Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४६८
श्रीलक्ष्मीकांत. १७१९ भाद्रपद शुद्ध ७
आज्ञापत्र सेनाधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा ता।मोकदम मौजे वांयगांव पा धुगांव प्रांत वराड, सु।। समान तिसैन मया व अल्लफ, सन १२०७ मौजे मजकूर हा गांव सन मजकूरचे अवल सालापासोन सरकार हिस्सा राजश्री नारायण बाबूराव वैद्य यांसी इनाम दिल्हा असे. तरी मशारनिलेसीं रुजू होऊन सरकारहिश्शाची अंमल देणें. जाणिजे. छ ६ माहे रो।।वल मोर्तबसूद, बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४६७
श्री ( नकले ) १७१९ भाद्रपद शुद २
राजश्री दारकोजी बाबळे गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रो दौलतराव शिंदे रामराम विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. पो नेमावर पंचमहालपैकी काटाफोडा व सत्वास व पाणीबिडवाचे गांव वजा करून पो मा।र व तो राजोर व तो हरणगांव येथील फडणिशीची आसामी, राजश्री आपाजी मुधाजी कुळकर्णी श्रीगोंदेकर यांचे पुत्र खर्ड्याचे लढाईत जखमा लागोन मत्यु पावले, ऐसें जाणून दरखी असामीची नेमणूक सालीना बारमाही वेतन रुपये ३०० एकूण तीनसें सालमजकुरापासोन देऊन ही सनद तुह्मांस सादर केली असे. तरी मा।रनिल्हेचे हातें दप्तरचें कामकाज घेत जाऊन सदरहू तीनसें रुपये सालमा।रापासून सालदरसाल वर्षपरंपरा पाववीत जाणें. पट्यापैकीं मजरा पडतील. शिवाय जमीन बिघे सुमारी ६० साठ इनामी व गावगनां भेटी परभारें देवीत जाऊन, फडणिशीचा कानूकायदा चालवीत जाणें, ही सनद मा।रनिलेस वहिवाटीस द्यावी. रवाना छ १ माहे रोवल सु।। समान तिसैन मया व अलफ, बहुत काय
लिहिणें ? हे विनंती. मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४६६
श्री १७१९ आपाड शुद्ध ९
नेमणूक. सरकार राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा सु।। समान तीसेन मया व अल्लफ, सन १२०७. राजश्री आनंद बाबूराव यासीं, सालीना बमय पालखी, रुपये ३००० तीन हजार याचा दरमहा रुपये अडीचशेंप्रमाणें इ।। छ १३ माहे शवाल सन १२०६ पासोन सिलेखान्याकडून पावत जाईल. शिवाय कारकून आर ३ तीन, नि।। राजश्री नारायण बाबूराव, दर असामीस रु।। दोनशेंप्रमाणें सालीना रु।। साहाशें खासा स्वारी व-हाडप्रांतीं गेलियावर नेमणूक करून देण्यांत येईल, सदरहू प्रों करार, छ. ७ मोहरम, सन मजकूर,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७ श्री १६१५ माघ वद्य ८
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके २० श्रीमुखनाम संवत्छरे माघबहुल अष्टमी सौम्यवासर क्षत्रियकुलावंतस श्री राजाराम छत्रपती आणि वेदमूर्त जोसीराव यांचे
पुत्र गणशे जोसी व विनायक जोसी गोत्र भारद्वाज आश्वलायन सूत्र यासि दिल्हे वृत्तिपत्र ऐस जे तुह्मी बहुत विद्यावत जोतिषशास्त्री निपुण आणि वेदशास्त्रसंपन्न ऐसे जाणोन श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ सहिरण्योदक धारापूर्वक तुह्मास इनाम मौजे नेरे ता। हवेली परगणे पुणे देह १ एक रास कुलबाब कुलकानू देखील हालीपटी व पेस्तरपटी जलतरुपाषाणनिधिनिक्षे पडिले पानसहित खेरीज हकदार व इनामदार करून गाव चतुःसीमप भूमि पूर्वमर्यादेप्रमाणे इनाम दिल्हा असे तुह्मी आपले स्वाधीन करून घेऊन तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने अनभऊन सुखरूप असणे यासि जो कोण्ही अन्यथा करील त्यास धमशास्त्रीची वचने श्लोक
