पत्रांक ५८
श्रावण वा ९।१६९० श्री. नक्कल
राजश्री त्रिंबकनाईक कमाविसदार ता। देवपूर गोसावी यासी अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्त्रे।। तुकोजी होळकर रामराम सु।। तिसा सितैन मया व अलफ राजश्री रामचंद्र निंबाजीनों राजश्री गोविंद शिवराम यास ता।मजकुरीं सरकारांतून दप्तरदारीची असामी करार करून सालीना वेतन रु।। २०० दोनशें तुम्हांकडून देविले असेत तरी तुम्हीं मशारनिलेचे हातून दप्तरदारीचें लिहिंप्याचें प्रयोजन घेऊन सदरहू दोनशें रुपये वेतन महालमजकुरऐवजीं पावते करीत जाणे जाणिजे छ २३ रा।खर बहुत काय लिहिणें.
मोर्तब शिका