[ ५२८ ]
श्री.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्याजश्री बाळोबा गोसावी यांसीः--
सेवक बापूजी माहादेव नमस्कार उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुमचें पत्र सुतर स्वाराबरोबर आलें तें मिरापुरी पावले. लिहिलें कीं, माहाराजांहीं व बखातींसगांनीं याच वाटेने श्रीमंतांकडे जाणे होय, तर उत्तम आहे. ऐसे लिहिले, त्यास, येथे वर्तमान आले की, श्रीमंत करोलीकडे येणार. नंतर आज उदईक, आमची रुकसद करतील. आह्मी दिल्लीचे मार्गे जाऊं. कळलें पा।. यानंतर आह्मांस नवाब दुंदेखानांनी घोडीं दिधली होती ते त्यांचेच हद्देंत गेली आहे. ती त्यास नवाबास सांगून घोडींचा तलास करवून घोडी पाठऊन देवावीं. बहुत काय लिहिणें ? छ १० रजब. हे विनंति.
हिशेब
२ शालेची रजई
.॥. अंगरखा पायजामा सफेद
.।- छीट आंगरखा पायजामा
३-॥- शालेचा जामा
----
६।-
वसूल रुपया १ बाकी
५।-