Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

वद्य ११ शुक्रवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान व राजश्री सदाशिवपंतभाऊ असे मोहुर्तेकडून निघोन पहाटेस बाहेर गेले. राजश्री गोविंदराऊ बिन्न अडबोजी शितोळे देशमुख याच्या भांबोडियाच्या शेतांत जाऊन तेथें डेरे देऊन राहिले. शेत सारें लुटलें. त्याचे रु॥ १५० गोविंदरायास दिल्हे.

कार्तिक शुद्ध १ बुधवारीं दिपवाळी. संतबा देशमुख याणी आपला पुत्र यशवंतराऊ यास घरी दिल्ही. कारकून कोण्ही बोलावले नव्हते. गोविंदराऊहि गेले नव्हते. त्याणींच मनस्वीपणें दिल्हा.

मातुश्री ताराऊसाहेब याजकडे श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान याणीं मधेस्तीस राजश्री धोंडो गोविंद वकील व राजश्री महादाजी नाईक निंबाळकर व राजश्री दिनकर महादेव, ऐसे सातारियास किल्ल्यावर पाठविले होते. त्यास, ते तेथें जाऊन त्यांचें व यांचें बोलणें काय जालें हें कळेना. परंतु मातुश्री ताराबाई व राजश्री ऐशी कार्तिक शुद्ध ५ रविवारीं दोप्रहरा दिवसा किल्ल्याखाली उतरोन राजश्री फत्तेसिंगबावाच्या वाडियांत जाऊन राहिली.

कार्तिक वद्य ( कोरें ) राजश्री दमाजी गायकवाड यासी आवजी कवडियाच्या वाडियांतून काहाडून चिंतो गणेश देशपांडे यांच्या वाडियांत नेऊन ठेविले.

कार्तिक रुजू मार्गेश्वर शुद्ध ७ गुरुवारीं दमाजी गायकवाड याजला चिंतो गणेश देशपांडे याच्या वाडियांतून काहाडून लोहगडावर ठेवावयास रवाना केले. व रोजमजकुरींच श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांच्या व राजश्री दादोबा प्रतिनिधी यांच्या भेटी बहूळचे मुक्कामीं जाल्या. व राजश्री महादाजी अंबाजी पुरंधरे हे मुलेंलेकरें घेऊन रोजमजकुरीं स्वार होऊन जेजूरीस देवदर्शणास गेले. तेथून देवदर्शण करून सासवडास येऊन मग श्रीमंताकडे लश्करांत जाणार.

शुद्ध ११ बुधवारी राजश्री रामाजी रंगनाथ व विनाजी रंगनाथ वाळवेकर यांजला निरोप दिल्हा. नारोपंतीं रामाजी गोपाळ याजपासून करीना रामाजीपंत उठोन गेलियावरी लेहविला. हजीर मज्यालसीची नांवे घालविली. त्याजवर जगोबाच्या हातें त्याचें नांव लेहविलें. वरकटांचींहि लेहविलीं. खालता उदंडच मजकूर लिहिला. गतवर्षीच्या नवरात्रांत वाल्हियांत व सिधेश्वराच्या देवळीं माहोछाव होत होता, तेथें रामाजीपंताचे नातू व विनाजीपंताचे नातू पाहावयास गेले. यांची कटकट जाली. विनाजीच्या नातानीं त्याजला काठी मारली. तो दाहावे रोजीं वारला. जगोबा ह्मणून त्याची आई व भाऊ पेशवियापाशी फिर्याद जाली. यांस अटकिलें. रामाजीपंतांनी विचार केला कीं, विनाजीचे सोयरे मातबर, त्यांचे भिडें आपलें कोण मनास आणतो? गोही कोण पाहतो? पाहिली तरी कोण देईल ? ऐसें चित्तांत आणून निरोप घेऊन गेलें. खंड बालेसरामधें पडोन विनाजीपंतास रामाजीपंतास एक करून निरोप देविला.

छ १६ सवाल भाद्रपद वद्य २ मंगळवारी राजश्री जानोजी निंबाळकर महाराऊ श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान याजकडे मध्यस्तीस आला आहे.

