Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५
श्री १६१३ चैत्र शुध्द १०
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक १७ प्रजापतीनाम सवत्सरे दशमी सो (भौ) मवासरे क्षत्रियकलवतस श्रीराजाराम छत्रपती याणी समस्तसेनाधुरधर राजमान्य राजश्री सताजी घोरपडे सेनापती यासि आज्ञा केली ऐसीजे तुह्मी माहादजी जगदळे देसमुख रा हरी विनतीपत्र पाठविले ते पावले महादजी जगदळे देशमुख ता। मजकूर याचे वतन याचे यास चालविण्याची आज्ञा केली पाहिजे ह्मणोन लिहिले त्यावरून व माहादजीच्या विनतीवरून मनास आणिले पुर्वी बेदरचे पादशाहाचे व विजापूरचे पादशाहाचे होते तेही पाहिले
हे मर्हाटे लोक त्या प्रातीचे वतनदार होते त्यास ही पूर्वी + + + जगदळे का। मजकूरचे देशमूख ऐसे नेमस्त जाले व तुमच्या पत्रावरून विदित जाली ह्मणोन स्वामी याच्यावरी कृपाळू होउनु याचे वतन यास चालवायाची आज्ञा करून पत्र दिल्हे असे सुभियाचे नावे सनदा सादीर केल्या असेती. त्या प्रमाणे चालेल कोण्ही बिलाहरकत करील त्यास तुह्मी ताकीद करून सुरक्षीत चालवणे. ये विशि राजश्री राजचद्र पडित अमात्य यास लिहिले आहे ते चालवीतील जाणिजे बहूत लिहीणे तरी सुज्ञ असा
बार सुरू सूद बार
प्रविष्ट श्रावण सुध गुरुवार छ ६
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४
श्री १६१३
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके + + + + + + + + + + + + क्षत्रियकुलावतस श्रीराजाराम छत्रपति याणी राजमान्य राजश्री सुदर तुकदेऊ दि॥ चिरजीव राजश्री राजा कर्ण यासी आज्ञा केली ऐसी जे माहादजी जगदळे देशमुख ता। मसूर सुभा कर्हाड याचे देशमुखीचा कथळा पूर्वी जाला होता त्यास स्वामीने याचे कागदपत्र व फर्मान पूर्वीत होते ते मनास आणून माहादजी जगदळे देशमुख स्वामीचे पायासि येकनिष्ठ स्वामिकार्याचा ह्मणून याजवरी कृपाळू होऊन मसूर तर्फेची देशमुखी याची यासि करार करून दिल्ही ते विषइची पत्रे पूर्वी राजश्री रामचद्रपतास व सुभेदारास सनदा तुह्मास आज्ञापत्र सादर जाले ऐशासी स्वामीचे पत्रा प्रमाणे राजश्री रामचद्रपती पत्रे करून दिधली तेणे प्रमाणे व सुभाचे कागद प्रमाणे देशमुख मजकुराचे वतन चालत असता साप्रत तुह्मी देशमुखमजकुराचे वतनास इसकील करून कथळा केला आहे ह्मणून विदित जाले व ता। मसूर माहालचे गाव ५७ सत्तावन फर्मानी लिहिले आहेत त्या पैकी गाव ३७ सदतीस त्या माहालाकडे चालत आहेत बाकी २० गाव यादव देसमुख ता। उबरज व ता। तारगाव व ता। आउद याच्या कथळेयामुळे चालत नाही ह्मणून विदित जाले तरी माहादजी जगदळे देशमुख ता। मसूर याचे वतन स्वामीने करार करून दिल्हे असता तुह्मास कथळा करावया काय यगरज आहे हाली हे आज्ञापत्र सादर केले आहे तरी माहादजी जगदळे देशमुख ता। मसूर याचे वतनासी कथळा न करिता सुरक्षित चाले ते करणे हक्कलाजिमा व इनाम देशमुखीस पूर्वीपासून चालत आला असेल तो चालविणे ह्मणून स्वामीने सनदा तयार केल्या आहेत त्या प्रमाणे चालविणे मसूर माहालपैकी सततीस गाव मसूरेखाले चालताती वीस गाव चालत नाही त्यासी हमशाईगोत देशमुख मोकदम चौगले मेळऊन त्याजवरी मनसुफी टाकून गोतमुखे मसुरेखालील गाव यादव बळेच खात असलिे तरी मसुरेखाले च देऊन माहादजी जगदळे याची देशमुखी चालवणे येविषई राजश्री रामचद्रपतास पत्र लिहिले आहे ते निर्वाह करून देतील तुह्मी त्यास येकजरा कथळा न करणे फिरोन बोभाटा येऊ न देणे जाणिजे बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा
