Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५
श्री १६१५ भाद्रपद वद्य ११
राजश्री सुंदर तुकदेऊ
गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री राजा कर्ण दंडवत सु॥ सन अर्बा तिसैन अलफ तपे मसूर पा। कराड एथील देशमुखी पुरातन माहादजी बिन सुलतनाजी जगदळे याचे वतन पुरातन चालले आहे त्या वतनानिमित्य पूर्वी चंदीच्या मुकामी एऊन राजश्री स्वामिसनिध आपले वर्तमान सागितले आणि वतनानिमित्य सेरणी कबूल केली त्यावरी राजश्री स्वामीने तपेमजकूरचे वतन यास मर्हामत करून वतनाची पत्रे करून दिल्ही ते पत्रे घेऊन ते हि रा। रामचद्रपतास जवळी गेले तेही यापासून थोडेबहुत द्रव्य दिवाणात घेऊन वतन याचा यास दुबाला केला त्यास तुम्ही तपेमजकूर दे॥ कराडप्रातीची देसमुखी वतन आह्मास दिल्ही आहे ह्मणून ह्याच्या वतनास इस्कील केले याकरिता मशारनिले मागती चजीस एऊन राजश्री स्वामीस वर्तमान विदित केले त्यावरून आह्मास बोलाऊन राजश्री स्वामीने आज्ञा केली की तपेमसूरची देशमुख माहादजी जगदळे यास दिल्ही आहे एविशी मा। सुदर तुकदेव यास पत्र दिल्हे आहे तुह्मी आपली पत्रे देउन याचे वतन याचे स्वाधीन करणे तपेमजकुरीची देशमुखी यास दिल्ही आहे ह्मणून आज्ञा केली याकरिता तुह्मास हे पत्र लिहिले आहे तरी तपेमसूरची देशमुखी माहादजी जगदळे यास वौशपरंपरेने चालवावे ऐसा निर्वारूप राजश्री स्वामीने पत्रे दिल्ही आहेत तरी तुह्मी तपेमजकूरचे वतनास इस्कील अथवा खलील न करिता माहादजी जगदळे याचे स्वाधीन करून याचा मामला सुरक्षित चालवणे देशमुखीस हक्कलाजिमा व इनामती इसाफती जे आहे ते राजश्री स्वामीच्या पत्राप्रमाणे बिलाकुसूर चालवणे माहादजी जगदळे हे पुरातन सेवक एकनिष्ठ याचे चालवणे राजश्री स्वामीस व आह्मास बहुत च अगत्य तरी तुह्मी याउपरि कोणेविशी उजूर न करिता याचे वतन यास सुरक्षित चाले ते गोष्टी करणे सर्वथा कथळा न करणे या पत्राची प्रती लिहून घेऊन मुख्य पत्र देशमुखास परतोन देणे छ २४ मोहरम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४
श्री १६१५ भाद्रपद वद्य १
स्वस्तिश्रीराज्याभिषेकशके २० श्रीमुखनामसवत्सरे भाद्रपदबहुल प्रतिपदा भोमवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजाराम छत्रपति याणी समस्तसेनाधुरधर राजमान्य राजश्री धनाजी जाधवराऊ सेनापती यासि आज्ञा केली ऐसी जे तपे मसूर प्रा। कराड येथील देशमुखीचे वतन सालाबाद माहादजी बिन सुलतानजी जगदळे याचे पिढी दर पिढी चालत आले आहे मधे काहीक दिवस भोगवटा उठला होता याकरिता माहादजी जगदळा चजीचे मुकामी हुजूर एऊन वर्तमान विदित केले व पूर्वील कागदपत्र व पादशाहाचे फर्मान होते ते हि दाखविले त्यावरून स्वामीने मनास आणून याचे वतन याचे दुमाला करून प्रा। मजकूरीच्या देशाधिकारियास आज्ञापत्र सादर केले त्यास साप्रत राजश्री सुदर तुकदेऊ दि॥ चिरजीव राजश्री राजा कर्ण याणी कथळा केला की कराड परगणियाची देसमुखी राजश्री राजा कर्ण यास दिल्ही त्यामुळे मसूर तपियाची देसमुखी दिल्ही आहे म्हणौन वतनासी कथळा केला याकरिता माहादजी जगदळा मागती चजीचे मुकामी हुजूर एऊन वर्तमान विदित केले ऐशास पूर्वी याचे कागदपत्र मनास आणून निर्वाह करून याचे वतन खरे जाले याकरिता स्वामी कृपाळू होऊन याचे स्वाधीन केले कराडची देशमुखी चिरजीव राजा कर्ण याकडे दिल्ही आहे काही मसूर तपादेखील दिल्ही नाही ऐसे असता सुदर तुकदेऊ यास कथळा करावयास काय गरज होती हाली स्वामीने मसूरतपियाची देशमुखी माहादजी जगदळे यास चालवावयाची आज्ञा करून सुदर तुकदेव यास आज्ञापत्र सादर केले असे ते याउपरि कथळा करणार नाही तुह्मी हे जाणोन तपेमसूरीची देशमुखी सालाबादप्रमाणे माहादजी जगदळे याचे दुमाला करणे आणि याचे हाते स्वामिकार्य घेत जाणे या वतनास खलेल करील त्यास ताकीद करणे जाणिजे* बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा
माा सुरू सुद
पैाा छ २८ रबिलोवल सन खमस
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २३
श्री १६१५ भाद्रपद वद्य १
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके २० श्रीमुखनामसवत्सरे भाद्रपद बहुल प्रतिपदा भोमवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजारामछत्रपति याणी रा। खडोजी वाग मुद्राधारी व कारकून किल्ले वसतगड यासि आज्ञा केली ऐसीजे तुह्मी विनती पत्र छ ७ रमजानचे पाठविले ते छ २९ जिल्हेज प्रविष्ट जाले माहादजी जगदळे देशमुख तपे मसूर प्रा। कराड हे पूर्वी स्वामीचे सेवेसी आला होता तेव्हा स्वामीनी त्याची विनती मनास आणून वृत्तिपत्रे दिल्ही त्या प्रमाणे राजश्री राजचद्र पडित अमात्य हुकमतपन्हा याणि ही आपली पत्रे करून दिल्ही याउपरि राजश्री सुदर तुकदेऊ आले याणी देशमुखीस खलेल केले ह्मणोन महादजी जगदला सेवेसी आला आहे याचे पापत्य करून द्यावया आज्ञा केली पाहिजे ह्मणोन लिहिले ते कळो आले ऐशास माहादजी जगदला याणे स्वामीच्या पायासी येकनिष्ठा धरून सेवा केली या करिता देशमुखमजकुरावरी कृपाळून याचे वतन यास बिलाकुसूर चालवावे ऐसा निर्वाह करून राजश्री रामचद्रपत यास व राजश्री सुदर तुकदेव यास आज्ञा-पत्रे पाठविली आहे ते याचे वतन याचे स्वाधीन करून सुरक्षित चालवितील तुह्मी एकनिष्ठेनें राहोन अलगनोबत चौकस करून जागा स्वामीचा जतन करणे जाणिजे निदेश समक्ष
संमत संमत
मंत्री सचिव
सुरु सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२
श्री १६१३ पौष वद्य ९
कौलनामा अज सुभा राजश्री बाबाजी नारायण सुबेदार व कारकून प्रात सातारा ताहा माहादजी बिन सुलतानजी जगदळे देशमुख तपे मसूर व पाटील कसबेमजकूर बिना बरा सु॥ सन इसन्ने तिसैन अलफ बादे कौलनामा + + + + + + + चे विशी छत्रपती स्वामीचे व राजश्री पत अमात्य याचे आज्ञापत्र सादर जाले प्रजापतीनाम सवत्सरे वैशाख बहुल दशमी भौमवासरे पै॥ छ १० जिलकाद सालमजकूर तेथे अज्ञा की माहादजी जगदळे हुजूर एउनु चजीचे मुकामी विनति केली की स्वामीच्या पायासी एकनिष्ठता धरून कितेक स्वामिसेवा केली आहे व स्वामीचे तर्फेचे कितेक लोकाचे कबिलियास आपले ठिकाणी ठाव देउनु कबिले राहिले स्वामीचे सेवेसी नष्टाई केली नाही हे परस्परे स्वामीस विदित होउनु मशारनिले स्वमिकार्याचा व एकनिष्ठ आहे या करिता स्वामीने याजवरी कृपाळू होउनु याचे वतन देशमुखी यास पुरातन चालत होती तेणे प्रमाणे चालवावयाची आज्ञा करून अभयपत्र दिल्हे असे व सुभियास सनद सादर केली असे तरी तुह्मी हि याची देशमुखी याचे स्वाधीन करणे भोगवटा बहुत दिवस उठला