श्रावण शुद्ध ३ बुधवारी पाहटे दिवस उगवतां बुधवार राजश्री महादाजी अंबाजी पुरंधरे राजश्री नानाकडे, भाऊकडे, जाऊन आले. तिसरे प्रहरीं बोलावून नेले. सदरेस कारभारास बैसले होते. समजावीष बाबाची जाली, अगोधर आठ चार रोज मध्यस्ती होत होती. रोजमजकुरीं एकत्र जाले.

आश्विन शुद्ध ९ मंगळवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान राजश्री महादोबाबाबाचेथें संध्याकाळच्या प्रहरा दिवसास गेले. ते मधरात्रीस फिरोन आपल्या वाडियांत आले.

शुद्ध १० बुधवारीं दसरियास श्रीमंताबरोबर माहादोबाहि शिलंगणास गेले होते. दसरियाची वस्त्रेंहि दिल्हीं. मुरार गुंडाजी पेशपांडे यानीं पालखी केली. १
आश्विन वद्य ८ मंगळवारी चांबळीच्या सेडकराच्या पाटिलकीच्या महजराबर देशमुखानीं शिक्का करून दिल्हा. त्याजपासून काय घेतलें हें कळलें नाहीं. शिक्का करून महजर ता। मालोजी.

आश्विन वद्य १० गुरुवारीं रात्री बाळाजी पंडित प्रधान एकलेच माहादोबा बाबाचेथें गेले होते.

श्रा। वद्य ३ सोमवारीं श्रीपतराऊ बापूजी याच्या कचेरीस पाहारेचें दिव्य मथुरा कोल्हालीण, मौजे कानगांउ, इजपासून घेतलें. दिवीं उतरली. तिजवर, तिची जाऊ गोडाई परंतु नात्यानें सासू, तिजवर, माणका चांभार कानगांवकर यासी जात्यात ह्मणून त्याचेच घरचे पालक लेक नरसा व माहादा हे ह्मणों लागले. परंतु दृष्टीनें पाहिलें नाहीं. ते अटकेस आहेत. कोल्हालियास दोनशें रु॥ खंडले. चांभारांनी देवास शिवून शेंदूर भोगविला ह्मणून सव्वादोनशे रु॥ खंडले. शंभरेक रु॥ अगोदर मसाला घेतला होता. माणका चांभार याजला पागोटें दिल्हे. निरोप सर्वांस दिल्हा असे.

वद्य ३ सोमवारी पेशवे थेवरास गेले. मंगळवारी चतोर्थी जाली. बुधवारीं मु॥ जाला. गुरुवारी पुणियास आले. उमाबाई दाभाडीहि बा। गेली होती. १

भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस श्रीदेव चिंचवडाहून मोरेश्वरास जावयास पुणियास आले. संगमीं राहिले. पाऊस लागला. दुसरे रोजी लोणीस गांवांत मलबा कुलकर्णी याचेथें जाऊन राहिले. तिसरे रोजी पिसावियावरी राहिले. चतोर्थीस मोरेश्वरास गेली. पाऊस दोन रोज फार फार लागला यात्रेची तारांबळ फार जालीं. पंचमीच्या महानैवेद्यावर पोळ्या घालाव्या. त्या विसरले होते. आयते वेळेस नाहींतश्या कळलियावरी आणिल्या. श्रीनीं चिंचवाडाहून निघतां वहाणा बराबर घेविल्या होत्या. अन्न पुरलें. तोटा आला नाहीं. १

भाद्रपद शुद्ध ५ गुरुवारी रात्रीं धोंडो नामदेव कडेदेशपांडे, कर्यात मावळकर, यांस देवआज्ञा जाली. पुणियांतच वारले. गदाधरभट्ट ढेकणे यांचेथें राहून औषधउपाय करीत होते. गुणास न आलें. शेवट जाला असे.

शुद्ध १० मंगळवारीं एकबोटियाणीं कावडीच्या निम्मे पाटिलकीचा महजर करून घेतला. तो श्रीपतराऊ बापूजीच्या कचेरीस आणिला होता. त्याजवर तान्हाजी सोमनाथ हवालदार हवेली सांडस याचा शिक्का करून देविला.