सुरू सूद बार संमत
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
बिलकम हणमाजी अनत कुळकर्णी मौजेमजकूर मौजे शिरवडे व मौजे तासवडे |
|
गोही | |
बहिरोजी जाधव पाटील बिन लखमोजी पटेल का। उबरज (निशाणी नांगराची) नागोजी बिन अप्पाजी पटेल का। उबरज हणगोजी बिन करमोजी पटेल मौजे कविठे (निशाणी नांगराची) बाळोजी बिन दत्ताजी पा। मौजे कोणेगाऊ (निशाणी नांगराची) शिवाजी बिन कृष्णाजी पटेल जाधव मौजे तासवडे (निशाणी नांगराची) धारोजी बिन काळोजी सुतार मौजे कोणेगाऊ (निशाणी वाकसाची) ह्मसाजी बिन धनाजी पाटील मौजे वडूज पा। खटाव (निशाणी नागराची) |
गावलोक व बलुते मौजेमजकूर येमाजी बिन जनाजी चौगुला मौजे मजकूर काठी दुर्गोजी बिन बाजी कारवेकर चौगुला काठी शिवाजी बिन नाइकजी मालकर खोडीवाडी (निशाणी नांगराची) तुकोजी बिन भानजी थोरबळा (निशाणी नांगराची) १२ बैते मौजेमजकूर १ गणोजी बिन कान्होजी सुतार मौजे शिरवडे १ सोननाक बिन ह्मसनाक मेतरा १ जननाक बिन मगनाक माहार मौजेमजकूर १ नाइका बिन गणनाक माहार मौजेमा। १ साऊ ठाकूर बिन भैर ठाकूर मौजेमा। १ ह्मसनाक बिन भाननाक चांभार मौजेमा। जीगा १ केदारजी बिन सूर्याजी कुंभार मौजेमा। (निशाणी फड) १ रेखु बिन मोतजी कुभार मौजेमा। (निशाणी चाकाची) १ सिदोजी परीट बिन बापूजी परीट मौजेमा। सील १ संभाजी गुरव बिन तुकोजी गुरव मौजेमजकूर १ मल्हारा बिन बापूजी हजाम मौजेमजकूर (निशाणी आरसा) १ हणमत बिन अनतभट जोसी मौजेमजकूर पातडे --------- १२ |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३
श्रीगणाधीश १६१० भाद्रपद शुध्द ७
स्वस्तिश्रीनृपशालिवानशके १६१० वरशे प्रभवनामसवत्सरे भाद्रपदमास सुध्दसप्तमी रविवासरे तद्दिनी राजश्री माहादजी पाटील बिन सुलतानजी पाटील जगदळे गोसावी यासी स्नो॥ बाबाजी बिन गगाजी पाटील व माणकोजी पाटील बिन राऊजी पाटील जगदळे व माहादजी बिन नरसोजी पाटील व सूर्याजी बिन बापूजी पा। जगदळे पटेल मौजे शिरवडे यानी लेहून दिल्हे क्रयपत्र ऐसे जे आपला मूळपुरुश व तुमचा मूळ पुरुश हे एक घराणे व तुमचे वाटणीस गेले मसूर व आपले वाटणीस आले शिरवडे तुह्मी मसूरीची पटेलगी करित आह्मा आह्मी शिरवडाची पटेलगी करीत आहो व तुह्मी राजगडास गेलेती आणि माघे नाईकडे कुणबियानी कथळा मौजेमजकूरचे पटेलगीसी करून हरवाजी अजजाहातीदेमुसखी याची पाठी करून पटेलगीसी कथळा केला त्यासी व आपणासी बहुत कटकट जाहाली काळादुकळाचे आपणासी शक्ति नाहीं ऐसी जाहाली याकरिता नाईकडे आपल्यासी रेटेनात ऐसे जाहाले मग गोसावियापासी आपण उभे राहिलो नाईकडियासी वादवेवाद सागावा आपण पाठी राखावी व आपले वतन जतन करावे ह्मणऊन