Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ४७
श्री. श १६८८ फाल्गुन वा४
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री आबाजी महादेव गोसावी यांसि सेवक माधवराव बल्लाळ प्रधान सु।। सबा सितैन मया अलफ प्रस्तुत तुमचें पत्र येऊन कांहीं च अर्थ कळत नाहीं तर प्रस्तुत तीर्थस्वरूप कोठें आहेत पुढें कोणीकडे जावयाचा विचार तें सविस्तर बारीक मोठे अर्थ लिहिणे वरकड राजश्री गोविंद शिवराम याणी लिहिलें आहे त्यावरून कळेल जाणिजे छ १८ सवाल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ४६
श्री.
राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी
पो बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति श्रीमंत रावसाहेबांचे पत्र आलें कीं पुरंधरास दागिने होते त्या पैकीं पुण्यास आले हे वजा करून बाकीचे सोने रुप्याचे दागिन्यांची याद तीर्थरूपास समजावणे त्यास आपल्या जवळ याद आहे च व बाकी दागिन्यांचा मजकूर कसकसा जाहाला लिहून पाठवावें व याद समजावावयाची असली तर श्रीमंतास समजवावी आणि कोठें म्हणता तें लिहून पाठवावें कनडफुलमरीपैटणबीडचे गांव वराडचे गांव व सुतांडा मिळोन साडेतीन लक्ष रुपये चिंतोपंताचे मारफतीनें बोलतात चेहलदू निराळा काढावा म्हणोन आम्ही म्हणतों मागाहून लिहून पाठऊं चिंतोपंतानीं आम्ही आल्यापूर्वी खानदेशचे तेरीज धरून फडशा करीत होते ते आम्ही आल्यावर फिरऊन जाजती साठ सत्तर हजार साधून विल्हेस लावले तुम्हांस कळावें याजकरितां लिहिलें असे बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विनंति
राजश्री नारो बाबाजीनीं सांगितले त्याजवरून कळलें असो जें होईल तें पाहावें हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ४५
श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसी
पोष्य त्रिंबक सदाशिव व मोरो बाबूराव कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन केलें पाहिजे विशेष तुम्हीं पत्रें पाठविलीं तीं पावोन परम उल्हास जाहाला या च प्रकारें सदैव कुशलार्थ लिहून संतोषवीत असावें इनामगांवच्या पत्राविशीं लिहिलें व कुरणाचा मजकूर लिहिला त्यावरून श्रीमंतास विनंति करून ध्यानांत आणून दिल्हें त्याउपरि तुम्हांस पत्र लिहून दिल्हें आहे तें पाठविलें आहे त्यावरून कळेल सारांश गुता नाहीं पत्रें देतील हें पत्र च सनदेप्रमाणें आहे तुम्हीं हि भाद्रपद अखेर याल आलियावर पत्राचा हि प्रकार होईल इकडील वर्तमान तर हैदरनाइकाकडील बोलीचा प्रकार लागला आहे ठराव होईलसे दिसतें या मासांत निकाल पडेलसे दिसतें माहादशेटीचे मार्फतीनें राजकारण आहे राजश्री गोपाळराव दादा सावनुरास होते ते इकडे बोलाविले आहेत विठ्ठल शिवदेव तेथें जाऊन राहिले आहेत गोपाळरायासीं ऐवजाचा मजकूर बोलून जें होईल तें कारतों राजश्री मोरोबाआबासीं बोललों आहें त्याणी सांगितलें कीं या गोष्टीची काळजी आहे दादा आल्यावर थोडीबहुत तजवीज करितों असे बोलले आहेत आम्ही हि सर्वप्रकार त्यांसीं बोललों त्यास गोपाळराव आल्यावर कांहीं विल्हे लागावेसे आहे तेथें तुम्हीं येथील श्रीमंताचे लक्षाप्रमाणें मुख्याची मर्जी कायम राखलीत येणेंकरून यजमान तुमचे ठाई बहुत कृपायुक्त आहेत आम्हास हि याजहून विशेष दुसरें नाहीं वरचेवर वर्तमान लिहीत जावें नारोपंत पोंकशे यास समागमें आणावें बहुत काय लिहिणे कृपालोभ असों दीजे हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ४४
पो छ १९ रमजान श्री. १६८५ फाल्गुन शु।। ८
यादी सरकारच्या फौजेचा अजमास सु।। आर्बा सीतैन मया व अलफ छ ७ रमजान
कित्ता कित्ता
२००० विठ्ठल शिवदेव ५०० धोंडो दत्तात्रय
