Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ५२३ ]

श्री.

राजश्री दुरगाजी शिंदे मु॥ रेवदडे यांसी पत्र कीं, राजश्री मानाजी अंगरे वजारतमाब दर्शनास आले होते. सर्व प्रकारें मशारनिले पदरीं आहेत. यांच्या ठायीं दुसरा विचार नाही. तुह्मीं यांचे तालुकेयांत हरएकविसीं कजिया कथळा, व रयेतीस उपसर्ग एकंदर करित न जाणें. व आगर चेऊळ येथें रयेतीस मानिलेनें कौलपत्र देऊन, इजारा राजश्री कृष्णाजी मोरेश्वर कोलटकर यासी दिल्हा आहे. तेथील आबादानी व वसाहात मशारनिले कोलटकर कौलाप्रो करितात. तेथें रेवदंडीकर
सावकार ज्यास अनकूळ पडेल तो जलमार्गे उदीमव्यापार करावयाची आमदरफ्त करितील. ते सुदामत फिरंगियास मइबात आली होती, त्याप्रों। करूं द्यावी. जलमार्गास अवरोध न करावा. व जंजिरे कुलाबा खांदेरी देखील मानिलेकडील चाकरमाने चेऊलखाडींतून फाटे, लाकूड, शाकार, दाणा गल्ला आणितात. त्यास जकात सुदामतापासून घेतली नाही, आणि सालमजकुरी रेवदंडियांत काजिया करितां, ह्मणून विदित जाहालें. तरी, चेऊलास सावकारी आमदरफ्तीस व चाकरमानेयासी जकातीचा उपद्रव नवीन व्हावा ऐसें नाहीं. हेविशींची हकीकत सविस्तर हुजुर लेहून पाठविणें. मनास आणोन आज्ञा केली जाईल.

[ ५२२ ]

श्री.

+ + + येतां तर रुपये वसूल होते. फौजा लांब राहिल्या. लोकांस दबाव कोणाचा नाहीं. ऐसे आहे. पूर्वी एक किस्त जाली. त्याशिवाय रुपया एक आला नाही. सांप्रतकाळीं एक्या किस्तीची तरतूद करविली आहे. याप्रकारें वर्तमान आहे. नुसते कागद काळे करून नवाबानें दिल्हे आहेत. परंतु रुपये वसूल होणें कठिण आहे. विना आपली फौज या प्रांतीं पांच सात हजार आलियाखेरीज जेथें जेथें तनखे आहेत तेथील वसूल होणें संकट आहे. आपली फौज आलियानें रुपया वसुलांत येईल. नवाबाचा या मुलकांत जप्त किमपि नाहीं. प्रताप नारायण या प्रांती येणार. त्यास दरमियान जमीदारांचा बागडा ! पांच हजार फौज त्याची निभणें कठिण ! ऐसा बंदोबस्त यवनाचा आहे. आपल्या फौजेची दहशत या लोकांस आहे. गाजीपूर व काशी वगैरे येथील वर्तमान एकच आहे. काशीचा पैसा मात्र खरा. त्यामध्यें बलवंडसिंगाशीं गांठ आहे ! दरमियान यवनाचीं पत्रें येत आहेत, की रुपये सत्वर वसूल करून सरकारांत पाठवावे. ऐशी अंतस्ते पत्रें सर्व जमीदारांस येत आहेत. आणि आह्मांसहि तनखे दिल्हे आहेत. जमीदारांनीं आह्मांस रुपये द्यावे कीं नवाबास पाठवावे ? त्यास, जमीदार दोन्ही गोष्टी करीत नाहीत. नवाबासहि पैसा पाठवीत नाहीत आणि आह्मांसहि पैसा देत नाहीत. धातुपोषणाच्या गोष्टी सांगताहेत. आह्मी आपल्या बळें पैसा घ्यावा, त्यास, जमियत जे आहे ते तुह्मांस विदित आहे. अजमगडच्या तनख्याऐवजी रुपये प्रताप नारायणानें वसूल चाळीस हजार केले. व येथें हादियारखान आहे, त्यानें रुपये बत्तीस हजार वसूल केले. ऐसें आहे. हादियारखानास तुह्मीं परवाना पूर्वी नवाबाचा पाठविला कीं, जो रुपया वसूल केला तो माघारे देणें. त्यास, तो रुपया देतो, ऐसा अर्थ नाहीं. कजिया करावा, इतका मात्र त्यास रुपयाविषयीं तगादा लावायासी आळस न केला. परंतु रुपया देत नाहीं. येणेंप्रमाणे वर्तमान आहे. विशेष काय लिहिणें? माहालच्या तनख्याविषयी लिहिलें. त्यास, दोन चार स्थळें मिळून कांहीं रुपया वसूल होईल. याजसाठी वारंवार लिहिलें जात आहे. हे विज्ञापना.

