Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ४८५

श्री. १७२१ आषाढ शुद्ध १


राजश्री रंगराव महादेव गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। दवलतराव सिंदे दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. राजश्री आपाजी मुधाजी यांजपासून तुह्मीं रसदेचा ऐवज घेऊन, पो धर्मपुरा हा माहाल सांगितला. त्यास, अलिकडे राजश्री आनंदराव पवार यांचें तुमचें चित्त शुद्ध नाहीं. सा। पवार यांणीं आपाजी मुधाजीकडून माहाल काढिला आणि रसदेचा ऐवज त्यांजपासून घेतला. त्याचा फडशा तुमचे विद्यमानें जाहला नाहीं, ह्मणोन विदित जाहलें. त्यावरून हें पत्र तुह्मांस लिहिलें असे. तरी माहाल मा।रनिलेकडे कायम ठेऊन वहिवाट घ्यावी. हे न जाल्यास रसदेचा ऐवजाचा... व्याजसुद्धां तुह्मीं आपलेतर्फे फडशा ...लाऊन ऐवज ......फडशा करावा. रा छ १७ सफर, सु।। मयातैन व अल्लफ. बहुत काय

लिहिणें ? हे विनंति. मोर्तबसुद.

पत्रांक ४८४

श्री. १७२० पौष शुद्ध १२

श्रीमंत मातुश्री गंगाज्यान्हवी बयाबाई व ताई वडिलाचे सेवेसीः-

आज्ञांकित यशवंतराव धोंडदेव कोल्हटकर कृतानेक सां नमस्कार विज्ञापना येथील क्षेम ता। पौष शुद्ध १२ पावेतों आपले आशीर्वादें घरीं सर्व सुखरूप जाणोन स्वकीय कुशल लेखनाज्ञा करीत असलें पाहिजे. विशेष. फार दिवस वर्तमान तिकडचे कांहीं नाहीं, ह्मणोन काळजी वाटते. अकस्मात रा। पांडोबा तात्यांनी शहराहून पौष शुद्ध २ स सविस्तर लिहून पत्र पाठविलें. त्याजवरून आद्यंत मजकूर कळों आला. येथून दोन च्यार पत्रें श्रीमंत राजश्री आपाचे नांवें लिहून सविस्तर लिहिलें होतें, त्याजवरून सेवेसीं मजकूर अवगत जालाच असेल, तूर्त या प्रांतीं उणा आहे. परंतु बाहेरचीं वर्तमानें ऐकोन चित्तास काळजी वाटते. कोणते वेळेस काय घडेल समजत नाहीं. होळकर यांची फौज उजेनप्रतीं दाहापांच हजार आली होती. तेथें लढाई होऊन बरोबरी जाली, ह्मणोन वर्तमान आहे. शिंदे यांचें लष्कर पूर्वस्थळावरच स्वस्थ आहे. या वेगळें इकडे नवल विशेष नाहीं. आमचेकडील कुशल व राजश्री तात्याकडे माणूस गेलाच असेल. त्याजकडचें वृत्त सविस्तर लिहून पाठवावें. सार्वकाळ पर्त्रोतरी सांभाळित असावें. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

पत्रांक ४८३

श्रीह्माळसाकांत. १७२० आश्विन वद्य ११


राजश्री बाळोजी इंगळे का।।दार पो सिरोंज गोसावी यांसी:-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रो काशीराव होळकर रामराम विनंती उपरी. पो मा।र येथील दरखदारांचे होतें दरखाचें काम घेत नाहींत, ह्मणोन सरकारांत विदित जालें. त्यावरून हें पत्र तुह्मांस लि।। असे. तरी दरखदाराची वहिवाट व कानूकायदे पेशजीपासोन चालत आले आहेत, त्याप्रमाणें ज्याचें काम त्याचे हातें घेऊन वेतनाचा वगैरे ऐवज निर्वेध पावता करीत जाणें. येविषईचा पुन्हां बोभाट येऊं न देणें. रा। छ २५ जावल, सु।। तिसा तिसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तब असे. शिक्का असे.

