[ ५२५ ]
श्री.
त्यासी, त्या गोष्टी अनुभवास आणायाचे दिवस हेच आहेत. ईश्वरें आपणांस मोगलाईकडील सूत्रधारी केलें. या दिवसांत जरी आमची साहेता न करतील, आणि स्नेह साफल्य न दाखवितील, तरी पुढें कोणता प्रसंग ? बहुत लिहिणें तरी आत्मस्तुति दिसते. मीहि जसा स्नेहांत दृढ आहे, व ज्याचा जालों, त्याचा कायावाचामनसा जालों. त्यांत संदेह नाही. व कांहीं कामाचाहि आहे. जरी आपण विश्वास देऊन येथें यथास्थित आत्म्यांत विचारांत शरिक ठेवतील, तरी, उदंड कांहीं किफायत स्वामीच्या विद्यमानें नवाबाची करून दाखवीन. रोहिले नबाब आमसी काय वाकीफ ? न जाणो ! पूर्वी खोजीमकुलीखानांहीं गिल्ला शिकवाहि आमचा काय लिहिला असेल ? ऐसियासी, आपण असलियानें आमची खातरजमा जाली, लौकिकांत प्रतिपादनाहि जाली. गोष्ट प्रसंगाची आहे. जरी आपण इमायतनामा वा ब + + + चे नावें आकारणविशईं पाठवितील तरी + + झी तरी बिल एकरुई दृढतर चित्तारूढ करितील. तरी मी सर्वां अगोदर येऊन आपली भेटी घेईन. कितेक प्रसंग इकडील निवेदन करून आपले विद्यमानें मुलाजमतहि होईल. यद्यपि आह्मांस तरी आपणांसी काम आहे, भेटीनंतर जैसा विचार सांगतील तैसा केला जाईल. खोजीमकुलीखानानें प्रस्तुत मोठा जुलुम शहरचे लोकांवर मांडला आहे. कितेक साहुकार तरी शहरांतून गेले. जरी यासी नबाबांहीं, तोंडी लाविलें तरी हा योग्य नाहीं; दुष्टबुद्धि व हिंदूचा अत्यंत द्वेष्टा आहे. आतांपासूनच याच पाय दृढ न होय तो प्रसंग ध्यानांत असो द्यावा. नवाबहि इकडे बंदोबस्त व द्रव्य मेळवायानिमित्य येताती व तुह्मीहि जैशी हाती धरले तैसा निर्वाहहि केला पाहिजे. बहुतांकडे उदंड द्रव्यें निघतील. घेणार पाहिजे. हे प्रसंग लिहिणियांत येत नाहींत. भेटीच्या समयीं सूचना केले जातील. मूळ स्नेह करून दाखवायचे दिवस हेच आहेत. बहुत काय लिहावें ? जो उपकार आपण करितील ते आपलें नांव राहील वादगारी. उत्तराची मार्गप्रतीक्षा करजेते. हे विनंति.