[ ५२१ ]

श्री.

तीर्थरूप राजश्री दादा वडिलांचे सो।.

अपत्य पुरुषोत्तमानें सा। नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम ता। छ ७ मेहरम मुकाम इंद्रप्रस्थ वडिलांचे आशीवादेंकरून यथास्थित असे. विशेष. पूर्वी सविस्तर वृत्त दररोजचें सो। लिहून पाठविलें असे, तें पावून सकलार्थ विदित जाला असेल. विशेष. आज छ मजकुरीं वजिरास पातशाहापाशी आणून मीरबक्षीकडून अकबत महमुदासहित, व समस्त मंडळीस – जे सलुख करणार त्यांस किल्यांत पातशाहाचे मातुश्रीसमीप नेऊन, प्रातःकालपासून सायंकालपावेतों ज्या ज्या युक्तीनें समजावणें, तें समजाऊन, लडाईचे पल्यावर आणून समस्तांचे मोहरेनशीं शपथपूर्व पातशाहास लिहून दिधलें कीं, सलुख करीत नाहीं; लडाई निश्चयात्मक करितों. पूर्वीच करार ठैरला होता की, सा लक्ष रुपये द्यावे; व रोहिले वगैरे जे तंग करितात, त्यांस समजवावें. ते रु॥ पातशाहांनी देऊं केले. व पुन्हां रुपया न मागावा हा मुचलका घेऊन रुपयांची निशा केली. व लूट ठैरिलियावर हरगोविंद माधोसिंगजीचे तर्फेनें येऊन सांगू लागले कीं, उद्या मर्हाटे येऊन पन्नास लाख रुपये मागत बसले. तेव्हां कोठून द्याल ? ते समयीं पातशहास संशय येऊन आह्मांस ह्मणूं लागले की, जर तुह्मी आह्मांकडून लडाई करवितां, जर तुमचे खाविंद येऊन सलुख करवितील, अथवा आह्मांस रुपये मागतील, तेव्हां आह्मी कोठून रुपये आणावे ? यास्तव तुह्मी साफ आह्मांस लिहून द्या की, श्रीमंत रघुनाथराउ आलियावर सलुख करणार नाहीत; व सख्य करणार नाहींत; व बेसन रुपयाहि मागणार नाहीत; व वजिर बक्षीसी शामील होऊन सफदरजंगास व जाटास मारावें; व त्या उभयतांचा जो माल येईल तो निमेनिम पातशाहास देऊं व निमे आह्मी घेऊं. याप्रों। लिहिलें द्याल तर, आमची खातरजमा होईल. व नगनगोटे मोडून सा लक्ष रुपये देऊन, श्रीमंत दादासो येत तोंवर थांबवूं ; नाहींतर, आह्मी आपल्याकडून त्याची तकशीर माफ करून जाटासहि त्याचे मुलुकास वाटें लाऊं. कां कीं, त्याचें येणें जालियावर आह्मी अधिक बलायेंत पड़ल्यास आह्मांस काय सुख ? मुलुख सर्व तुह्मी घेतला ! आतां हा किल्ला येऊन मागाल तेव्हां आह्मी काय करावें ?

[ ५२० ]

श्री.