पत्रांक ४८२

श्रीलक्ष्मीकांत. १७२० आश्विन वद्य १


पु।। रावजी अमृतरावजी गोसावी यांस:-
दंडवत विनंती उपरी. आपणाकरितां विजयादशमीचे पोशाख पाठविले आहेत. बितपशील.
१ तिवट पैठणी लाल.
१ शेला पैठणी लाल.
१ किनखाफ छेडीदार.
१ जामेवार मलमल बंगाली.
------


राजश्री विनायकराव.
१ तिवट पैठणी आबाशी.
१ दुपट्टा पैठणी आबाशी आस्वली कांठी.
१ किनखाफ अहमदाबादी.
१ जामेवार ब-हाणपुरी फर्द दोन.
------


सदरहूप्रमाणें पोहचतील. रु।। छ १५ माहे जमादिलावल. हे विनंती. मोर्तबसुद.

पत्रांक ४८१

श्री ह्माळसाकांत. १७२० ज्येष्ठ शुद्ध ३

( शिक्का असे. )

दस्तक सरकार राजश्री कासीराव होळकर ता। कमावीसदारान व ठाणेदारान व जमीनदारान व जकातेवाजेलोकान मो हाय. सु।। समान तिसैन मया. राजश्री येशवंतराव गंगाधर यांजकडील कारकून लष्करांतून शिरोंजेस जात आहे. बराबर घोडीं व माणसें व उंट वगैरे आटाला. त्यांस मार्गी कोणेविसीं मुजाहीम न होतां मु।। राहतील. तेथें चौकी पाहारा देऊन, आपलाली हद्दपार करून देणें. जाणिजे. छ १ जिल्हेज मोर्तबसुद.

लेखांक २९                                                                       श्री                                                             १६१९ आषाढ शुध्द १३

                                                                        29                                                                                                                                                                                                                                                                                                 

इजती असार रामाजी बाबाजी व देवाजी त्रिंबक देशपांडे पा। सुपे सन हजार ११०७ मालूम दानद की सैद जलील सावकार याचे कर्ज सरकारी आहे सदरहू ऐवजास प्रगणेमजकूरचे गाव देविले असेती त्याची सनद पेशजी अलाहिदी चालिली आहे बिता।

नाझर                                                                    कुंभारवाडा                                                             मौजे मावडी
   १                                                                               १                                                                          १

एकूण तीन गांव देविले असेती सदरहू गावीचा जो टकापैकी उसूल होईल तो महमदबेग दि॥ माइले पाठविले असेती याचे हवाले करणे सदरहू गावीचा टकापैका सावकाराखेरीज तफरका न होए ते करणे जे गोस्टीने सावकार आह्मासी रुजू हो तो ऐसे करणे सावकारमजकूर आमचा खजाना आहेती जे वेळेस दरकार होतो ते वेळेस कार्यास एताती या करिता हे काम जरूर ह्मणून तुह्मास लि॥ असे सरजाम करणे रा। छ ११ जिल्हेज

                                                                                           29 1

                                                                                                फारसी

पत्रांक ४८०

श्री १७१९


यादी भोंसले याजकडील कारभारी यांस सालमजकूरापासून गांव द्यावयाचा करार. सु।। समान तिसैन मया व अल्लफ, रु।। ३५००० यांस नांवनिशी

१४००० श्रीधर लक्षुमण मुनसी रु।। १४००० यांसी गांव.


पत्रांक ४७९

श्रीलक्ष्मीकांत. १८१९

राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-


अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। रघोजी भोंसले सेनासाहेबसुमा दंडवत उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. तेथील लिहिला मजकूर कळला. त्यास, तुह्मीं तेथील प्रसंगास आहां, तेव्हां याचप्रमाणें वरचेवरी पत्र पाठऊन वर्तमान लिहीत जावें. वरकड येथून नवल विशेष ल्याहावें, ऐसें नाहीं. यापूर्वी तुह्मांकडेस पत्रें पाठविलीं आहेत. त्यांचे उत्तराची मार्गप्रतीक्षा करोन असों. सांप्रतहि जो मजकूर लिहिणें, तो राजश्री सदाशिव बापूजी यांसीं लिहिला आहे. तुह्मांसी बोलतील, त्यावरून  *

पत्रांक ४७८

श्री १७१९

याद मसुदा.

