पत्रांक ४७८
श्री १७१९
याद मसुदा.
१ मौजे खेडे, परगणे आबड, तुकोजी पा। वगैरेमुळें तुजकडे करज भवानदास मारवाडी मौजे ताडेकर याचे असतांना मागनीस येतो. त्यास तूं दंडेलीच्या गोष्टी सांगतोस आनि पिटून लावितोस, म्हणोन मारवाडी यानें विदित केलें कीं, मजवर जबरदस्ती पाटील करितो आणि माझा फडशा सुदामत करीत नाहीं. त्याजवरून तुजला हे पत्र सादर केलें असे. तर, त्यास मशाला रु।। १०० सेभर देणें, हें खतपत्र मारवाडियाचा खडशा रोखाचा बरहुकूम व्याजसुधा करून देणें. येविसीचा फुरुन बोभाट आल्यास कारयास येनार नाहीं. म्हणोन * पत्र.