शुद्ध दशमी मंगळवारी विश्वनाथ जोशी राहीरकर यांणीं आतुरसंन्यास घेऊन पुण्याच्या संगमीं जीतच नदींत जाऊन जलसमाध घेतली. वारले. १

श्रावण शुद्ध १० सह ११ सोमवारी पहाटेच मोरो कृष्ण देवरुखे जकाते यांस देवआज्ञा जाली. स्त्रीनें सहगमन केलें.

रोज गुदस्त श्रावण शुद्ध ९ रविवारी जेजूरकर बेलसरे यासी श्रीपतराऊ बापूजीनीं बापूजी महादेव यास पत्र दिल्हें. मोरो बाबाजी व कोंडो शामराज या उभयतांत भांडण लागले आहे. खंडोबा ह्मणतो, मोरोबा आह्मी एक, जदी भाऊ, वडील आह्मी, धाकटे मारोबा. मोरोबा ह्मणतो, हे आह्मी एक, जदी नव्हे, आपल्या बापास संतान नव्हतें जालें, याजकरितां हे राजवडिकर भाऊपाणियास आणिले, आपण यांचे सुतक अज्ञानपणें धरीत आलों, याउपरि धरूं नयेसें आपल्या चित्तास आलें, याजकरितां खंडोबाचा भाऊ बाबू वारला त्याचे सुतक आपण धरिलें नाही. त्याचे अधले रोजी आपली मातुश्री वारली, तिचे क्रियेस खंडोबानी द्वाही दिल्ही, त्याजवरून उभयतां आले, मोरोबाचे आईचा नववा दिवस, याजकरितां त्याजला सांगितले की उद्यां दाहा रोजांचें कर्म करून अकरावे दिवशीचे कर्म करून येणे, सपिंडी न करणे, खंडोबाचीहि राहिली आहे, तुझीहि राहू देणे, ऐसे करून वाटे लाविले. दुसरे तिसरे रोजी गोविंदराऊ चिटणीस याणी पेशवियाचे पत्र श्रीपतबापूजीस आणिलें कीं, मोरोबावाजीच्या आईची सपिंडी करूं देणें. त्याजवरून त्याणीं सापिंड्याहि करवणें ह्मणून पत्र दिल्हें असे. उभयतांचे भांडण आहे तें मनास आणणार. ऐसें जालें असे.

शुद्ध १० सह ११ भोमवारीं भागूबाई देशपांडीण, नारो विठ्ठलाची स्त्री, दीडप्रहरां दिवस सकाळच्या वारली. तिची क्रिया बाजी शंकर याजपासून करविली. १

शुद्ध १३ सह १४ गुरुवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांचा पुत्र तिसरा ती वरसाचा होता. त्यास बरें वाटत नव्हतें. त्यास रोजमजकुरी सकाळच्या दहा घटका दिवसांत देवआज्ञा जाली. फटकाळ गोष्ट जाली. १

रोजमजकुरींच राजश्री दमाजी गायकवाड याचा भाऊ जैसिंगराऊ याजला आवजी कवडियाच्या वाडियांतून मुहूर्त करून काहाडून राजश्री आयाबा मजमदार याच्या वाडियांत आणून ठेविले. भोजनोत्तर जाऊन मंगळवार पेठेंत राहिले. दुसरे रोजीं नदी उतरोन लावलें. दुर्जनसिंगाचे राऊत दिल्हे. १

श्रावण शुद्ध १ शुक्रवार.

शुद्ध चतोर्थी सोमवारीं मातुश्री राधाबाई, पेशवियांची आजी, यांची तुळा पुणियांत केली. रुपये घातले होते. १

राजमाचीस लटका राजा ठेविला होता. तो सातारियास रामराजियाकडे पाठविला होता. तो लबाड. त्याजला डाग देऊन, डावे हातची करंगळी तोडून, पांच पाट काहाडून, त्याजला बाहेर घातला. त्याजबराबर गोसावी होती त्याचा हात कापला, भोई होता त्याचे कान कापिले. तोतयानें सांगितलें की, मी आहीररायाचा. माझे नांव संताजी. माझ्या बापाचे नांव संभाजी आहीरराऊ. मजला यशवंतराऊ प्रभूनीं व आणख्यांनी भर देऊन, राजा ह्मण ह्मणून, सांगितले. ऐशी सातारियाहून खबर आली. १