होता याकरिता यास सीरणी होनु पा। २००० दोनी हजार हुजूर वसूल घेउनु देशमुखी करार केली असे याणे औरगजेबास भेटोन आपले वतन मसुरेच्या देशमुखीचा फर्मान करून घेतला ह्मणून याजवरी दोष ठेवावा तरी वतनाचा मामला म्हणून कारकीर्दि जाली ते कारकीर्दीचे कागदपत्र करून घेताती ते रीतीने याणेहि फर्मान घेतले ऐशियासि हा स्वामीच्या पायापासी आला याकरिता स्वामीने याजला मोगलास भेटला तो अन्याय क्षमा करून वतन मोकरर करून दिल्हे असे तुह्मी याजवर काही दोष न ठेवणे आणि याचे चालवीत जाणे याच्या हाते स्वामिसेवा घ्यावयाची ते घेत जाणे याच्या वतनास इतकियाउपरि खलेल न करणे याचे देशमुखीविसी बेदरचे पादशाहाचे फर्मान व इभ्राम अदल शहाचे फर्मान व सुलतान माहामद शाहाचे फर्मान व वरकड कितेक कागदपत्र होते ते स्वामीने मनास आणिले व कितेक म्हराटे लोक होते त्यास पुसिले त्यावरून देशमुखी याची नेमस्त जाली त्यावरून व याचे एक निष्ठे वरून देशमुखीवतन मोककर करून दिल्हे असे तरी याचे दुमाले करून देशमुखीचा मामला यापासून घेत जाणे म्हणून राजश्री छत्रपति स्वामीचे आज्ञा जाली त्यावरी राजश्री पतअमात्य एही तुह्मास नेउनु बोलिले जे तुमचे देशमुखीचे बहुत दिवस भोगवटा उठिला होता एदनिमित्य हुजूर राजश्री स्वामीने दोनी हजार सीर्णी तुम्हापासून घेउनु वतन दुमाले केले व हाली एथे मनास आणिता तुमचे वतन बहुत दिवस चालिले नाही याकरिता तुमचे माथा सीर्णी होन पा। ७५० साडे सातसे घेतले आणि तुम्हास दुमालपत्र आमचे नावे दिल्हे तरी तुम्ही आपली देशमुखी चालउनु सुखरूप असणे राजश्री स्वामीच्या पायापासी एकनिष्ठता धरून वतनावरी सुखरूप असणे आणि पुत्रपौत्री वशपरपरेने चालवीत जाणे वतनाचा हक्कलाजिमा व इनाम पेषजी फर्मानी भोगवटा चालिला असेल त्याप्रमाणे हाली लावणामाफिक हक्कलाजिमा खाउनु सुखरूप असणे कोणेविशी शकअदेशा न धरणे बेशक होउनु आपले देशमुखीचे प्रयोजन चालउनु सुखरूप असणे दरीबाब कौल असे रा। छ २२ रबिलाखर दरीबाब कोष्ल असे मोर्तब सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २१
श्री १६१३ ज्येष्ट वद्य ७
मा। अनाम माहादजी जगदळे देशमुख कर्यात मसूर सुभा प्रात सातारा यासी रामचद्र नीळकठ अमात्य सुहुरसन इसन्ने तिसैन अलफ कर्यातमजकूरची देशमुखी पुरातन होती त्याचा भोगवटा बहुत दिवस राहिला या कारणे तुह्मी राजश्री स्वामीचे सेवसी जाऊन विनति केली व व्रीतिपत्रे होती ती विदित केली त्यावरून मनास आणून बहूत दिवस भोगवटा राहिला या कारणे सेरणी होन पा। दोनी हजार ठेऊन तुमची देशमुखी तुमच्या दुमाला करविली यावरी एथे मनास आणिता बहुत दिवस भोगवटा राहिला व्रीतीपत्रे करून द्यावी लागतात ह्मणऊन तुमचे माथा आणिखी होन पा। ७५० साडे सात से सेरणी ठेऊन कर्यातमजकूरची देशमुखी दुमाला केली असे सदर्हू सेरणीपैकी देणे होन पा।
बा। देणे खरीदी गल्ला बद्दल बद्दल मुशाहिरा परशराम
हुजूरपागा बराबरी स्वारी त्र्यंबक मुतालीक दिमत
कारखानिसी किले सातारा मजमू सेवक राजमडळ
याकडे ऐवज तकदमा होन होन पा। बा। सिखीपरज
पादशाही १९२ ८
एकूण होन पा। दोनी से रास देविले असेत आदा करणे पावल्याचा जाब घेणे त्याप्रमाणे मजुरा असे छ १ रबिलोवल निदेश समक्ष
बार सुरू सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०
