Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३३ १६२२ फाल्गुन शुध्द १
अर्जदास्त दर बांदगी देसमुख व देसपांडे
पा। सुपे अर्ज मीरसानद ता। माहे रमजान पा। मजकूरची बखैर सलाबत असे साहेबसलामत पा। मा।ची हकीकत तर पहिले पा।मारी सेख महमद बकर दिवाण होता त्याने जे जे गाव आबाद होते ते ताजदीने वैरान केले त्या उपर साहेबाचे तरफेने हि सेखदार आले होते त्यास हि खातिरेस आणीत नवता या उपर साहेबी पा। मजकुरास गुलाबराय सेखदार पाठविले ते माहालास एऊन दाखल जाले तो गुलाबरायास बोलावणी पाठविली जे तुह्मी गावात आले आहा आण आपणास भेटले नाहीत तुह्मास काय पोहचत आहे आधीं आपणास भेटावे मग आपण जेणे प्रमाणे हुकूम फर्माऊन तेणे प्रमाणे अमल करावा ह्मणौनु भेटावया बोलाऊ पाठविले त्यावरी त्यानी जाब दिधला की आपण तुमचा चाकर नाही जे तुह्मास एऊन भेटोन मग तुह्मी अमल आमचे हवाले कराल तर आपण काही तुमचे चाकर नाही आपण ज्याचे चाकर आहों त्याचे हुकूम एऊन बैसलो आहो आण अमल करितो ह्मणौनु जाब दिधला त्या उपर दोन च्यार रोज पैगामापैगामी जाली त्या उपर एके रोजी गुलाबराव कचेरीस बैसले होते तो एकाएकी च वीस पचवीस सिपाही घेऊन जावयास पाठविले त्या उपर बहुत गोफ्तगो जाली या उपर डेरियास आले मागतमी दाहा वीस माणसे पाठऊन आपले कचेरीस नेवयास जपत होता तो गुलाबरायजी व आपण अज हजूर पुरनूर दरगाहास लस्करास गेलो जाऊन अदालतेस उभे राहोन हुकूम हाजी सद्दीखानावर घेतला त्यानी हुकूम केला की हा हुदा नोराबादेचे दिवाणाचा आहे त्याजवर हुकूम देऊन ह्मणौनु जाब दिल्हा त्याजवर मागती उदालतेस उभे राहोन हुकूम + + + + खानावर घेतला की एख्तयार + + + + + करून देणे त्याजवर हाजी सद्दीखानास अर्ज कितेक भातेने करून सेख महमद बकर दिवाणास मालीमामलियात दखल करावयास गरज नाही व पा। मा।स कौल लागले ढेपेचा व फौजदारास परवाना की करोडियाची दर बाबे कुमक करणे आण दिवाण ताजदी करू न पावे ऐसा परवाना घेऊन माहालास आलो त्याउपर मग सेख महमद बकराने पिछा सोडिया या उपर पा। मा।री तुमचे तरफेने अमल ऐसा जाला गुलाबरायाने बहुत पैरोशानी सोसून तुमचा अमल एथे बैसऊन बोलबाला केला आजितागाईत इथे अमलसा नवता त्यानी अमल ऐसा नांव केला गुलाबराय बहुत कामाचे माणूस आहे बहुत कारसाबाराह आहे ते आहे जर आणि एक एक दोन वरसे माहाली राहातील तर एथे तुमचा अमल बरा चालेल आण कारसाबाराह हि बरा च होईल साहेबी गुलाबरायास पाठविले बरा च माणूस + + + + होते परंतु तैसा च एथे अमल हि नकश हि बरा च केला
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ५७ ] अलीफ. १९ आगस्ट १७०७.