गोसावियासी विदित केले दुसरियानी येऊन पटेलगी जोरावारीने घ्यावी याकरिता मसूरची पाढरी व शिरवडाची पाढरी हे एकाची याकरिता मौजेमजकूरची पटेलगी निमे तुह्मी खावी व निमे आह्मी खावी ऐसा तह करून नाईकडेयासी वादवेवाद सागितला नाईकडे दूर केले हुजूर रा। स्वामीपासी निवाडपत्रे जाहाली नाईकडे खोटे त्यासी गुन्हेगारी बाधली आह्मी जगदळे खरे आह्मासी हरखी बाधली ते हरखीचे पैके होन ५० तुह्मी दिल्हे व याखेरीज आह्मासी हि काळादुकळाचे वाचविले आपले वौशीचे ह्मणौन जतन केले व आपल्यासी खावयासी पोटाकरिता होन ५० दिल्हे याबद्दल आपल्यासी माहारनागर व पातनश्रीफ वडीलपणाची हदमहदूद पाढरीवरी जे उत्पन्न होईल ते निमे दोनी ठाई तारोतार वाटून द्यावे व गाव समायीक लावावा ज्यासी फावेल त्याने लावणी करावी एकाची मोडी एकावरी न घालावी व आपल्या भाऊपणामध्ये दुसरे दिसो नेदावे आपण आधीं पान घ्यावे व मागे तुह्मी घ्यावी व नागर आधी आपण करावा व मग तुह्मी करावा ऐसे तारोतार पाढरीवरी उत्पन्न होईल ते दोनी ठाई घ्यावे यासी कोणी बिलाहरकती करणार नाही बाबाजी पाटिलाची विल्हेच्यानी हरकती केली तरी बाबाजी पाटिलाने साभाळावे व माहादजी पाटिलाच्याने आपलें साभाळावे ऐसा निछयो करून तुह्मास हे पत्र लेहून दिल्हे असे यासी कोणी बिलाहरकत करणार नाही अवलाद अफलाद लेकराचे लेकरी तजाऊफ होऊ तरी श्रीची आण असे व आपल्या वडिलाची आण असे हे क्रयपत्र सही सु॥ समान समानीन अलफ छ ७ माहे जिलकाद व नाईकडियाचे लिगाड जे पडेल ते तुह्मी वारावे आपण पाठी राखावी हे लेहून दिल्हे क्रयपत्र सही वळी सुमारे ६१ एकसष्टी रास
(निशाणी नांगराची)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
सदर्हू जणानी साक्ष दिल्ही तेथे लिहिले की जगदळे पाटील मौजे शिरवडे खरे, नाईकवडा कुणबी मौजेमजकूर हा खरा लाइणी झोडपणे पटेलगीस झोबतो परतु आपणास पाटील ऐसे दखल नाही ह्मणऊन साक्षपत्रे छ २६ जमादिलोवल सु॥ सन खमस समानैन चे हुजूर रुजू केली व कोनेर रगनाथ मुख्य देशाधिकारी प्रा। कर्हाड याची बखेर छ २७ जमादिलोवल सु॥ सन खमस समानैन ची राजश्री
छत्रपति स्वामींस आणिले आहे तेथे लिहिले आहे की हमशाही शिवधडे पाटील मोख्तसर व भले लोक मौजेमजकुरीचे बारा बलूते ऐसे कसबे पेठ ता। कोडुली येथे आणिले आणि जगदळे व नाईकडे यासि विचारिले जे हमशाही शिवधडे पाटील व गावीचे बारा बलूते सागतील त्यास तुह्मी राजी आहा की नाही ह्मणोन विचारिले त्यास जगदळे व नाईकडे बोलिले जे त्यासि आह्मी राजी आहो ह्मणोन बोलिले त्यास सागितले जे तुह्मी राजी आहा तरी राजीनामे व जमानकतबे लेहून देणे ह्मणोन सागितले त्यावरून राजीनामे व जमानकतबे लेहून दिल्हे त्यावरी हमशाही पाटील व मोख्तसर व भले लोक व बारा बलूते आणिले त्यावरी श्रीकृष्णेची क्रिया घालून आपले बेताळीस स्मरोन बरहक्क गोही देणे ह्मणोन त्यास सत्य घालून जगदळे व नाईकडे ऐसे उभे करून बहुजूर हमशाही पाटिलास व मोख्तसर व बारा बलुते यासि विचारिले तेही तक्रीरा लेहून दिल्ह्या त्या तक्रीरास ऐसे जाहाले जे जगदळे पाटील खरे