विज्ञापना विशेष. आपांची स्वारी निराळी करून पाठविली आहे. त्याजबा। फडणीस, पोतनीस, जामदारखाना मोगसाईहून रवाना केलें आहे. अगोधर, आपाजी गोविंद, बिनीवालेकडील बिनी करितात, त्यांसच फौजा समागमें देऊन पाठवावयाचा निश्चय होता. फौजा नेमिल्या; तमाम सरदारांस बोलावून आणून, रुबरु सांगितलें. रुबरु कांहीं नाहीं, न करी, ह्मटलें नाही. बिराडास गेल्यानंतर साफ सांगोन पाठविलें जे, आह्मांस जावयासी अनकूल पडत नाही. सर्वाजी गोडे, दारकोजी निंबाळकर, यांणीं साफच सांगून पाठविलें जे, आह्मी जात नाहीं. तेव्हां वेडेवांकडें पुष्कळ बोलून पागा हिरोन आणीन, लुटून टाकीन, ऐशीं भयवाक्यें करून बोलिले. त्याजवरून, दोघे फौजसुद्धां तयार जिनबंदी करून राहिले होते. त्यांचें कांहीं जालें नाहीं. चांदाजी शितोळे यांनीही सांगोन प्रहर रात्री पाठविलें जे, आह्मी कांहीं जात नाहीं. जमाव भांडका, ऐसें जाणोन, त्याजवर चौकी खिजमतगारांची पाठविली. गाडदी तयार करविले. हल्ला करावयाचें केलें. इतकियांत हें वर्तमान सर्वत्रांस कळल्यानंतर तमाम उजवी बाजू जिनबंदी करून तयार जाली. आपास सखोजी जखताप, व सखाराम हरी, व कृष्णांजी रणदिवे, ऐसे येऊन बहुत प्रकारें सांगितलें. न ऐकत, तेव्हां एकांतीं उठोन नेले. सखोजी जखताप यांनी साफ सांगितलें जे, त्याजवर हल्ला केल्यानें पाच हजार फौज तयार जाली आहे, त्याजबरोबर उभे राहतील तेव्हां ठीक पडणार नाहीं, आतां आटोपावें, रदबदली ऐकावी. मग ऐकोन, चौकी उठवून आणली. दुसरे दिवशीं रा॥ आपास नेमून त्याजबरोबर फौजा देवून रवानगी केली. त्याजबरोबर जावयासी कांहींच कोणी ह्मटलें नाहीं; उठोन गेले. ऐसें जालें. झुंजाचे अलीकडे क्रुरता फारच धरली आहे. नित्य एक दोन हात तोडितात; डोकी मारितात. रदबदली कोणाचीही चालत नाही. जे करतील तें प्रमाण. दर्द कोणाची नाहीं. इजत जतन होऊन पुणियास येईल तो प्रालब्धाचा जाणावा. स्वामीचे प्रतापेंकरून आमचें कामकाज यथास्थित चालत आहे. रा॥ वामनराव व आनंदराव रास्ते यांस पत्रें जरूर कारकुनी दुसाला द्यावयाविसीं पाठवावीं. राजश्री मामासहि एक पत्र, जखम लागली सबब, समाधानाचें लिहावें. आमच्या हरएक कानूकैदेविसीं, कारकुनीविसीं तावन्मात्र सुचवावें. विशेष काय लिहिणें ! ही विज्ञप्ति.

[ ५१९ ]

श्री.

श्रीमंत राजश्री राऊ व तथा राजश्री आपा स्वामीचे सेवेसीः--

पोष्य अंबाजी त्रिंबक कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ २२ रमजान, जाणून स्वकीय कुशल लेखन करावया आज्ञा केली पाहिजे. विशेष. का। सासवड येथे * + + स्वामींनी रोखा केला आहे तो मना केला पाहिजे. कृपा केली पाहिजे. हे विनंति.

[ ५१८ ]

श्री.

पुरवणी राजश्री धोंडोबास आशीर्वाद उपरि. तुह्मी साहित्याविसीं लिहिलें. तर सासवडच्या मनुष्यमात्रास बरें जितके होत जाईल तितकें करावें. ऐसी आज्ञा तीर्थरूप रा॥ तात्यास्वामीची आहे. याकरितां आह्मीं अवघियांसीं बरें इच्छितों. आमच्याने होईल त्यास अंतर करीत नाहीं. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हा आशीर्वाद.

[ ५१७ ]

श्री.

राजश्री देशमुख व मोकदम का। सासवड गोसावी यासीः--

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। अंबाजीं त्रिंबक देशपांडे कसबे मजकुर आशीर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाले. त्यावरून राजश्री पंत प्रधान यांस पत्र पाठविलें आहे; तें वाचून, लाखोटा करून पुणियास पाठवून देणें. नाना रोखा देतील. यानंतर, चिरंजीव राजश्री माहादेवास व धोंड्यास पूर्वीच आह्मी पत्र लेहून पाठविलें की, तुह्मी दिवाणांत न जावें. कोण जातील ते मुखरूप जाऊत. दिवाण आपले कोण्ही ह्मणावेसे नाहीं. पहिलें आपल्यास टक्कल पडलें तें अझूण वारले नाही. कोण जातील ते सुखरूप जाऊत. तुह्मी आह्मांस बोलाविलें तरी राजश्री स्वामी आह्मांस निरोप देत नाहींत. याकरितां यावयास अनकूल पडत नाहीं. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

[ ५१६ ]

श्री.