शुद्ध ६ षष्ठी बुधवारी श्रावणमासची दक्षणा पेशवियांनी फार फार दिल्ही. पंडितांस अगोदरीचे सुवर्णयाचे सोने दिल्हे होते. बुधवारी दोनप्रहरापासून दक्षणा द्यावयास आरंभ केला. सारी रात्र देतच होते. दुसरे रोजीं चार सहा घटकापर्यंत दक्षणा देतच होते. अडीच लक्ष रु॥ वांटिले. १

नागपंचमीचे संधीस ताराबाईनी सातारचा हवलदार आनंदराऊ जीवेंच मारिला. त्याजपासून काय अंतर पडले असेल तें असो !

श्र॥ शुद्ध ८ शुक्रवारीं बाबा वैद्य याणीं खंडू तेलियाच्या जागियावरी नवें घर बांधले. त्या घरास ग्रहप्रवेश केला असे. १

रोजमजकुरीं गायकवाडास निर्बंध पेशवियांनी फार केला. त्याचें मनुष्य त्याजवळ राहूं दिल्हे नाही. आपलींच माणसें चाकरीस दिल्हीं. १

षष्ठीस शिराळशेट, मांजरी बु॥ येथील बापूजी पाटलाचा, खाले आळीच्या घुलियानी द्वाही देऊन पारवर अटकाविला. तीन चार रोज होता. हवलदार गांवास गेले. त्याणीं त्याचा त्याजकडून नदींत टोकविला असे. १

शुद्ध १५ बंदवाने पिलाजी जाधव याणी सोडविलीं असेत. १

जेष्ठ वद्य १० शुक्रवारी दमाजी गायकवाड याचे जेष्ठ पुत्र सयाजी गायकवाड मंगळवेढियाच्या ठाणियांत ठेविले होते ते पुणियास आले. दमाजीपाशींच ठेविले असेत. १

आषाढ शुद्ध १३ मंगळवारीं नारोबा मोझे श्रीपंढरीस वारले. थोर होते. यांचा काळ यथास्थित जाला. १

आषाढ शुद्ध ६ सोमवारी नारायणभट ढेरे पुणियांत मृत्य पावले. १
गोपाळभट शाळग्राम याची स्त्री वारली. आषाढ शुद्ध. ( कोरें ).

धांडो नामदेव कडेदेशपांडे का। मावळ याची स्त्री धाकटी, पुणियांत उपाय करावयास आणिली होती, ते वारली. आषाढ शुद्ध. (कारें ).

नारायणभटाच्या तेराव्या रोजी महादेवभट ढेरे यांची सून वारली. १

आषाढ वद्य ५ मंगळवारी पेशावयांनी सुवर्णरथ दान केले. लाख रु॥ लागले. १

आषाढ वद्य ६ षष्ठी बुधवारी पिलाजी जाधवराऊ दाघोलीस पहाटे वारले, दिवस उगवतां बुधवार. अडीच दिवस वाचा बंद जाली होती. वरचेवर वारले. पेशवे परामृषास गेले होते. १

आषाढमासी शुद्धपक्षीं पुणियास माधवराऊ बिन रघोजी बांडे याजला खानदेशीहून खबर आली की, राजश्रीचे जावई, गजराबाईचे दादले, मल्हारराऊ बांडे हगवणीच्या दुखण्यानें वारले.

आषाढ वद्य ९ मंदवारी पहाटे बाजी भिवराऊ याचे पुत्र बापूजी बाजीराऊ यांस देवआज्ञा जाली. त्याचे स्त्रीनें सहगमन केलें. पुणियांतच काळ जाला असे. दहन संगमीं केलें. पहाटेची सव्वाप्रहर दीड प्रहर रात्र उरली ते समयीं वारले. १

वैशाख वद्य १३ मंदवारीं रूपगीर गोसावी, गणेशखिंडीच्या विहिरीपाशील, याणें जिता संध्याकाळीं पासणियांत देवळावरती रामगंगेचे पछमेस समाध घेतली. त्याजला भोंबाडकरांनी दोन बिघे विहिरीपाशीं जमीन व गांवाजवळ तेहत्तीस हात घरास जमीन दिल्ही होती. ते त्याणें शिवरामभट चित्राव याचा लेक कृष्णंभट आला आहे, त्याजला कागद दिल्हे. दानधर्म करून समाधी घेतली असे.

