पत्रांक ४७७
श्री १७१९ फाल्गुन शुद्ध १४
आसिर्वाद उपरी. तुह्मी गेल्यापासून नागपुरास पाऊन तीन पत्रें रा गोविंदराव बापू यांचे कबजांत दोन व उलडोल यांचे गड्यासमागमें एक एकूण तीन पत्रें पाठविली तीं पावलीं. इकडील मजकूर तरी बितपशीलः
राजश्री नानाः सिंद्याचे लष्करांत सरकारांतून बाहेर निघाल्यावर तैनातेंत
राहिल्यानंतर आह्मांस सरकार चार ++आहेत ती घेऊन चाकरी
वाड्यांत बोलाऊन आणून आजपर्यंत करा, असें सरकारचे ह्मणणे पडल्यास,
ठेविलें. जेवणाची वगैरे सर्व सोय आमचे मानस सर्वात्मना आहे
चांगली. श्रीमंताचा नमस्कार केल्यास जे विनंती करावी. कनिष्ट बंधूचे
होतो. घरीं चौकी बसली होती नांवें करार करून द्यावी. ते चाकरी
तेही श्रीमंतांनी कृपा करून करितील. मीहि जवळच आहें.
उठविली. आठ दाहा दिवस जाले. असें जाहलियास उत्तमच. नाहींतर ईश्वर
आह्मांस सर्वाबरोबर पैका सामर्थ्या- उपेक्षिणार नाहीं. असा बुद्धीचा
पेक्षा अधिक मागतात. सर्वांची वाट पक्केपणें निश्चय करून, ईश्वरावर भाव
पडेल तसी आह्मींहि आपली तोड ठेऊन, स्नानसंध्या करीत सुखरूप
पाहूं. कदाचित वेगळींवेगळीं बोलणीं राहूं, हाच निश्चय कलम १
ज्यांचीं त्यांनी केल्यास, आमचेहि आह्मी स्नान संध्या केली असतां
उत्तर जे योजले ते तुह्मांस समजावें. तुमचे नुकसान कसें म्हणाल तर,
म्हणोन लिहितों. कसें म्हणाल तर, तुह्मीही मोठ्या लोकाचे पदरीं आहां.
आह्मांपाशी पैका काय म्हणोन घेतां. वडिलांनीं त्यांचा लोभ चांगला
जर अपराधी आहों तर जें मर्जीस सांभाळिला आहे व तेही थोर आहेत.
येईल ते पारपत्य करावें. सरकारांत उगीच बसलेत तरी पोटास तुमच्या
ओढ आहे. तुह्मीं सरकारचे चाकर देतील, अशी आमची खातरजमा
जें मिळविलें ते द्यावें, असें म्हणूं आहे. दुसरेही च्यार इष्टमित्र आहेत.
लागल्यास, शपथपूर्वक आह्मीहि समय जाणतील सर्व बरेंच आहे.
देणार, भ्रम मोठाले म्हणून अधिक- कलम १.
उणें मागूं लागल्यास, आमचे जवळ तुह्मी येथून तेथें गेलां. मार्गानें
द्यावयास नाहीं. कोणाचें कर्ज कसे सुखरुपतेनें गेलां किंवा कसें ?
करावयाचें नाहीं, व मिळतही नाहीं. भेटी कधीं कशा जाल्या ? कोणेस्थळी.
तेव्हां ईश्वरसत्तेनें जें दैवी असेल तें आहां? भेटीनंतर बोलणीं कशीं
घडो. आतां सर्वस्वदानांत मातुश्री जालीं? हा तपशील आम्हांस समजला
व तुह्मी बंधू यांचे विभाग आहेत. नाहीं. तुम्हीं लिहावा तोही लिहिला
त्याविषयीं बोलून पाहूं. नाहीं तरी, नाही. आम्हांस तिकडील वर्तमान
सर्वांचीहि गती एकानिमित्त अशी समजत नाहीं असें म्हटलें असतां,
होणार असल्यास होऊं, येविषयीं लोकांत कृत्रिम करितात असें
तुमचे आमचे बोलणें जातेसमयीं झालेंच येतें. तर जें तेथें आढळेल तें आम्हांस
आहे. यांत जसा प्रसंग घडेल, तसें व सरकारांत वरचेवर लिहित
तुह्मांस लिहूं. आह्मीं सरकारवाड्यांत जावें. याची मर्यादा येथून कोणी ग्रहस्थ
गेल्यावर भोंसल्याकडे येणें जाणें कोणी कामावर जाईल तोंपावेंतों
रा। नानासंबंधी काय कसें म्हणोन कामावर कोणी ग्रहस्थ जाणार,
ऐकवलें. पुरसीस जाली. जे असें आह्मीही ऐकतों. खरें असल्यास
वास्तवीक येणें जाणें तें आह्मींहि मागाहून समजेल. आम्हीं येथें
सांगितलें. कलम १ अडचणींत असूं, पत्र पावतें होणार
तुमच्या तिकडील मनस्वी बातम्या नाहीं, म्हणोन बहुदा लिहिलें नसेल,
येतात. तुह्मी तर कांहींच लिहित असें वाटतें. त्यांस चिंता नाहीं. सर्व
नाहीं. हें काय ? जे वास्तवीक लिहित जावें. पत्रें पावतील. उत्तरेंहि
असेल ते लिहित जावें. लिहिल्यास येत जातील. कलम १.
आंगावर येई असे करूं नये. माहि- इकडील वर्तमान तरी बरोबरचे
तगारीने लिहित जाणें, कलम १ व पुढील चालीचे वगैरे अर्थ तुम्हास
ती मातुश्री आयाबाई व सर्व येथेंच स्वारीसुद्धां बातम्यावरून व अकबारा-
आहेत. आठ पंधरा दिवशीं वरून समजत असेल. कलम १.
बाईस रवाना करावी, असा विचार आह्मीं सरकारवाड्यांत होतों.
आहे. मग पाहावें. कलम १. तेथें श्रीमंतांस विनंती केली. घरी
जाण्याची परवानगी जाली आहे. जात येत असावें, चार दिवस जाले. कळावें. कलम १
इत्यादिक गोष्टी इकडील तुह्मांस समजाव्या व तुह्मांकडील आह्मांस पुढे समजत जाव्या. नाहीं तरी, कोण करितात, हें न समजतां अनेक अंदेशे मनांत येतात. ह्मणोन तपशीलवार लिहिलें आहे. श्रीमंत पुण्यवान दयाळू आहेत. जो जशी निष्ठा ठेवील त्यास तसें फळ येईल, हें मनांत आणून जें करणें तें करीत जावें. याउपर पत्रें वरचेवर पाठवीत जावीं. रवाना छ १२ माहे रमजान. फालगुन शुद्ध १४ बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.
शेवेसी विसाजी बल्लाळ सां नमस्कार विनंति विशेष. लिखितार्थ परिसोन पत्राची उत्तरें समर्पक यावीं. कोणे गोष्टीविषयीं चिंता न करावी. श्रीरामचंद्राच्या इच्छेकरून सर्व पार पडतील. सर्वांचा सांभाळ करणार श्रीहरी आहे. विस्तार काय लिहूं ? हे विनंती.