श्रीशंकर १६१३ ज्येष्ट वद्य ७
शके १६१३ प्रजापतिनाम सवछरे जेष्ठवदि सप्तमी रविवासरे तद्दिनी शर्तनामा राजश्री माहादजी जगदळे देसमुख तपे मसूर व पटेल का। मजकूर यासि राजश्री जानराऊ वागमोडे गौउ मोकदम मौजे फोडशिरस का। दहीगाऊ प्रा। माण लेहून दिल्हे ऐसे जे तुह्मी आपणास तपे मजकुरचे देसमुखी पैकी गाव ४ च्यारी दिल्हे मौजे आरवी १ मौजे नागझरी १ मौजे किरवली १ व कोपर्डे १ एकूण च्यारी गाव दिल्हे यासि तुह्मास आह्मी ४०० च्यारी से होन पादशाही दिल्हे असती ऐसियासि आह्मी तुमची पाठी राखावी वशपरपरेने पाठी राखावी ऐसे वसपरपरेने न करी तरी त्यासि वाराणसीस गोहत्या-ब्रह्महत्येचे पातक असे व तुह्मी आह्मास महजर व खरीदीखत करून दिल्हे असे त्याप्रमाण्ये तुह्मी व आह्मी वसपरपरेने चालावे सु॥ इसन्ने तिसैन अलफ तेरीख १९ माहे रमजाण हा शर्तनामा सही वळी सुमार २६ सवीस रास
साक्ष | |
रा। नेमाजी राजे सीदे रामोजी पतंगराव सेडगे |
रा। झुंझारराव देवकाते मोकदम
यमाजी बिन निंबाजी मोकदम |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९
श्रीशंकर १६१३ ज्येष्ट वद्य ६
छत्रपती
राजश्री माहादजी जगदाळे देशमूख ता। मसूर
गोसावी यास
-॥ अखंडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री स्ने॥ जानराऊ वागमोडे जोहार विनंती उपरी तुह्मी चदीचे मोकामीं राजश्री स्वामी सनिध येऊन देशमुखीचीं पत्रे करून घेतली याबद्दल रा। स्वामीनी तुह्मास हरकी मागितली ऐसियास तुह्मीपासीं पैके द्यावयास मौसर नाही या करिता आह्मापासीं येऊन घेतले होन ५०० पाचसे व तुह्मी एकले तुह्मास पाठीराखा नाही याबद्दल आमची पाठी करून तुह्मी आपले आत्म-सतोशे आह्मास आपले वतन देसमुखी ता। मजकूर पैकी च्यारी गाऊ आह्मास मिरास करून दिल्हे आहेती बी॥
मौजे आरवी मौजे नागझरी
मौजे कोपरडे मौजे किरोली
एकूण गाऊ च्यारी येथील हक्क-लाजिमा व इनाम व धार सेव व पडिले पान कुल बाजे बाबा जेणेप्रमाणे पुरातन चालत आले आहे तेणेप्रमाणे घेत जाणे ह्मणऊन सदरहू च्यारी गाऊ दिल्हे आहेती चौ गावीचा कारभार तुह्मी कर्णे तेथे आह्मी दखलगिरी करणार नाही ऐसा तुमचे व आमचे तह जाला असे आह्मी तुमची पाठी राखावी तुह्मी काही पैके याबद्दल गाऊ दिल्हे नाहीत आपली पाठी राखावी साह्या-घ्याव्यास पावावे ऐसा निर्व्हाव करून च्यारी गाऊ लेकराचेलेकरी चद्र सूर्य आसने तोवरी दिल्हे आहेती तुह्मी आतर पडे न देणे व आह्मीही पाठी राखावयास आतर पडो देणार नाही दिला तर वतनाचेमुळे टका भरी पडेली तो तकसीम बरहुकूम आह्मी देऊन हे आपले वडिलाचे इनाम सही तेरीख छ १९ रमजान सन इसन्ने तिसैन अलफ लिहिली वळी सुमार ४३ त्रेताळीस हे लिहिले सही
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८
श्री १६१३ ज्येष्ठ वद्य ७
शके १६१३ प्रजापति नाम सवछरे जेष्ट वदि सप्तमी रविवासरे तद्दिनी खरीदखत राजश्री जानराऊ वागमोडे गौउ मोकदम मौजे फोडशिरस का। दहीगाऊ प्रा। माण यासि माहादजी बिन सुलतानजी जगदळे देसमुख तपे मसूर व पटेल का। मजकूर याणी लेहून दिल्हे ऐसे जें आपण आपले वतनाच्या कार्याबद्दल चदीस राजश्री स्वामी सन्निध आला आणि आपले वतन देसमुखीचे दुमाले करून घेतले ते वख्ती राजश्री स्वामीनी आपणास हरकी मागितली ते समई आपणास टक्का पैका मिळेनासा जाहला मग आपण तुमची भेटी घेऊन तुह्मास आपले देसमुखी पैकी देह च्यार रास बी॥
