Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ६७
श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदपंत तात्या स्वामी गोसावी यांसी
पो। त्रिंबकराव सदाशिव कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ२५ जमादिलावल नजीक बंकापूर यथास्थित जाणोन स्वकीयें कुशल लेखन केलें पाहिजे विशेष आपल्याकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तर पत्र पाठवून संतोषवीत असिलें पाहिजे यानंतर खंडोजी जगन्नाथ आम्हाशीं फारच बाकोन आहेत आम्हांजवळ राहात होते ते आतां राहात नाहींत आम्हाशीं वांकडें राहावयाचें कारण की श्रीमंत तैनात जाजती करीनात ती आम्ही जाजती करवावी ही कल्पना चित्तांत धरून आम्हांकडे येत जात नाहींत आपल्यास कळावें आमचा इलाज जितका होता तितका आम्हीं गोपाळराव मोरोबा दादा बाळकोबा हरीपंत फडके रामचंद्र गणेश इतक्यांकडून आम्हीं रायासीं रदबदल करविली आम्ही केली ती ऐकेनात शेवटीं हजार रुपये जाजती एकाएकास केले तथापि खंडोजीबावाचे मनास नये आम्हीं काय करावें आणि आम्हांस च वेडेंवांकडे बोलतात आम्हीं सोसतों कांहीं वाईट बोलत नाहीं तुम्ही म्हणाल कीं नाना जलद उतावळी करून रागें भरले असतील तरी तात्या आमचा उतावळी जलदी दोष गुण बळवंतरायानें सोसलीं तुम्हीं सोसलीं सोशिता वरकड आमचें कोणी चालू देणार नाहीं आम्ही हि कोणास कांहीं म्हणत नाहीं असे रीतीने आहों परंतु खंडोजीबावानी आम्हावर फार च केली या गोष्टीस वर्ते लिहिले गृहस्त साक्ष आहेत राणू हगवणा तेथे आला तो आम्हांस न पुसतां आला म्हणून पत्र पाठविलें नाहीं राणू हि हा मजकूर सांगेल बरें त्याचे चित्तास येईल तें करोत आम्ही तिळमात्र वाईटबरें म्हणत नाहीं असें आहे तुमची भेट होईल कीं नाहीं तुम्ही या प्रांते येणार किंवा नाहीं हे सर्व बारीक मोठे वर्तमान लिहून पाठवावें चितोडी घोडी नारोपंतास देऊं कळावें हंहप्पाबरोबर पत्रें पाठविलीं ती पावलीं असतील लोभ असो दीजे हे विनंति
अपत्ये अप्पाचे साष्टांगनमस्कार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ६६
पो छ ८ जिल्काद श्रीगणराज
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसीं पोष्य मोरो बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लेखन केलें पाहिजे विशेष आपण राजश्री जयरामपंताबरोबर पत्र पाठविलें तें पावलें लिहिला मजकूर कळला ऐवजाचा मजकूर ऐसिन्यास जोगीनीं निकड केली म्हणून त्यास दिल्हा आपण निकड न केली म्हणून न दिल्हा असा अर्थ नाहीं आम्ही आपला निरोप घेऊन आलों तेसई आपण कांहीं मा। सांगितला होता यास्तव अनमान जाला कदाचित् आपणास विस्मरण जालें असेल तरी नकळे असो आतां जयरामपंतास ठेऊन घेतलें आहे अखेरसालीं थोडाबहुत ऐवज पावता होईल आम्ही मिरजेस आलों सैन्य प्रस्तुत गलगनाथाकडे गेलें ती।। मातोश्रीबाईस बरें वाटत नाहीं यास्तव येथें आलों प्रस्तुत कांहींसा उतार आहे आठा दिवशीं सैन्यांत जाणार सालमजकूर छावणी जालियाणें हैदरनाईकाचे पारपत्य होईल कदाचित् छावणी जाली नाहीं तरी कृष्णतीरपर्यंत त्याची च सत्ता जाणावी प्रस्तुत तो बिदनुरी आहे मीरफैजुला हानगळापाशी आहे बंकापूर धारवाड दोनीं सज्य करून ठाणीं बसलीं आहेत परंतु पारपत्य ने जालें तरी घेतली नाहींसारखीं त्याजपाशीं वीसहजार गाडदी आठ हजार फौज इतकें सामान व तोफा शंभरपर्यंत आहेत झाडी सोडीत नाहीं हरपनहळ्ळी चित्रदुर्ग येथें कांहीं साधेल या आशेवर गलगनाथपाशीं गेले आहेत यजमानाची कृपा पूर्ववत आहे कारभारी हि प्रतिवर्षाप्रों कृपा करितात आम्ही कांहीं व्यंग दाखवीत नाहीं कालानुसार वर्तणूक करितों तीर्थरूप राजश्री दादास हलसिंगीचे हल्लेस जखम पट्याची शिरावर लागली होती उत्तम प्रकारें बरी जाली पाणीं घेतलें आपणास कळावें बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ६५