जाहाले. नाईकडा कुणबी खोटा जाहाला तक्रीरा दफ्तरी विले लाविल्या यानी जगदळे व नाईकडे आपले बिराडी गेले ते च दिवशी नाईकडा कुणबी पळाला मग नाईकडियाच्या जमानदारास आणविले तो जमानदार हि गैरहजीर जाहाला मग जगदळे व तकरीरा ऐसिया सेवेसी हुजूर पाठविले आहेत त्यावरून सेवेसी श्रुत होईल जगदळे पाटील खरे जाहाले असेती निवाडपत्र द्यावया स्वामी धणी आहेती ह्मणोन बखेर रुजू केली सदर्हू साक्षपत्रावरून व बखेरीवरून हुजूर हि करीना व भोगवटा मनास आणिता दिसोन आले की मौजेमजकुरीची पटेलगी कदीम मिरासी जगदळियाची ऐसे खरे जाहाले याकरिता मौजेमजकुरीची पटेलगी जगदळियाचे दुमाला केली असे कदीम पहिलेपासून सालाबाद चालत आले आहे तेणेप्रमाणे पुढे हि अवलाद अफलाद पिढी दर पिढी चालवणे नाईकडे कुणबी मौजेमजकूर हे लाइणी झोडपणे समध नसता पटेलगीसी कथळा करीत होते ते दूर केले असेती याला मौजेमजकुरीच्या पटेलगीसी अर्थाअर्थी समध नाही मौजेमजकुरीची पटेलगीस जगदळे खरे जाहाले यासि हरकी होन पा। २५ पचवीस
नाईकडे कुणबी खोटे जाहाले यासि गुन्हेगारी होन पा। ५० पन्नास रास येऊन होन पा। ७५ पावणासे रास देखील सरदेशमुखी करार केले असेती हे निवाडपत्र सत्य
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
कुळकरणी व खोत व मोख्तसर कुणबी
व बारा बलुते मौजेमजकूर
कुळकर्णी व चौगुले व खोत व रयां
तिमाजी अनत कुळकर्णी सताजी रेवजी पवार खोत
१ १
भानजी थोटवेला कुणबी दुगौजी बिन बागी चौगुला
मौजे मजकूर १ १
बलूतियानी
केदारजी कानोजी सुतार सोना बिन ह्मासा महार
मौजे बेलवडे १ मौजेमजकूर १
ह्मासा भाना चांभार सावठाकूर बिन बहिर ठाकूर
मौजे मा।र १ १
फिरंगा बिन मोतजी दादजी हजाम मौजेमा।र
कुंभार मौजेमाार १
बहिरा बिन नारा गुरव
मौजेमजकूर १ लग ............................. ०
शिवधडे पाटीलानी व बलूतियानी
कृष्णाजी मयाजी पा। संताजी भिवजी घाटिगे
मौजे बेलवडे १ मौजे वराडे १
भिवजी बिन नरसोजी जाधव संभाजी जेताजी घोलप
पटेल मौजे तासवडे १ मौजे निगडी १
बाळोजी बिन दत्ताजी चव्हाण नाईकजी जाधव व जागोजी
पा। मौजे कोणेगाऊ १ जाधव पटेल कसबे
धारोजी बिन काळोजी उंबरज १
सुतार मौजे कोणेगाऊ १ लग ..................... ०
कसबे मसूर
रुद्राजी नरसिह कुळकर्णी रामजी बिन जनकोजी
का। मा।र १ चौगुला मौजेमा।र १
बहिरजी जानोजी सुतार मोतनाक बिन जननाक
का। मा।र १ ह्मेतरा का। मा।र १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२
श्री १६०७ ज्येष्ट वद्य १३
तालीक बंद ५/४ च्यार
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके क्रोधनामसंवत्सर