पुरवणी राजश्री राऊ व तथा राजश्री आपा स्वामीचे सेवेसीः--

विनंति उपरि. स्वामींनी का। सासवडावरी रोखा गाडियांचा व सुतार, व लोहार, यांचा केला आहे. त्यास राजश्री पंत सचिव सातारियास घर बांधताती, त्यास वर्तमान कळलियावर तेहि ठेवीचा रोखा गांवावरी करितील. दुईमुळें गांवींची खराबी होती. याजकरितां स्वामींनी गाडे, व सुतार, व लोहार, याचा मनोरोखा दिल्हा पाहिजे. ठेवीचे ऐवजी आह्मी राजश्री नानांपासी पोता रुपये ५० देऊन. तरी मनारोखा स्वामींनी अगत्य दिल्हा पाहिजे. येविसीं अनमान केला न पाहिजे. गांव स्वामींचा आहे. जीव राखोन गांव पचविला पाहिजे. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

                                                                                  लेखांक ३०२

                                                                                                  श्रीशंकर                                                       
                                                                                                                                                                       

करीणा जेधे देशमुख ता। रोहिडखोरे सु॥ खमस +++ व अलफ करीणा लिहिला जे खेमजी नाईक व भानजी नाईक जेथे आपले वडील बेदरी पातशाहाजवळी घे नाइकी करून होते त्यास खेलोजी नाईक पातशाहाजवळी राहिला आणि भानजी नाईक आपले वडिल बेदरीहून निघोन नेरास आले नेरीहून खिडिनजीक येऊन राहिले त्यास ता। मजकुरी अगदी जगल खराब होता जगल होते याकरिता कन्हेरीचे खिडीतून निघोन भानजी नाईक येऊन उत्रोलीस बाल प्रभु व बाबाजी प्रभु देसपाडे होते त्यास भेटोन राहिले खोपडे पसरणीहून चारणीस पळसोसीस येऊन राहिले होते माहालीची वसाहती जाली माहाली कोण्ही पूर्वीचा वतनदार देसमुख नव्हता त्यास आपले वडिल भानजी नाईक पातशाहाजवळी जाऊन माहालीचा करीना जाहीर केला त्यावरी पातशाहानी मनात आणून वतनदार कोण्ही नव्हता याकरिता भानजी नाइकास देसमुखी देऊन परवाना करून दिल्हा तो परवाना घेऊन सिरवली ठाणे होते तेथे दखल केला तेथून उत्रोलीस येत होते त्यास मार्गी गाडेखिडीस खोपडियानी वाद धरून भानजी नाइकास दगा केला पाचजण मारिले आणि परवाना नेऊन वीगच्या डोहात बुडविला उत्रोलीस गुरढोरे माणस वस्तभाव होती ते खोपडियानी लुटली मुलेमाणसे उत्रोलीहून पळोन मौजे वागणी ता। गुजणमावळ येथे गेली त्यास ते जागा राहावयास अनकुल न पडे याकरिता तेथून निघोन धावडीबदरीस जाऊन राहिले त्यास भानजी नाइकाचे पुत्र कान्होजी नाइक लाहान होते थोर जालियावर बाराजण लोक व कान्होजी जेधे ठेऊन जोगटेभीस आले त्यास खोपडियाचे वर्‍हाड मौजे करनवडे येथे होत होते तेथे जाऊन मारा केला त्यावरी तेथून निघोन मागती धावडीबदरीस गेले त्यावरी हे वर्तमान दिवाणात दाखल जाहले दिवाणाने व गोताने आपले वडील कान्होजी नाईक यास व खोपडियास जमा केले त्यास सिरवलीच्या वडाखाले दिवाण व गोत बोलिले जे पातशाहानी जेधियास देसमुखी दिल्ही हे गोष्टी परंतु खोपडियानी जेध्याचा मारा केला व जेध्यानी खोपडियाचे वर्‍हाड मारिले त्यामुळे खून दुतर्फा जाले आहेत याकरिता देसमुखी दो जागा वाटावी ऐसा निर्वाह करून दोनी तर्फाच्या दोनी वाटण्या करून चिठिया लेहून श्री देव