जेष्ठ शुद्ध तृतिया गुरुवारीं सेनापती व खासखेल व उमाबाई ऐसी पुणियास इंद्रोजी कदम घेऊन येऊन मल्हारजी होळकर यांच्या वाडियांत आणून ठेविलीं असेत. १

दाभाडियास व गायकवाडास शिधापाणी सरकारांतून देत असेत.

श्रीमंत राजश्री पंतप्रधान सातारियांत होते. मातुश्री ताराबाई यांचे राजकारण मनास आणावयास राहिले. परंतु, ती अद्याप गडाखाले येईनात. राजश्रीस पाठविनात. मग हे कुच करून जेष्ठ शुद्ध ९ बुधवारी सत्रा घटकेस पुणियास आले. तिसरे प्रहरीं राजश्री महादाजीपंत बाबा वाडियांत जाऊन, भेटी घेऊन, सवेंच आपल्या वाडियांत आले. १

रोजमजकुरी चिरंजीव लक्ष्मणास समाधान होईनासें जालें.

जेष्ठ शुद्ध १५ सह १ शुक्रवारी चंद्रग्रहण पडिलें.

जेष्ठ वद्य ३ शुक्रवार सन ११६१ छ १६ रजबू अवशीचे रात्रीं श्रीमंत व भाऊ महादोबाच्या घरास समाधानास आले असेत. १

वद्य पंचमीसह षष्ठी सोमवारीं श्रीमंत सिंहगडास गड पहावयास प्रथमच गेले असेत. १

सवेंच तेच रोजी तिसरे प्रहरीं आले असेत. १

शुद्ध रुजू वद्य ३ शुक्रवारीं मावळे दावडीच्या बंदोबस्तास पाठविले होते. नारायणराऊ, गोविंद हरीचे पुतणेहि, पागा पाठविली होती. त्याणी गायकवाडाचा जामदारखाना उघडून कापड वगैरे चोरिलें. ठिकाणीं लागले. ह्मणून रोजमजकुरी मावळियाचे हात तोडिले. कोरडियानें मारिले. नारायणरायास रागास आले. हसमाचे कारकूनहि तिघे होते त्यांस मार दिल्हा.

                                                                                   लेखांक १६५

                                                                                                       श्री                                                        १६१९ भाद्रपद वद्य ७

राजश्री सरदारानीं लस्कर गोसावी यांसि

5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। शंकराजी नारायण सचिव सुहूरसन समान तिसैन अलफ मौजे इडमिडे सा। हवेली हा गाव सदानंद याचे समाधी खाले निंबात आहे यासी अनछत्राबद्दल इनाम पहिलेपासून चालत आला आहे तेथे तुह्मी कितेक उपद्रव देत आहा ह्मणून कळो आले तर तुह्मास त्या गावास उपद्रव द्यावयास काय प्रयोजन आहे ताकीद समजोन एकदर त्या गावास उपद्रव न देणे जाणिजे छ २० सफर सदेश समक्ष

                                                                     165

सुरुसुद


                                                                

                                                                   

शके १६ ७३, सन ११६०,
प्रजापतिनाम संवत्सरे,
चैत्र शुद्ध प्रतिपदा,
रविवार.

शुद्ध ६ गुरुवारी, सुभानजी बिन्न सटवोजी जाधवराऊ वाघोलकर यास सममालकीचे शिक्की याजसी देशमुखाचें पत्र दिल्हे कीं, तुह्मी पेरणाची शेरीबाग लावावयास मागितली, तरी ते शेरी तुह्मांस दिल्ही असे, बाग लावणें. बहिरोबाचें दस्तूरचे पत्र असे. बाईनीं वाघोलीस त्यास देऊं केली. त्याणी माणूस पाठविले. त्याजवळ पत्र दिल्हें असे. १

चैत्र शुद्ध ८ मंदवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांचा चौथा पुत्र लहान होता त्यास का। मजकुरी देवआज्ञा जाली.
रोजमजकुरीं सातारियामधें राजश्रीच्या हुजरांत बर्हानजी मोहिते, व फरादखान, जाधव वगैरे यांशीं व श्रीमंताकडील मानाजी पायगुडे वगैरे यांशी जुंज झालें. परस्परें जखमी जाले.