१ मौजे खेडे, परगणे आबड, तुकोजी पा। वगैरेमुळें तुजकडे करज भवानदास मारवाडी मौजे ताडेकर याचे असतांना मागनीस येतो. त्यास तूं दंडेलीच्या गोष्टी सांगतोस आनि पिटून लावितोस, म्हणोन मारवाडी यानें विदित केलें कीं, मजवर जबरदस्ती पाटील करितो आणि माझा फडशा सुदामत करीत नाहीं. त्याजवरून तुजला हे पत्र सादर केलें असे. तर, त्यास मशाला रु।। १०० सेभर देणें, हें खतपत्र मारवाडियाचा खडशा रोखाचा बरहुकूम व्याजसुधा करून देणें. येविसीचा फुरुन बोभाट आल्यास कारयास येनार नाहीं. म्हणोन * पत्र.

पत्रांक ४७७

श्री १७१९ फाल्गुन शुद्ध १४


आसिर्वाद उपरी. तुह्मी गेल्यापासून नागपुरास पाऊन तीन पत्रें रा गोविंदराव बापू यांचे कबजांत दोन व उलडोल यांचे गड्यासमागमें एक एकूण तीन पत्रें पाठविली तीं पावलीं. इकडील मजकूर तरी बितपशीलः


राजश्री नानाः सिंद्याचे लष्करांत                    सरकारांतून बाहेर निघाल्यावर तैनातेंत
राहिल्यानंतर आह्मांस सरकार                     चार ++आहेत ती घेऊन चाकरी
वाड्यांत बोलाऊन आणून आजपर्यंत            करा, असें सरकारचे ह्मणणे पडल्यास,
ठेविलें. जेवणाची वगैरे सर्व सोय                  आमचे मानस सर्वात्मना आहे
चांगली. श्रीमंताचा नमस्कार केल्यास            जे विनंती करावी. कनिष्ट बंधूचे
होतो. घरीं चौकी बसली होती                     नांवें करार करून द्यावी. ते चाकरी
तेही श्रीमंतांनी कृपा करून                        करितील. मीहि जवळच आहें.
उठविली. आठ दाहा दिवस जाले.               असें जाहलियास उत्तमच. नाहींतर ईश्वर
आह्मांस सर्वाबरोबर पैका सामर्थ्या-             उपेक्षिणार नाहीं. असा बुद्धीचा
पेक्षा अधिक मागतात. सर्वांची वाट              पक्केपणें निश्चय करून, ईश्वरावर भाव
पडेल तसी आह्मींहि आपली तोड                ठेऊन, स्नानसंध्या करीत सुखरूप
पाहूं. कदाचित वेगळींवेगळीं बोलणीं            राहूं, हाच निश्चय कलम १
ज्यांचीं त्यांनी केल्यास, आमचेहि                 आह्मी स्नान संध्या केली असतां
उत्तर जे योजले ते तुह्मांस समजावें.              तुमचे नुकसान कसें म्हणाल तर,
म्हणोन लिहितों. कसें म्हणाल तर,               तुह्मीही मोठ्या लोकाचे पदरीं आहां.
आह्मांपाशी पैका काय म्हणोन घेतां.            वडिलांनीं त्यांचा लोभ चांगला
जर अपराधी आहों तर जें मर्जीस                सांभाळिला आहे व तेही थोर आहेत.
येईल ते पारपत्य करावें. सरकारांत             उगीच बसलेत तरी पोटास तुमच्या
ओढ आहे. तुह्मीं सरकारचे चाकर              देतील, अशी आमची खातरजमा
जें मिळविलें ते द्यावें, असें म्हणूं                 आहे. दुसरेही च्यार इष्टमित्र आहेत.
लागल्यास, शपथपूर्वक आह्मीहि                समय जाणतील सर्व बरेंच आहे.
देणार, भ्रम मोठाले म्हणून अधिक-            कलम १.
उणें मागूं लागल्यास, आमचे जवळ            तुह्मी येथून तेथें गेलां. मार्गानें
द्यावयास नाहीं. कोणाचें कर्ज                    कसे सुखरुपतेनें गेलां किंवा कसें ?
करावयाचें नाहीं, व मिळतही नाहीं.           भेटी कधीं कशा जाल्या ? कोणेस्थळी.
