Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४७६
श्रीह्माळसाकांत १७१९ माघ वद्य ११
राजश्री वामनाजी हरी का।दार पा। आंबड गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। काशीराव होळकर दंडवत. सु।।
समान तिसैन मया व अल्लफ. को व्याहामांडवें व मौजे गोंदी पो मजकूर हे दोन्ही गांव श्रीमंताकडून राजश्री यशवंतराव गंगाधर याजकडे आहेत. तेथें तुह्मी नगरपट्टी बा। तगादा करितां म्हणोन विदित जालें. त्यास, हरदू गांव श्रीमंताकडून मा।रनिलकडे दुमाला. तेपक्षीं तेथील नगरपट्टीचा ऐवज मागणें नीट नाहीं. यास्तव, हें पत्र सादर केलें असे. तरी तुह्मीं येविषई हरदू गांवांस मुजाहीम न होणें. जाणिजे. छ २४ साबान. बहुत काय लिहिणें ? मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ५३ ] श्री. ६ नोव्हेंबर १७०५.
राजीनामापत्र शालिवान शके १६२७ पार्थिव नाम संवत्सरे मार्गसीर शुद्ध द्वितीया बुधवार, दर जागा किले प्रसिद्धगड उर्फ रांगणा, हजीर मजालस बेहुजूर-
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
हजीर मजालसी समस्ता हुजूर रामाजी विठ्ठल शेणवी व कृष्णाजी बाब शेणवी व अंताजी मल्हार शेणवी देशकुळकर्णीं व गांवकुळकर्णी देहाय तर्फ अजिरे यांनी राजश्री रामचद्र नीळकंठ भारद्वाजगोत्री देशकुळकर्णी व गांवकुळकर्णी तर्फ अजिरें यांस लिहून दिलें पत्र ऐसे जे - तर्फ मजकूरचें देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण बुन्यादी विठ्ठल माद शेणवी याचें होतें. त्याच्या वडिलापासून आपल्या वडिलांनी तिसरी तकषीम देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण विकत घेतलें. गांवहि विभागाप्रमाणें तिसरे तकषिमेचे वाटून दिले. त्याप्रमाणें आपले वाडवडिल परंपरा खात आले. विठ्ठल माद शेणवीहि आपले परंपरेनें दोनी तकषिमा देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण खात आले. ईश्वरगतीनें विठ्ठल माद शेणवी मृत्य पावला. त्याचे पोटीं कोणीं संतान नाहीं. अगर त्यास कोणी दाईज गोत्रज नाहीं नकल जाहालें. वृत्ती दिवाणची देखोन महाराज राजश्री साहेबीं तुमासीं अजराम-हामत करून देतां सारें वतन विठ्ठल माद शेणवी याचें समजोन अर्बा तिसैनच्या सालीं स्वामीनीं आपला मुतालिक तिमाजी गोविंद वतनावरी पाठविला तो महालासी जाऊन तर्फमजकूरचें देशकुळकर्ण व गावकुळकर्ण अनभवूं लागला. धणी चंदीस दूर प्रातें असतां हा करीना कोणास सागावयाकरिता आपण बाहीर पडोन देशावरी गेलो वडिलापासोन तिसरी तकषीम आपला भोगवटा, त्यास विक्षेप जाहला देखोन, बेळगांवीं राहोन कथळा केला त्यावरी सन अर्बा मयामध्ये महाराज राजश्री छत्रपतिसाहेबाची स्वारी प्रसिद्धगड ऊर्फ रागणा या जागा जाहाली ते प्रसंगी राजश्री त्र्यबकजी कानोजी सरदेसाई व खळोजी कानोजी देसाई व सभाजी रामाजी देसाई व शामराऊ मल्हार नाडगौडा तर्फ मजकूर हे राजश्री साहेबाच्या दर्शनास आले त्याबराबरी कृष्णाजी बाब शेणवीही