पत्रांक ४८३
श्रीह्माळसाकांत. १७२० आश्विन वद्य ११
राजश्री बाळोजी इंगळे का।।दार पो सिरोंज गोसावी यांसी:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रो काशीराव होळकर रामराम विनंती उपरी. पो मा।र येथील दरखदारांचे होतें दरखाचें काम घेत नाहींत, ह्मणोन सरकारांत विदित जालें. त्यावरून हें पत्र तुह्मांस लि।। असे. तरी दरखदाराची वहिवाट व कानूकायदे पेशजीपासोन चालत आले आहेत, त्याप्रमाणें ज्याचें काम त्याचे हातें घेऊन वेतनाचा वगैरे ऐवज निर्वेध पावता करीत जाणें. येविषईचा पुन्हां बोभाट येऊं न देणें. रा। छ २५ जावल, सु।। तिसा तिसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तब असे. शिक्का असे.