चैत्र वद्य ५ गुरुवारी शिवरामभट चित्राव पासणियांत रात्रीं वारले. बोलत होते. १

आप्पाभट पंढरपुरे चिंचवडीं तेहि वरचेवर वारले. वद्य. ( कोरें ).

वैशाख शुद्ध १० सह ११ बुधवारीं श्रीमंत पंतप्रधान फौजेसुद्धां भागानगराकडून सातारियास दाखल जाले. गुरुवारी येवतेश्वरावर व गणेशखिंडीकडे फौजा रवाना केल्या. येवतेश्वरावर आईसाहेबांची व गायकवाडाची चौकी होती ती उधळली. गायकवाड महारदरियांत राहिला होता. त्याजवर बाण व जेजाला यांचा मार केला. गायकवाडाचे बुणगे व किरकोळ लोक गडाच्या कडाणीस गेले. हजार बाराशें गायकवाड उभा राहिला मरावयास. श्रीमंत व भाऊ फौज तयार करून चालोन घेतले. यांची फौज भारी. त्याचा परिणाम होईना. तेव्हां गायकवाडाकडून भेटीचा मजकूर जाला. यांजलाहि विचार पडला की, तो मरावयास तयार जाला, बहुतांचा नाश करील. मग सटवोजी जाधव, जानोजी ढमढेरे, शिदोजी राऊत, नाना पुरंधरे, रामचंद्रबावास पाठविलें. गायकवाड भेटीस आला. भेटी घेऊन आपल्या गोटांत गेला. दुसरे रोजी याणीं गायकवाडास सांगोन पाठविलें कीं, गोटाशेजारी वेणेवर येऊन राहा. त्याजवरून वेणेवर दक्षणतीरीं येऊन राहिला. श्रीमंत उत्तरतीरीं राहिले. सेनापतीहि गायकवाडाबा। आले होते. गायकवाडास ह्मणों लागले पंचवीस लक्ष रु॥ व निम्मे गुजराथ वांटणी दे. त्याणे ह्मटलें उमाबाई धणी आहेत. त्यासी जें बोलणें तें बोला. उमाबाईकडे गायकवाड जाऊन शिक्केकटार त्याजपुढें ठेविलीं. दाली सोडली, ह्मणून बोलोन आपल्या डेरियांत गेला. चौथे रोजीं मंगळवारी सकाळींच श्रीमंतानीं फौजा पाठवून गायकवाड लुटला. त्याणें स्नान केलें होतें. तयार नव्हता. नाना बेवसवास होता. यांची फौज जाऊन घोडी वोढूं लागली. गायकवाड ह्मणों लागला, त्याच्या वचनावर आपण बेवसवास होतो, त्याणीं वचन सोडून हे गोष्टी करूं लागले तरी कोणी हत्यार धरूं नका, सुखरूप लुटूं द्या. मग यांणीं अगदीं गोट लुटला. गायकवाड दोघे भाऊ विठ्ठल शिवदेव याणीं आपल्या डेरियास नेले. सेनापति मानाजी पायगुडियानीं आपल्या डेरियांत नेले. गायकवाड पायउतराच गेले. जैशिंग बरगियाच्या डेरयास नेले. अवघ्यापासीं चौकिया ठेविल्या. गायकवाड तिघे भाऊ एकत्र केले. सेनापति श्रीमंताबा। उमाबाई अंबिकाबाई होती, खासखेल होते, त्याजपाशीं नेले. दाभाडियानी अवघी गुजराथ पेशवियांच्या हवाला केली. त्याप्रा। गायकवाडानींहि देविली. ठाणीं गोंदे, वजपूर व दावडी गायकवाडास राहावयास दिल्हीं. त्रिवर्ग गायकवाड पुणियास पाठविले. वैशाख वद्य १३ शनवारीं पुणियास आले. आवजी कवडियाच्या वाडियांत ठेविले. चौक्या भोंवताल्या ठेविल्या. ठाणीं आलियावरी सोडावें. याजकरितां अटकेस ठेविले आहेत. गायकवाडाचा वडील पुत्र पेशवियाबा। उमाबाईपाशीं होता. तो येतांना मंगळवेढियांत पाठविला. गायकवाडाजवळ दोघे मुलें होतीं, तीं आईसाहेबापाशीं सातारियावरी ठेविली होती. ती तेथेंच आहेत. ऐशी हकीकत जाली असे. १