दानपालनयो र्मध्ये दानात्स्त्रेयोनुपालनं ॥
दानात्स्वर्गमवाप्नोति पालनादच्युतं पदं ॥१॥ छ
स्वदत्ता दुहिता भुमि पित्रुदत्ता तु सोदरि ॥
अन्यदत्ता भवेन्माता यो हरे त्रिषु संगमा ॥१॥ छ
ऐसी पातके जाणोन तुह्मास इनाम चालवितील निदेश समक्ष
संमत मंत्री संमत सचिव
सुरू सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४६५
श्री ( मसूदा ) १७१९ वैशाख शुद्ध १५
कर्जरोखा शके १७१९ पिंगल नाम संवत्सरे वैशाख शु।। १५ ते दिवशी खत लिखिते धनकोनाम राजश्री बाळाजी जनार्दन फडणीस यांसीं रिणकोनाम रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा, मु।। पुणें, आत्मकार्यालागीं पर्वतसंबंधें मुद्दल घेतले रु ३००००० तीन लक्ष चांदवड छापी सुलाखी. यांस व्याज दरमहा दरशेहे रु।। १ एकोत्राप्रमाणें बिनसुट. मार्गशीर्ष वद्य १ या मुदतीस मुद्दल व्याजसुद्धां, ऐवज चांदवड, पुणें याचें मुकामीं देऊं. हा रोखा लिहून दिल्हा, सर्व हस्ताक्षर खुद्द.
साक्ष.
१ नारायणराव वैद्य. १ गोविंदराव पिंगळे.
१ श्रीधर लक्ष्मण. १ कृष्णराव माधव.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
ज्यांणी जमिनीची सनद घेतली असेल त्यास निमेप्रमाणे द्यावी. कलम १.
ज्याणीं गांव मुकासे द्यावयाच्या सनदा आणिल्या त्याचा प्रकार. ज्यास गांवसेर सारिखे असतील त्यासच द्यावे. वरकडास ऐवज मात्र द्यावा. कार्यभाग जाणून. कलम १.
खारापाटण महालांतील चौकशी मनास आणितां इदलशहाचे फरमान व थोरले शिवाजी महाराज यांचीं पत्रें भोगवटियासीं घेऊन वतनदार ह्मणवीत होते त्यांची दरखोरी करितां-
१ रामाजी हरी कुलकर्णी पोंभुर्ले यांच्या वडिलांनीं खारेपाटण महालचीं देसगतचीं राजपत्रें व फर्मान घेतलें; परंतु याचा भोगवटा अव्याहत नाहीं. वर्षे तूट जहालीं. सबब पत्रें खोटीं. कलम १
जबानीई सुबाजी बिन हुसनजी नीll मुखरी दाखल मुखरी मुकादम याचे नकल जाहले. त्यास वर्षे ६२ बासष्ट झाली. इतकेत भालेराई जाहाली. तेव्हां कोणी वतनदार गांवीं नाहीत जो भेटेल तोच वतनदार ह्मणून मारीत आणावे वसूल घेत. रोखा पोखा कौल करार त्याच्याच नावचा वतनदाराचा उजूर नाहीं ते समयीं दादन मुखरीच्या निसबतीने सेवा केली.
ते वेळचीं पत्रे.
माझे नांवची आहेत ऐशी हे राजगत भोगली आहे. पत्रे रूप करणार धणी समर्थ आहेत पत्रें भोगवटीटी. मी वतनदार नव्हे, परंतु मुखरीचा ऐसा ह्मणवीत आलों आहे याबा। हे सुबाजी व मुखरीचा गुमस्ता ह्मणोन पत्र करून दिल्हे आहे. कलम १
थोर कार्य असल्यास रु।। १६, नजर पातशाह १०, मुनसी ३, अर्जबेग ३
याप्रमाणें फरमाचा बंद शिवशाईंत जाहला आहे. कलम १.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४६४
श्री १७१८
मसोदा
यादी पत्रें सरकारची:-
१ किल्ले अकबराबाद राजश्री जगन्नाथराम याचे स्वाधीन केला आहे. त्यांस तुह्मी रुजू होऊन सरकार-चाकरी करीत जावी, म्हणोन.
