[ ५३१ ]
श्रीमोरया.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोधरपंत स्वामीचे सेवेसीः--
पोष्य गंगाधर यशवंत सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. दारूगोळी पाहिजे तर दारू व शिसे देखील दाहा उंट भरून अगत्यरूप पाठऊन देणें. दारु उत्तम व शिसें ऐसें सत्वर येऊन पावे तें करणें व बाण उत्तम पंनास उंट, ऐसें पातशहांकडून हा सरंजाम लि॥प्रमाणें, मागोन घेऊन पाठवून देणें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
उपरि झेंड्या करणें टोकर थोर उत्तम दोन जरूर जरूर पाठऊन देणें. झेंडे तयार केले आहेत. परंतु टोकरावांचून अटकाव असेत. टोकर उत्तम अगत्य पाठणें. वेळू ढालाकारणें पाहिजेत. यास्तव लि॥ असें. हे विनंति.