमान विदित जाले तरी तुह्मी स्वार व करोल घेऊन भेटीस येणे करोल स्वार पाहून विले केली जाईल जाणिजे छ ११ जमादिलाखर बहुत काय लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५५४ ]
श्री.
पो। छ ८
वर्तमान ये घडीपावेतों जालें तें तुह्मांस कळावें याजकीरतां सविस्तर लिहिलें असे. वरकड जयपुराकडून गडा आल्या ह्मणोन लिहिलें होतें. त्यासी, त्या सर्व मिथ्या ! आह्मांकडील मंडळी सर्व कुशाल आहेत. कांहीं घोडी माणसें जखमी जालीं. नागी कोणही जाया नाहींत. ईश्वर इच्छेने सर्व आनंदरूप आहेत. तुह्मी पठाणाकडील व सर्व इतस्तता वर्तमान व पुढें कर्तव्यार्थ जो मनसबा असेल, तो तत्वतां वरचेवर लिहित जाणें. बहुत काय लिहिणें ? छ २५ साबान. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५५३ ]
श्री.
गडकरी यांणी राजश्री खलबतखानियांत आणिलें. त्या दिवशी आईसाहेबांनी तिसरे प्रहरपर्यंत उपवास केला. आपाजी बाबूरावहि वरता गेला होता. हेहि मध्यस्थींत होते. निदान राजश्रीच्यानें निराळा फड करावयाचें अवसान न होय. राजश्री जाऊन मातुश्रीचे पायांवर डोई ठेविली. भोजन पंक्तीस केलें. पुराणकास काढावा (हें) सुप्रयुक्त होईल तर बरें नाहीं तर जबरदस्तीनें करावें, असेंहि गडकरी बोलत. परंतु राजश्री नेटून सांगत नाही. जर असें केलें तर ह्मातारीजीस खंतु लागेल ह्मणून भितात; यास काय करावें ? गडकरी यास रोजमरा द्यावयास ह्मणोन पंधरा वीस हजार रुपये अंत्यस्तें राजश्रींनी आपलें खासगत पोतें जगनाथ ह्मणून पानगावकर आहे त्याजकडील पाहाटेचे न कळत घेऊन गडावर गेले आहेत. राजश्रीची प्रकृत स्वामीस विदितच आहे. लागी माणूस जवळ नाहीं, जें भलती एक नेटून करवील. ऐसियास, खालून मातबर पांच सात वरतें घ्यावे; राजश्रीस राजश्रींप्रमाणें नेट द्यावे; आईसाहेबास आईसाहेवाप्रमाणें दमदार करावी; आणि स्वामीचे लक्षाप्रमाणें यांनी मनसबा सिद्धीस न्यावा; पुरणकांनी जीवभय घेतलें आहे. त्याजमुळे आईसाहेबही निकर्ष करणार. त्यांचें भय तूर्त वारावें. हरकसें करून राबत्याखाले घालून खाली आणावी असा विचार केला आहे. आईसाहेबांनी स्वामीसहि आणखी एक पत्र पाठविलें आहे; त्यांत काय मजकूर लिहिला आहे न कळे ! त्याचें उत्तर आलियावर, काय करणें तें करूं ह्मणतात. मग पत्र लिहिलें आहे खरें किंवा उगाच बाहना करून दिवसगतीवर घालतात न कळे ! आईसाहेबांसी लटकेलाडें हरप्रकारें बोलोन हात गुंतला तो मामला करावा. राजश्री एक दिवस उपवास करते, अगर निष्ठूर दाखविते, तर गडकरी यांसहि बोलावयास जागां होता. तें अवसान, एकटा पडला आहे, त्यामुळें न होय, यास्तव दिवसगत लागते. यास्तव, सांप्रत वरते दोघाचौघांस घेऊन नेटून लौकर करावयाचा विचार केला आहे. स्वामीचें पुण्य समर्थ आहे ! श्रीकृपें स्वामीच्या मनोदयानरूपच घडेल. राजश्रीचे मतें मातुश्रीनें समजून सोहलतीनें करावें असें आहे. तें तर होत नाही. याची तर भ्रांत फिटत नाही. उगी माणसासमागमें राजश्रीस सांगून धडावें, तर तो काय जाऊन सांगेल, न कळे ! तर्ही सांगोन पाठवितों. परंतु नेट नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५५२ ]
ह्मणून लिहिलें. ऐसियास, म्यां आधीं आपली आज्ञा आणविली तेव्हां घरास आलों. एकादशीस नाईकांचा निरोप घेऊन स्वार होवुन वरकुव्यास येऊन राहिलों. द्वादशीस लिमगावास दाखल जालों. बारामतीहून दाहा कोस सुपें आहे. व सोळा कोस लिमगाव आहे. राजश्री हरी गोपाळ यास आपण जे समयीं बारामतीस जायाची आज्ञा करितील, ते समयीं अगोधर मजकडे मुजरद गडी चालणार पाठवून मी बारामतीस दाखल होतांच, रा॥ हरीपंतास माझें पत्र येतांच स्वार होऊन यावें असा संकेत करणार आपण समर्थ आहेत. मीहि कांहीं सेवेसी आपल्या योग्य नाहीं. आपण मात्र काय समजून कृपा करितां हें श्रीजाणे ! सर्व प्रकारें आपण आमचें उर्जित करतील. आपला बोलबाला जाल्यावरी आमची यथास्थित स्थापना करणें आपणांस संकट आहे, ऐसा अर्थ नाही. परंतु रा॥ आबा, व रा॥ बापू , व रा॥ मल्हारबा यांचें वचन पुर्ते आह्मांविशीं घेतले पाहिजे. प्रथमच कारभारास आरंभ होतांच आमची मामलियत रा॥ बापूंनीं रा॥ विष्णुपंतांस सां + + + + + + + + + + + + + + + + + + + + + जाले. त्यावरी बहुतप्रकारें आह्मी स्वामींचा दाब राखून बहुतच गोष्टी सख्त नरम रसायनाच्या बहुत खुश होवून पुढें ज्या मनसुब्यावरी आह्मी व आपण पाऊल ठेविलें आहे, त्यावरी कायम मिजाज राहेत ऐसें केलें. शेवटीं, आह्मी येथवर बोलों की, आमचा स्नेह न करावा. यास्तव तुह्मांस बोध केला नानाप्रकारें करून मर्जी तुमची बारहम करतील. शेवटी, आमच्या प्राक्तनी जें ईश्वरापासून नेमिलें असेल, तें होईल ! परंतु आपण एकवचनी, आपले साम्यतेचा मोहरा राज्यांत नाहीं, ज्याची दस्तगिरी कराल तें सेवटास न्याल; हा भरंवसा जाणून ज्यांत आमचा लौकिक, व आपली इरे राहे, ते गोष्ट करणें. येविषयींची बळकटी जितकी करावयाची तितकी करून घेतली; शफत वाहून घेतली; पुढें श्री समर्थ आहे ! आह्मी लिमगावांत आहोत, ऐसें न जाणावें. सासवडी आपणांजवळ आहोंत ऐसें जाणावें. जे समयीं आपलें आज्ञापत्र येईल ते समयीं सासवडांत आहोंत ऐसे समजावें.
पुढें आणीक आठवे रोजीं रा॥ हरी गोपाळ यास पाठवितो. * + + + + + + + + + + + +