सर्व राजांत श्रेष्ठ, सर्व उमरावांत थोर, मुसलमानी धर्मरक्षक, राजे शाहू याणीं बादषाही कृपेचे उमेदवार होऊन जाणावें कीं, सांप्रत ईश्वर कृपेंकरून आमची फत्ते होऊन सिंहासनाधिरूढ झालो. तुमचे निष्ठेविशीचा मजकूर अमीरुल उमराव याणीं समजाविला. ऐशीयास तुह्मीं पेशजी प्रों। इकडील लक्षांत बागवोन मशारनिल्हे लिहितील तशी वर्तणूक करीत जावी. छ २ जमादिलाखर, सन १ जुलूस.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५०६
श्रीह्माळसाकांत.
१७२२ मार्गशीर्ष शुद्ध ९
राजश्री मोत्याजी कालगावडे गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो काशीराव होळकर रामराम विनंती उपरी. श्रीक्षेत्र प्रवरासंगम टोंकें व कायगांव तिरस्थळी गंगातीर, तेथें तुह्मीं मनस्वी उपद्रव देऊन ब्राह्मणथोर-ज्यांस श्रीमंत सामोरे येऊन महत्व राखून बहुत दिवस चालवीत आले. येवनादिकांनीही तिळप्राय तोशीस दिल्ही नाहींत्यांस तुह्मीं चाप लाऊन मारहाण अप्रतिष्ठा बहुत केली. कोणाची अब्रू राहू दिल्ही नाहीं ! आणि पुढेंही उपद्रव करतां, पैका मागतां. ऐशा बोभाट्याचें पत्र सरकारांत आलें व श्रीमंतास आलें. ऐशियास, क्षेत्रींचे ब्राह्मणास कोण्ही तिळप्राय उपसर्ग देत नाहींत, रखवालीच करितात. ( शिक्का ) व आपलेंही सरकारांतून कोणे वेळेसही उपद्रव द्यावयाची चाल नाहीं. ऐसें असतां, तुह्मीं मनस्वी वर्तणूक अरंभिली, याचें कारण काय ? याजकरितां येथून हुजरे व जासूद रवाना करून हें पत्र लिहिलें असे. तर पत्रदर्शनीं ब्राह्मण तिरस्थळीचे यांस काडीमात्र तोशीस न लावितां, जो काहीं ऐवज घेतला असेल, तो माघारीं देऊन ब्राह्मणांचे मानमहत्व राखून, त्यांची खातरी करून, तेथें मुक्काम न करितां कूच करून जाणें. या अन्वयें न घडल्यास, परिछिन्न उपयोगीं पडणार नाहीं. येविशीं श्रीमंतांची निक्षूण ताकीद आहे. दुसरे पत्राचा आक्षेप न करितां, ब्राह्मणाचा बोभाट येऊ नये. रा। छ ७ रजब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ५६ ] अलीफ. २३ जून १७०७.
सर्व शूरांत श्रेष्ठ, सर्व उमरावात थोर, इस्लामीधर्मरक्षकाचे पुत्र, रोज शाहू याणीं पातशाही कृपेते सतोषी होऊन जाणावें की- तुह्माकडील रायभान वकील याणीं विनंति केली जे, तुह्मी आपले जहागिरीचे महालीं आल्यानतर इकडे यावयाचा इरादा केला आहे, याजकरिता राणीनें जमीदारीचा फर्मान मिळावा ह्मणोन कृत्रिमाने अर्जी लिहिली होती. तिला व तिचे चिरंजीवास कपटी समजोन त्याचें उत्तर दिल्हें नाहीं. कारण कीं, आमचे मुलकांतील राज्य व जमीदारी तुह्मांकडे असावी आणि तुह्मी आपले वडिलांप्रमाणे तेथें कायम रहावें. नंतर जे किल्ले थोरले पातशाहींतील त्या वेळेस हातीं आले नउते तेहि फौज पाठवून घ्यावे. जाणोन तुह्मी आत्मिक असें समजोन हा फर्मान पंज्यासुद्धां लिहिला आहे तरी तुह्मीं आपले फौजेसुद्धां जलद येथें येऊन पोहोचणें. ह्मणजे तुह्मावरी कृपा आणि लोभ वारंवार उत्कृष्ट होईल. छ ४ माहे रबिलाखर, सन १ जुलूस.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ५५ ] अलीफ. १९ मे १७०७.
