पत्रांक ४८५
श्री. १७२१ आषाढ शुद्ध १
राजश्री रंगराव महादेव गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। दवलतराव सिंदे दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. राजश्री आपाजी मुधाजी यांजपासून तुह्मीं रसदेचा ऐवज घेऊन, पो धर्मपुरा हा माहाल सांगितला. त्यास, अलिकडे राजश्री आनंदराव पवार यांचें तुमचें चित्त शुद्ध नाहीं. सा। पवार यांणीं आपाजी मुधाजीकडून माहाल काढिला आणि रसदेचा ऐवज त्यांजपासून घेतला. त्याचा फडशा तुमचे विद्यमानें जाहला नाहीं, ह्मणोन विदित जाहलें. त्यावरून हें पत्र तुह्मांस लिहिलें असे. तरी माहाल मा।रनिलेकडे कायम ठेऊन वहिवाट घ्यावी. हे न जाल्यास रसदेचा ऐवजाचा... व्याजसुद्धां तुह्मीं आपलेतर्फे फडशा ...लाऊन ऐवज ......फडशा करावा. रा छ १७ सफर, सु।। मयातैन व अल्लफ. बहुत काय
लिहिणें ? हे विनंति. मोर्तबसुद.