आले. त्याणीं तुमची भेटी घेतली ते प्रसंगीं देशकास तुह्मीं विचारिले कीं , रामाजी विठ्ठल शेणवी हे बेळगांवास जाऊन आमच्या वतनास कथळा करिताती ह्मणोन. त्यास त्याणीं सांगितले जे, देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण तर्फ मजकूर येथील तिसरी तकषीम त्याची, त्याचा भोगवटा चालत आला आहे, त्याप्रमाणे त्याची तकषीम त्यास द्यावी, आणि त्यास तुह्मीं समाधानरुप राखोन तकषीमप्रमाणे वतन अनभवून असावें, ऐसें आमच्या विचारें आहे, ऐशियास, शफतपूर्वक वचन द्याल तरी रामाजी विठ्ठल शेणवी यासी बेळगांवीहोऊन भेटीस घेऊन येऊन ह्मणोन त्यावरून तुह्मीं देशकाची गोष्टी मान्य करून देशमुखास व कृष्णाजी बाब शेणवी यासी शफतपूर्वक सांगितले कीं, रामाजी विठ्ठल शेणवी यास घेऊन येणें. त्यावरी देशक व कृष्णाजी बाब शेणवी महालास गेलेयाउपरी रामाजी विठ्ठल शेणवीं यास बेळगांवीहोऊन आणून छ १६ रजब सन सीत मया ये दिवशीं राजश्री त्रिंबकजी कानोजी सरदेसाई व रवळोजी कानोजी देसाई व संभाजी खंडोजी देसाई व शामराऊ मल्हार नाडगौडा आह्मास भेटीस घेऊन आले. आमच्या तुमच्या भेटी जाहाल्या तेसमयीं आह्मा समक्ष देसाई तर्फ मजकूर यास विचारिलें कीं, रामाजी विठ्ठल शेणवी व कृष्णाजी बाब शेणवी व अंताजी मल्हार शेणवी यांची देशकुळकर्णाची व गांवकुळकर्णाची तिसरी तकषीम आहे ह्मणतात ते कशी आहे ते आपले बेताळीस स्मरोन सांगा, तुम्ही देशमूख, आह्मांस व त्यास वडील आहा, जें सांगाल त्यास आह्मीं मान्य आहों ऐसें ह्मणितलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४७५
श्री १७१९ माघ वद्य ६
वेदशास्त्रसंपन्न राजश्री नारायण दीक्षित स्वामीचे सेवेसी:--
विद्यार्थी बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये लिहीत जावें. विशेष. तुह्मी सरकारचे लक्षांत पहिल्यापासून वागत आहां. सांप्रतचा प्रसंग अडचणीचा. याजकरितां येथून विनंति होत जाईल ती माहाराजांनी कृपा करून मान्य करीत असावी, हें करणें तुह्माकडे. येविसी राजश्री सिवराम नारायण सांगतील. रा। छ १९ साबान, सु।। समान तिसैन मया व अलफ. * बहूत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८ १६१८
[फारसी मजकूर]
तुमार जमाबंदी माहाल जागीर पा। सुपे सा। जुनेर सुबे खुजस्तेबुनियाद सु॥ सन ११०६ जमाबंदी बमारुफाती साबाजी मुरारी सेखदार व कारकून गुमास्ते तहवरदस्तगाह राजश्री राजे जागीरदार जमाबंदी बिलमख्ता साल तमाम कुलबाब कुलकानू जिराईत व बागाईत खरीफ व रबी बमय फरा बटा कुल साल तमाम जमा मोकरर अज देहे ६३ पैकी वजा इसाफती देसमुख मालेगौ खुर्द देहे १ व देसपांडे सिंगापूर देहे १ बाकी देहे ६१ पैकी वजा आलाहिदी जागीर साबाजी निंबाळकर देहे ३
ता। हवेली देहे २ ता। बारामती
१ खलद साकूदपूर मलेद देहे १
१ सिरोली
-------
२
बाकी देहे ५८ पैकी मुतलख वैरान साबक देहे ५
ता। हवेली देहे ३ ता। बारामती देहे २
१ मौजे रावणगी १ कोटवडी
१ मौजे नायवली १ रुई