राजे शाहू याणीं बादशाही कृपेचे उमेदवार होऊन जाणावें कीं, तुमचें पत्र पावून लोभास कारण झालें. तुह्मास मनसब व दहा हजारी स्वाराची सरदारी दिली असे व बाकीचे व तुमचे सर्व मा। सैद अबदुलखान बहादुर कुतुबुलमुलुख याजकडे सांगितलें आहे त्याप्रों। अमलांत आणावें आणि आपला वकील एक तुमचें येणें येथें होई त्यापूर्वीं पाठवून द्यावा, ह्मणजे मनसबेच्या सनदा सरकारांतून तयार करविल्या जातील. छ २७ सफर, सन १ जुलूस.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५०५
श्री.
१७२२ मार्गशीर्ष शुद्ध ८
आसीर्वाद उपरी येथील वर्तमान मार्गशीर्ष शुद्ध ८ इंदुवार पावेतों यथा.
स्थित असे विशेष. येथील वर्तमान तरीः मोत्याजी कालगावडा याची फौज आठ दाहा हजार पावेतों आली. टोकेंकरास खंडणीचे चार हजार रुपये पडले. शिवाय ++ आठसें रुा प्रवरासंगम येथील साडे सातसें कायेगांवचे ऐन तीन हजार सिवाय दरबार खर्चाचे रुा पांचसे सिवाय ताकीदार वगैरे मिळोन दोनसें रुापर्यंत खर्च लागले. यासी पट्टी सर्वं ग्रामस्त सरकारसुद्धां साडे तीन हजार पर्यंत केली आहे. त्यांत मराठे व भिडे व थथे व नरसिंह जोशी वे ऋषी यांचे खंड मात्र आहेत. तूर्त ऐवज येत नाहीं. बाकी कमकसर पट्टी वसूल येईल. ठरावांत भरणा होत आहे. लष्कराचा मुकाम आठ दिवस आहे, ह्मणून बोलवा आहे. चिरंजीव राजश्री हरभटदादा येथें आले होते. त्यांचे भेटीस बापू अमृतराव व गोपाळपंत असे आले होते. रवानगीविशीं कांहीं ह्मणत होते. परंतु गडबडीमुळें कांहीं सोय न जाली. दादा पंचमीस पैठणास गेले. बापूसुद्धां मंडळी नांदगांवीं गेली. गडबडी ++ चिरंजीव सो मैनास व मुलीस * साता-यास पाठविल्या. समागमें कापड व कांहीं दप्तरें अशी पाठविलीं. मी पंचमीस जाणार. परंतु गडबडीमुळें जाणें ने जालें. वरकड आह्मीं सावध आहों, टोकेंकर कांहीं ग्रहस्थ स्थलांतरास गेले ! कळावें. बहुत काय लिहिणें, हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५०४
श्री
१७२२ कार्तिक मार्गशीर्ष,
यादी मौजे कायगांव व मौजे कांठी पिंपळगांव पो गांडापूर हे दोन्ही गांव वेदशास्त्रसंपन्न राजश्री रामचंद्र दीक्षित व लक्ष्मीनारायण दिक्षित यांजकडे सरकारांतून इनामी आहेत. दोन्ही गांवांवर मोत्याजी गावडे यांनी फौज सुद्धां येऊन दंगा करून जबरदस्तीनें ऐवज घेतला, बितपशील रु. २००० मौजे कायगांव सुा मयातैन सन १२०९ चे सालीं अजमासें खर्चसुद्धां व चें नुकसानीसुद्धा १००० मौजे कांठी पिंपळगांव सुरसन मयतैन सन १२०९.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३२ १६२१
शाहाजादे महमद बेदारबख्त