२५०० नारो शंकर ९०० शाहाजी भोसले
३००० गोपाळराव ५००० हुजरातदेखील पागा
९०० सखाराम भगवंत -------------
५०० नरसिंगराव धायगुडे ६४००
३०० विसाजी नारायण १०४०० कित्ता
१००० नीळकंठ महादेव ---------------
२०० बाबूजी नाईक १६८००
----------------
१०४००
फौज आज ता।
याप्रमाणें जमा जाहाली आहे याखेरीज रास्ते व विसाजी कृष्ण व त्रिंबकराव शिवदेव निघोन आले लौकरच येऊन भेटतील व रामचंद्र जाधवराव चितापुरावर आहेत ते हि लवकर च येणार तीन हजार पर्यंत फौज आहे व गाडदी हजार दीड हजार पर्यंत आहेत मीर मोगल हि समागमें आहेत जाधव रायासमागमें बहुधा येतील किंवा न येत हें कळेना याखेरीज दोनतीनशें स्वार नित्य येत च आहेत
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ४३
श्री. शके १७०४ पौष वा। ३
राजश्री नीलकंठराव गोसावी यांसि अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्त्रो तुकोजी होळकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित जावें विशेष तुम्हीं पत्र पाठविलें तें पाऊन लेखनार्थ अवगत जाला मौजे पाटेठाण ता। सांडस हा गांव तुम्हांकडील याजवर जकातवैरणीचा वगैरे रोखा जाला आहे त्यास मनाचिटी गांवास पाठवावी म्हणोन लि।। ऐशियास तुमच्या लिहिल्यावरून मौजे मजकुरास मनाचिटी देऊन स्वार बोलाऊन घेतले असत गांवास कोणेविशीं उपसर्ग लागू पावणार नाहीं रा। छ १७ सफर सु।। सलास समानीन मया व अलफ बहुत काय लिहिणे हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ४२
पे।। छ ९ जिल्काद श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसीं:-
पोष्य जगन्नाथ कृष्ण कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता। चैत्र वद्य १३ मु।। कराड आपले कृपे करून वर्तमान यथास्थित असे विशेष बहुत दिवस आपणाकडून पत्र येऊन कुशलार्थ कळत नाहीं तेणें करून चित्त सापेक्षित असे तरी ऐसें नसावें सदैव पत्रीं सांभाळ करावा उचित आहे. यानंतर आपले आज्ञेप्रमाणें श्रीमंत राजश्री पंतप्रतिनिधिसन्निध आहों परंतु लक्ष आपल्यापाशीं आहे आपण तेथें यजमानापाशीं आहेत तेणें करून आमचें चित्त स्वस्थ आहे श्रीमंत राजश्री पंतप्रतिनिधि यांसि आपलें स्मरण बहुत वारंवार होत आहे आम्ही हि आपला मजकूर सर्व निवेदन करीत आहों हें घर सर्व प्रकारें आपलें आहे तरी तेथें आपण आहेत बहुत लोक बहुता रीतीनें गैरवाका यजमानास समजावयास चुकत नाहीं यास्तव सूचना लिहिली आहे सर्व बंदोबस्त आपल्यावर आहे असा दृढभाव चित्तांत आणून श्रीमंतानी राजश्री अप्पाजी गंगाधर आपणाकडे पाठविले आहेत हिकडील सर्व कर्तव्यार्थ निवेदन करितील ध्यानांत आणून सर्वप्रकारें जो जो मजकूर पडेल त्याचें निराकरण करणार आपण वडील आहेत सांप्रत दातेगड व वासोटा वेढा बसोन आकर्षणांत बहुत रीतीनें आणिले आहेत परंतु लोक फितवेखोर बहुत आहेत तें पत्रीं कोठवर लिहावें ? राजश्री गमाजीबाबा यांचे अनुसंधान तेथें लागलें आहे राजश्री वेंकाजीपंत याचे हातें आस्वासन आहे ऐसें आइकितों याकरितां तो दरबार रक्षण करून आमचें संरक्षण होय तें करणें आपणास आगत्य आहे तेथे विस्तार काय लिहूं आम्हीं आपले पदरचा स्नेह बहुत दिवस जोडिला आहे त्याचें सार्थक आम्हांपरोक्ष आपण आपण केलें हें हि आम्हांस परभारें कळलें च आहे आम्हीं ल्याहावें तेव्हां स्मरण व्हावें असें नाहीं परंतु सूचनार्थ विनंनि लि।। आहे गकारनामकाचें सूत्र लागलें म्हणून ऐकिलें याची तरतूज आपण करितील परंतु हे पत्र पाहून निर्भय उत्तर पाठवावया आपण आहेत कृपा वर्धमान केली पाहिजे हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ४१
श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसीं
