पत्रांक ४८२
श्रीलक्ष्मीकांत. १७२० आश्विन वद्य १
पु।। रावजी अमृतरावजी गोसावी यांस:-
दंडवत विनंती उपरी. आपणाकरितां विजयादशमीचे पोशाख पाठविले आहेत. बितपशील.
१ तिवट पैठणी लाल.
१ शेला पैठणी लाल.
१ किनखाफ छेडीदार.
१ जामेवार मलमल बंगाली.
------
४
राजश्री विनायकराव.
१ तिवट पैठणी आबाशी.
१ दुपट्टा पैठणी आबाशी आस्वली कांठी.
१ किनखाफ अहमदाबादी.
१ जामेवार ब-हाणपुरी फर्द दोन.
------
४
सदरहूप्रमाणें पोहचतील. रु।। छ १५ माहे जमादिलावल. हे विनंती. मोर्तबसुद.