मौजे आरवी १ मौजे नागझरी १ मौजे किरवली १ मौजे कोपर्डे १ एकून च्यार गाऊ चौसे ४०० होन पातशाही तुह्मापासून घेऊन सदरहू गाव तुह्मास ४ दिल्हे असेत याचा अलाहिदा माहजर करून दिल्हा असे व पैके चदीचे मुक्कामी सदरहू होन च्यारसे होन पा। आपणास पावले हे गाव दुसरियास दिल्हे असिले आणि दुसरियाने कथळा करावयास गरज कोणासी नाही आपण वारून सु॥ इसन्ने तिसैन अलफ हे खरीदखत सही छ १९ रमजान वली सुमार २९ एकोणतीस रास* हेषरीद पत सही
साक्ष पैके आह्मां हजूर पावले
राजेश्री नेमाजी राजे सिंदे ![]() |
राजश्री झुजारराव देवकाते मोकदम मौजे मेखळी का। बारामती प्रांत सुपें येमाजी पाटील मौजे लाहासुर्णे पाा इंदापूर |
अजगरराव माडकर मोकदम मौजे व्याहाळें पा। कडेवळीत |
बाजी मासाळ यमो कदम मौजे आगो ती पाा इंदापूर |
रामोजी पतंगराव सेडगे
तेरीख १९ रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७
श्री १६१३ ज्येष्ठ वद्य ७
छत्रपती
राजश्री माहादजी देसमुख
पा। मसूर गोसावी यासि
॥ फखडितलक्ष्मीमडित याविराजित राजश्री स्नेहपूर्वक विठोजीराजे सिदे जोहार सु॥ इसन्ने तिसैन अलफ तुह्मी राजश्री
स्वामीपासीं चजीस एउनु आपले देसमुखीची सनद असनादे करून घेतली आणि राजश्रीस हरकी कबूल केली त्यासि आपणापासीं एउनु वर्तमान सागितलीयावर तुह्मी वतनदार नाईक ह्मणौनु आपण तुह्मास होन पातशाही ३०० तीनसे दिधली ऐसियासि त्यापैकी तुह्मी आपणास खत बेजा २०० दिधले बाकी सेभर होन उरले ते आपण तुह्मास बक्षीस दिधले असेती देशामधे आपला कदीम व भाऊ रा। बावाजीराजे आहेती यासि पावते करून त्याचे उत्तर आह्मास पाठवणे वरकड बहुत काय लिहिणे सदर्हू दो शा होनास मुदत एका वरसाची केली असे कळले पाहिजे रा। छ २० रमजान *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १६
श्री १६१३ वैशाख वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १७ प्रजापतिनाम सवत्सरे वैशाख बहुल दसमी भोमवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजाराम छत्रपति याणी राजश्री नागोजीराउ व चादजीराउ पाटणकर देसमुख पा। पाटणयासि आज्ञा केली ऐसीजे, तुह्मी माहादजी जगदळे देशमुख याबरोबरी विनतिपत्र पाठविले ते पावले माहादजी देशमुख याचे देशमुखीचा भोगवटा कितेक दिवस तुटला आहे ऐशास हे पुरातन वतनदार या पासी बेदरचे पादशहाचे फर्मान व इभराईम आदलशाहाचे फर्मान व सुलतान माहमदशाहाचे फर्मान व वरकड कागदपत्र पूर्वील भोगवटियाचे आहेती तरी याचे वर्तमान स्वामीने मनास आणून याजवरी कृपा करून याचे वतन देशमुखी यास चालविण्याची आज्ञा करून अभयपत्र करून देविले पाहिजे ह्मणोन कित्येक तपसिले लिहिले ते विदित जाले व माहादजी देशमुख याणे आपले वर्तमान जाहीर करून कागदपत्र रुजू केले ते सर्वही मनास आणिले आणि माहादजी जगदळे याची देशमुखी यास चालवायाची आज्ञा केली आहे व अभयपत्र दिल्हे आहे व सुभियाचे नावे सनद सादरकेली आहे तेणेप्रमाणे याचे देशमुखीचे वतन याचे यास चालेल काही अतर पडणार नाही व या उपरी याचे वतनास इस्कील व खलेल होणार नाही जाणिजे निदेश समक्ष
बार सूद
सुरू सूद