शुद्ध १५ बंदवाने पिलाजी जाधव याणी सोडविलीं असेत. १
जेष्ठ वद्य १० शुक्रवारी दमाजी गायकवाड याचे जेष्ठ पुत्र सयाजी गायकवाड मंगळवेढियाच्या ठाणियांत ठेविले होते ते पुणियास आले. दमाजीपाशींच ठेविले असेत. १
आषाढ शुद्ध १३ मंगळवारीं नारोबा मोझे श्रीपंढरीस वारले. थोर होते. यांचा काळ यथास्थित जाला. १
आषाढ शुद्ध ६ सोमवारी नारायणभट ढेरे पुणियांत मृत्य पावले. १
गोपाळभट शाळग्राम याची स्त्री वारली. आषाढ शुद्ध. ( कोरें ).
धांडो नामदेव कडेदेशपांडे का। मावळ याची स्त्री धाकटी, पुणियांत उपाय करावयास आणिली होती, ते वारली. आषाढ शुद्ध. (कारें ).
नारायणभटाच्या तेराव्या रोजी महादेवभट ढेरे यांची सून वारली. १
आषाढ वद्य ५ मंगळवारी पेशावयांनी सुवर्णरथ दान केले. लाख रु॥ लागले. १
आषाढ वद्य ६ षष्ठी बुधवारी पिलाजी जाधवराऊ दाघोलीस पहाटे वारले, दिवस उगवतां बुधवार. अडीच दिवस वाचा बंद जाली होती. वरचेवर वारले. पेशवे परामृषास गेले होते. १
आषाढमासी शुद्धपक्षीं पुणियास माधवराऊ बिन रघोजी बांडे याजला खानदेशीहून खबर आली की, राजश्रीचे जावई, गजराबाईचे दादले, मल्हारराऊ बांडे हगवणीच्या दुखण्यानें वारले.
आषाढ वद्य ९ मंदवारी पहाटे बाजी भिवराऊ याचे पुत्र बापूजी बाजीराऊ यांस देवआज्ञा जाली. त्याचे स्त्रीनें सहगमन केलें. पुणियांतच काळ जाला असे. दहन संगमीं केलें. पहाटेची सव्वाप्रहर दीड प्रहर रात्र उरली ते समयीं वारले. १