लेखांक १६५
श्री १६१९ भाद्रपद वद्य ७
राजश्री सरदारानीं लस्कर गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। शंकराजी नारायण सचिव सुहूरसन समान तिसैन अलफ मौजे इडमिडे सा। हवेली हा गाव सदानंद याचे समाधी खाले निंबात आहे यासी अनछत्राबद्दल इनाम पहिलेपासून चालत आला आहे तेथे तुह्मी कितेक उपद्रव देत आहा ह्मणून कळो आले तर तुह्मास त्या गावास उपद्रव द्यावयास काय प्रयोजन आहे ताकीद समजोन एकदर त्या गावास उपद्रव न देणे जाणिजे छ २० सफर सदेश समक्ष
सुरुसुद