श्री
पु।। राजश्री गोविंदपंत गोसावी यांसी
दंडवत विनंति उपार इकडील मजकूर लि।। आहे वरकड हि येथून आपलेपरी लिहीत आहेत यामध्यें आमचें लक्ष श्रीमंतांच्या पायाशी एकनिष्ठ आहे त्याचें नुकसान न व्हावें म्हणून सरळपणें मान-सन्मान कोणेविशी न पाहतां रात्रंदिवस मेहनत केली आणि श्रीमंतांच्या पुण्येंकरून सर्वास यश आलें ते च चाल यंदाच्या स्वारीस येऊन मनसबा केला तो च शेवटास लागला असता तरी इतके संकट न पडतें पैका हि मिळत होता आणि तह पडत होता परंतु करणारानीं छीळछद्म करून उभयतामध्यें बिघड पाडून रा। विसाजीपंतास मिळोन इतके प्रकार केले असो जे जसें करितील तसें फळ हि होईल परंतु आम्हांकडील दरबारचा कामकाजाचा सर्व भरवंसा आपला आहे वकील केले त्याणीं येथें नानाप्रकारें मनसबे रचले दरबारी त्याचे पुत्र आहेत ते हि त्याचे आज्ञेप्रमाणें च वर्तत असतील आम्हांस कांहीं दरबारचें वर्तमान कळत नाहीं इतके दिवस जाले त्याचेकडून पत्राची उत्तरें न आली आमचें वर्तमान तेथें न कळे त्याजकडील आम्हांस न कळे तेव्हां वकिलाचें करणें लि।। काय समजावें एक वर्ष जालें आमच्या लष्करांतून रा।। विसाजीपंताजवळ जाऊन पाहिलें आम्हांकडील लक्ष सोडिलें आम्हीं रीतीच्या वाटे सांगत असतां त्याच्या विचारास न ये ते मोठा खेळांत जाऊन पडिले असो तेथे हि श्रीमंतांचे कार्य होत असेल त्याचा अर्थ आमच्या लक्षांत राहावें ऐसें नाहीं कोणेविशीं जाबसालांत भरवंसा पडत नाहीं याजमुळें सांप्रत कैलासवासी सुभेदार याजपासून तुमचा स्नेह च चालत आहे त्याप्रमाणें आम्हांसी हि लोभ च केला सर्व कामकाज निर्गम करून इकडे रवाना केले आम्हास हि स्नेहाची ममतेची जोड दरबारांत एक आपली च आहे या अर्थी तेथील कामाचा काजाचा जाबसालाचा करण्याचा अर्थ आपल्याकडे च आहे दुसरे आम्ही जाणत नाहीं सर्व जाबसाल आपणच करीत जावा जालें वर्तमान रा। केसोपंत याजला आपल्याजवळ ठेऊन त्याजकडून आठवे दिवशीं वर्तमान ल्याहावयास सांगत जावे येथून हि वरचेवर जालें वर्तमान लि।। जाऊं म्हणजे दरोबस्त सर्व अर्थ समजत जातील अतःपर दुसरियाच्या भरवंशियावर न जावें आपण च इकडील अर्थ मनन करून बोलणे ते बोलून लिहिणें अर्थ ते लिहिवीत जावे दुस-या पत्राची वाट न पाहावी छीळछिद्म बहुत जालें आहे भरवसा एक आपल्या शि।। आम्हांस कोणाचा पडत नाहीं ऐसें पाहून हाली लिहिलें असे रो। छ ४ साबान हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ६४
श्री
सेवेसीं त्रिंबक सदाशिव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील वर्तमान ता। आषाढ शुद्ध चतुर्दशीपर्यंत स्वामीचे कृपेंकरून यथास्तित असे विशेष बहुता दिवशीं स्मरण सेवकाचें होऊन कृपाळू होऊन आज्ञापत्र पाठविलें तें पाहून चरणाचे दर्शनतुल्ये आनंद वाटला स्वामीचे पदरचे आहों कृपा करणार स्वामी समर्थ आहेत खासास्वारी लवकर च येईल जानोजी भोसले गाइकवाड निंबाळकर तमाम सरदार फौजसुद्धां बोलाविले आहेत हैदरनाइकाचे पारपत्य पुरतें च होईल व येविशीं सेवकास कृपोत्तरे आज्ञा केली त्यास स्वामी पुण्यवान प्रतापी आहेत अशाचा मजकूर तो किती आहे सर्व हि स्वामीचे पादाक्रांत आहेत स्वतेजप्रकाशेंकरून शत्रूचे निर्दाळण शीघ्रकाळें च होईल स्वामीचे पाय दृष्टीस पडतील तो दिवस आनंदाचा आहे सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापन
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ६३
पे।। छ ८ जिल्काद श्री
पु।। राजश्री मामा स्वामी गोसावी यांसी
विनंति उपरि अप्पाजी बाबूराव जामदारखाने पूर्वी राजश्री विष्णु नरहर याणीं तुम्हाकडे पाठविले होते त्याजबराबर आमचें पत्र हि एक आपल्यास होतें त्यास याचें उत्तर हि आलें नाहीं आप्पाजीपंत तुम्हांपाशीं च आहेत किंवा पत्रें देऊन रवानगी केली हे ल्याहावें येथें आम्ही वरच्यावर श्रीमंतास उमजूम देणें तें देत च आहों होतां होईल तें खरें हे विनंति ।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ६२
श्री कार्तिक शु।। ६।१६९२
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री गणेश त्रिंबक गोसावी यांसि
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार सा इहिद्दे सबैन मया व अलफ मौजे बालें पे।। सोलापूर येथील ओढ्याचे कडेस कुरण आहे ते राजश्री गोविंद शिवराम याजकडे सालमजकूर तुम्हांपासून करार करून देऊन हे सनद तुम्हास सादर केली असें तरी सदरहू कुरण मा।निलेकडे चालवणें जाणिजे
छ ४ रजब आज्ञाप्रमाण
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ६१
श्री ज्येष्ठ शु।। १४।१६९
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री आनंदराव जिवाजी कमाविसदार
पा। सिन्नर गोसावी यांसि
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार सु।। सबैन मया व अलफ पा।मजकूर येथील सालमजकूरचे रसदेचा ऐवज लौकर घेतला पाहिजे तरी तुम्हीं रसदेचा ठराव करून घेऊन भरणा सत्वर करणें जाणिजे छ १३ सफर आज्ञाप्रमाण
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ६०
नकल श्री श्रावण बा।३०।१६९०
राजश्री खंडो बाबूराव कमाविसदार सरकार बिगड गोसावी यांसि
अखंडित लक्षुमी अलंकृत राजमान्य स्नो तुकोजी होळकर दंडवत सु। तिसा सितैन मया व अलफ राजश्री गणेश नारायण नि।। राजश्री गोविंद शिवराम यांसि सरकारांतून सरकारमजकूर येथील मजमूची असामी करार करून सालीना वेतन रुपये ३०० तीनशें तुम्हांकडून देविले आहेत तरी तुम्हीं सरकारमजकुरीं मशारनिलेचे हातून मजमूचे प्रयोजन घेऊन सदरहू तीनशे रु।। माहालमाऐवजीं पावते करीत जाणें जाणिजे छ २९ रा।खर बहुत काय लिहिणें
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ५९
श्रीशंकर
राजश्री सखाराम भगवंत यांसि व गोविंद शिवरामसि
विनंति उपरि भोजनोत्तर चार सा घटिका बसोन फडशा केला पाहिजे बराबर गोपाळराव कृष्णराव बल्लाळ व रास्ते यांस हि घेऊन येणें आम्हांकडील हि कारभारी बोलाविले आहेत सारे च पाहिजेत एक कमी कामास नये सा-यांचे गुजारतीनें चिट्या हवाला कराव्या लागतील पुढें कितेक लंढे राहतील ते उगवण्यास दिक्कत पडली न पाहिजे नाहींतरी चिट्या किल्ल्याच्या हातास आल्यावरी तुमची काळजी हरली मग आमची कामें ढालढकलीखालीं पडल्यास कसें पुरवेल यास्तव अगोदर पक्कें करावयास सारे पाहिजेत हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ५८
श्रावण वा ९।१६९० श्री. नक्कल
राजश्री त्रिंबकनाईक कमाविसदार ता। देवपूर गोसावी यासी अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्त्रे।। तुकोजी होळकर रामराम सु।। तिसा सितैन मया व अलफ राजश्री रामचंद्र निंबाजीनों राजश्री गोविंद शिवराम यास ता।मजकुरीं सरकारांतून दप्तरदारीची असामी करार करून सालीना वेतन रु।। २०० दोनशें तुम्हांकडून देविले असेत तरी तुम्हीं मशारनिलेचे हातून दप्तरदारीचें लिहिंप्याचें प्रयोजन घेऊन सदरहू दोनशें रुपये वेतन महालमजकुरऐवजीं पावते करीत जाणे जाणिजे छ २३ रा।खर बहुत काय लिहिणें.
मोर्तब शिका