दा। बो। मोकदमानि मौजे वांकी पा। सुपे सु॥ सन ११०९ कारणे कबूल कतबा लेहून दिल्हा ऐसा जे मौजे मजकुरास सालमजकुरी बटाईचा कौल दिधला होता त्यास पाउसाने कमी केली व गनीम रामराजा आला त्याच्या लस्कराने तमाम धामधूम करून महसूल चारून लुटून फना केला त्यावर त्याचे तंबीस हजरत आले त्यांच्या हि लस्कराने कुल पायमाली जाली याकरिता काही हाल रयतीमधे राहिला नाही त्यास मौजेमा।चा माल आकार जाला त्यावर जागीरदार साहेबी सन १११२ मधे राजश्री दाद प्रभु यासि साहेबयख्तयारी देऊन पाठविले की मौजे मा।चा हाल अहवाल ऐवज मालवज पाहोन जमाबदी मुशकस करणे त्यावरून आपणास हजूर बोलाऊन जमाबदीचे बाबे रजा फर्माविली तर साहेबी आपला हाल अहबवाल ऐवज मालवज पाहोन खातिरेस आणून जमा मुशकश केलिया उगवणी करून त्यावर आपले बाबे देसमुख देसपांडे पा। मजकूर यानी आपला हाल अहवाल ऐवज मालवज जाहीर केला तो साहेबी खातिरेस आणून कुलबाब कुलकानू काळी पाढरी साल तमाम बील मख्ताहाय बटा जमा मुशकस केली त्याची उगवणी करून मा। जमा बिलमख्ता रु॥
२९७
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५०३
श्रीनाथप्रा.
१७२२ कार्तिक वद्य १४
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नारायण दीक्षित ठकार स्वामीचे सेवेसीः-
सेवक दौलतराव सिंदे दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहिणें. विशेष. मौजे माहागांव येथील बाळाजी बिन फुरंगोजी व सुलतानजी बिन मानाजी व राणोजी बिन धोंडजी चव्हाण पाटील यांची पाटीलकी पूर्वीची असतां, अलीकडे सुलतानजी बिन मुरारजी व आपाजी बिन सलतानजी व मुरारजी बिन सुलतानजी लाड यांणीं धटाईनें पाटीलकीचा सोळावा हिस्सा देतात. अलीकडे त्यांतही खलेल केली ह्मणोन समजलें. त्यावरून हें पत्र आपणांस लिहिलें असे. तरी आपण लाड यासी बरें वजेनें ताकीद करून चव्हाण याची पाटीलकी सुदामत पासून चालत आली आहे, त्याप्रों चालवीत, तें करावे. येविसी पुन्हां बोभाट न ये तें करावें. रा छ २७ जमादिलाखर, सुा इहिदे मयातैन व अलफ, * बहुत काय लिहिणे ? हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५०२
श्री
१७२२ आश्विन शुद्ध १
श्रीमंत महाराज राजश्री बाबासाहेब स्वामींचे सेवेसीः-
विनंती सेवक नारायण बाबुराव वैद्य कृतानेक सा नमस्कार विज्ञापन ता। छ २९ जावल मुकाम नागपूर येथेx स्वामीचे कृपाकटाक्षेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. मजवर संकटाचा समय प्राप्त जाहला. या जकरितां आपलें वर्तमान स्वामीस समजावें म्हणोन, चिरंजीव सदाशीव लक्ष्मण जोशी यांनी तपशिलें लिहिले आहे. त्याचें मनन कृपा करून समक्ष होऊन माझें संकट दूर होय, अशी आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. दुसरी गत पायांशिवाय नाहीं. व मीही जाणत नाहीं. ये विषयीं आर्या श्लोकः-
त्वं मम जननी जनकस्त्वमेव बंधुः कुलंच शीलंच ।
त्वयि निष्ठुरतां याते तृणमपि वज्रायते मयीशान ।। १ ।।
फार काय लिहूं ? सेवसीश्रुत होय हे विज्ञापना.