१ राणोजी कदम किलेदार,
६ पागे तैनातीस आहेत त्यांस
१ माधव बाबूराव
१ वेंकोजीराम
१ रामजी ताकपीर
१ दारकोजी वाबळे
१ राजाराम यशवंत
१ अमरोजी शिंदे
--------
६
-------
७
१ विश्राम अनंत याचें नावें पत्र कीं, किले अकबराबाद सरकारांतून जगन्नाथराम याचे स्वाधीन केला आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४६३
श्री १७१८
यादी पत्रें.
५ राजश्री बाळाजी इंगळे यांस सामील जावें ह्मणोन.
१ भूपाळवाले यांस पत्र.
१ पेंढारी यांस पत्र.
१ बाळाजी इंगळे यांसि पत्र कीं, लिहिल्याप्रमाणें पत्रें पाठविलीं व णव सरंजाम ठेवणे.
१ उज्जनीस तोफखान्यांतून तोफा मोठाल्या दोन द्यावयाची परवानगी चिट्टी.
१ इमामखान आरोणेस आले आहेत, त्यासमागमें सरंजाम आहे. त्यासहि पत्र.
-------
५
२ राघोगडास गिराशाचा दंगा आहे. त्यास तेथें बंदोबस्तास पत्रें कीं, स्वारशिपाई तेथें पाठवणें.
१ राजे जालमसिंगजी कोटेवाले यांस.
१ राजगडास रावतसिंग व प्रतापसिंगजीस कीं, दोनशें स्वार पाठवावे.
------
२
१ सरकारचा कारकूण पाठविला पाहिजे कीं, फौजेत हिशेब ठेवीत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४६२
श्री १७१८
श्री महाराजाधिराज श्री महाराजा श्री राजा मर्दन–सिंघ-देव एतेश्री पंडित मुख्यप्रधान श्री माधवरावजीके आशीर्वाद बंचने. इहाके समाचार भले है. उहाके समाचार भले चाहिये. अपरंच राजा प्रीथीसिंधजूनें काशी नरसिके तै मौजे वडा यह गांव इनायत दियोहै. सो चलत आयो है. ताको तुमने सालगुदस्तां जपती करी है. जपती उठायके मसारुनिले के बेटांप श्री व्यंकटराव काशीके तरफ गांव चलो आयो है. उत्तम माफक चलाउतो.
॥ श्री ।।
पंतश्री मुख्य प्रधान श्रीराव सवाई माधौराहज.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६ १६१४ भाद्रपद वद्य ७
(फारसी मजकूर)
ता। मोकदमानि व रयानि मौजे सिरसोफळ प॥ सुपे सा। जुनर सुबे खजस्तेबुनियाद सु॥ सन ११०२ बिदानद की सुरो मायदेऊ जपे यासि दुमाले दरवजा करून दिल्हा ऐसा जे मौजेमजकूरचे कुलकर्ण व जोतिस अष्टाधिकार याबदल माहादाजी रखमागदाचे वडील कोनेर कृस्ण व परसो विस्वनाथ ठोबरा पेसजी अमल शाहाजी भोसले अदलशाही हरदोजण भांडत होते ऐसियासि दिव हरदोजणी केले त्यास हरदोजणाचा दिवी निवाडा जाला नाही ह्मणौऊन कुलकर्ण व जोतीस अमानत करून देसपांडियाचा गुमास्ता चालवीत होता ऐसियासि ज्याहापन्हा कबलेगाही अहमदनगरास आले ते वख्ती सुरो मजकूर खानवालाशान फकरुदीखान फौजदार थानेमजकुरास आले होते त्याजपासी उभा राहिला की आपले वतन आहे त्याजवर फकरुदीखानाचे अमली सुरोमजकुरास महजर करून दिल्हा त्यास मौजे मजकूर सन -------------- मधे वसाती जाले ऐसियासि थानेमजकुरास खानवालाशान पाहाडखान फौजदार आले त्यास सुरोमजकूर उभा राहिला त्यावर खंडोजी व मेऊजी व अंबाजी आटोळे गौंड मोकदम मजकूर यानी अर्ज केला की माहादाजी रखमागद व विसाजी परसराम ठोंबरा हे पेसजी भाडत होते इ. इ. इ. छ २० मोहरम सन ३६ जुलूसवाला