पे।। बापूजी महादेव साष्टांग दंडवत विनंति येथील कुशल ता। छ १ शवाल जाणोन स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे विशेष आपण स्मरण करून कृपापुरस्कर पत्र पाठविलें तें पावोन, बहुत आनंद जाहाला राजश्री नाना याचे लग्नाचा निश्चय केल्याचा मजकूर लिहिला तो कळला त्यास अतीउत्कर्ष संतोष जाहाला कार्यसिद्धी उरकोन घ्यावी श्रीमंत हरिहरेश्वरचें दर्शन करून माघारा फिरले कळावें बहत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ४०
पो छ २२ माहे जोवल श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसी
पोष्य त्रिंबकराव सदाशिव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता। छ ५ जमादिलोवल मु।। धारवाड येथें सुस्वरूप असों विशेष इकडील वर्तमान तर धारवाडास मोर्चे लाविले आहेत गांव बोलूं हि लागला आहे लवकर च आठा-चौ दिवशीं येईल हैदरनाईक जडेहनवटीवर आहे कांही फौज मीरफैजुल्ला बराबर मुर्डगोडावर आला आहे त्याजवर श्रीमंतांनी हि गोपाळराव व रास्ते वगैरे आणिखीं दोनचार पथकें पाठविलीं आहेत कुरणाचा मजकूर तर मागे च एकादोन पत्रीं लिहिला आहे त्याजवरून कळेल दादासाहेबानी यावें हें रावसाहेबांचे मनांत फार आहे लवकर यावें हें उत्तम आहे तिकडील वर्तमान मोंगलाकडील व सिंद्याकडील भोसले गाइकवाड यांकडील व फौज किती जमा होईल किती दिवसा येणें होईल होळकाराकडील अधिकोत्तर सर्व लिहून पाठवावें वरकड भेटीनंतर कळेल एकदोन पत्रें बारीक मजकुराचीं आपले पत्राचीं उत्तरे पाठविली आहेत तीं पावलीं च असतील त्यावरून सर्व कळेल भेट होईल तो अपूर्व दिवस आहे लोभ असा दीजे हे विनंति
अपत्यें अप्पाचे साष्टांग नमस्कार विनंति वडिलीं कृपा करून तीर्थरूप यांचे पत्राबरोबर पत्रें पाठविलीं पावोन परम समाधान जालें ऐसें च सदैव पत्रे पाठऊन संतोषवीत जावें हे विज्ञापना
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ३९
पेशा छ ९ जिल्काद श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी
पोष्य सर्वोत्तम शंकर साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता। चैत्र वद्य नवमी पर्यंत मु।। हावनूर तुंगभद्रा दक्षणतीर येथें सुखरूप आहों विशेष आपणाकडून बहुत दिवस पत्र येऊन वृत्त कळत नाहीं व येथून एकदोन पत्रें पाठविलीं त्यांचें हि उत्तर न आलें तरी ऐसें पूर्ण कृपेचे ठाई नसावें यास्तव सदेदित पत्रे प्रेषण करून परामर्ष करावा यानंतर इकडील वर्तमान तरी मनोळीहून निघोन धारवाड उजवें घालून सावनुरास आलों तेथें पठाण सावनूरकर येऊन भेटला व हैदरनाईक मायनहळी येथें झाडीचे तोंडी व मीरफैजल्ला बंकापुराजवळून साहा कोशावर होता पुढें नये यामुळे हरपनळी व चित्रदुर्ग यांची खंडळी उरकावी या अर्थे तेथून कूच करून मु।। मजकुरीं आले तों हैदरनाईक तेथून निघोन सावनूरास जाऊन शह द्यावा या अर्थे आले बलारी फिरोन माघारे वाला नदीवर मुक्काम केला एथून सडी स्वारी करून गांठ घालणार व हिंदुस्थानाकडील यथास्थित वृत्त कळत नाहीं कृपा करून करून लिहिलें पाहिजे बहुत काय लिहिणें कृपालोभ असो दिल्हा पाहिजे हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ३८
श्रीम्हाळसाकांत
पो छ ४ रो। वल चैत्र शके १७३३
राजश्री गोविंदराव नीलकंठ गोसावी यांसि अखंडितडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्त्रे।। यशवंतराव होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें विशेष तुम्हांकरितां मकरसंक्रमणाचे तीळ शर्करामिश्रित पाठविले आहेत हे स्वीकारून उत्तर पाठवणे रा।। छ १७ जिल्हेज सु।। इहिदे अशर मया तैन व अलफ बहुत काय लिहिणे हे विनंति