ज्येष्टबहुल त्रयोदशी भृगुवासर सुरसन सीत समानीन अलफ करणे जाहाला निवाडा ऐसा जे माणकोजी बिन राहूजी जगदळा पटेल मौजे शिराडे ता। उबरज यामधे व शिवाजी नाईकडा व नरसोजी नाईकडा कुणबी मौजेमजकूर यामधे मौजेमजकूरचे निमे पटेलगीचा वेव्हार लागोन माणकोजी जदळा पटेल याचा भाऊ माहादजी पटेल का। मसूर ता। मा।र हुजूर येऊन विदित केले की मौजेमजकूरची पटेलगी आह्मा जगदळियाची वृत्ति कदीम सालाबाद पहिलेपासून चालत असता लाइणी शिवाजी नाईकडा निमे पटेलकीसी कथळा करितो तरी स्वामीनी त्याचा व आपला बरहक्क निवाडा केला पाहिजे ह्मणोन विदित केले त्यावरून राजश्री कोनेर रगनाथ मुख्य देशाधिकारी प्रा। कर्हाड यासि आज्ञापत्र सादर केले की माणकोजी जगदळा पाटील याला तुह्माजवळी पाठविला असे शिवाजी नाईकडा यासि हि सुभा बोलाऊन घेऊन हरदोजणाचा जमान घेणे आणि देशमुख व देशकुळकरणी व हमशाही गावीचे मोकदम व मौजे मजकुरीचे बलुते ऐसे वृध वृध जमा करून श्रीचे देवालयी नेऊन त्यास सतय घालून विचारणे की मौजेमजकूरची पटेलकी कदीम वृत्ति कोणाची भोगवटा कोणाचा कैसा किती दिवस चालिला आहे हे साग वर्तमान सत्यपूर्वक सागतील त्याचे साक्षपत्र व त्याचा निशानानसी व त्यावरी तुह्मी आपली मुद्रा करून साक्षपत्र व हरदो वादी ऐसे हुजूर पाठवणे मनास आणून बरहक्क निवाडा करून निवाडपत्र व राजश्री स्वामीचे आज्ञापत्र सादर होईल तेणेप्रा। वर्तवणे एकाचा आकस व कोशीस सर्वथा न करणे परनिष्ठ जैसे असेल तैसे लिहिणे ह्मणोन पत्र सादर केले होते त्यावरून कोनेर रगनाथ यानी माहाली हमशाही शिवधडे पाटील व मोख्तसर भले लोक व मौजेमजकुरी बारा बलुते ऐसे कसबे पेठ ता। कोडुली येथे जमा करून हरदोजणा वादियाचे राजीपणे राजीनामे लेहून घेऊन हमशाही पाटील व मोख्त३सर भले लोक व बारा बलुते यासी श्रीकृष्णेची क्रिया व सत्य घालून व आपले बेताळीस स्मरोन बरहक्क गोही देणे ह्मणोन त्यास सत्य घातले त्यावरून त्यानी साक्ष दीधली त्याचे साक्षपत्र माहालीहून आले बितपसील
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
एकूण कलमे ७ सात रास याचा कलमाचे कलम सदर्हूप्रमाणे निर्वाह केला आहे ऐसियास माहालीं आकस व कोसीस कराल आणि हुजूर राजश्री स्वामि कलमाचा कलम मनास आणितील तेव्हा आकास व कोसीस दिसोन आली ह्मणजे स्वामि तुमचा मुलाहिजा करणार नाही ऐसे बरे समजोन परनिस्ट लिहिलेप्रमाणे चौकस मनास आणोन हुजूर राजश्री स्वामिचे सेवेस लिहिणे ह्मणोन देशाधिकारी व पारपत्यगार ता। मजकूर यासि आज्ञा हे निवाडपत्र सत्य निदेश समक्ष रुजू.*
तेरीख ५ रबिलोवल
सु।। खमस समानीन सलफ
सुरु सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
सताजी पाटील मौजे सिवडे व मौजे वराडे ता। मजकूर येथील आपला हरास करून सेतेभाते सितोजी भोसले यानी गुराकडून चारविले व नेले ह्मणोन सताजी मजकुराने विदित केले बितपसील
कि॥ कलम सताजी घाटगा पा। याचे ए॥ साडे एकेताळीस बिघे सितोजी लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ०
|
कि॥ कलम सताजी पाटेल याच्या तिही कि॥ कलम सताजी पा। याचे पेवे
|
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
कि॥ कलम माहादजी पाटिलावर होन तरवार १ कुडकिया देखील मोते कि॥ होन पा। यापैकी सटवोजी भोसले कबूल जाले यास निर्वाह माहादजी पाटिलावर गुल |
कि॥ कलम माहादजी पा। याचे कडबा मौजे कोणेगव्हाण व का। मसूर ए॥ कलम १ लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ० लग .......................................... ०
|