पत्रांक ४७९
श्रीलक्ष्मीकांत. १८१९
राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। रघोजी भोंसले सेनासाहेबसुमा दंडवत उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. तेथील लिहिला मजकूर कळला. त्यास, तुह्मीं तेथील प्रसंगास आहां, तेव्हां याचप्रमाणें वरचेवरी पत्र पाठऊन वर्तमान लिहीत जावें. वरकड येथून नवल विशेष ल्याहावें, ऐसें नाहीं. यापूर्वी तुह्मांकडेस पत्रें पाठविलीं आहेत. त्यांचे उत्तराची मार्गप्रतीक्षा करोन असों. सांप्रतहि जो मजकूर लिहिणें, तो राजश्री सदाशिव बापूजी यांसीं लिहिला आहे. तुह्मांसी बोलतील, त्यावरून *