पत्रांक ६०
नकल श्री श्रावण बा।३०।१६९०
राजश्री खंडो बाबूराव कमाविसदार सरकार बिगड गोसावी यांसि
अखंडित लक्षुमी अलंकृत राजमान्य स्नो तुकोजी होळकर दंडवत सु। तिसा सितैन मया व अलफ राजश्री गणेश नारायण नि।। राजश्री गोविंद शिवराम यांसि सरकारांतून सरकारमजकूर येथील मजमूची असामी करार करून सालीना वेतन रुपये ३०० तीनशें तुम्हांकडून देविले आहेत तरी तुम्हीं सरकारमजकुरीं मशारनिलेचे हातून मजमूचे प्रयोजन घेऊन सदरहू तीनशे रु।। माहालमाऐवजीं पावते करीत जाणें जाणिजे छ २९ रा।खर बहुत काय लिहिणें