फाल्गुन शुद्ध ११ एकादशी सोमवारीं पेशवियांची फौज, बापूजी बाजीराऊ, गायकवाडावर चालोन जाऊन जुंझ केलें. जुंझ निबर जालें. पेशवियांची फौज निघाली. गांधणीवर जुंझ जालें. इकडील निशाणाचा हत्ती व नगारियाची हत्तीण वगैरे दोन हत्ती ऐसे चार गेले. अबदागीर व पालख्या व घोडीं कांहीं गेलीं. रंभाजी पांढरे व दत्ताजी भापकर पडले. शाहाजी भापकर यास जखमा आहेत. वगैरेहि पडले. जखमी जाले. गायकवाडाकडील जगजीवन पवार याच्या निशाणाचा हत्ती बोंधियांनी आणिला. दादजी माणकर, खंडोजी माणकराचा लेक, पडिला. वगैरे पडिले. जखमी जाले. ऐसे वर्तमान जालें असे. १

फाल्गुन वद्य ३ सह ४ सोमवारीं वाघोलीस सटवोजी जाधवाचे राखेची लेक यमाई इचें लग्न जालें, मानाजी आंगरे याच्या राखेच्या लेकास दिल्ही.

वद्य ६ गुरुवारीं गायकवाड अज-बोटियावरी आलाशी खबर आली. तेच रोजीं संध्याकाळीं पुणें पळालें. पहांटे मातुश्री राधाबाई व काशीबाई सिंहगडास गडास गेली. शुक्रवारी केंदरावर गायकवाड आला. बापूजी बाजीराव पेशवियाची फौज लोणीधामणीवर आली. मंदवारीं गायकवाडास मु॥ जाला. राजश्री येशवंतराऊ दाभाडे सेनापति इंदुरीहून केंदरावर गायकवाडापाशीं आले. रविवारी तळेगांव गाधाडीखाले निंबगांवाकर मु॥ केला. सोमवारीं. साळेमाळेच्या पारगांवावर मु॥ जाला. मंगळवारी येथून तिसरे प्रहरी त्र्यंबकराऊ विश्वनाथ आपले फौजेत जावयास गेले. रात्रीं त्रिंबक सदाशिव पुरंधरे साताराची फौज घेऊन, सासवड ठेवून, पुणियास आले. महादाजीपंतबाबाची भेटी घेऊन, बुधवारी सकाळचे माघारे फौजेकडे गेले. रात्रीं पहिले प्रहरीं त्रिंबकराऊ माघारे घरास आले. नाना पुरंधरे फौजेबरोबर गायकवाडामागें गेले. फाल्गुन वद्य चतोर्देशी शुक्रवारीं वेणेजवळ यांचे त्यांचे जुंझ जालें. गायकवाडांनी याजला पहिलियानें मागें सारिलें. मग यांणी लगट केला. गायकवाडाचा मोड केला. त्याचे बुणगे गोटावर होते तितके याणीं लुटिले. घोडी, डंट, पालख्या, बैल, ढोरें, डेरे, राहुट्या, आणिल्या. सडी फौज, गायकवाड व सेनापती सातारियांत शहरांत गेले. महारदरियांत जाऊन राहिले. मंदवारीं संध्याकाळीं पुणियास खबर आली. तोफा केल्या. अंबाजी शिवदेव, विठ्ठल शिवदेव याचे बंधू, पडिले. पेशवियाकडील आणीखहि कांहीं पडिले. फिरंगोजी पंवार, हणमंतराऊ निंबाळकराकडील, याणीं व गोपाळराऊ प्रतिनिधीकडील व बापू चिटनीस यांणीं व पेशवियाची नानापाशील साताराची फौज यांणीं झुंज केले. यांची फत्ते जाली.