१ मौजे निळूज -----------
------- २
३
बाकी देहे जुजुवी आबाद रुजू साल गु॥ देहे ५३ मो। जमा साल गु॥ रुपये २०००१ वीस हजार एक रुपया यास वैरान सालमजकुराकारणे मुतलख वैरान देहे ५ एकून रुपये ५२४ पाच से चोवीस बिता।
११७ मौजे सिउरी ९५ मौजे मुरटी
१३९ मौजे आबी खुर्द ९५ मौजे उडवड
७८ मौजे मुजेवाडी
---------- ------------
३३४ १९०
बाकी देहे जुजबी आबाद देहे ४८ मो। जमा बमोजिब साल गु॥ रुपये १९४७७ यासी कमी सालमजकुराकारणे सबब की बाराची कमी जाली याकरिता खरीफ नाबूद जाले व रबीचे बाड जाले कोठे कोठे पाऊस जाला त्याने कोठे कोठे दाणा आला जागा जागा बीबूड जाली अजी सबब कमी जाली रुपये ७६४४ बाकी जमा साल तमाम कुलबाब कुलकानू खरीप व रबी जिराईत व बागाईत बिलमख्ता बमय फरा बटा जमा मो।
जमाबंदी रुपये
१२३५७
मो। बारा हजार तीन से सतावन रुपये रास ता। हवेली देहे ४२ पैकी वजा इसाफती देहे २ देसमुख मालेगौ खुर्द व देसपाडे सिगापूर बाकी देहे ४० पैकी जागीर आलाहिदी साबाजी निंबाळकर देहे २ बाकी देहे ३८ पैकी मुतलख वैरान देहे साबाक देहे ३
रावणगौदेहे मौजे नायवली
१ १
मौजे निळूज
१
बाकी देहे रुजू गु॥ ३५ मो। जमा बमोजिब साल गु॥ रुपये १३३३४ यास वैराण सालमजकुराकारणे वैराण देहे ५ एकून रुपये ५२४ बित॥
११७ सिउरी ९५ मुरटी
१३९ आंबी खुर्द ९५ उडवडी
७८ मुजेवाडी --------
------- १९०
३३४
यास सालमजकुराकारणे आबाद जुजबी देहे ३० मो। जमा बमोजिब साल गु॥ रुपये १२८१३ यास कमी सालमजकुराकारणे सबब बाराची कमी जाली याकरिता खरीफ नाबूद जाले व रबीचे बाड जाले कोठे कोठे पाऊस जाला त्याने कोठे कोठे दाणा आला जागा जागा बीबूड जाली सबब कमी जाली रुपये ४५७५ बाकी जमा साल तमाम कुलबाब कुलकानू खरीफ व रबी जिराईत व बागाई बिलमख्ता बमय फरा व बटा कुल जमा मो। रुपये ८२३८
→पुढे देहबदेही वाचण्यासाठी इथे क्लीक करा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४७४
श्री १७१९ कार्तिक वद्य १०
आज सुभा रा। दौलतराव शिंदे ता। मोकदमानी कसबे व्याह मांडवें, पा। आंबड. सु।। समान तिसैन मया व अलफ. मल्हारजी लोखंडे हुजरे, नि।। सरकार, यांजी हौस उमाजी म्हसका खीलारी याजबरोबर, सरकारच्या म्हैसी चारणीस गेल्या त्यांत होती. कसबे मा।रच्या मुकामीं ती म्हैस थकली. सबब विठूजी पाटील कसबे मजकूर याच्या स्वाधीन करून, पुढें म्हैसी चारणीस घेऊन गेला. ती म्हैस पा।मा।र सुदामतपणें देत नाहीं म्हणोन समजलें. त्यावरून ताकीद सादर केली असे. तरी, पामार यासी ताकीद करून म्हैस याची याचे स्वाधीन करून देऊन पावती घेणें. येविषयी फिरून बोभाट आलिया कार्यास येणार नाहीं. जाणिजे. छ २३ जमादिलावल, मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४७३
श्रीह्माळसाकांत. १७१९ आश्विन शुद्ध ९
कपतान दि।। मुसावस फिरंगी नि।। सरकार गोसावी यांसीं:-
