लेखांक २९ श्री १६१९ आषाढ शुध्द १३
इजती असार रामाजी बाबाजी व देवाजी त्रिंबक देशपांडे पा। सुपे सन हजार ११०७ मालूम दानद की सैद जलील सावकार याचे कर्ज सरकारी आहे सदरहू ऐवजास प्रगणेमजकूरचे गाव देविले असेती त्याची सनद पेशजी अलाहिदी चालिली आहे बिता।
नाझर कुंभारवाडा मौजे मावडी
१ १ १
एकूण तीन गांव देविले असेती सदरहू गावीचा जो टकापैकी उसूल होईल तो महमदबेग दि॥ माइले पाठविले असेती याचे हवाले करणे सदरहू गावीचा टकापैका सावकाराखेरीज तफरका न होए ते करणे जे गोस्टीने सावकार आह्मासी रुजू हो तो ऐसे करणे सावकारमजकूर आमचा खजाना आहेती जे वेळेस दरकार होतो ते वेळेस कार्यास एताती या करिता हे काम जरूर ह्मणून तुह्मास लि॥ असे सरजाम करणे रा। छ ११ जिल्हेज
फारसी