मौजे अंबवडे येथे टाकिल्या त्यास वरले तर्फेची चिठी जेध्याच्या हातास आली उत्रौलि तर्फेची चिठी खोपडियाचे हातास आली वाटणी जालिया त्यापासून कान्होजी नाइकान देसमुखी केली त्याचे पोटी नाइकजी नाईक जाले त्याणे देसमुखी केली त्याचा सर्जाराऊ व चापजी जेधे व नाइकजी जेधे व रायाजी जेधे व संभाजी जेधे ऐसे साजण पुत्र जाले आपले वडील सर्जाराऊ याणी देसमुखी केली आपण हि करीता आहा देसमुखीचा करीणा या जातीचा आहे वतनाचा करीणा राजश्री थोरले कैलासवासी स्वामी याणी पूर्वी च मनास आणून खोपडियाआधी पान आपले आजे कान्होजी जेधे यास दिल्हे आपले बाप सर्जाराऊ जेधे यास हि पाने आधी दिल्ही आहेत खोपडियाआधी पाने आपले वडिली घेतली आहेत ये जातीचा करीणा पानाचा करीणा तरी आपले वडिल आधी पान घेत आले आहेत आपले आजे कान्होजी जेधे स्वारानसी माहाराज साहेबापासी चाकरी करीत होते ते समई राजश्री छपिति कैलासवासी स्वामीस माहाराजानी पुण्यास ठेविले त्याजवळी आपले आले कान्होजी नाइक स्वारानसी राहिले त्यावरि राजश्री दादाजी कोडदेऊ सिवापुरास आले ते समई बारा मावळामधे कृष्णाजी नाइक बादल देसमुख ता। हिरडसमावळ दाईत घेत होते त्यास कर आपले वडिल देत होते त्याणी दाईत दिले नाही दादाजी कोडदेऊ कृष्णाजी बादल यावरी गेले ते समई कृष्णाजी बादलाने स्वारावरी चालोन घेतले स्वार पिटून काढिले घोडियाच्या दाड्या तोडिल्या दादाजी कोडदेऊ नामोहर होऊन सिवापुरास आलियावरी कान्होजी नाइकास बोलिले की तुह्मी कृष्णाजी नाइकास भेटीस घेऊन येणे तुह्मी हे गोष्टी मनावर धरिता तेव्हा कृष्णाजी नाईक हि आणिता आणि बारा मावळेचे देसमुख काही आले आहेत काही राहिले आहेत ते हि भेटीस येतात ह्मणौन कितेक गोष्टी बोलिले त्यावरि कान्होजी नाइक कारीस आले तेथून कृष्णाजी बादल यास च्यार गोष्टी सागोन पाठविल्या त्यावरून कृष्णाजी नाईक भेटीस सिवापुरावरी आले त्यावरी अगदी देसमुख भेटले त्यावरी कुल मावळेलोक जमाव करून तीन हजार लोक खळदबेलसर येथे मैदानास जुझावयास पाठविले ते समई मोगलाने चालोन घेतले मावळच्या लोकानी शर्ति केली मोगल मारून लाविला त्यामधे आपले बाप बाजी नाईक लहान होते त्यानी निशाणाचा भाला घेऊन जमावाबरोबर गेले तरवारेची शर्ती केली राजश्री छत्रपतिस्वामीनी मेहेरबान होऊन आपल्या बापास सर्जाराई दिल्हे ते समई मोगलाकडे बबई खोपडी पहिली च तिकडे गेली होती आपणाकडील लोक रणामधे जमखी होन राहिले होते ते दाखऊन त्याच्या गर्दना मारविल्या त्यावरी अगदी मावळे जमा जाले राज्य वृध्दीते होत चालिले त्यावर अबलजखान वाईस राजश्री छत्रपतिस्वामी कैलासवासीवरी चालोन आले ते समई खडोजी खोपडे पारखे होऊन अबजलखानास भेटले आणि राजश्री         स्वामीस धरून देतो ह्मणऊन कबुलाती केली त्यावरी कान्होजी नाईक आपले आजे याणी आपली माणसे पळविली ती तळेगावी नेऊन ठेविली आणि आपण व सर्जाराऊ व चापजी नाईक व नाईकजी नाईक राजश्री स्वामीचे भेटीस गेले त्यास राजश्री            स्वामी बोलिले की खंडोजी खोपडे अबजलखानास भेटले

(अपूर्ण)

 

[ ५१५ ]

श्री.

राजश्री अंबाजी व्यंबक यासी आज्ञा केली ऐसीजेः--

राजश्री सयाजी दरेकर याजवरी स्वामी कृपाळू होऊन त्याचा सरंजाम त्यास करून दिल्हा असे. * तुह्मांस कळावयाकारन लिहिल अस.