Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ५६९ ]

श्री.

पौ। छ ३ रजब.

राजश्री पुरुषोत्तम महादेव व देवराव महादेव गोसावी यासीः--

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जावें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावून लेखनार्थ अवगत जाला; व कितेक अर्थ राजश्री कृष्णाजी हरी यांणी सांगितला तो सकल कळला. ऐसियासी, तुह्मी आपलें सर्व प्रकारें समाधान रक्षून आमचे भेटीस येणें. कोणेविसी फिकीर न करणें. रा॥ छ २ रजब. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

मोर्तवसुद.
श्रीह्माळसाकांत चरणीं तत्पर,
खंडोजीसुत मल्हारजी होळकर.

[ ५६८ ]

श्री.

राजश्री दामोदर महादेव यासीः----

उपरि. तुह्मी गेलिया दोन रोज जाले. अतःपर काम उरकून सत्वर येणें. विलंब न करणें. जाणिजे. छ ८.

( लेखनसीमा.)

[ ५६७ ]

श्री.

राजश्री दामोधर माहादेऊ गोसावी यासीः--

छ अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य
स्नो। मल्हारजी होळकर व राणोजी सिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करणें. विशेष. तुमचें पत्र ढवळपूरचे मुकामाचें आलें तें पावलें. खजाना समागमें आहे, कोणे रोखें यावें ? ह्मणून लिहिलें. ऐसियास, श्रीमंत व आह्मी सर्व फौज एकत्र जाली आहे. तुह्मास श्रीमंतांनीं सिरोजेचे सुमारे बोलाविलें आहे. सरकारचें पत्रही पाठविलें असे, त्यावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. ( मोर्तबसुद )

श्रीजोती-
लिंग चरणीं तत्पर,
जनकोजीसुत
राणोजी सिंदे
निरंतर.

[ ५६६ ]

श्री.

राजश्री दामोदर साहेब गोसावी यासीः--

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
जयाजी सिंदे दंडवत उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करणे. विशेष. तुह्मी पत्र पाठविले ते पावले. कामापावेतों आलों, पुढें वाट चालत नाहीं, स्वार पाठविले पाहिजेत, ह्मणोन लिहिलें. तर, श्रीमंत राजश्री दादासाहेबांनी लिहिलें असेल, त्याप्रमाणें वर्तणूक करणें. वाटेनें बहुत सावधपणें येणें. जाणिजे. छ ७ रा।खर. बहुत काय लिहिणें, हे विनंति.

( मोर्तब )
(सुद)

श्रीजोतिलिंगचरणीं तत्पर,
राणोजीसुत जयाजी सिंदे
निरंतर.

                                                                                  लेखांक ३०६

                                                                                                       श्री                                                     
                                                                                                                                                                     

यादी वंशावळ पेशजीच्या टिपणावरून एकंदर करून लिहिल्या शके १७५४ जयनाम संवत्सर सन सलास सलासीन मया तैन व अलफ 

 

→यादी वंशावळ वाचण्यासाठी पुढे क्लीक करा

[ ५६५ ]

श्री.

पौ। छ ४ रमजान.

राजश्री दिवाणजी व लाला गोसावी यासीः--

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ सटवाजी मोहिते हवलदार किल्ले रामसेज विनंति उपर येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष. राजश्री संताजी बावा सेवेसी आले आहेत. त्यास त्याची हजरी हजूर लेहून पाठविणें, जे, रोजमुरा ज्यारी होय, तोवरी तुह्मी याचा रोजमुरा देणें. परवानगी आलियावर मुजरा देतील. क + + + ++ येथें किल्याचे बेगमीस + + + + यावर, आले गेले याचें वर्तमान आह्मांस पाठवणें. देहे असामी पाहिजे. त्यास, तुह्मांस श्रुत केलें होतें. तर हे असामी करून पाठवावे. छबिन्याचा शिरस्ता आहे. त्यास कांबळे ५, १॥ रुपयाप्रों॥ मुकरार असे. तर, व झुट या लाकडाचा बंदोबस्त कोणाकडे करितां, हें लिहिणें. आमची खाजगत अडशेरी वगैरे व परियाची अवदागिरचा व दिवट्यांचा तपशील

।३॥ खासगत असामी १
।३॥ अबदागिर्या १
-------- ------
१।-॥ ४

येणेंप्रमाणें अडसेरीमध्यें रोजमुर्याचे ऐवजी रुपया १ कमी करीत जावा. विशेष काय लिहिणें ? हे विनंति.

मोर्तबसुद.

श्रीमार्तंडचरणीतत्पर
सटवोजी मोहिते निरंतर.

[ ५६४ ]

श्री.