तेव्हां ईश्वरसत्तेनें जें दैवी असेल तें              आहां? भेटीनंतर बोलणीं कशीं
घडो. आतां सर्वस्वदानांत मातुश्री               जालीं? हा तपशील आम्हांस समजला
व तुह्मी बंधू यांचे विभाग आहेत.                नाहीं. तुम्हीं लिहावा तोही लिहिला
त्याविषयीं बोलून पाहूं. नाहीं तरी,              नाही. आम्हांस तिकडील वर्तमान
सर्वांचीहि गती एकानिमित्त अशी               समजत नाहीं असें म्हटलें असतां,
होणार असल्यास होऊं, येविषयीं              लोकांत कृत्रिम करितात असें
तुमचे आमचे बोलणें जातेसमयीं झालेंच      येतें. तर जें तेथें आढळेल तें आम्हांस
आहे. यांत जसा प्रसंग घडेल, तसें             व सरकारांत वरचेवर लिहित
तुह्मांस लिहूं. आह्मीं सरकारवाड्यांत          जावें. याची मर्यादा येथून कोणी ग्रहस्थ
गेल्यावर भोंसल्याकडे येणें जाणें               कोणी कामावर जाईल तोंपावेंतों
रा। नानासंबंधी काय कसें म्हणोन             कामावर कोणी ग्रहस्थ जाणार,
ऐकवलें. पुरसीस जाली. जे                      असें आह्मीही ऐकतों. खरें असल्यास
वास्तवीक येणें जाणें तें आह्मींहि                मागाहून समजेल. आम्हीं येथें
सांगितलें. कलम १                                 अडचणींत असूं, पत्र पावतें होणार
तुमच्या तिकडील मनस्वी बातम्या              नाहीं, म्हणोन बहुदा लिहिलें नसेल,
येतात. तुह्मी तर कांहींच लिहित                 असें वाटतें. त्यांस चिंता नाहीं. सर्व
नाहीं. हें काय ? जे वास्तवीक                   लिहित जावें. पत्रें पावतील. उत्तरेंहि
असेल ते लिहित जावें. लिहिल्यास             येत जातील. कलम १.
आंगावर येई असे करूं नये. माहि-            इकडील वर्तमान तरी बरोबरचे
तगारीने लिहित जाणें, कलम १                 व पुढील चालीचे वगैरे अर्थ तुम्हास
ती मातुश्री आयाबाई व सर्व येथेंच              स्वारीसुद्धां बातम्यावरून व अकबारा-
आहेत. आठ पंधरा दिवशीं                      वरून समजत असेल. कलम १.
बाईस रवाना करावी, असा विचार            आह्मीं सरकारवाड्यांत होतों.
आहे. मग पाहावें. कलम १.                     तेथें श्रीमंतांस विनंती केली. घरी
जाण्याची परवानगी जाली आहे. जात येत असावें, चार दिवस जाले. कळावें. कलम १

इत्यादिक गोष्टी इकडील तुह्मांस समजाव्या व तुह्मांकडील आह्मांस पुढे समजत जाव्या. नाहीं तरी, कोण करितात, हें न समजतां अनेक अंदेशे मनांत येतात. ह्मणोन तपशीलवार लिहिलें आहे. श्रीमंत पुण्यवान दयाळू आहेत. जो जशी निष्ठा ठेवील त्यास तसें फळ येईल, हें मनांत आणून जें करणें तें करीत जावें. याउपर पत्रें वरचेवर पाठवीत जावीं. रवाना छ १२ माहे रमजान. फालगुन शुद्ध १४ बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.

शेवेसी विसाजी बल्लाळ सां नमस्कार विनंति विशेष. लिखितार्थ परिसोन पत्राची उत्तरें समर्पक यावीं. कोणे गोष्टीविषयीं चिंता न करावी. श्रीरामचंद्राच्या इच्छेकरून सर्व पार पडतील. सर्वांचा सांभाळ करणार श्रीहरी आहे. विस्तार काय लिहूं ? हे विनंती.