अज काशीराव होळकर, सु।। समान तिसैन मया व अल्लफ. तुमचें हुजर प्रयोजन आहे. याकरितां हें पत्र सादर केलें असे. तरी, तुह्मीं देखत पत्र कूच करून, पलटणसुद्धां हुजूर येणें. जाणिजे. छ ८ रविलाखर. बहुत काय लिहिणें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४७२
श्रीह्माळसाकांत. १७१९ आश्विन शुद्ध ७
राजश्री पागापथके वगैरे सरकारी लोक मु।। आंबड गोसावी यांसीं:-
श्रे।। काशीराव होळकर रामराम. सु।। समान तिसैन मया अल्लफ, राजश्री येशवंतराव गंगाधर यांजकडील मौजे व्याहा माडवें वेगोंदी परगणें मा।र येथें तुह्मांकडून उपद्रव लागतो ह्मणोन हुजुर विदित जालें. त्यावरून हें पत्र सादर केलें असे. तरी तुह्मीं मा।रनिलकडील गांवास काडीमात्र तोशीस न देणें. बोभाट आलिया ठीक पडणार नाहीं जाणिजे. छ ६ रा।खर. बहुत काय लिहिणें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४७१
श्रीह्माळसाकांत. ( नकल ) १७१९ भाद्रपद वद्य १४
राजश्री माहितराव मैराळ कादार प्रांत आंबड यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। काशीराव होळकर. सु।। समान तिसैन मया व अल्लफ, मौजे आंतरवाळी सराठी हा गांव राजश्री नागो जिवाजी यांजकडे सरकारांतून आहे. तेथील वस्तभाव घोडीं वगैरे चिरंजीव मल्हारराव होळकर यांजकडील सदाशीव भाईजी यांणी नेलीं असतील, त्यांची ठिकाण लागून यांची यांसीं माघारी पावलीं पाहिजेत. याजकरितां हें पत्र सादर केलें असे. तरी तुह्मीं मा।।रनिलेकडील गांवची वस्तभाव घोडीं वगैरे जेथें ठिकाणीं लागेल तेथून आणून यांचीं यांसीं पावतीं करणें. जाणिजे. छ २७ रो।वल, बहुत काय लिहिणें मार्तब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४७०
श्री १७१९ भाद्रपद वद्य १४
दस्तर सरकार श्री दौलतराव शिंदे ता।
का।।दारान व ठाणेदारान वे चौकीदारान व रहदारान व बाजेलोकोन जकायत महालानिहाय. सु।। समान तिसैन मया व अलफ. रा। कृष्णराव महिपत साठे यांजकडील जासूद जोड्या दोन पुण्याहून पो देवास येथें जात आहेत. त्यांस मार्गी जातांना व येतांना मुजाहीम न होतां, नदीनाला व आपलाली हद्द पार करून देणें. जाणिजे. छ २७ सफर, मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४६९
श्री १९१७ भाद्रपद शुद्ध १०
राजश्री सदाशीव भाईजी व बाबाजी आबाजी कामगारी पो आंबड गोसावी यांस:-
स्ने।। मल्हारराव होळकर दंडवत सु।। समान तिसैन मया व अल्लफ, का।। व्याहामांडवे व मौजे गोंदी पो मजकूर हे दोन्हीं गांव राजश्री दादाजी गंगाधर यांजकडे आहेत. तेथें तुह्मीं स्वारप्यादे पाठवून, नख्त ऐवज व खर्चवेंच वगैरे मनस्वी पैका घेतला, ह्मणून विदित जाहलें. त्यास, मारनिल्हे सरकार उपयोगी. यांचें अगत्य जाणून, यांजकडील गांवास उपद्रव न व्हावा, येविशी पेशजीं दोनतीन पत्रें सादर जाले असतां, मागती दंगा करितां हें नीट नाही. त्यास हालीं पत्र पावतांच, याजकडील गांवाकडून नख्त ऐवज व खर्चवेंच घेतला असेल तो दरोबस्त ऐवज माघारी देऊन, पुन्हां उपद्रव न देणें. जाणिजे. छ ८ रो।।वल. बहुत काय लिहिणें ? मोर्तबसुद.