वेदमुहूर्ति राजश्री अपाभट काका स्वामीचे सेवेसी:--

विद्यार्थी नारो बाबाजी फडके कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील क्षेम ता। छ १६ जावल मु॥ पुणें वर्तमान यथास्थित जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. राजश्री बापूजी माहादेव हिंगणे याचे गांवचा एकसाल ऐवज सरकारांत घ्यावयाचा करार करून मारनिल्हे याचे नावें वरात जाहाली आहे. त्यास, यांणी ऐवज न दिल्यास गांवची जप्ती करून ऐवज घेणें, ह्मणोन आमचे नावें सनद आहे. त्यास, हाली हिंगणे यांचे कारकुनांनी सरकारांत विनंति करून भाद्रपदअखेर निमे ऐवज, व कार्तिकअखेर निमे, याप्रो। दोहो हप्त्यांनी झाडून वरातेप्रमाणें ऐवज देतों, ह्मणून कबूल केलें आहे. याजकरितां आपणास हें पत्र लिहिलें आहे. तरी हपता भरे, तोंपावेतों त्यास ऐवजाविसीं निकड न करावी. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असो दिल्हा पाहिजे. हे विनंति.

[ ५६३ ]

श्री.

राजश्री बापूजी महादेव पुरुषोत्तम महादेव गोसावी यासीः--

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य

स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जावें. विशेष. तुह्मी छ १ माहे रा॥खरची पत्रें पाठविलीं, ती छ ११ माहे मिनहूस प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला. दिल्लीकडील नजिबखान, व याकुब अल्लीखान, व ठाकूर सुरजमल, व सुजाअत दौले, व शाहाजादे वगैरेचें वृत्त तपशिलें लेखन केलें, व रायाची पत्रें पाठविलीं, ती पावून सविस्तर अवगत जालें. इकडील वर्तमान तरः माधोसिंगांनी बदफैली आरंभिली; नेणवियास फौज पाठवून मोर्चे लाविले; व कांहीं फौज माळवियांत रवाना केली, ती पाटणास आली. पुढें येऊन धूम करावी हा प्रकार योजिला. याचें पारपत्य करणें जरूर; याजकरितां, फौजेची संचणी करून, इंदुरीहून कूच करून, दरमजल मुकुंदवारीनजीक स्वारी आली. पुढें दरकूच जात असों. माधोसिंग उन्हरियाहून माघारा रणथंबोरीस गेला. पाटणीं फौज आहे. त्याचें पारपत्य करून, बंदोबस्त करून पुढें उपयोगीं कर्तव्य तें केलें जाईल. देशी निजामअल्लीनें बिघाड केला. बेदरावर आहे. श्रीमंत राजश्री दादासाहेब अमदानगरावर आहेत. फौज जमा जाली; आणि होती. मागे मोगलांवर जातात. सत्वर पारपत्य करितील, अगाध नाहीं. पैदरपै पत्रें पाठवून त्या प्रांतीचें सविस्तर वृत्त वरचेवर लिहीत जाणे. दिलारायाच्या पत्राचें उत्तर पाठविलें आहे. जाणिजे छ १५ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

[ ५६२ ]

श्री.

राजश्री दामोदरपंत गोसावी यासी :-

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. तुह्मी गेला, तेव्हां बरोबर कनीराम हेही आले आहेत. त्यास, रोज माधोसिंग याजकडील जाबसाल, जो असेल तो, मशारनिलेच्या हातून करवीत जावा. दिवाण हरगोविंद याजला राजे माघोसिंग याच्या जाबसालांत न आणावें. तो लबाड, त्याच्या बोलण्याचा विश्वास नाहीं; याजकरितां जैपुरचा जो जाबसाल असेल, तो कनीरामजीच्या विद्यमानें करीत जाणे. रा॥ छ १६ मोहरम. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

मोर्तबसूद.

श्रीह्माळसाकांत चरणीं
तत्पर, खंडोजीसुत
मल्हारजी होळकर.

[ ५६१ ]

श्री.

पौ। छ २ माहे सफर.

राजश्री बापूजी माहादेव व ता। राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासी:-

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशळ जाणून स्वकीय कुशळ लिहीत जाणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावोन भावार्थ कळों आला. दिल्लीकडील वर्तमानः-- मालिक नवाब सफदरजंग यांजकडील कुशलवृत्त श्रवण होऊन संतोष जाला. पुढें सुभियाच्या बंदोबस्ताकारितां जाणार, ह्मणून पत्री लिहितां. त्यासी, काय मनमुबा ठहरला ? समजावीस जाली किंवा काय विचार ? तो तत्वतां लिहून पाठविणें. वरकड अर्थ पुरवणी पत्नीं तुह्मी लिहिला होता; त्याचें प्रतिउत्तर आलाहिदा पत्रीं आहे, त्यावरून कळो येईल. राव उभयता बंधूंचें स्वारस्य होऊन जलदीनेंच कूच होऊन, जिकडे जावयाचा निश्चय ठहरेल, तेणेंप्रो। तुह्मांस लिहून. छ २५ मोहरम. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

( मोर्तबसुद.)

श्रीह्माळसाकांत चरणीं तत्पर
खंडोजीसुत मल्हारजी
होळकर.